(फेब्रुवारी 13, 2019 रोजी अद्यावत केलेले)
भारतामधील विदेशी मुद्रेतील व्यवहारांचे प्रशासनासाठीचा कायदेशीर साचा, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 द्वारे उपलब्ध करण्यात आला आहे. जून 1, 2000 पासून जारी झालेल्या विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 (फेमा) खाली, विदेशी मुद्रेतील सर्व व्यवहारांचे वर्गीकरण भांडवली किंवा चालु खाती व्यवहार असे करण्यात आले आहे. एखाद्या निवासी व्यक्तीने केलेले, व भारताबाहेरील आकस्मिक जबाबदा-यांसह, त्याचे/तिचे अॅसेट्स किंवा जबाबदा-या ह्यात बदल न करणारे सर्व व्यवहार, चालु खात्यातील व्यवहार आहेत.
फेमाच्या कलम 5 अन्वये, भारतात निवासी असलेल्या व्यक्ती1, केंद्र सरकारने ज्यासाठी विदेशी मुद्रा काढण्यास मनाई केली आहे असे व्यवहार सोडल्यास - जसे, लॉटरीच्या बक्षिसाची रक्कम प्रेषण करणे, रेस/रायडिंग मधील किंवा अन्य एखाद्या छंदापासून मिळालेले उत्पन्न प्रेषण करणे, लॉटरीची तिकिटे, बंदी घातलेली/विहित केलेली मासिके, फूटबॉल पूल्स, स्वीपस्टेक्स इत्यादि खरेदी करण्यासाठी प्रेषणे करणे, डिव्हिडंड बॅलन्सिंग लागु असलेल्या कोणत्याही कंपनीद्वारा डिव्हिडंडचे प्रेषण, चहा व तंबाखूच्या निर्यातीच्या इनव्हॉईस मूल्यावर 10% पर्यंतचे कमिशन सोडल्यास, रुपी स्टेट क्रेडिट रुटखाली, निर्यातीवर कमिशन देणे, भारतीय कंपन्यांच्या विदेशातील संयुक्त उद्योग/संपूर्ण मालकीच्या दुय्यम संस्था मधील इक्विटी गुंतवणुकींच्या रुपातील निर्यातीवरील कमिशन प्रदान करणे, अनिवासी स्पेशल रुपये (खाते) योजनेतील निधीवरील व्याजाचे उत्पन्न प्रेषण करणे व टेलिफोन्सच्या ‘कॉल बॅक’ सेवांशी संबंधित प्रदान करणे - कोणत्याही चालु खाते व्यवहारासाठी विदेशी मुद्रेची खरेदी व विक्री करण्यास मुक्त आहेत.
विदेशी मुद्रा व्यवस्थापन (चालु खाते व्यवहार) नियम, 2000 - अधिसूचना (जीएसआर क्र. 381(ई) दि. मे 3, 2000) व अधिसूचना जीएसआर क्र. 426(ई) दि. मे 26, 2015 मध्ये दिल्यानुसार ह्या नियमांचे सुधारित शेड्युल 3, कार्यालयीन राजपत्रात तसेच आमच्या वेबसाईटवर www.rbi.org.in उपलब्ध असलेले, ‘इतर प्रेषण सुविधा’ वरील आमच्या महानिर्देशात जोडपत्र म्हणून उपलब्ध आहे.
हे एफएक्यु, ह्या विषयावर, युजर्सना असलेल्या सामान्य प्रश्नांची उत्तरे सहज समजणा-या भाषेत देण्याचा प्रयत्न करतात. तथापि, एखादा व्यवहार करण्यासाठी, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 (फेमा) आणि त्याखाली देण्यात आलेले विनियम/नियम किंवा सूचनांचा संदर्भ घेतला जावा.
प्रश्न 1 :- युएसडी 2,50,000 ची उदारीकृत प्रेषण योजना (एलआरएस) काय आहे ? |
प्रश्न 2 :- ह्या योजनेखाली मनाई असलेल्या बाबी कोणत्या ? |
प्रश्न 3 :- फेम (कॅट) सुधारणा नियम, 2015 खाली एखादी निवासी व्यक्ती विदेशी मुद्रा सुविधा मिळवू शकेल असे कोणते हेतू आहेत ? |
प्रश्न 4 :- एलआरएस खाली, निवासी व्यक्तींनी, विदेशातील ठेवी/गुंतवनुकीवरील उपार्जित व्याज/डिव्हिडंड ह्यांचेही प्रत्यावर्तन मुद्दलाच्या व्यतिरिक्त करणे आवश्यक आहे काय ? |
प्रश्न 5 :- कुटुंबातील सभासदांच्या बाबतीत एलआरएसखालील प्रेषणे एकत्रित करता येऊ शकतात काय ? |
प्रश्न 6 :- एडीने, व्यवहाराच्या स्वरुपावर प्रेषणाची परवानगी देणे ठेरवावे की प्रेषणर्कत्याने दिलेल्या घोषणापत्रावर आधारित प्रेषण करावे ? |
प्रश्न 7 :- ह्या योजनेखाली बाह्य प्रेषणे पाठविण्यासाठी निवासी व्यक्तींनी परमनंट अकाऊंट नंबर (पॅन) असणे अनिवार्य आहे काय ? |
प्रश्न 8 :- प्रेषणांच्या वारंवारतेवर काही निर्बंध आहेत काय ? |
प्रश्न 9 :- निवासी व्यक्ती (परंतु भारतात कायम निवासी नसलेली), कर वजावट केल्यानंतरचे नक्त वेतनाचे प्रेषण करु शकते. तथापि, नक्त वेतन म्हणून युएसडी 2,50,000 ची प्रेषण मर्यादा संपलेली असल्यास, ती व्यक्ती एलआरएस खाली इतर उत्पन्नाचे प्रेषण करु इच्छित असल्यास, तसे करणे, युएसडी 2,50,000 ह्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याने त्यासाठी परवानगी असेल काय ? |
प्रश्न 10 :- एपी डीआयआर परिपत्रक 106, दि. जून 1, 2015 च्या परिच्छेद 5.4 निर्देशित करतो की भांडवली खाते व्यवहारांसाठीचे प्रेषण करण्याआधी किमान एक वर्ष तरी, अर्जदाराचे खाते त्या बँकेत ठेवले जाणे गरजेचे आहे. हा निर्बंध, चालु खाते व्यवहारांनाही लागु आहे काय ? |
प्रश्न 11 :- परवानगी असलेल्या चालु खाते व्यवहारांसाठी, मॉरिशस व पाकिस्तानमध्ये प्रेषण करण्याबाबत काही निर्बंध आहेत काय ? |
प्रश्न 12 :- प्रेषणर्कत्याने कोणत्या आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत ? |
प्रश्न 13 :- ही प्रेषणे केवळ युएस डॉलर्स मध्येच केली जाऊ शकतात काय ? |
प्रश्न 14 :- ग्राहकांना विदेशातील गुंतवणुकी उपलब्ध करण्यासाठी मध्यस्थ संस्थांनी विशिष्ट मंजुरी घेणे आवश्यक आहे काय ? |
प्रश्न 15 :- एखाद्या व्यक्तीकडून गुंतवणुक केली जाऊ शकेल अशा कर्ज किंवा इक्विटी संलेखाच्या प्रदानावर/दर्जावर काही निर्बंध आहेत काय ? |
प्रश्न 16 :- निवासी व्यक्तींसाठी, एडी बँकांकडून, भारतीय रुपयांमध्ये किंवा विदेशी मुद्रेत कर्ज सुविधा (निधी आधारित असलेली किंवा निधी आधारित नसलेली) देता येऊ शकतात काय ? |
प्रश्न 17 :- एलआरएसखाली, बँकर्स, निवासी व्यक्तींसाठी, भारतात विदेशी मुद्रा खाती उघडू शकतात काय ? |
प्रश्न 18 :- ह्या योजनेखाली, निवासी व्यक्तींनी विदेशी मुद्रेतील खाती उघडण्यासाठी भारतामधील एखाद्या ऑफशोअर बँकिंग युनिटला (ओबीयु), भारताबाहेरील बँकेच्या शाखेसमान (अॅट पार) समजण्यात येऊ शकते काय ? |
प्रश्न 19 :- फेम (कॅट) सुधारणा नियम, 2015 च्या शेड्युल 3 च्या परिच्छेद 1 मध्ये दिलेल्या हेतूंसाठी विदेशी मुद्रेची निकासी/प्रेषण करण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत ? |
प्रश्न 20 :- चरितार्थासाठीच्या प्रेषणांसह, सर्व जावक प्रेषणांमध्ये, 15 सीए, 15 सीबी हे कागदपत्र घेणे आवश्यक आहे काय ? |
प्रश्न 21 :- एलएलपीच्या लाभासाठीच उच्च शिक्षण घेत असलेल्या एलएलपीच्या भागीदारांचा शिक्षण खर्च भागविण्यासाठी, त्या एलएलपीने केलेला खर्च, अशा व्यक्तींच्या (भागीदार) एलआरएस मर्यादेच्या बाहेर असेल काय ? |
प्रश्न 22 :- एलआरएसखाली एकमेव मालकाने केलेल्या प्रेषणावरील स्पष्टीकरण. |
प्रश्न 23 :- एलआरएसखाली प्रेषणे करण्यासाठी भारताबाहेरील बँकेत विदेशी मुद्रा खाते उघडणे, ठेवणे व धारण करणे ह्यासाठी पूर्व मंजुरी आवश्यक आहे काय ? |
प्रश्न 24 :- (इंडिव्हिज्युअल) व्यक्ती व्यतिरिक्त अन्य व्यक्तींसाठी, फेम (कॅट) सुधारणा नियम, 2015 च्या शेड्युल 3 खाली कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ? |
प्रश्न 25 :- एखादी निवासी व्यक्ती, त्या निवासी व्यक्तीचा जवळचा नातेवाईक असलेल्या एनआरआय/पीआयओला, क्रॉस्डचेक/इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फरने, रुपयांमधील कर्ज देऊ शकते काय ? |
प्रश्न 26 :- एखादी निवासी व्यक्ती, त्या निवासी व्यक्तीचा जवळचा नातेवाईक असलेल्या एनआरआय/पीआयओला, क्रॉस्डचेक/इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फरने, रुपयांमधील देणगी देऊ शकते काय ? |
प्रश्न 1 :- युएसडी 2,50,000 ची उदारीकृत प्रेषण योजना (एलआरएस) काय आहे ?
उत्तर :- ह्या उदारीकृत प्रेषण योजनेखाली, अल्पवयीनांसह, सर्व निवासी व्यक्तींना, परवानगी असलेल्या कोणत्याही चालु किंवा भांडवली खाते व्यवहारासाठी किंवा दोन्हींच्या संयोगासाठी, प्रति वित्तीय वर्ष (एप्रिल - मार्च) युएसडी 2,50,000 पर्यंतचे प्रेषण मुक्तपणे करण्याची परवानगी आहे. ह्याशिवाय, निवासी व्यक्ती, फेम (कॅट) सुधारणा नियम 2015 दि. मे 26, 2015 च्या शेड्युल 3 च्या परिच्छेद 1 मध्ये निर्देशित केलेल्या हेतूंसाठी, 3 युएसडी 2,50,000 च्या मर्यादेमध्ये विदेशी मुद्रा सुविधा मिळवू शकतात.
ही योजना, युएसडी 25,000 च्या मर्यादेसह फेब्रुआरी 4, 2004 रोजी सुरु करण्यात आली होती. त्यानंतर प्रचलित व्यक्ती व समष्टी आर्थिक स्थितीनुसार ही एलआरएस मर्यादा टप्प्याटप्प्याने सुधारित करण्यात आली आहे.
प्रेषणकर्ता अल्पवयीन असल्यास एलआरएसच्या घोषणापत्राच्या फॉर्मवर त्या अल्पवयीन व्यक्तीच्या नैसर्गिक पालकाने सही करणे आवश्यक आहे. ही योजना, कॉर्पोरेट्स, भागीदारी कंपन्या, एचयुएफ, ट्रस्ट इत्यादींसाठी उपलब्ध नाही.
प्रश्न 2 :- ह्या योजनेखाली मनाई असलेल्या बाबी कोणत्या ?
उत्तर :- ह्या योजनेखालील प्रेषण सुविधा पुढील गोष्टींसाठी उपलब्ध नाही.
(1) शेड्युल 1 खाली खास मनाई केलेल्या हेतूंसाठी प्रेषण (जसे लॉटरीची तिकिटे/स्वीप स्टेक्स, विहित केलेली मासिके इत्यादि) किंवा विदेशी मुद्रा व्यवस्थापन (चालु खाते व्यवहार) नियम, 2000 च्या शेड्युल 2 खाली निर्बंधित केलेल्या कोणत्याही बाबतीसाठी प्रेषण.
(2) विदेशातील एक्सचेंजेस/विदेशातील प्रति पक्ष ह्यांना मार्जिन्स किंवा मार्जिन साठी भारतामधून प्रेषणे.
(3) विदेशातील सेकंडरी मार्केटमध्ये, भारतीय कंपन्यांनी दिलेल्या एफसीसीबींची खरेदी करण्यासाठी प्रेषणे.
(4) विदेशामध्ये विदेशी मुद्रेमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी प्रेषणे.
(5) फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) कडून वेळोवेळी ‘असहकारी देश व प्रदेश’ म्हणून ओळखण्यात आलेल्या देशांना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे भांडवली खाते प्रेषणे.
(6) रिझर्व बँकेने, बँकांना वेगळ्याने कळविल्यानुसार, दहशतवादी कृत्ये करण्याची जोखीम म्हणून ओळखले जाणा-या व्यक्ती व संस्थांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रेषणे.
प्रश्न 3 :- फेम (कॅट) सुधारणा नियम, 2015 खाली एखादी निवासी व्यक्ती विदेशी मुद्रा सुविधा मिळवू शकेल असे कोणते हेतू आहेत ?
उत्तर :- वित्तीय वर्ष धर्तीवर व्यक्ती, युएसडी 2,50,000 पर्यंतच्या एलआरएस मर्यादेत, पुढील हेतूंसाठी विदेशी मुद्रा सुविधा मिळवू शकतात.
(1) कोणत्याही देशाला खाजगी भेटी (नेपाळ व भूतान सोडून)
(2) देणगी किंवा बक्षीस
(3) इमायग्रेशन
(5) जवळच्या नातेवाईकांच्या परदेशातील चरितार्थ
(6) व्यवसायासाठी प्रवास, किंवा एखाद्या कॉनफरन्स किंवा विशेष प्रशिक्षणासाठी हजर राहणे किंवा विदेशातील औषधोपचारांच्या खर्चासाठी किंवा चेकअपसाठी किंवा वैद्यकीय उपचारांसाठी/चेकअपसाठी विदेशात जाणा-या रुग्णाबरोबर सहाय्यक म्हणून.
(7) विदेशातील वैद्यकीय उपचारांसंबंधीचा खर्च.
(8) विदेशातील शिक्षण
(9) फेमा 1999 मधील चालु खात्याच्या व्याख्येखाली न आलेले अन्य कोणतेही चालु खाते.
फेम (कॅट) नियम, 2000 च्या शेड्युल 1, 2 किंवा 3 खाली किंवा फेमा 1999 मध्ये सुधारित किंवा व्याख्या केल्यानुसार मनाई/निर्बंध न घालण्यात आलेल्या सर्व अवशिष्ट चालु खाते व्यवहारांसाठी, एडी बँक, आरबीआयच्या परवानगीशिवायच प्रेषणाचा व्यवहार करु शकते. त्या व्यवहाराच्या खरेपणाविषयी एडीनेच स्वतःचे समाधान करुन घ्यावयाचे आहे.
प्रश्न 4 :- एलआरएस खाली, निवासी व्यक्तींनी, विदेशातील ठेवी/गुंतवनुकीवरील उपार्जित व्याज/डिव्हिडंड ह्यांचेही प्रत्यावर्तन मुद्दलाच्या व्यतिरिक्त करणे आवश्यक आहे काय ?
उत्तर :- नाही. ह्या योजनेखाली केलेल्या पोर्टफोलियो गुंतवणुकींमधून मिळविलेले उत्पन्न निवेशक ठेवू व पुनः गुंतवू शकतो.
तथापि, एखाद्या निवासी व्यक्तीने, एलआरएस मर्यादेत, भारताबाहेरील संयुक्त उद्योग किंवा संपूर्ण मालकीच्या दुय्यम कंपनीच्या इक्विटी शेअर्समध्ये व सक्तीने परिवर्तनीय प्रिफरन्स शेअर्समध्ये विदेशी थेट गुंतवणुक केली असल्यास त्याने/तिने, वेळोवेळी सुधारित केलेल्या विदेशी मुद्रा व्यवस्थापन (विदेशी सिक्युरिटीचे हस्तांतरण किंवा देणे) विनियम 2004 च्या अधिसूचना क्र. 263/आरबी - 2013 दि. ऑगस्ट 5, 2013 खाली विहित केलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे.
प्रश्न 5 :- कुटुंबातील सभासदांच्या बाबतीत एलआरएसखालील प्रेषणे एकत्रित करता येऊ शकतात काय ?
उत्तर :- ह्या योजनेच्या अटी व शर्तींचे पालन कुटुंबामधील वैय्यक्तिक सभासदांनी केले असल्यासच, जवळच्या कुटुंब सभासदांच्या बाबतीत ह्या सुविधेखालील प्रेषणे एकत्रित केली जाऊ शकतात. तथापि, इतर कुटुंब सभासदांकडून भांडवली खाते व्यवहारांसाठी, बँक खाते उघडणे/गुंतवणुक/मालमत्ता खरेदीसाठी व ते/ती गुंतवणुक/मालमत्ता/विदेशातील बँक खाते ह्यांचे सह-मालक/सह-भागीदार नसल्यास, प्रेषणांचे क्लबिंग (एकत्रीकरण) करण्यास परवानगी नाही. ह्याशिवाय, एक निवासी व्यक्ती दुस-या निवासी व्यक्तीला (जिचे एलआरएसखाली विदेशात विदेशी मुद्रेत खाते आहे) विदेशी मुद्रेत देणगी देऊ शकत नाही.
प्रश्न 6 :- एडीने, व्यवहाराच्या स्वरुपावर प्रेषणाची परवानगी देणे ठेरवावे की प्रेषणर्कत्याने दिलेल्या घोषणापत्रावर आधारित प्रेषण करावे ?
उत्तर :- प्रेषणर्कत्याने फॉर्म ए2 मध्ये दिलेल्या घोषणेनुसार व्यवहाराचे स्वरुप एडी स्वीकारील व त्यानंतर प्रमाणित करील की ते प्रेषण रिझर्व बँकेने वेळोवेळी ह्याबाबत दिलेल्या सूचनांनुसारच आहे. तथापि, विद्यमान फेमा नियम/विनियमांचे अनुपालन करण्याची खात्री करुन घेण्याची अंतिम जबाबदारी प्रेषणर्कत्याचीच आहे.
प्रश्न 7 :- ह्या योजनेखाली बाह्य प्रेषणे पाठविण्यासाठी निवासी व्यक्तींनी परमनंट अकाऊंट नंबर (पॅन) असणे अनिवार्य आहे काय ?
उत्तर :- होय. प्राधिकृत व्यक्तींमार्फत एलआरएस खाली केलेल्या सर्व व्यवहारांसाठी, निवासी व्यक्तीने त्याचा/तिचा परमनंट अकाऊंट नंबर (पॅन) देणे अनिवार्य आहे.
प्रश्न 8 :- प्रेषणांच्या वारंवारतेवर काही निर्बंध आहेत काय ?
उत्तर :- एलआरएस खालील प्रेषणांच्या वारंवारतेवर कोणतेही निर्बंध नाहीत. तथापि, एका वित्तीय वर्षामध्ये, भारतामधील सर्व स्त्रोतांमधून खरेदी केलेले किंवा प्रेषण केलेले विदेशी चलन युएसडी 2,50,000 च्या संचयित मर्यादेमध्ये असणे आवश्यक आहे.
वित्तीय वर्षामध्ये युएसडी 2,50,000 पर्यंतच्या रकमेचे प्रेषण केले गेल्यावर, गुंतवणुकीचे उत्पन्न देशात परत आणले असले तरीही, ह्या योजनेखाली आणखी प्रेषणे करण्यास निवासी व्यक्ती पात्र असणार नाही.
प्रश्न 9 :- निवासी व्यक्ती (परंतु भारतात कायम निवासी नसलेली), कर वजावट केल्यानंतरचे नक्त वेतनाचे प्रेषण करु शकते. तथापि, नक्त वेतन म्हणून युएसडी 2,50,000 ची प्रेषण मर्यादा संपलेली असल्यास, ती व्यक्ती एलआरएस खाली इतर उत्पन्नाचे प्रेषण करु इच्छित असल्यास, तसे करणे, युएसडी 2,50,000 ह्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याने त्यासाठी परवानगी असेल काय ?
उत्तर :- निवासी व्यक्ती (परंतु भारतात कायम निवासी नव्हे), ज्यांनी आपले सर्व उत्पन्न/मिळकत व वेतन ह्यांचे प्रेषण केले असून ह्याशिवाय ‘इतर उत्पन्नाचे’ ही प्रेषण करु इच्छित असल्यास, त्यांनी त्यांच्या एडी बँकेमार्फत, कागदपत्रांसहित आरबीआयकडे विचारात घेण्यासाठी आरबीआयकडे जावे.
प्रश्न 10 :- एपी डीआयआर परिपत्रक 106, दि. जून 1, 2015 च्या परिच्छेद 5.4 निर्देशित करतो की भांडवली खाते व्यवहारांसाठीचे प्रेषण करण्याआधी किमान एक वर्ष तरी, अर्जदाराचे खाते त्या बँकेत ठेवले जाणे गरजेचे आहे. हा निर्बंध, चालु खाते व्यवहारांनाही लागु आहे काय ?
उत्तर :- नाही. ह्यामागील कारणमीमांसा म्हणजे, फेम (कॅट) सुधारणा नियम, 2015 च्या शेड्युल 3 खाली, खाजगी व व्यावसायिक सहलींसाठी, ज्या एफएफएमचीकडूनही दिल्या जाऊ शकतात. चालु खाते व्यवहारांसाठी, प्रेषण सुविधा युएसडी 2,50,000 ह्या एलआरएस मर्यादेपर्यंत आहे. एफएफएमसी प्रेषणर्कत्यांची खाती ठेवू शकत नसल्याने, ही तरतुद (वरील परिपत्रकाच्या परिच्छेद 5.4 मध्ये दिलेली) केवळ भांडवली खाते व्यवहारांपुरतीच सीमित ठेवण्यात आली आहे. तथापि, एफएफएमसींनी खात्री करुन घ्यावी की, चालु खाते व्यवहार करण्यास परवानगी देण्यापूर्वी, ‘तुमचा ग्राहक जाणा’ च्या मार्गदर्शक तत्वांचे व जारी असलेल्या अँटी मनी लाँडरिंग नियमांचे पालन करण्यात आले आहे.
प्रश्न 11 :- परवानगी असलेल्या चालु खाते व्यवहारांसाठी, मॉरिशस व पाकिस्तानमध्ये प्रेषण करण्याबाबत काही निर्बंध आहेत काय ?
उत्तर :- नाही. मॉरिशस व पाकिस्तान मध्ये चालु खाते व्यवहारांसाठी प्रेषणे करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत.
वित्तीय कारवाई कृती दलाकडून एफएटीएफ वेळोवेळी ‘सहकार्य न करणारे देश व प्रदेश’ म्हणून ओळखले गेलेल्या देशांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केलेली प्रेषणे आणि रिझर्व बँकेने बँकांना वेगळ्याने कळविल्यानुसार दहशतवादी कृत्ये करण्याबाबत लक्षणीय जोखीम म्हणून समजण्यात आलेल्या व्यक्ती व संस्था ह्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रेषणे करण्यास परवानगी नाही.
प्रश्न 12 :- प्रेषणर्कत्याने कोणत्या आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत ?
उत्तर :- जिच्या मार्फत सर्व भांडवली खाते प्रेषणे केली जाणार आहेत अशा एका एडीच्या शाखेची नेमणुक संबंधित व्यक्तीने करावी. प्रेषण करण्याआधी किमान एक वर्षासाठी त्या अर्जदाराने तेथे बँक खाते ठेवणे आवश्यक आहे.
परवानगी असलेल्या चालु खाते व्यवहारांबाबतच्या प्रेषणांसाठी, असे प्रेषण करणारा अर्जदार त्या बँकेचा नवा ग्राहक असल्यास, प्राधिकृत डीलर्सनी ते खाते उघडणे, चालविले जाणे व ठेवले जाणे ह्याबाबत ड्यु डिलिजन्सची प्रक्रिया केली पाहिजे. ह्याशिवाय, त्या एडीने अशा ग्राहकाच्या निधीच्या स्त्रोताबाबत समाधान करुन घेण्यासाठी त्या ग्राहकाकडून मागील वर्षासाठीचे बँक विवरणपत्र मिळवावे. असे बँक विवरणपत्र उपलब्ध नसल्यास अगदी अलिकडील आय कर मूल्यमापन आदेशाची किंवा अर्जदाराने दाखल केलेल्या रिटर्नची प्रत मिळवावी. अर्जदाराने, प्रेषणाच्या हेतू संबंधित फॉर्म ए 2 भरणे आवश्यक असून घोषित करावे की, तो निधी त्याचा स्वतःचा असून त्याचा उपयोग ह्या योजनेखाली मनाई केलेल्या किंवा नियंत्रित केलेल्या हेतुंसाठी केला जाणार नाही.
प्रश्न 13 :- ही प्रेषणे केवळ युएस डॉलर्स मध्येच केली जाऊ शकतात काय ?
उत्तर :- ही प्रेषणे कोणत्याही मुक्तपणे रुपांतरणीय विदेशी मुद्रेत केली जाऊ शकतात.
प्रश्न 14 :- ग्राहकांना विदेशातील गुंतवणुकी उपलब्ध करण्यासाठी मध्यस्थ संस्थांनी विशिष्ट मंजुरी घेणे आवश्यक आहे काय ?
उत्तर :- भारतात कार्यकारी उपस्थिती नसलेल्या बँकांसह संबंधित बँकांनी, त्यांच्या विदेशातील शाखांसाठी ठेवी मिळविण्यासाठी किंवा विदेशातील म्युच्युअल फंडांचे किंवा अन्य विदेशी वित्तीय सेवा कंपनीचे एजंट म्हणून काम करण्यासाठी रिझर्व बँकेकडून मंजुरी घेतली पाहिजे.
प्रश्न 15 :- एखाद्या व्यक्तीकडून गुंतवणुक केली जाऊ शकेल अशा कर्ज किंवा इक्विटी संलेखाच्या प्रदानावर/दर्जावर काही निर्बंध आहेत काय ?
उत्तर :- एखाद्या व्यक्तीकडून केल्या जाऊ शकणा-या गुंतवणुकीच्या दर्जावर, युएसडी 2,50,000 च्या एलआरएसखाली कोणतीही रेटिंग्ज किंवा मार्गदर्शक तत्वे विहित करण्यात आलेली नाहीत. तथापि, वैय्यक्तिक निवेशकाने, तो किंवा ती करु इच्छिणा-या गुंतवणुकी संबंधाने निर्णय घेतेवेळी ड्यु डिलिजन्स करणे अपेक्षित आहे.
प्रश्न 16 :- निवासी व्यक्तींसाठी, एडी बँकांकडून, भारतीय रुपयांमध्ये किंवा विदेशी मुद्रेत कर्ज सुविधा (निधी आधारित असलेली किंवा निधी आधारित नसलेली) देता येऊ शकतात काय ?
उत्तर :- एलआरएसखाली भांडवली खाते व्यवहारांसाठी प्रेषणे करण्यास एडी बँकांकडून त्यांच्या निवासी व्यक्ती ग्राहकांसाठी कोणत्याही निधी आधारित किंवा नॉन-फंड आधारित सुविधा दिल्या जाणे एलआरएसमध्ये नाही.
तथापि, ह्या योजनेखाली चालु खाते प्रेषणे करण्यासाठी, एडी बँका त्यांच्या निवासी वैय्यक्तिक ग्राहकांना निधी आणि नॉन-फंड आधारित सुविधा देऊ शकतात.
प्रश्न 17 :- एलआरएसखाली, बँकर्स, निवासी व्यक्तींसाठी, भारतात विदेशी मुद्रा खाती उघडू शकतात काय ?
उत्तर :- नाही.
प्रश्न 18 :- ह्या योजनेखाली, निवासी व्यक्तींनी विदेशी मुद्रेतील खाती उघडण्यासाठी भारतामधील एखाद्या ऑफशोअर बँकिंग युनिटला (ओबीयु), भारताबाहेरील बँकेच्या शाखेसमान (अॅट पार) समजण्यात येऊ शकते काय ?
उत्तर :- नाही.
प्रश्न 19 :- फेम (कॅट) सुधारणा नियम, 2015 च्या शेड्युल 3 च्या परिच्छेद 1 मध्ये दिलेल्या हेतूंसाठी विदेशी मुद्रेची निकासी/प्रेषण करण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत ?
उत्तर :- एलआरएस खालील सर्व व्यवहारांसाठी पर्मनंट अकाऊंट नंबर (पॅन) असणे अनिवार्य आहे.
प्रश्न 20 :- चरितार्थासाठीच्या प्रेषणांसह, सर्व जावक प्रेषणांमध्ये, 15 सीए, 15 सीबी हे कागदपत्र घेणे आवश्यक आहे काय ?
उत्तर :- एपी (डीआयआर मालिका) परिपत्रक क्र. 151 दि. जून 30, 2014 अन्वये, अनिवासी व्यक्तींसाठी प्रेषणांना परवानगी देतेवेळी, मूळ स्त्रोतात कर वजावट करण्यासंबंधाने अनुसरावयाच्या कार्यरीतीसंबंधाने, भारतीय रिझर्व बँक फेमाखाली कोणत्याही सूचना देणार नाही. कर संबंधित कायद्यांच्या आवश्यकतांचे लागु असल्यानुसार पालन करणे एडींसाठी अनिवार्य आहे.
प्रश्न 21 :- एलएलपीच्या लाभासाठीच उच्च शिक्षण घेत असलेल्या एलएलपीच्या भागीदारांचा शिक्षण खर्च भागविण्यासाठी, त्या एलएलपीने केलेला खर्च, अशा व्यक्तींच्या (भागीदार) एलआरएस मर्यादेच्या बाहेर असेल काय ?
उत्तर :- एलएलपी ही एक कॉर्पोरेट संस्था असते व तिला तिच्या भागीदारांपेक्षा वेगळे कायदेशीर स्थान/ओळख असते. ह्यासाठी, एलएलपीच्या लाभासाठीच उच्च शिक्षण घेणा-या तिच्या भागीदारांचा शिक्षण खर्च करणे/प्रायोजित करणे हे वैय्यक्तिक भागीदारांच्या एलआरएस मर्यादेच्या बाहेर असेल व त्याला त्याऐवजी, त्या एलएलपीने, कोणत्याही मर्यादेशिवाय केलेला अवशिष्ट चालु खाते व्यवहार समजला जाईल.
प्रश्न 22 :- एलआरएसखाली एकमेव मालकाने केलेल्या प्रेषणावरील स्पष्टीकरण.
उत्तर :- एखाद्या एकमेव/एकल मालकी व्यवसायामध्ये, त्या व्यवसायाचा मालक, एलआरएसखाली, परवानगीप्राप्त मर्यादेपर्यंत युएसडीचे प्रेषण करु शकतो. एखादी एकल मालकी संस्था, तिच्या चालु खात्यात डेबिट करुन पैशाचे प्रेषण करु इच्छित असल्यास, त्या मालकाची त्याच्या वैय्यक्तिक दिमतेतील पात्रता विचारात घेतली पाहिजे. ह्यासाठी एलआरएसखाली, एखाद्या वित्तीय वर्षात, एखादी व्यक्ती तिच्या क्षमतेत युएसडी 2,50,000 चे प्रेषण करत असल्यास, कायदेशीर वेगळेपणा/स्पष्टपणा नसल्याने तो, व्यवहाराचा एकल मालकीचा मालक म्हणून असलेल्या क्षमतेत आणखी युएसडी 2,50,000 चे प्रेषण करु शकणार नाही.
प्रश्न 23 :- एलआरएसखाली प्रेषणे करण्यासाठी भारताबाहेरील बँकेत विदेशी मुद्रा खाते उघडणे, ठेवणे व धारण करणे ह्यासाठी पूर्व मंजुरी आवश्यक आहे काय ?
उत्तर :- नाही.
प्रश्न 24 :- (इंडिव्हिज्युअल) व्यक्ती व्यतिरिक्त अन्य व्यक्तींसाठी, फेम (कॅट) सुधारणा नियम, 2015 च्या शेड्युल 3 खाली कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ?
उत्तर :- इंडिव्हिज्युअल व्यतिरिक्त अन्य व्यक्तींसाठी पुढील सुविधा उपलब्ध आहेत.
(अ) पुढील गोष्टींसाठी - (अ) ख्यातनाम शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यासन निर्माण करणे. (ब) शैक्षणिक संस्थांनी प्रायोजित केलेल्या निधींना (तो गुंतवणुक निधी नसेल) वर्गणी आणि (क) दाता असलेल्या कंपनीच्या कार्यक्षेत्रामधील संस्था किंवा संघ किंवा तंत्र-संस्थांना वर्गणी - मागील तीन वित्तीय वर्षांमधील विदेशी मुद्रेतील उत्पन्नाच्या एक टक्क्यापर्यंत किंवा युएसडी 5,000,000 ह्यापैकी कमी असलेल्या रकमेपर्यंत देणग्या.
(ब) भारतामधील निवासी सदनिका किंवा व्यापारी भूखंड ह्यांच्या विक्रीसाठी विदेशातील एजंट्सना दिलेली प्रति व्यवहार, युएसडी 25,000 पर्यंतची दलाली किंवा आवक प्रेषणाच्या पाच टक्के ह्यापैकी कमी असेल ती रक्कम.
(क) पायाभूत सोयी प्रकल्पांबाबतच्या कोणत्याही सल्लागार सेवांसाठी प्रति प्रकल्प युएसडी 10,000,000 पर्यंतची, आणि भारताबाहेरुन घेतलेल्या सल्लागार सेवांसाठी प्रति प्रकल्प युएसडी 1,000,000 पर्यंतची प्रेषणे.
(ड) भारतामधील एखाद्या संस्थेने भारतामध्ये आणलेल्या गुंतवणुकीच्या पाच टक्के पर्यंत किंवा इनकॉर्पोरेशन पूर्व खर्चाची भरपाई म्हणून, युएसडी 100,000 ह्यापैकी जी कमी असेल त्या रकमेची प्रेषणे.
(ई) फेम (कॅट) सुधारणा नियम, 2015 च्या शेड्युल 3 च्या परिच्छेद 1 खालील अटीनुसार असलेल्या हेतूंसाठी युएसडी 2,50,000 पर्यंतची प्रेषणे. तथापि, अशा संस्थांनी केलेल्या सर्व अवशिष्ट चालु खाते व्यवहारांना कोणत्याही विहित मर्यादेशिवाय अन्यथा परवानगी असून ते एडीच्या स्तरावरच पूर्ण/समाप्त केले जावेत. एखाद्या व्यवहाराच्या खरेपणाबाबत स्वतःचे समाधान करुन घेण्याची जबाबदारी त्या एडीचीच असेल.
वरील मर्यादेबाहेरील कोणत्याही गोष्टींसाठी भारतीय रिझर्व बँकेची पूर्व मंजुरी घेणे आवश्यक आहे.
प्रश्न 25 :- एखादी निवासी व्यक्ती, त्या निवासी व्यक्तीचा जवळचा नातेवाईक असलेल्या एनआरआय/पीआयओला, क्रॉस्डचेक/इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फरने, रुपयांमधील कर्ज देऊ शकते काय ?
उत्तर :- एखाद्या निवासी व्यक्तीला, त्या निवासी व्यक्तीचा जवळच्या नातलग (कंपनीज अधिनियम, 2013 च्या कलम 2 (77) मध्ये व्याख्या केलेला ‘नातलग’) असलेल्या एनआरआय/पीआयओला, क्रॉस्ड चेक/इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फरने रुपयांमधील कर्ज देण्यास पुढील अटींवर परवानगी देण्यात आली आहे.
(1) ते कर्ज व्याजमुक्त असावे व त्याची किमान परिपक्वता एक वर्ष असावी.
(2) कर्जाची रक्कम, त्या निवासी व्यक्तीला उपलब्ध असलेल्या, प्रति वित्तीय वर्ष युएसडी 2,50,000 ह्या सर्वसमावेशक एलआरएस मर्यादेत असावी. त्या वित्तीय वर्षात कर्जाची रक्कम युएसडी 2,50,000 ह्या एलआरएस मर्यादेत असल्याची खात्री करुन घेण्याची जबाबदारी धनकोची असेल.
(3) ह्या कर्जाचा उपयोग कर्जदाराच्या वैय्यक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा भारतामधील त्याच्या स्वतःच्या व्यावसायिक हेतूंसाठी केला जाईल.
(4) ह्या कर्जाचा वापर, एकट्याने किंवा अन्य व्यक्तींच्या सहयोगाने, भारताबाहेर रहिवासी व्यक्तींकडून गुंतवणुक केलेल्या पुढील कार्यकृतींसाठी केला जाणार नाही.
(अ) चिट फंडाचा व्यवसाय किंवा
(ब) निधी कंपनी किंवा
(क) शेती किंवा मळे कार्यकृती किंवा रियल इस्टेट व्यवसाय किंवा फार्महाऊसेसची बांधणी किंवा
(ड) ट्रान्स्फरेबल डेवलपमेंट राईट्स (टीडीआर) मध्ये ट्रेडिंग
स्पष्टीकरण :- वरील (क) च्या बाबतीत रियल इस्टेट व्यवसायात, टाऊनशिप्सचा विकास, निवासी/व्यापारी, इमारती बांधणे, रस्ते किंवा पूल ह्यांचा समावेश नाही.
(5) ही कर्ज रक्कम त्या एनआरआय/पीआयओच्या एनआरओ खात्यात जमा केली जावी. अशा कर्ज रकमेचे क्रेडिट हे एनआरओ खात्यातील पात्र असलेले क्रेडिट समजले जावे.
(6) ह्या कर्ज रकमेचे भारताबाहेर प्रेषण केले जाणार नाही.
(7) ह्या कर्जाची परतफेड, नेहमीच्या बँकिंग वाहिन्यांमधून आवक प्रेषणे करुन किंवा कर्जदाराच्या अनिवासी सामान्य (एनआरओ)/अनिवासी साह्य (एनआरई)/विदेशी मुद्रा अनिवासी (एफसीएनआर) खात्यांमध्ये, डेबिट करुन किंवा ज्यांच्या विरुध्द ते कर्ज दिले गेले आहे त्या शेअर्स किंवा सिक्युरिटीजच्या विक्रीच्या उत्पन्नातून केली जावी.
प्रश्न 26 :- एखादी निवासी व्यक्ती, त्या निवासी व्यक्तीचा जवळचा नातेवाईक असलेल्या एनआरआय/पीआयओला, क्रॉस्डचेक/इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फरने, रुपयांमधील देणगी देऊ शकते काय ?
उत्तर :- एखाद्या निवासी व्यक्तीला, त्या निवासी व्यक्तीचा जवळच्या नातलग (कंपनीज अधिनियम, 2013 च्या कलम 2 (77) मध्ये व्याख्या केलेला ‘नातलग’) असलेल्या एनआरआय/पीआयओला, क्रॉस्ड चेक/इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फरने रुपयांमधील देणगी देण्यास पुढील अटींवर परवानगी देण्यात आली आहे. ही रक्कम त्या एनआरआय/पीआयओच्या एनआरओ खात्यात जमा केली जावी. ही देणगीची रक्कम, निवासी व्यक्तीला उपलब्ध असलेल्या एलआरएस खाली परवानगी असलेल्या प्रति वर्ष युएस 2,50,000 च्या सर्वसमावेशक मर्यादेखाली असली पाहिजे. एलआरएस खाली प्रेषण केलेली देणगीची रक्कम ही एलआरएस खाली असून, ह्या देणगी रकमेसह त्या वित्तीय वर्षात त्या दात्याने केलेली सर्व प्रेषणे, एलआरएस खाली विहित केलेल्या मर्यादेच्या बाहेर नाहीत ह्याची खात्री करुन घेण्याची जबाबदारी त्या दात्याचीच असेल.
|