Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 
 
 
 
 
 
होम >> मराठी - जबाबदारी

जबाबदारी (डिसक्लेमर)

यातील सर्व आकडे बिनचुक आहेत याची खात्री करून घेण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न करण्यात आले आहेत. तथापि शंका निर्माण झाल्यास, कृपया छापील आवृती पहावी.

या साईटवरील माहिती बिनचुक व अद्यावत असावी याबद्दल आरबीआय सर्व प्रयत्न करीत असली तरी, या साईटला भेट देणारांना जाणीव करून देण्यात येते की, या साईट्मध्ये असलेल्या कोणत्याही मजकूराच्या बिनचुकपणाची व पूर्णत्वाची जबाबदारी आर बी आय घेणार नाही आणि त्या माहितीचा उपयोग करताना, भेट देणारांनी स्वत: च काळजी व निर्णय घ्यावा.

तुमच्या सुसंबंध माहितीसाठी आवश्यक असे इतर वेबसाईटसाठीचे दुवे (लिंक्स) देण्यात आले आहेत. परंतु त्या साईटवरील मजकुराबाबत आर बी आय जबाबदार राहणार नाही.

या वेबसाईटचा कोणत्याही भागातील नामनिर्देशित संस्था किंवा व्यक्ती यांना समाविष्ट करण्यात आले याचा अर्थ, आर बी आय त्या देत असलेल्या सेवा किंवा उत्पाद यांना कोणतीही पुष्टी/ पाठिंबा देते असा नाही.

हमी व दायित्व संबंधी जबाबदारी

या वेबसाईटवरील मजकूर कोणत्याही हमी विना आणि 'जसा आहे तसा' धर्तीवर देण्यात आला आहे. आर बी आय पुढील बाबतीत जबाबदार किंवा दायित्वयुक्त असणार नाही :-

अ) या वेबसाईटवरील मजकुराचा, बिनचुकपणा, विश्वासनियता, सांप्रतकालीनता, कालसंबंध, अनुल्लंघन, शीर्षक, व्यापारक्षमता, किंवा अन्य कोणत्याही हेतुसाठी

ब) या वेबसाईटमधून उपलब्ध मजकूर किंवा तत्संबंधित कार्ये अखंडित व बिनचुक असतील, किंवा त्यातील दोष सुधारले जातील, किंवा ही वेबसाईट आणि र्सव्हर सर्व व्हायरस आणि/ किंवा इतर अपायकारक घट्कांपासून मुक्त असतील.

या वेबसाईटचा उपयोग केल्यामुळे कोणत्याही प्रकारचे ( प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ) नुकसान किंवा तोटा झाल्यास व तसेच या वेबसाईटवरील मजकुरावर अवलंबुन राहिल्यामुळे (परंतु तेवढ्यापुर्ते सिमीत नसलेले) नुकसान किंवा तोटा झाल्यास त्यासाठी आर बी आय जबाबदार राहणार नाही.

या वेबसाईटवरील मजकुरात कोणताही आर्थिक किंवा व्यावसायिक सल्ला दिलेला नाही. अर्थविषयक किंवा व्यवसायिक सल्ला हवा असल्यास एखाद्या सक्षम व्यवसायिकाच्या सेवा घ्याव्यात.

प्रवेश हक्क

ही वेबसाईट वेळोवेळी अद्यावत करण्याचा किंवा तिच्यात फेरफार करण्याचा हक्क आर बी आय राखून ठेवत आहे. याशिवाय, या वेबसाईटमध्ये कोणत्याही व्यक्तीला प्रवेश/ भेट देण्याचा हक्क किंवा एखाद्या विशिष्ट इंटरनेट ऍड्रेसमधून या वेबसाईटला कोणत्याही वेळी व कोणत्याहि कारणशिवाय भेट नाकारण्याचा हक्क आर बी आय राखून ठेवत आहे.

या वेबसाईटमधून अन्य वेबसाईटशी दुवे

या वेबसाईटमध्ये , आर बी आय ने न चालविलेल्या वेबसाईटशी 'हायपर लिंक्स' आहेत. अशा वेबसाईटमधील मजकुराबाबत आर बी आय जबाबदार नाही आणि या वेबसाईटना भेट / प्रवेश दिल्यामुळे झालेल्या कोणत्याही नुकसान/ तोट्यासाठी ती जबाबदार राहणार नाही. या हायपर - लिंक्सचा उपयोग आणि अशा दुवे असलेल्या वेबसाईटला भेट / प्रवेश आपापल्या जोखमीवर केला जावा.

या सर्व हायपर- लिंक्स, या वेबसाईटच्या उपयोजकाला एक सोय म्हणून देण्यात आल्या. ही वेबसाईट हायपर-लिंकद्वारा ज्याच्यांशी जोडली गेली आहे. अशा वेबसाईटवरील एखाद्या व्यापारधंदा, बोधचिन्हे, व इतर खुणा/ चिन्हे यांच्याशी कोणत्याही परिस्थित, आर बी आय चा कोणताही सहयोग अथवा संबंध असणार नाही.

इतर वेबसाईटचे या वेबसाईट बरोबर दुवे

खाली दिलेल्या बाबी सोडल्यास ही वेबसाईट किंवा तिच्यामधील मजकुर यासाठी 'लिकींग' , 'कॅशिंग', किंवा ' फ्रेमिंग' करण्याची सक्त मनाई आहे.

'होम पेज शी दुवा' - या वेबसाईटच्या http://www.rbi.org.in होमपेजशी तुम्ही आर बी आय ला लिखितरुपात कळवून, दुवा साधू शकता.

या वेबसाईटच्या अंतर्गत पेजशी हायपर-लिंक साधण्यासाठी (होमपेज नव्हे), उपयोजकाने आर बी आय कडे विनंती करावयास हवी, तसेच या वेबसाईटशी किंवा कोणत्याही मजकुरासाठी हायपरलिकिंग, फ्रेमिंग, किंवा तत्सम कार्यांसाठी परवानगी देतेवेळी, अटी घालण्याचा अधिकार आर बी आय राखून ठेवीत आहे.

या वेबसाईटचे किंवा त्यातील मजकुराचे लिंकिंग, फ्रेमिंग करणे म्हणजे, वापर/उपयोगाच्या अटी व शर्तींमध्ये फरक, बदल किंवा फेरफार केला गेल्यावरही वरील विधान अबाधित राहील. उपयोजकाला या वापराच्या अटी व शर्ती मान्य नसल्यास, त्याने यावेबसाईटचे किंवा त्यातील कोणत्याही मजकुराचे लिंकिंग व फ्रेमिंग बंद करावे.

कोणत्याही, साईट्मध्ये अयोग्य, अश्लील, बदनामीकारक, उल्लंघन करणाऱ्या, असभ्य, किंवा बेकायदेशीर विषय, नावे, मजकुर किंवा माहिती, जी एखाद्या लिखित कायद्याचा भंग करणारी , कोणतीही उपयोजक बौधिक मत्ता, मालकीहक्काची, गुप्तता, किंवा जनहक्काची असेल, तर आर बी आय, त्या साईट्शी दुवे, फ्रेम्स यांचे निर्बलीकरण करण्याचे सर्व हक्क राखून ठेवत आहे.

या वेबसाईटमधून किंवा तिच्यातील कोणत्याही मजकुरामधून किंवा तिच्या दुव्यांमधून मिळालेल्या अन्य साईटवर उपलब्ध असलेल्या मजकुराची जबाबदारी घेण्यास आर बी आय नकार देत असून, त्यासाठी कोणत्याही लिंक्स किंवा फ्रेम्सचे निर्बलीकरण करण्याचा हक्क राखून ठेवत आहे.

 
वर 
 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä