Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 02/09/2016
तुमचा ग्राहक जाणा - मार्गदर्शक तत्वे

(सप्टेंबर 02, 2016 पर्यंत अद्यावत)

(भारतीय रिझर्व बँकेच्या तुमचा ग्राहक जाणा वरील मार्गदर्शक तत्वांचा ही संक्षिप्त व सुलभीकृत आवृत्ती आहे)

प्रश्न 1 : केवायसी म्हणजे काय ? त्याची काय गरज आहे ?

उत्तर : केवायसी म्हणजे - नो युवर कस्टमर (तुमचा ग्राहक जाणा/ओळखा). ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे, बँका त्यांच्या ग्राहकांची ओळख व पत्ता ह्याची माहिती मिळवितात. ह्या प्रक्रियेमुळे, बँकांच्या सेवांचा गैरवापर केला जात नसल्याबाबत खात्री होते. खाती उघडतेवेळी बँकांनी केवायसीच्या कार्यरीती पूर्ण करणे आवश्यक असते. ग्राहकांचा केवायसी तपशील नियतकालिकतेने अद्यावत करणेही बँकांसाठी आवश्यक आहे.

प्रश्न 2 : बँक खाते उघडण्यासाठीच्या केवायसी-आवश्यकता कोणत्या ?

उत्तर : बँक खाते उघडण्यासाठी, एका अलिकडील छायाचित्रासह, ओळखीचा एक पुरावा व पत्त्याचा पुरावा सादर करावा लागतो.

प्रश्न 3 : ‘ओळखीचा पुरावा’ व ‘पत्त्याचा पुरावा’ म्हणून कोणते कागदपत्र सादर करावे लागतात ?

उत्तर : ओळखीचा पुरावा देण्यासाठी, भारत सरकारने, ‘अधिकृत वैध कागदपत्र’ (ओव्हीडी) म्हणून सहा कागदपत्र अधिसूचित केले आहेत. हे सहा दस्त म्हणजे, पारपत्र, वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, युआयडीएआयने दिलेले आधार कार्ड व एनआरईजीए जॉब कार्ड. ओळखीचा पुरावा म्हणून ह्यामधील कोणतेही दस्त सादर करता येईल. ह्या कागदपत्रांमध्ये तुमचा पत्ता दिलेला असल्यास, ते पत्त्याचा पुरावा म्हणूनही स्वीकारले जाऊ शकतात. ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रात तुमचा पत्ता नसल्यास, तुम्हाला, तुमचा पत्ता असलेले आणखी एक अधिकृतरीत्या वैध दस्त सादर करावे लागेल.

प्रश्न 4 : ओळखीचा पुरावा म्हणून माझ्याकडे वरीलपैकी कोणतेही एक दस्त नसले तरीही मी बँक खाते उघडू शकतो काय ?

उत्तर : होय. तुम्ही तुमचे अलिकडील छायाचित्र देऊन व बँक अधिका-याच्या उपस्थितीत तुमची सही करुन किंवा अंगठ्याचा ठसा उमटवून छोटे खाते (स्मॉल अकाऊंट) नावाचे बँक खाते उघडू शकता.

प्रश्न 5 : असे स्मॉल अकाऊंट्स व इतर खाती ह्यामध्ये काही फरक आहे काय ?

उत्तर : होय. स्मॉल अकाऊंट्सवर काही मर्यादा आहेत.

  • ह्या खात्यातील शिल्लक कोणत्याही वेळी रु.50,000/- पेक्षा अधिक असू नये.

  • एका वर्षातील एकूण जमा (क्रेडिट) रु.1,00,000/- पेक्षा अधिक असू नये.

  • एका महिन्यातील एकूण निकासी व हस्तांतरणे रु.10,000/- पेक्षा अधिक असू नयेत.

  • ह्या खात्यांमध्ये विदेशातून आलेली प्रेषणे जमा करता येणार नाहीत.

अशी खाती, सुरुवातीला 12 महिन्यांपर्यंत कार्यान्वित असतात व त्यानंतर, असे खाते उघडल्यानंतर बारा महिन्यांच्या आत, त्या खातेदाराने, अधिकृतरीत्या वैध कागदपत्रांसाठी अर्ज केला असल्याचा पुरावा सादर केल्यास, ते खाते आणखी बारा महिन्यांसाठी कार्यान्वित राहू शकते.

प्रश्न 6 : माझ्याकडे अधिकृतरीत्या वैध कागदपत्रांपैकी कोणतेही दस्त नसल्यास, स्मॉल अकाऊंटसारखी मर्यादा नसलेले खाते उघडणे मला शक्य आहे काय ?

उत्तर : ओळखीचा पुरावा (पीओआय) म्हणून पुढील पैकी एका दस्ताची प्रत सादर करुन एक खाते उघडता येऊ शकते.

(1) केंद्र/राज्य सरकारचे विभाग, वैधानिक/विनियामक प्राधिकरणे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, अनुसूचित वाणिज्य बँका आणि सार्वजनिक वित्तीय संस्था ह्यांनी दिलेले व त्या व्यक्तीचे छायाचित्र असलेले ओळखपत्र किंवा

(2) त्या व्यक्तीच्या छायाचित्रावर सत्यांकन करुन, एखाद्या राजपत्रित अधिका-याने दिलेले पत्र.

पत्त्याचा पुरावा (पीओए) म्हणून तुम्ही पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करु शकता.

(1) कोणत्याही सेवा दात्याने (वीज, टेलिफोन, पोस्ट पेड मोबाईल फोन, पाईप्ड गॅस, पाण्याचे बिल) दिलेले, दोन महिन्यांपेक्षा जुने नसलेले उपयोजितेचे देयक.

(2) मालमत्ता कर किंवा म्युनिसिपालटीचा कर भरण्याची पावती.

(3) बँक खात्याचे किंवा पोस्टाच्या बचत खात्याचे लेखा-विवरणपत्र.

(4) सरकारी विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ह्यांनी, त्यांच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांना दिलेले पेन्शन किंवा फॅमिली पेन्शन प्रदान आदेश (पीपीओ) - मात्र त्यावर पत्ता दिलेला असावा.

(5) राज्य किंवा केंद्र सरकारचे विभाग, वैधानिक किंवा विनियामक संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, अनुसूचित वाणिज्य बँका, वित्तीय संस्था व सूचिबध्द कंपन्यांच्या मालकांनी, निवासी जागा वाटपासाठी दिलेले पत्र. त्याचप्रमाणे, अशा अधिकृत निवासी जागा वाटप करणारांबरोबर केलेले लीव्ह अँड लायसन्स करार.

(6) विदेशी कायदेशीर अधिकार असलेल्या सरकारी विभागांनी दिलेले कागदपत्र किंवा भारतामधील विदेशी वकिलात किंवा मिशनने दिलेले पत्र.

तथापि, हा एक सर्वसाधारण नियम नसून, कोणत्याही/एखाद्या ग्राहकांच्या बाबतीत, ही सुलभीकृत वापरावी की नाही ह्याचा निर्णय, त्या त्या बँकांनीच घ्यावयाचा आहे.

प्रश्न 7 : माझे नाव बदलले आहे आणि माझ्या नव्या नावाने कोणतेही ओव्हीडी नाहीत. तर मग मी कशा प्रकारे बँक खाते उघडू शकेन ?

उत्तर : लग्न किंवा अन्य कारणाने नावे बदलण्यात आली असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत खाती उघडण्यासाठी, राज्य सरकारने दिलेले, विवाह प्रमाणपत्र किंवा बदललेले नाव निर्देशित केलेली अधिसूचनेसह, त्या व्यक्तीच्या पूर्वीच्या नावे असलेल्या अधिकृतरीत्या वैध कागदपत्राची प्रमाणित प्रत सादर केली जावी.

प्रश्न 8 : जोखीम-मूल्यमापनावर आधारित असे ग्राहक वर्गीकरण करणे बँकांसाठी आवश्यक आहे काय ?

उत्तर : होय. ग्राहकांच्या एएमएल जोखीम मूल्यमापनावर आधारित, त्यांचे निम्न, मध्यम व उच्च जोखीम वर्गामध्ये वर्गीकरण करणे बँकांसाठी आवश्यक आहे.

प्रश्न 9 : अशा जोखीम वर्गीकरणाबाबत बँका त्यांच्या ग्राहकांना कळवितात काय ?

उत्तर : नाही.

प्रश्न 10 : एखादे खाते उघडण्यासाठी केवायसीसाठी मागण्यात आलेले कागदपत्र देण्यास मी बँकेला नकार दिल्यास काय परिणाम होईल ?

उत्तर : केवायसीसाठीचे आवश्यक कागदपत्र तुम्ही सादर न केल्यास, बँक तुमचे खाते उघडू शकणार नाही.

प्रश्न 11 : मी केवळ आधार कार्ड देऊनच बँक खाते उघडू शकेन काय ?

उत्तर : होय. ओळख व पत्ता ह्या दोन्हींचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारण्यात येते.

प्रश्न 12 : बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्ड देणे आवश्यक आहे काय ?

उत्तर : नाही. तुम्ही आधार कार्ड किंवा इतर पाच ओव्हीडी, खाते उघडण्यासाठी देऊ शकता.

प्रश्न 13 : ई-केवायसी म्हणजे काय ? ई-केवायसी कसे काम करते ?

उत्तर : ई-केवायसीचा संदर्भ इलेक्ट्रॉनिक केवायसीशी आहे.

केवळ आधार क्रमांक असणारांसाठीच ई-केवायसी करणे शक्य आहे. ई-केवायसी सेवा वापरताना, बायोमॅट्रिक सत्यांकनामार्फत तुमची ओळख/पत्ता, बँक शाखांना/बिझिनेस कॉरेस्पाँडंट्सना (बीसी) देण्याबाबत नेमक्या सहमतीसह तुम्ही युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) ह्यांना प्राधिकृत करावे लागते. त्यानंतर, युआयडीएआय, तुमचे नाव, वय, लिंग व छायाचित्र ह्यांची माहिती, बँकेकडे इलेक्ट्रॉनिक रितीने पाठविते. अशा ई-केवायसी प्रक्रियेने पाठविलेल्या माहितीला, पीएमएल नियमांखाली, अधिकृत वैध दस्त समजले जाण्यास परवानगी असून, ती केवायसी पडताळणीसाठीची वैध प्रक्रिया आहे.

प्रश्न 14 : बँक खाते उघडताना ओळख देणे आवश्यक आहे काय ?

उत्तर : नाही. ओळख देण्याची आवश्यकता नाही.

प्रश्न 15 : चेन्नईला राहतो, पण माझ्या पत्त्याच्या पुराव्यात नवी दिल्लीचा पत्ता आहे, तरीही मी चेन्नईमध्ये खाते उघडू शकतो काय ?

उत्तर : होय. तुमच्या अधिकृत वैध कागदपत्रात नवी दिल्लीचा पत्ता असून तुमच्या चेन्नई मधील पत्त्याचा पुरावा तुमच्याजवळ नसला तरीही तुम्ही चेन्नईमध्ये बँक खाते उघडू शकता. अशा बाबतीत, तुम्ही नवी दिल्लीचा पत्ता असलेले अधिकृत वैध कागदपत्र सादर करुन त्यासोबत संपर्क/पत्रव्यवहारासाठी चेन्नईच्या पत्त्याबाबतचे घोषणापत्र सादर करावे.

प्रश्न 16 : मी माझे विद्यमान बँक खाते एका ठिकाणावरुन दुस-या ठिकाणी हस्तांतरित करु शकतो काय ? त्यासाठी मला पुनः केवायसी प्रक्रिया करावी लागेल काय ?

उत्तर : त्याच बँकेच्या एका शाखेमधून, दुस-या शाखेत खाते हस्तांतरित करणे शक्य आहे. अशा हस्तांतरणासाठी पुनः केवायसी प्रक्रिया करण्याची गरज नाही. तथापि, पत्ता बदलला असल्यास, तुम्हाला नवीन/विद्यमान पत्त्याबाबत घोषणापत्र सादर करावे लागेल. पत्त्याचा पुरावा म्हणून सादर केलेल्या अधिकृत वैध दस्तामध्ये (ओव्हीडी) असलेला पत्ता हा तुमचा वैध पत्ता (म्हणजे तुमचा कायम पत्ताही नाही किंवा विद्यमान पत्ताही नाही) राहिला नसल्यास, तुम्हाला पत्त्याच्या पुराव्यासाठी, विद्यमान किंवा कायम पत्ता असलेले अधिकृत वैध दस्त मिळवून ते सहा महिन्यांच्या आत सादर करावे लागेल. तथापि, दुस-याच एखाद्या बँकेत खाते उघडावयाचे असल्यास, तुम्हाला केवायसी प्रक्रिया पुनश्च/नव्याने करावी लागेल.

प्रश्न 17 : ओळख व पत्ता ह्यांचा पुरावा म्हणून मी कागदपत्र सादर केले असले तरीही, मी बँकेत उघडू इच्छिणा-या प्रत्येक खात्यासाठी मला केवायसी कागदपत्र सादर करावे लागतील काय ?

उत्तर : नाही. तुम्ही एखाद्या बँकेत, केवायसी पूर्ण करुन खाते (स्मॉल अकाऊंट सोडून) उघडले असल्यास, दुसरे एक खाते, त्याच बँकेत उघडण्यासाठी, कागदपत्र सादर करण्याची गरज नाही.

प्रश्न 18 : कोणकोणत्या व्यवहारांसाठी पॅन नंबर देणे माझ्यासाठी आवश्यक आहे ?

उत्तर : खाते उघडणे, रु.50,000/- च्या वरील रकमेचे (रोख असलेले किंवा नसलेले) व्यवहार इत्यादींसाठी पॅन नंबर देणे आवश्यक आहे. पॅन नंबर देणे आवश्यक आहे अशा व्यवहारांची संपूर्ण यादी, आय कर विभागाच्या वेबसाईटवरुन पुढील युआरएलवर मिळविता येते.

http://www.incometaxindia.gov.in/_layouts/15/dit/pages/viewer.aspx?grp=rule&cname=CMSID&cval=103120000000007541&searchFilter=&k=114b&IsDlg=0

प्रश्न 19 : क्रेडिट/डेबिट कार्डांसाठी केवायसी करणे आवश्यक आहे काय ?

उत्तर : होय. क्रेडिट/स्मार्ट कार्डे आणि अॅड ऑन/पूरक कार्डांसाठीही केवायसी प्रक्रिया आवश्यक आहे. केवळ खातेदारांनाच डेबिट कार्डे दिली जात असल्याने आणि केवायसी पूर्ण झाल्यावरच खाती उघडली जात असल्याने डेबिट कार्डे देण्यासाठी वेगळ्याने केवायसी करण्याची गरज नाही.

प्रश्न 20 : माझे कोणतेही बँक खाते नाही पण मला एक प्रेषण करावयाचे आहे तर मला केवायसी लागु आहे काय ?

उत्तर : होय. रु.50,000/- ची देशांतर्गत प्रेषणे व विदेशात प्रेषणे करु इच्छिणा-या सर्वांसाठी, केवायसी प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

प्रश्न 21 : रोख रकमेच्या विरुध्द मी डिमांड ड्राफ्ट/पेमेंट ऑर्डर/प्रवासी चेक खरेदी करु शकतो काय ?

उत्तर : होय. रु.50,000/- पेक्षा कमी रकमेचे डिमांड ड्राफ्ट/पेमेंट ऑर्डर/प्रवासी चेक्स रोख रकमेविरुध्द खरेदी केले जाऊ शकतात आणि रु.50,000/- व त्यापेक्षा अधिक रकमेचे वरील संलेख, केवळ ग्राहकाच्या खात्यात डेबिट करुन किंवा चेक विरुध्दच दिले जाऊ शकतात.

प्रश्न 22 : बँकांकडून तृतीय पक्षाचे उत्पाद (विमा किंवा म्युच्युअल फंडाचे उत्पाद) विकत घेताना, केवायसी कागदपत्र सादर करणे मला आवश्यक आहे काय ?

उत्तर : होय. बँकेमध्ये ज्यांची खाती नाहीत अशा ग्राहकांना (ह्यांना वॉक इन ग्राहक म्हणतात), बँकांकडून तृतीय पक्षाचे उत्पाद विकत घेतांना, तो व्यवहार रु.50,000/- व त्यापेक्षा वर असल्यास, ओळखीचा व पत्त्याचा पुरावा देणे आवश्यक आहे. असे तृतीय पक्षाचे उत्पाद विकत घेण्यासाठी, बँकेच्या स्वतःच्या ग्राहकांना केवायसी करणे आवश्यक नाही. तथापि, निधीचे प्रेषण करणे/प्रवासी चेक देणे, सोने/चांदी/प्लॅटिनमची विक्री ह्यासाठी ग्राहकाच्या खात्यामध्ये डेबिट करुन किंवा चेकच्या विरुध्द प्रदान करण्याबाबतच्या सूचना आणि पॅन नंबर देण्याची आवश्यकता ह्या बाबी, बँकेचे ग्राहक व वॉकइन ग्राहक ह्या दोघांनाही लागु असतील.

प्रश्न 23 : मी खाते उघडले तेव्हा केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. असे असतानाही माझी बँक, मला पुनश्च केवायसी करण्याचा आग्रह का धरत आहे ?

उत्तर : केवायसीचे अभिलेख नियतकालिकतेने अद्यावत करणे बँकांसाठी आवश्यक असते. बँक खात्यांवर सातत्याने परिश्रम करण्याचाच तो एक भाग आहे. असे अद्यावत करण्याची नियतकालिकता, बँकांनी केलेल्या जोखीम वर्गीकरणावर अवलंबून खात्या-खात्यांसाठी वेगवेगळी असते. अभिलेख नियतकालिकतेने अद्यावत केल्याने, ग्राहकांच्या खात्यातील फसवणुकी कमी होण्यास मदत होते.

प्रश्न 24 : केवायसीच्या नियतकालिक अद्यावतीकरणासाठीचे नियम कोणते ?

उत्तर : बँकेच्या जोखीम दृष्टिकोनाच्या आधारे, केवायसी अभिलेख अद्यावत करण्यासाठी निरनिराळ्या नियतकालिकता विहित करण्यात आल्या आहेत. उच्च जोखीम ग्राहकांसाठी दोन वर्षातून एकदा, मध्यम जोखीम ग्राहकांसाठी आठ वर्षातून एकदा, आणि निम्न जोखीम ग्राहकांसाठी दहा वर्षातून एकदा, केवायसी करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया करण्यासाठी, खाते उघडतेवेळीच्या सर्व केवायसी प्रक्रिया पुनः कराव्या लागतात.

निम्न जोखीम म्हणून वर्गीकरण केलेल्या ग्राहकांसाठीही केवायसीचे नियतकालिक अद्यावतीकरण करावे लागत असले तरी, ग्राहकाची ओळख (नावात बदल इत्यादि) आणि/किंवा पत्ता ह्यामध्ये कोणताही बदल झालेला नसल्यास, नियतकालिक अद्यावतीकरण करतेवेळी, दर्जामध्ये कोणताही बदल नाही असे स्वयं-प्रमाणपत्र देण्यास बँका ग्राहकांना सांगू शकतात. असे नियतकालिक अद्यावतीकरण करण्यासाठी, बँकांनी त्यांच्या अशा ग्राहकांना, अधिकृत वैध कागदपत्रे देण्यास सांगण्याची आवश्यकता नाही.

अशा निम्न जोखीम ग्राहकांच्या पत्त्यात बदल झाल्यास, ते ग्राहक, त्या कागदपत्राची (पत्त्याचा पुरावा) केवळ एक प्रमाणित प्रतच, मेल/पोस्टाद्वारे पाठवू शकतात. नियतकालिक अद्यावतीकरण करतेवेळी अशा निम्न जोखीम ग्राहकांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नाही.

अल्पवयीन असलेल्या ग्राहकांना, ते सज्ञान झाल्यावर त्यांचे नवे/ अलिकडील छायाचित्र सादर करणे आवश्यक आहे.

प्रश्न 25 : नियतकालिक अद्यावतीकरण करतेवेळी मी केवायसी कागदपत्र सादर न केल्यास काय होईल ?

उत्तर : नियतकालिक अद्यावतीकरण करतेवेळी तुमचे केवायसी कागदपत्र तुम्ही सादर न केल्यास, तुमचे खाते बंद करण्याचा पर्याय बँकेला उपलब्ध आहे. खाते बंद करण्यापूर्वी, बँक, ते खाते अंशतः गोठवू शकते (म्हणजे सुरुवातीला सर्व जमा/क्रेडिट करण्यास परवानगी व खाते बंद करण्याचा पर्याय तुम्हाला देऊन तुमचे पैसे परत घेऊन जाण्याच्या सूचनेसह, त्या खात्यातील डेबिट्सना परवानगी नाकारणे) त्यानंतर मात्र, क्रेडिट करण्यासही परवानगी दिली जाणार नाही. तथापि, असे अंशतः गोठविणे, तुम्हाला योग्य ती नोटिस दिल्यानंतरच बँकेकडून केले जाईल.

प्रश्न 26 : अंशतः गोठविण्याची अंमलबजावणी कशी केली जाते ?

उत्तर : अंशतः गोठविण्याची कारवाई पुढील प्रकारे केली जाते.

  • अंशतः गोठविण्याचा पर्याय राबविण्यापूर्वी, सुरुवातीला बँकांनी ग्राहकांना तीन महिने आधी योग्य ती नोटिस देणे आवश्यक आहे.

  • ह्यानंतर, आणखी तीन महिन्यांसाठीचे स्मरणपत्र दिले जाईल.

  • त्यानंतर, सर्व क्रेडिट (जमा) करण्यास परवानगी, व खाते बंद करावयाचे स्वातंत्र्य ह्यासह सर्व डेबिट करण्यास परवानगी नाकारुन अंशतः गोठविण्याची अंमलबजावणी केली जाईल.

  • सुरुवातीला अंशतः गोठविण्याची अंमलबजावणी केल्यानंतर सहा महिन्यांनीही त्या खात्यांनी केवायसी निकष/प्रक्रिया पूर्ण केली. बँका त्या खात्यातील सर्व क्रेडिट व डेबिट करण्यास परवानगी देणार नाहीत व ती खाती अकार्यकारी म्हणून वर्गीकृत करतील.

दरम्यानच्या काळात, खातेदार संबंधित केवायसी कागदपत्रे देऊन ती खाती पुनरुज्जीवित करु शकतात

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä