Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 20/12/2016
कोअर इनवेस्टमेंट कंपन्या

(डिसेंबर 20, 2016 पर्यंत अद्यावत)

प्रस्तावना

भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या प्रकरण 3ब मध्ये तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन अबँकीय वित्तीय कंपन्यांचे विनियमन व पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी भारतीय रिझर्व बँकेवर टाकण्यात आली आहे. हे विनियामक व पर्यवेक्षणीय उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहे.

(अ) वित्तीय कंपन्यांची निरोगी वाढ होत असल्याची खात्री करणे.

(ब) धोरणात्मक साचामधील वित्तीय प्रणालीचा एक भाग म्हणून, त्यांचे अस्तित्व व कार्यकृतींमुळे प्रणालीमध्ये अस्वाभाविकता येणार नाही अशा रितीने ह्या कंपन्या काम करतील ह्याची खात्री करुन घेणे, आणि

(क) ह्या बँकेने एनबीएफसींवर ठेवलेली नजर व पर्यवेक्षण ह्यांचा दर्जा, ह्या वित्तीय प्रणालीच्या क्षेत्रात होत असलेल्या विकासाला धरुनच चांगला ठेवला जातो.

गेल्या काही वर्षांमध्ये, आरबीआयने, कोअर इनवेस्टमेंट कंपन्या (सीआयसी), एनबीएफसी-इन्फ्रास्ट्रक्चर वित्तीय कंपन्या (आयएफसी), इन्फ्रास्ट्रक्चर कर्ज निधी-एनबीएफसी, एनबीएफसी-एमएफआय आणि अगदी अलिकडील, एनबीएफसी-फॅक्टर्स, ह्यासारख्या काही विशेष संस्था स्थापन केल्या आहेत.

एनबीएफसी, जनता, रेटिंग एजन्सीज्, चार्टर्ड अकाऊंटंट इत्यादींच्या हितासाठी, काही कार्यकारी बाबींवर स्पष्टीकरण देणे, तसेच विनियामक बदलांमागील कारण-मीमांसा देणे आवश्यक आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी, ह्या विशेष एनबीएफसींवर, भारतीय रिझर्व बँकेने (अबँकीय पर्यवेक्षण विभाग) प्रश्न व उत्तरांच्या स्वरुपात स्पष्टीकरणे देण्याचे ठरविले असून त्यामुळे विनियामक साचाची जाणीव अधिक चांगल्या प्रकारे होईल अशी आशा आहे.

ह्या एफएक्यु मध्ये सिस्टमॅटिकली इंपॉरटंट कोअर इनवेस्टमेंट कंपन्यांवर (सीआयसी-एनडी-एसआय) दिलेली माहिती, जनतेच्या हितासाठी सर्वसाधारण स्वरुपाची असून, दिलेल्या स्पष्टीकरणांमुळे, ह्या बँकेने, विशेष एनबीएफसींना दिलेल्या विद्यमान विनियामक सूचना/निदेश बदलत नाहीत.

कोअर इनवेस्टमेंट कंपन्या (सीआयसी)

(1) सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट कोअर इनवेस्टमेंट कंपनी (सीआयसी-एनडी-एसआय) म्हणजे काय ?

उत्तर : सीआयसी-एनडी-एसआय ही पुढील गुणविशेष असलेली एक अबँकीय वित्तीय कंपनी आहे.

(1) अॅसेट्सचे आकारमान रु.100 कोटी व त्यापेक्षा अधिक

(2) शेअर्स व सिक्युरिटीज मिळविण्याचा व्यवसाय करणारी आणि शेवटच्या ऑडिटेड ताळेबंदाच्या दिवशी पुढील अटी पूर्ण करणारी

(3) इक्विटी शेअर्स, प्रिफरन्स शेअर्स, बाँड्स, डिबेंचर्स, ग्रुप कंपन्यांमधील कर्जे ह्या स्वरुपात तिच्या नक्त अॅसेट्सच्या 90% पर्यंत धारण केले असणारी.

(4) तिची ग्रुप कंपन्यांमधील इक्विटी शेअर्स मधील गुंतवणुक (दिल्याच्या तारखेपासून 10 वर्षांपेक्षा अधिक नसलेल्या कालावधीत इक्विटी शेअर्स मध्ये अपरिहार्यतेने रुपांतरित करावयाच्या संलेखांसह), वरील खंड (3) मध्ये निर्देशित केलेल्या नक्त अॅसेट्सच्या 60% पेक्षा कमी नसते.

(5) डायल्युशन किंवा निर्गुंतवणुक करण्याच्या हेतूने केलेल्या ब्लॉक विक्रीमार्फत सोडल्यास, ती कंपनी, शेअर्स, बाँड्स, डिबेंचर्स, गट कंपन्यांमध्ये दिली/घेतलेली कर्जे ह्यामधील तिच्या गुंतवनुकींमध्ये ट्रेडिंग करत नाही.

(6) बँक ठेवी, नाणे बाजारातील संलेख, सरकारी प्रतिभूती, गट कंपन्यांनी दिलेली किंवा गट कंपन्यांना दिलेली कर्जे, किंवा गट कंपनीच्या वतीने दिलेल्या हमी ह्यामध्ये केलेल्या गुंतवणुकी सोडल्यास, ती कंपनी, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 (क) व 45 (फ) मध्ये संदर्भित केलेली अन्य कोणतीही वित्तीय कार्यकृती करणार नाही.

(7) ती सार्वजनिक निधी स्वीकारते

(2) पूर्वी पंजीकरण करण्यामधून सूट मिळालेल्या व ज्यांचे अॅसेट रु.100 कोटींपेक्षा कमी आहेत अशा विद्यमान कोअर इनवेस्टमेंट कंपन्यांना (सीआयसी), सूट मिळविण्यासाठी पुनः अर्ज सादर करणे आवश्यक आहे काय ?

उत्तर : भूतकाळात पंजीकरण करण्यात सूट मिळालेल्या व रु.100 कोटींपेक्षा कमी अॅसेट असलेल्या विद्यमान सीआयसींना, अधिसूचना क्र. डीएनबीएस.(पीडी) 220/सीजीएम(युएस)-2011 दि. जानेवारी 5, 2011 मध्ये दिल्यानुसार, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 एनसी अनुसार पंजीकरण करण्यापासून सूट देण्यात आली असून त्यांनी सूट मिळविण्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

(3) भूतकाळात पंजीकरण करण्यात सूट मिळालेल्या व रु.100 कोटींपेक्षा कमी अॅसेट्स असलेल्या विद्यमान सीआयसींना, प्रत्येक वर्षाच्या मार्च 31 रोजी असलेल्या त्यांच्या स्थिती संदर्भाने, त्या कंपन्या पूर्वीच्या ज्या निकषांच्या आधारावर, ‘एक कोअर इनवेस्टमेंट कंपनी’ म्हणून समजण्यात आल्या होत्या अशा त्या निकषांचे पालन करणे त्या कंपन्यांनी सुरुच ठेवले आहे असे, अशा अर्थाचे वैधानिक ऑडिटरने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे काय ?

उत्तर : नाही. भूतकाळात पंजीकरण करण्यात सूट मिळालेल्या व रु.100 कोटीपेक्षा कमी अॅसेट्स असलेल्या सीआयसींना, अधिसूचना क्र.. डीएनबीएस.(पीडी) 220/सीजीएम(युएस)-2011 दि. जानेवारी 5, 2011 मध्ये दिल्यानुसार, पंजीकरण करण्यात सूट देण्यात आली आहे. त्यामुळे, वरील अधिसूचनेचे त्या पालन करत असल्याबाबतचे ऑडिटरचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही.

(4) केवळ एकाच गटामध्ये, एकूण रु.100 कोटीपेक्षा अधिक अॅसेट्स असलेल्या चार ते पाच संभवित कोअर इनवेस्टमेंट कंपन्या आहेत. अशा परिस्थितीत, त्या गटामधील कोणत्या कंपनीने, सीआयसी म्हणून रिझर्व बँकेकडून पंजीकरण करणे आवश्यक आहे ?

उत्तर : त्या गटामधील सर्वच सीआयसींना सीआयसी-एनडी-एसआय म्हणून समजले जाईल (मात्र त्यांनी सार्वजनिक निधी मिळविला असला पाहिजे) आणि त्या सर्वांनी आरबीआयकडून पंजीकरण प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे.

(5) एका गटामध्ये, एकूण रु.100 कोटीपेक्षा अधिक अॅसेट्स असलेल्या निरनिराळ्या कोअर इनवेस्टमेंट कंपन्या आहेत. त्यापैकी एका कंपनीने सार्वजनिक निधी उभा केला/मिळविला आहे (एक सीआयसी-एनडी-एसआय म्हणून पात्र ठरण्याची पूर्व-आवश्यकता). अशा परिस्थितीत, कोणती सीआयसी, ही सीआयसी-एनडी-एसआय समजली जाऊन तिने एक सीआयसी-एनडी-एसआय म्हणून ह्या बँकेकडे पंजीकरण करणे आवश्यक आहे - त्या गटातील प्रत्येक सीआयसी ? की केवळ मूळ सीआयसी ? की जिने सार्वजनिक निधी उभा केला आहे/मिळविला आहे ती विशिष्ट सीआयसी ?

उदाहरणार्थ - एचसीओ ही ए,बी,सी ह्या सीआयसींचा मूळ गट असून त्याने त्या सीआयसींचे 100 टक्के इक्विटी भांडवल धारण केले आहे. ह्यापैकी सी ह्या कंपनीने सार्वजनिक निधी मिळविला असल्यास, एचसीओ आणि ए,बी व सी ह्या सर्वांनीच, सीआयसी-एनडी-एसआय म्हणून पंजीकरण करावे की फक्त केवळ सी ह्या कंपनीनेच पंजीकरण करावयाचे आहे ?

उत्तर : अशा बाबतीत केवळ सी ह्या कंपनीनेच पंजीकरण केले जाईल - मात्र, कोणत्याही अन्य सीआयसीला, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, सी कंपनी निधी पुरवीत नसावी.

(6) एखाद्या कंपनीच्या नक्त अॅसेट्सच्या नव्वद टक्क्यांपेक्षा कमी नसलेले अॅसेट्स काढण्यासाठी, त्या कंपनीने, तिच्या दुय्यम कंपनीच्या दुय्यम कंपनीत (स्टेप डाऊन सबसिडिअरी) केलेली गुंतवणुक हिशेबात घेतली जाईल काय ?

उत्तर : सीआयसींच्या ताळेबंदामध्ये दर्शविलेल्या, गट-कंपनीमध्ये केलेल्या सर्व थेट गुंतवणुकी ह्यासाठी हिशेबात घेतल्या जातील. दुय्यम कंपन्यांनी, स्टेप डाऊन सबसिडिअरीज किंवा इतर संस्थांमध्ये केलेल्या गुंतवणुकी, नक्त अॅसेट्सचे 90 टक्के काढण्यासाठी हिशेबात घेतल्या जाणार नाहीत.

(7) विद्यमान दायित्वे देखील बाह्य दायित्वांचा एक भाग म्हणून समजली जातील काय ? डीटीएल, देय असलेला अग्रिम कर, आणि आय कराची तरतुद ह्यासाठी कोणती वर्तणुक असेल ? ही सर्व बाह्य दायित्वे असतील काय ?

उत्तर : पुनर् प्रदान/परतफेड करावयाची कोणतीही बाब हे बाह्य दायित्वच असेल.

(8) अटींनुसार असलेले सर्व निकष पूर्ण केल्यावर एखाद्या विद्यमान एनबीएफसी-एनडी-एसआयचे सीआयसी-एनडी-एसआयमध्ये रुपांतरण झाल्यास, विद्यमान सीओआर वैध/लागु असणे सुरुच राहील व त्यासाठी नव्याने अर्ज करावा लागेल ?

उत्तर : सीआयसी-एनडी-एसआय साठीचा अर्ज वेगळा/निराळा असल्याने, नव्यानेच अर्ज करावा लागेल.

(9) सीआयसी/सीआयसी-एनडी-एसआय, त्यांच्या गटाबाहेर धारण करु शकतात, अशा नेट अॅसेट्सच्या 10% मध्ये कोणत्या बाबी आहेत ?

उत्तर : ह्यामध्ये, कंपनी परिणामकारकतेने चालण्यासाठी आवश्यक असलेली रियल इस्टेट किंवा इतर स्थिर अॅसेट्सचा समावेश होतो - परंतु त्यात, गट नसलेल्या कंपन्यांमध्ये इतर वित्तीय गुंतवणुक/कर्जे समाविष्ट नाहीत.

(10) मार्च 31 ऐवजी, डिसेंबर 31 ह्यासारख्या एखाद्या तारखेवर आधारित वैधानिक लेखा ठेवण्यासाठी एखादी सहाय्यक तरतुद आहे काय ?

उत्तर : ताळेबंदाच्या तारखेनंतरच्याही घडामोडी हिशेबात घेतल्या जात असतात हे सत्य विचारात घेता, अशा लेखा (अकाऊंट्स) हिशेबात घेता येऊ शकत असल्या तरीही, सीआयसी-एनडी-एसआयसह सर्व एनबीएफसींना, त्या वर्षाच्या मार्च 31 रोजी, त्यांच्या लेखांना अंतिम स्वरुप देणे व त्या आकड्यांवर आधारित वार्षिक ऑडिटर प्रमाणपत्र सादर करणे अपरिहार्य करण्यात आले आहे.

(11) एखाद्या सीआयसी-एनडी-एसआयकडून, एखादी कंपनी सोडून अन्य गट संस्थेमध्ये (जसे, भागीदारी संस्था, एलएलपी, ट्रस्ट, व्यक्तींचे संघ इत्यादि) केलेली गुंतवणुक ही, गट-कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे 90% काढण्यासाठी, गट-कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणुक म्हणून समजली जाईल काय ?

उत्तर : नाही. गट कंपन्यांमधील गुंतवणुकीचे 90% काढण्यासाठी, केवळ कंपनी अधिनियम 1956 च्या कलम 3 खाली पंजीकृत झालेल्या कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणुक हीच, गट कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणुक समजली जाईल.

(12) सीआयसी-एनडी-एसआय कंपन्यांना, सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट अबँकीय वित्तीय (ठेव न ठेवणा-या व स्वीकारणा-या) कंपन्या प्रुडेंशियल नॉर्म्स (रिझर्व बँक) निदेश, 2015 मधून सूट मिळाली आहे काय ?

उत्तर : नाही. त्यांना केवळ एनबीएफसी म्हणून व्यवसाय सुरु ठेवणे, कॅपिटल अॅडेक्वसी, आणि क्रेडिट/गुंतवणुकीच्या काँसेंट्रेशन नॉर्म्स बाबतच्या वैधानिक ऑडिटर प्रमाणपत्राच्या सादरीकरणाबाबतच्या नॉर्म्स बाबतच सूट देण्यात आली आहे.

(13) सीआयसी-एनडी-एसआयना, विदेशात गुंतवणुक करावयाची असल्यास, फेमा (कोणत्याही विदेशी प्रतिभूतीचे हस्तांतरण किंवा प्रदान) सुधारित विनियम अधिनियम 2004 च्या विनियम 7 अन्वये, त्यांना एनओसी घेणे आवश्यक आहे काय ?

उत्तर : होय. कारण त्या आरबीआयच्या नियंत्रणाखाली असल्याकारणाने, वित्तीय क्षेत्रात गुंतवणुकी करण्यासाठी, अबँकीय पर्यवेक्षण विभागा (डीएनबीएस) कडून एनओसी घेणे आवश्यक आहे. तथापि, अवित्तीय क्षेत्रात गुंतवणुक करणा-या पंजीकृत सीआयसीने, आरबीआयच्या अबँकीय पर्यवेक्षण विभागाकडून (डीएनबीएस) त्यासाठी पूर्व मंजुरी घेणे आवश्यक नाही. अशी गुंतवणुक केल्याच्या 30 दिवसांच्या आत, त्याबाबत त्यांनी वरील विभागाला कळविणे आवश्यक आहे.

(14) पंजीकरणासाठी सूट मिळाली असलेल्या व विदेशात गुंतवणुक करणा-या सीआयसींना, डीएनबीएसकडून एनओसी घेणे आवश्यक आहे काय ?

उत्तर : अशी सूट मिळालेल्या व विदेशातील वित्तीय क्षेत्रात गुंतवणुक करु इच्छिणा-या सीआयसींनी, प्रथम, भारतीय रिझर्व बँकेकडून पंजीकरण प्रमाणपत्र (सीओआर) घेणे आवश्यक असून, पंजीकृत सीआयसी-एनडी-एसआय ह्यांना लागु असलेल्या सर्व विनियमांचे पालन केले असणे आवश्यक आहे. तथापि, त्यांच्या गुंतवणुकी, विदेशातील अवित्तीय क्षेत्रात असल्यास त्यांनी ह्या बँकेकडून एनओसी घेण्याची आवश्यकता नाही.

(15) ह्या बँकेकडे, वर्ग ब म्हणून आधीच वर्गीकृत झालेल्या व रु.100 कोटींपेक्षा कमी अॅसेट्स असलेल्या, परंतु सीआयसी साठीचे निकष पूर्ण करणा-या एनबीएफसी, स्वेच्छेने निरपंजीकरण करु शकतात काय ? (कारण नवीन नॉर्म्सखाली, ह्या कंपन्यांना ह्या बँकेकडे पंजीकृत होण्याची आवश्यकता नसते), तसे असल्यास, कशावर विसंबून रहावे ? वैधानिक ऑडिटरचे प्रमाणपत्र, एक किंवा अधिक वर्षांसाठीचे ऑडिटेड ताळेबंद ?

उत्तर : होय. ह्या बँकेकडे सध्या पंजीकृत असलेल्या व अधिसूचना क्र.220 दि. जानेवारी 5, 2010 खाली सूट मिळविण्यासाठीचे निकष पूर्ण करणा-या सीआयसी, स्वेच्छेने निरपंजीकरण करु शकतात. ह्यासाठी, ऑडिट केलेले ताळेबंद व ऑडिटरचे प्रमाणपत्र हे दोन्हीही सादर करणे आवश्यक आहे.

(16) रु.100 कोटीपेक्षा कमी अॅसेट असलेल्या सीआयसी, आरबीआयकडून नियंत्रित/विनियमित केल्या जातात काय ?

उत्तर : वित्तीय क्षेत्रात विदेशात गुंतवणुक करण्यास इच्छुक असलेल्या सोडून, रु.100 कोटीपेक्षा कमी अॅसेट्स असलेल्या सीआयसींना, रिझर्व बँकेकडे पंजीकरण करण्यास व विनियमित होण्यास सूट देण्यात आली आहे.

(17) सीआयसीच्या व्याख्येनुसार, 90% एक्सपोझर काढण्यासाठी, केवळ गट-कंपन्यांमधील कर्जे घेणे/देणे/गुंतवणुकी करणेच अर्हताप्राप्त आहे काय ? त्या गटाच्या भागीदारी कंपन्यांमध्ये, त्या कंपनीने केलेल्या गुंतवणुकींना कोणती वागणुक दिली जाईल ?

उत्तर : कोणत्याही भागीदारी कंपनीला भांडवल देण्यास, किंवा लिमिटेड लायाबिलिटी पार्टनरशिप्स (एएलपी) सह भागीदारी संस्थांमध्ये, किंवा भागीदारी संस्थांच्या स्वरुपात असलेल्या व्यक्तीगत संघामध्ये भागीदारी करण्यास, सीआयसींना मनाई आहे.

(18) एखादी कंपनी सूचिबध्द नसल्यास तिला ब्लॉक डील्सच्या अटी लागु होतील काय ? ब्लॉक डील विक्री म्हणून व्याख्या करण्यासाठी, त्यासाठी हस्तांतरित करावयाच्या शेअर्सची संख्या/मूल्य काय असावे ?

उत्तर : सीआयसी परिपत्रकांमध्ये वापरण्यात आलेली संज्ञा ब्लॉक डील ही नसून, सेबीने व्याख्या केल्यानुसार ती ब्लॉक विक्री अशी आहे. ह्या परिपत्रकाच्या संदर्भात, एखादी ब्लॉक विक्री ही गुंतवणुकीसाठी किंवा निर्गुंतवणुकीसाठी केलेली दीर्घ मुदतीची किंवा डावपेच म्हणून केलेली विक्री असेल, परंतु लघु मुदतीच्या ट्रेडिंगसाठी नसेल. ब्लॉक डील च्या विरुध्द त्यात ह्या कामासाठीची किमान संख्या/मूल्य नसेल.

(19) सीआयसी/सीआयसी-एनडी-एसआय ठेवी स्वीकारु शकतात काय ?

उत्तर : नाही. सीआयसी/सीआयसी-एनडी-एसआय ठेवी स्वीकारु शकत नाहीत. हा पात्रतेचाच एक निकष आहे.

(20) सार्वजनिक निधी ह्या संज्ञेत काय-काय समाविष्ट आहेत ? तो सार्वजनिक ठेवीप्रमाणेच आहे काय ?

उत्तर : सार्वजनिक निधी हे सार्वजनिक ठेवींप्रमाणेच नाहीत. सार्वजनिक निधी मध्ये, सार्वजनिक ठेवी, आंतर-कॉर्पोरेट ठेवी, बँक वित्त, आणि कमर्शियल पेयर्स, डिबेंचर्स इत्यादि देऊन उभे करावयाचे निधी ह्यासारख्या बाहेरील स्त्रोतांमधून, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मिळालेले निधी इत्यादींचा समावेश आहे. तथापि, सर्वसाधारण रीत्या, सार्वजनिक निधींमध्ये सार्वजनिक ठेवी समाविष्ट असल्या तरी, येथे नोंद घेण्यात यावी की, सीआयसी/सीआयसी-एनडी-एसआय, सार्वजनिक ठेवी स्वीकारु शकत नाहीत.

(21) सार्वजनिक निधीच्या ‘व्याख्येत, अप्रत्यक्षपणे मिळालेले सार्वजनिक निधी’ ह्या संज्ञेचा अर्थ काय ?

उत्तर : अप्रत्यक्षपणे मिळालेले सार्वजनिक निधी म्हणजे, प्रत्यक्षपणे नव्हे, तर सार्वजनिक निधी मिळवू शकतात अशा संलग्न व गट संस्थांच्या मार्फत मिळालेला निधी.

(22) सीआयसी हमी देऊ शकतात काय ? आणि ह्याला, सार्वजनिक निधीच्या व्याख्येचा एक भाग समजता येऊ शकतो काय ?

उत्तर : होय. सीआयसी, त्यांच्या गट कंपन्यांच्या वतीने हमी देऊ शकतात किंवा इतर आकस्मिक जबाबदा-या घेऊ शकतात. सार्वजनिक निधीच्या व्याख्येखाली हमी येत नाहीत. तथापि, अशी शक्यता आहे की, सार्वजनिक ठेवी न स्वीकारणा-या सीआयसी, हमी-हस्तांतरणाचे वेळी सार्वजनिक निधीचा आधार घेतात. ह्यासाठी, असे करण्यापूर्वी, ह्याखालील दायित्व निर्माण होईल त्यावेळी, ते दायित्व त्या पूर्ण करु शकतील ह्याची खात्री सीआयसींनी करुन घेतलीच पाहिजे. विशेषतः पंजीकरणाच्या आवश्यकतांमधून सूट मिळालेल्या सीआयसींनी, दायित्व हस्तांतरणाचे वेळी, सार्वजनिक ठेवींचा आधार न घेता, ते दायित्व पूर्ण करण्याच्या स्थितीत असण्याबाबतची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. रु.100 कोटीपेक्षा अधिक अॅसेट्स असलेल्या व पंजीकृत नसलेल्या सीआयसींनी, आरबीआय कडून पंजीकरण प्रमाणपत्र (सीओआर) घेतल्याशिवायच सार्वजनिक निधी मिळविल्यास, अशी कृती, कोअर इनवेस्टमेंट कंपनीज (रिझर्व बँक) निदेश, 2011 दि. जानेवारी 5, 2011 चे उल्लंघन समजली जाईल.

(23) गट-कंपनी म्हणजे काय ?

उत्तर : एखादी कंपनी ही सीआयसी-एनडी-एसआय हे ठरविण्यासाठी, ‘गटामधील कंपन्या’ ची व्याख्या, अधिसूचना क्र.डीएनबीएस.(पीडी) 219/ सीजीएम(युएस)-2011 दि. जानेवारी 5, 2011 मध्ये, सविस्तरपणे, पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे - पुढीलपैकी कोणत्याही एका संबंधात एकमेकांशी संबंधित असलेल्या दोन किंवा अधिक कंपन्या/संस्थांमधील व्यवस्था - उदा. दुय्यम-मूळ (एएस 21 नुसार व्याख्या केलेली) संयुक्त उद्योग (एएस 27 नुसार व्याख्या केलेली), संलग्न/सहकारी (एएस 23 नुसार व्याख्या केलेली) प्रायोजक-प्रायोजित (सेबी (शेअर्स मिळविणे व ताबा घेणे) विनियम, 1997 मध्ये दिल्यानुसार) सूचिबध्द कंपन्यांसाठी, संबंधित पक्ष (एएस 18 नुसार व्याख्या केलेला) सामान्य ब्रँड नेम, आणि 20% व त्यावरील इक्विटी शेअर्स मध्ये गुंतवणुक).

(24) एखादी कंपनी सीआयसी-एनडी-एसआय म्हणून पंजीकृत कशी होऊ शकते ?

उत्तर : सीआयसी-एनडी-एसआय साठीचा अर्जाचा फॉर्म, ह्या बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असून, तो डाऊनलोड करुन व भरुन, त्या अर्ज-फार्ममध्ये दिलेल्या कागदपत्रांसह, ती डीएनबीएस ज्याच्या अधिकार क्षेत्राखाली येते, त्या प्रादेशिक कार्यालयाकडे तो अर्ज सादर केला जावा.

(25) एखाद्या सीआयसी-एनडी-एसआयची, तिच्या गटामधील गुंतवणुक 90% असली पाहिजे आणि विद्यमान एक्सपोझर नॉर्म्सच्या अनुसार, एनबीएफसी-एनडी-एसआयना, कोणत्याही गटामध्ये कर्ज देणे व गुंतवणुक असे दोन्हीही 40% पर्यंतच करण्यास परवानगी आहे. त्यामुळे, तिचा संपूर्ण व्यवसाय एका दुय्यम कंपनीतच असल्याने, एखादी एनबीएफसी, एनओएफ, सीआरएआर किंवा काँन्सेंट्रेशन नॉर्म्सचा भंग/उल्लंघन करताही एक सीआयसी होऊ शकते. तथापि, त्या संस्थेच्या धारण-रचनेत स्पष्टता येत असल्या कारणाने एखादी एनबीएफसी, स्वेच्छेने सीआयसी-एनडी-एसआय होऊ शकते. हा प्रश्न कसा सोडविता येऊ शकेल ? ज्याप्रमाणे एखाद्या अपंजीकृत सीआयसी-एनडी-एसआयला 6 महिने दिले जातात, त्याचप्रमाणे, एनबीएफसी-एनडी-एसआयलाही, कॅपिटल अॅडेक्वसी/एक्सपोझर नॉर्म्स मध्ये, संक्रमण कालात सूट दिली जाऊ शकते काय ?

उत्तर : त्या एनबीएफसीला तिच्या योजनेच्या पूर्ण तपशीलासह आरबीआयकडे अर्ज करावा लागेल आणि त्या प्रकारच्या गुणविशेषांच्या आधाराने निवडक धर्तीवर सूट दिली जाईल.

(26) एका कंपनीने गट-कंपन्यांमध्ये गुंतवणुक केली आहे. पण अॅसेट-इनकम निकषांनुसार, एक एनबीएफसी होण्यासाठी व्याख्या केल्यानुसार, ती कंपनी मुख्य व्यवसायासाठीचे निकष पूर्ण करु शकत नाही. तरीही ती कंपनी एक सीआयसी म्हणून पंजीकृत केली जाऊ शकते काय, की तिला आधी एक एनबीएफसी म्हणून पंजीकृत व्हावे लागेल ?

उत्तर : एनबीएफसींसाठी असलेले मुख्य व्यवसाय निकष पूर्ण करणे सीआयसीसाठी आवश्यक नाही.

(27) एक कंपनी एक सीआयसीच आहे परंतु ती, विहित केलेले निकष संपूर्णपणे पूर्ण करत नाही; तेव्हा अशा कंपनीने एक एनबीएफसी म्हणून पंजीकृत व्हावे काय ?

उत्तर : अधिसूचना क्र. अधिसूचना क्र.डीएनबीएस.(पीडी) 219/सीजीएम(युएस)-2011 दि. जानेवारी 5, 2011 च्या परिच्छेद 2 मध्ये दिलेले, सीआयसीसाठीचे निकष पूर्ण न करणा-या एखाद्या धारक कंपनीचा, एक एनबीएफसी म्हणूनच पंजीकृत होणे आवश्यक आहे. तथापि, अशी कंपनी, एक सीआयसी-एनडी-एसआय म्हणून पंजीकृत/सूट मिळविण्यास इच्छुक असल्यास, तिला तिच्या सीआयसी म्हणून करावयाच्या पुनर्घटनाच्या विशिष्ट कालावधीत साध्य करावयाच्या कृती योजनेसह, आरबीआयकडे अर्ज करावा लागेल. ती तसे करु शकत नसल्यास, तिला एनबीएफसीसाठीच्या आवश्यकतांचे व प्रुडेंशियल नॉर्म्सचे पालन करावे लागेल.

(28) सीआयसी निकष (चारही) पूर्ण न करणा-या एखाद्या धारक कंपनीला, तिने अॅसेट-उत्पन्नाबाबतचे निकष पूर्ण केले नसल्यासही एनबीएफसीबाबतच्या आवश्यकता व प्रुडेंशियल नॉर्म्स पूर्ण करणे आवश्यक आहे काय ? (उदाहरणार्थ :- ती धारक कंपनी दुस-या एका गट-कंपनीमधील 60 टक्के इक्विटीची मालक आहे; आणि इतर तीन अटी मात्र पूर्ण करत नाही, म्हणून ती एक सीआयसी म्हणून पात्र ठरत नाही. ह्याशिवाय, वित्तीय अॅसेट्समधून मिळणारे उत्पन्नही, तिच्या एकूण उत्पन्नाच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. अशा कंपनीसाठी, एनबीएफसी-नॉर्म्स पूर्ण करणे आवश्यक आहे काय ?)

उत्तर : नाही. ती कंपनी, एखाद्या एनबीएफसीसाठी असलेले, प्रमुख व्यवसाय निकष (अॅसेट-उत्पन्न साचा) पूर्ण करत नसल्याने (म्हणजेच, 50% पेक्षा अधिक अॅसेट्स हे वित्तीय अॅसेट्स असावेत, आणि त्या अॅसेट्समधून मिळणारे उत्पन्न तिच्या सकल उत्पन्नाच्या 50% पेक्षा अधिक असावे) त्या कंपनीसाठी, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय ए खाली पंजीकरण करणे आवश्यक नाही. तथापि, एनबीएफसीबाबतचे निकष पूर्ण केल्यावरच तिने एक एनबीएफसी म्हणून पंजीकरण करुन घ्यावे आणि एनबीएफसीसाठी असलेल्या नॉर्म्सचे पालन करावे.

(29) एका गटाला, पुनः संघटन करण्यासाठी, त्या गटात एक सीआयसी-एनडी-एसआय स्थापन करावयाची आहे. तथापि, आरबीआयकडून सीओआर प्राप्त केल्याशिवाय कोणतीही कंपनी एखाद्या एनबीएफसीचा व्यवसाय करु शकत नाही. म्हणून प्रायोजित कंपनीला, निरनिराळ्या कंपन्यांमधील शेअर्स, त्या सीआयसी-एनडी-एसआय मध्ये हस्तांतरित करण्यापूर्वी, सीओआरसाठी अर्ज करावा लागेल, परंतु त्यावेळी, त्या कंपनीचा नक्त अॅसेट्सचे 90%, गट कंपन्यांमध्ये गुंतविले नसल्याने, ती कंपनी आवश्यकतांच्या बाबतीत पात्र नसेल. अशा वेळी त्या कंपनीने काय करावे ?

उत्तर : त्या कंपनीला एक वर्षाच्या विहित कालावधीत, सीआयसी-एनडी-एसआयचा दर्जा मिळविण्यासाठी तिची योजना सादर करुन आरबीआयकडे सीओआरसाठी करावा लागेल. ती कंपनी तसे करु न शकल्यास, सूट लागु होणार नाही आणि तिला, एनबीएफसी साठीचे कॅपिटल अॅडेक्वसी व एक्सपोझर नॉर्म्सचे पालन करावे लागेल.

(30) रु.100 कोटीपेक्षा कमी अॅसेट्स असल्यामुळे किंवा सार्वजनिक निधी मिळवत नसल्यामुळे, पंजीकरणापासून सूट मिळालेल्या सीआयसींनी, एनबीएफसी म्हणून पंजीकरण करणे आवश्यक आहे काय ?

उत्तर : अशा सीआयसींना की ज्या (अ) सार्वजनिक निधी मिळवत असोत किंवा नसोत व ज्यांचे अॅसेट रु.100 कोटीपेक्षा कमी आहेत आणि (ब) ज्यांचे अॅसेट्स रु.100 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक असून, ज्या सार्वजनिक निधी मिळवत नाहीत, त्यांना, अधिसूचना क्र.डीएनबीएस.(पीडी) 221/सीजीएम(युएस)-2011 दि. जानेवारी 5, 2011 अनुसार, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए खाली ह्या बँकेकडे पंजीकरण करण्यास सूट देण्यात आली आहे. अशा प्रकारे, त्यांनी ह्या बँकेकडे पंजीकरण करण्याची आवश्यकता नाही. आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 एनसी खाली दिलेली ही सूट असल्याने त्यांनी ह्या बँकेकडे येण्याची गरज नाही.

(31) हा कायदा एनबीएफसींना लागु आहे काय ? म्हणजेच, रु.100 कोटीपेक्षा कमी अॅसेट्स असलेल्या व सार्वजनिक निधी न मिळविणा-या एनबीएफसींनाही, ह्या बँकेकडे पंजीकरण करण्यात सूट मिळेल काय ?

उत्तर : नाही. ही सूट केवळ सीआयसींनाच देण्यात आली आहे. सीआयसी सोडून असलेल्या एनबीएफसीं ह्याखाली किंवा सीआयसी निदेशांखाली येत नाहीत व त्यांना ह्या बँकेकडे पंजीकरण करावेच लागेल आणि ह्या बँकेने वेळोवेळी दिलेल्या लागु असलेल्या सर्व निदेशांचे पालन करावे लागेल.

(32) नक्त अॅसेट्समध्ये कार्यकारी अॅसेट्स समाविष्ट असावेत काय ?

उत्तर : अधिसूचना क्र.डीएनबीएस.(पीडी) 219/सीजीएम(युएस)-2011 दि. जानेवारी 5, 2011 (परिच्छेद 3 (1) ई) मध्ये, खास सीआयसीची व्याख्या करण्यासाठी नक्त अॅसेट्सची व्याख्या देण्यात आली आहे. त्यामुळे, त्यापैकी कोणतेही अॅसेट्स, कार्यकारी अॅसेट्स म्हणून पात्र असोत किंवा नसोत, त्यात दिलेल्या खास/विशिष्ट बाबीच त्यात समाविष्ट असतील.

(33) गट कंपन्यांच्या व्याख्येमध्ये एलएलपी व भागीदारी समाविष्ट आहेत काय ?

उत्तर : एलएलपी किंवा भागीदारी ह्या कंपन्या नाहीत, आणि म्हणून, त्यांना, गट-कंपन्यांच्या व्याख्येमधूनच जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. ह्याशिवाय, ह्या संस्थांची ढिसाळ रचना व विनियामक साचा विचारात घेता, त्यांना ह्या व्याख्येत समाविष्ट करावे असे वाटत नाही.

(34) देण्याच्या तारखेपासून 10 वर्षांपेक्षा अधिक नसलेल्या काळासाठी, इक्विटी शेअर्स मध्ये सक्तीने/अपरिहार्यपणे रुपांतरित करणे आवश्यक असलेले संलेख, कंपनीज अधिनियमाच्या अटीनुसार, बाह्य दायित्वांपासून वगळण्यात आले असले तरी, ते संलेख 20 वर्षांच्या कालावधीत परिवर्तनीय असल्यास, त्यांना ‘सार्वजनिक ठेवींच्या’ व्याख्येतून वगळण्यात आले आहे काय ?

उत्तर : 10 वर्षांचा कालावधी हा एक प्रुडेंशियल उपाय म्हणून विहित करण्यात आला होता - कंपनीज् अधिनियमाच्या तरतुदीनुसार नव्हे. ह्याशिवाय, येथील प्रश्न हा सार्वजनिक ठेवींचा नसून बाह्य दायित्वांचा आहे.

(35) इतर एनबीएफसींच्या बाबतीत असण्याविरुध्द, सीआयसी-एनडी-एसआय (अ) विदेशी गुंतवणुक किंवा (ब) ईसीबी उभे करणे किंवा (क) शेअर्स मिळवून बँक वित्त मिळविणे करु शकत नाही काय ?

उत्तर : सीआयसी-एनडी-एसआय वरील निदेशांमध्ये, त्यांनी विदेशात गुंतवणुक करणा-यावर निर्बंध टाकलेले नाहीत. अशी गुंतवणुक, महानिदेश, कोअर इनवेस्टमेंट कंपन्या (रिझर्व बँक) निदेश, 2016 च्या प्रकरण 7 च्या तरतुदींनी विनियमित/नियंत्रित असतील. त्याचप्रमाणे, सध्या, सीआयसी-एनडी-एसआय ईसीबी मार्फत निधी उभा करु शकतात. परंतु त्यावर, रिझर्व बँकेच्या विदेशी मुद्रा विभागाने दिलेल्या ईसीबी धोरणाचे नियंत्रण असेल. बँकांकडून एनबीएफसी/सीआयसींना दिलेल्या कर्जांवर, बँकांना लागु असलेल्या तरतुदींचे, आणि रिझर्व बँकेच्या बँकिंग विनियामक विभागाने दिलेल्या, ‘एनबीएफसींसाठी बँक वित्त’ मध्ये विशेष करुन दिलेल्या तरतुदींचे नियंत्रण असेल.

(36) एखाद्या गटामधील एक छोटी सीआयसी, सार्वजनिक निधी मिळवत नसल्यास; तिने एकूण/सकल अॅसेट्सवर आधारित पंजीकृत का व्हावे ?

उत्तर : ह्या एफएक्युंमध्ये आधीच स्पष्ट केल्यानुसार, त्याच गटामधील अन्य सीआयसी, सार्वजनिक निधी मिळवत असली किंवा नसली तरीही, सार्वजनिक निधी न मिळविणा-या सीआयसीला पंजीकरण करण्यामधून सूट देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, अ ही एक सीआयसी असून, ब व क ह्यादेखील सीआयसी व अ च्याच गटातील कंपन्या असल्यास, ब व क ह्यासह इतर कोणत्याही गट कंपनीमधून किंवा कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक निधी, ती (अ कंपनी) मिळवत नसल्यास, तिला (अ कंपनीला) एक सीआयसी म्हणून पंजीकरण करणे आवश्यक नाही. अ, ब आणि क ह्या तीनही कंपन्या कोणत्याही स्वरुपाचा सार्वजनिक निधी मिळवत नसल्यास, त्यापैकी कोणत्याही कंपनीला सीआयसी म्हणून पंजीकृत होण्याची गरज नाही.

(37) अनुपालनाच्या हेतूसाठी, त्या गटामधील सर्व सीआयसींचे समायोजित नक्त मूल्य एकत्रित धरले जाईल काय ?

उत्तर : समायोजित नक्त मूल्य (एएनडब्ल्यु) ही, भांडवली आवश्यकतेसारखीच एक संकल्पना आहे आणि त्यात, एएनडब्ल्यु, जोखीम भारित अॅसेट्सच्या (आरडब्ल्युए) 30% पेक्षा कमी नसावे. जेथे अॅसेट्स एकत्रित केले जातात तेथे, त्या गटामधील सर्व सीआयसींचे पंजीकरण सीआयसी-एनडी-एसआय म्हणून केले जाईल आणि वैय्यक्तिक रितीने एएनडब्ल्यु लागु होईल.

(38) सार्वजनिक निधीच्या व्याख्येमध्ये प्रकट असा विरोधाभास आहे, कारण सार्वजनिक निधीच्या व्याख्येत सार्वजनिक ठेवींचा समावेश करताच, सीआयसींनी सार्वजनिक ठेवी मिळविल्याचे मानले जाईल आणि म्हणून, त्या एक्सपोझर नॉर्म्स असलेल्या एनबीएफसी होतील काय ?

उत्तर : सर्वसाधारणतः सार्वजनिक निधीमध्ये सार्वजनिक ठेवी समाविष्ट असल्या तरी, येथे नोंद घेतली जावी की, सीआयसी, सार्वजनिक ठेवी स्वीकारु शकत नाहीत. ह्याशिवाय पुनश्च सांगण्यात येते की, ह्या बँकेकडून सीओआर मिळाले असले तरीही, ह्या बँकेच्या खास परवानगीशिवाय कोणतीही एनबीएफसी सार्वजनिक ठेवी स्वीकारु शकत नाही.

(39) एखाद्या गटामधील अनेक एनबीएफसी ह्यावर दिलेल्या सीसी डीएनबीआर (पीडी) सीसी.क्र. 002/03.10.001/ 2014-15 दि. नोव्हेंबर 10, 2014 अन्वये, एनबीएफसींसाठीचा सुधारित विनियामक साचाचा परिच्छेद 7, त्या गटामधील कोअर इनवेस्टमेंट कंपन्यांनाही (सीआयसी) लागु असेल काय ?

उत्तर : नाही. ह्या परिपत्रकाखाली, गटामधील अनेक एनबीएफसींचे अॅसेट्स एकत्रित करण्यासाठी, त्या गटामधील सीआयसी विचारात घेतल्या जाणार नाहीत. ह्याबाबत, त्या सीआयसींना, कोअर इनवेस्टमेंट कंपन्या (रिझर्व बँक) निदेश, 2011, दि. नोव्हेंबर 5, 2011 मधील सूचना लागु असतील.

(40) सीआयसींना लागु असलेले अॅसेट वर्गीकरणाचे नॉर्म्स कोणते ?

उत्तर : रु.500 कोटींपेक्षा कमी अॅसेट्स असलेल्या पंजीकृत सीआयसींना, नॉन-सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट अबँकीय वित्तीय (ठेवी न स्वीकारणा-या किंवा धारण न करणा-या) कंपन्या प्रुडेंशियल नॉर्म्स (रिझर्व बँक) निदेश 2005 मध्ये विहित केलेले अॅसेट वर्गीकरण नॉर्म्स लागु होतील, आणि रु.500 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक अॅसेट्स असलेल्यांनी, सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट अबँकीय वित्तीय (ठेवी न स्वीकारणा-या किंवा धारण न करणा-या) कंपन्या प्रुडेंशियल नॉर्म्स (रिझर्व बँक) निदेश, 2005 मध्ये विहित केल्यानुसार, > = रु.500 कोटी अॅसेट्स असलेल्या एनबीएफसींना लागु असलेल्या अॅसेट वर्गीकरण नॉर्म्सचे अनुसरण करावे.

(41) सीआयसींना लागु असलेले प्रमाणभूत अॅसेट तरतुदीकरण नॉर्म्स कोणते ?

उत्तर : रु.500 कोटी पेक्षा कमी अॅसेट्स असलेल्या पंजीकृत सीआयसी, नॉन-सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट अबँकीय वित्तीय (ठेवी न स्वीकारणा-या किंवा न धारण करणा-या) कंपन्या प्रुडेंशियल नॉर्म्स (रिझर्व बँक) निदेश, 2015 मध्ये विहित केल्यानुसार, 0.25% एवढे प्रमाणभूत अॅसेट तरतुदीकरण ठेवतील आणि > = रु.500 अॅसेट्स असलेल्या पंजीकृत सीआयसी, सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट अबँकीय वित्तीय (ठेवी न स्वीकारणा-या किंवा धारण करणा-या) कंपन्या प्रुडेंशियल नॉर्म्स (रिझर्व बँक) निदेश 2015 मध्ये विहित केल्यानुसार लागु असलेले 0.40% एवढे प्रमाणभूत अॅसेट तरतुदीकरण ठेवतील.

(42) कोअर इनवेस्टमेंट कंपन्यांना (सीआयसी), 91 दिवसांपेक्षा कमी परिपक्वतेच्या तरल निधी योजनांमध्ये (म्युच्युअल फंड) गुंतवणुक करण्यास परवानगी आहे काय ?

उत्तर : होय, सीआयसीसाठींच्या विद्यमान निदेशांनुसार, त्यांना, मनी मार्केट म्युच्युअल फंडांसह, मनी मार्केट संलेखांमध्ये गुंतवणुक करण्यास परवानगी आहे. मनी मार्केट संलेखामुळे, तरल निधी (लिक्विड फंड्स) हे म्युच्युअल फंड्स असल्याने, सीआयसींना त्यांचा अतिरिक्त निधी तरल निधी योजनांमध्ये गुंतविण्यास परवानगी आहे.

(43) सध्या, रु.100 कोटींपेक्षा कमी अॅसेट्स असलेल्या सीआयसींना, त्यांचा ताळेबंद रु.100 कोटी झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत ह्या बँकेकडे अर्ज करणे आवश्यक आहे. रु.100 कोटींचा ताळेबंद असण्याची तारीख ही, शेवटच्या ऑडिटेड ताळेबंदाची तारीख असू शकते काय ?

उत्तर : होय. सीआयसी असलेल्या व तिच्या शेवटच्या ऑडिटेड वार्षिक वित्तीय विवरणपत्रानुसार, रु.100 कोटींचा ताळेबंद साध्य करणा-या सीआयसीला ह्या बँकेकडे, एक सीआयसी-एसआय म्हणून पंजीकरणासाठी अर्ज करणे आवश्यक आहे - मात्र, सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट सीआयसी म्हणून ओळखले जाण्यासाठीच्या इतर अटी तिने पूर्ण केल्या असल्या पाहिजेत.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä