(संदर्भ क्र.डीओएस.सीओ.एआरजी/एसइसी.01/08.91.001/2021-22 एप्रिल 27, 2021)
परिपत्रक दिनांक, एप्रिल 27, 2021 नुसार, वाणिज्य बँका (आरआरबी सोडून), युसीबी व एनबीएफसी (एचएफसींसह) ह्यांच्यासाठीच्या वैधानिक केंद्रीय ऑडिटर्स (एससीए)/वैधानिक ऑडिटर्स (एसए) च्या नेमणुकीसाठीची मार्गदर्शक तत्त्वे ही, मालकी नसलेले विनियम ठेवण्यासाठी, ऑडिटर्सचे स्वातंत्र्य अबाधित राहण्याची खात्री करुन घेण्यासाठी व ऑडिटर्सच्या नेमणुकीमधील हितसंबंधाचे वाद टाळण्यासाठी आणि आरबीआयकडून विनियमित केल्या गेलेल्या संस्थांच्या ऑडिटरचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी आरबीआयने दिली आहेत. सर्व विनियमन संस्थांमधील ऑडिटर्सची नेमणूक करण्याच्या कार्यरीतींमध्ये सुसूत्रता आणण्यास आणि अशा नेमणुकी वेळेवारी, पारदर्शकतेने व परिणामकारकतेने केल्या जाण्यास ह्या मार्गदर्शक तत्त्वांची मदत होईल.
ह्या बाबतीत विचारण्यात येणा-या काही स्पष्टीकरणांचा विचार करुन, खाली दिल्यानुसार नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) व आवश्यक स्पष्टीकरणे देण्याचे ठरविण्यात आले आहे :-
(1) परिच्छेद 6.4 अनुसार, गटामधील सर्व संस्थांसाठी किंवा गटामधील आरबीआय विनियमित संस्थांसाठी, त्या संस्थांसाठी किंवा तिच्या गटातील संस्थांच्या ऑडिट/नॉन ऑडिट कार्यांसाठी असलेल्या/केलेल्या कोणत्याही नॉन-ऑडिट कामांमध्ये एक वर्षाचा फरक/अंतर असणे आवश्यक आहे काय ?
ह्या परिपत्रकात1 दिल्यानुसार गटातील संस्थेची व्याख्या असलेल्या व गटामधील आरबीआय विनियमित संस्था म्हणजेच, गट संस्था. तथापि, गट कंपन्यांसाठी (आरबीआयने विनियमित न केलेल्या) ऑडिट/नॉन ऑडिट कामांसाठी नेमण्यात आलेल्या एखाद्या ऑडिट कंपनीचा, एससीए/एसए म्हणून, नेमणुक करण्याचा विचार, आरबीआय विनियमित कोणत्याही संस्थेने केल्यास, संबंधित आरबीआय विनियमित संस्थेच्या संचालक मंडळाची/एसीबी/एलएमसीची जबाबदारी असेल की, हितसंबंधांबाबतचे वाद असणार नाहीत तसेच ऑडिटर्सचे स्वातंत्र्य अबाधित असेल. आणि ही बाब, संचालक मंडळ/एसीबी/एलएमसीच्या सभांच्या इतिवृत्तामध्ये सुयोग्यतेने नोंदविली जावी.
(2) जोडपत्र 1 च्या परिच्छेद ब(4) अनुसार, एखाद्या चार्टर्ड अकाऊंटंट कंपनीचा एखादा भागीदार कोणत्याही संस्थेमध्ये संचालक असल्यास, ती चार्टर्ड अकाऊंटंट संस्था, त्या संस्थेच्या कोणत्याही गट संस्थांमध्ये एससीए/एसए म्हणून नेमली जाणार नाही. ही अट, गटातील सर्व संस्थांना किंवा गटामधील आरबीआय विनियमित संस्थांना लागु आहे काय ?
येथे, गट-संस्थांचा संदर्भ हा, ह्या परिपत्रकातील गट संस्थेच्या व्याख्येनुसार असलेल्या, गटामधील आरबीआय विनियमित संस्थांशी आहे. ह्यामुळे, चार्टर्ड अकाऊंटंट कंपनीमधील एखादा भागीदार हा त्या गटातील आरबीआय विनियमित संस्थेत संचालक असल्यास, ती कंपनी, गटामधील कोणत्याही आरबीआय विनियमित संस्थेमध्ये एससीए/एसए म्हणून नेमली जाणार नाही. तथापि, जिचा भागीदार (आरबीआयने विनियमित न केलेल्या) कोणत्याही गट कंपनीत संचालक आहे अशा ऑडिट कंपनीचा विचार, एससीए/एसए म्हणून नेमणुक करण्यासाठी, गटातील कोणतीही आरबीआय विनियमित संस्था करत असल्यास ती ऑडिट कंपनी, एसीबी तसेच संचालक मंडळ/एलएमसी कडे त्याबाबत सुयोग्य प्रकटीकरणे सादर करील.
(3) परिच्छेद 6.4 अनुसार, एफवाय 2021-22 साठी, एखाद्या ऑडिट कंपनीची एससीए/एसए म्हणून नेमणुक करण्यापूर्वी, त्या संस्थांना एक वर्ष मागे पाहणे (त्या संस्थांच्या कोणत्याही नॉन ऑडिट कामांसाठी किंवा गट संस्थांसाठीच्या कोणत्याही ऑडिट/नॉन ऑडिट कामांबाबत) आवश्यक आहे काय ?
आरबीआय विनियमित संस्थेचा एससीए/एसए म्हणून एखाद्या ऑडिट कंपनीची नेमणुक करण्यापूर्वी, अशी नेमणुक व त्या आरबीआय विनियमित संस्थांमधील, किंवा गटामधील आरबीआय विनियमित इतर संस्थांमधील, त्या ऑडिट कंपनीला दिलेली नॉन ऑडिट कामे पूर्ण होणे ह्यात किमान एक वर्षाचा कालावधी असणे आवश्यक आहे. ही अट भविष्यात म्हणजे एफवाय 2022-23 पासून लागु होईल. ह्यामुळे, एखादी ऑडिट कंपनी, त्या संस्थेचे काही नॉन ऑडिट काम करत असल्यास, आणि/किंवा गटामधील आरबीआय विनियमित इतर संस्थांमधील कोणतेही ऑडिट/नॉन ऑडिट काम करत असल्यास आणि, एफवाय 2021-22 साठी त्या कंपनीच्या एससीए/एसए म्हणून नेमणुकीच्या तारखेपूर्वी ते काम तिने पूर्ण केले असल्यास किंवा सोडून दिले असल्यास, ती ऑडिट कंपनी, एफवाय 2021-22 साठी एससीए/एसए म्हणून नेमणुक केली जाण्यास पात्र असेल.
येथे पुनश्च सांगण्यात येते की, संस्थांसाठीच्या एससीए/एसएंनी केलेली नॉन ऑडिट कामे किंवा तिच्या गटामधील संस्थांसाठी केलेली ऑडिट/नॉन ऑडिट कामे ह्यामधील अंतर/कालावधी, एससीए/एसए म्हणून केलेले ऑडिट पूर्ण झाल्यानंतर किमान एक वर्ष असावा.
(4) पात्रता निकष पूर्ण केले नसताना व नेमणुकीची मूळ मुदत अजून पूर्ण झाली नसतानाही विद्यमान एससीए/एसए पुढे काम करणे सुरु ठेवू शकतात काय ? संस्थांनी ताबडतोब एससीए/एसए (संयुक्त ऑडिटर्स म्हणूनही) नेमणे आवश्यक आहे काय की ते ती नेमणुक त्यानंरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) केले जाऊ शकते ?
त्या संस्थेचे विद्यमान एससीए/एसए ह्यांनी पात्रतेचे निकष पूर्ण केले असल्यासच आणि त्या संस्थेचे एससीए/एसए म्हणून विहित केलेली तीन वर्षे पूर्ण केली नसल्यासच (संयुक्त ऑडिटर्स म्हणून सह) पुढे काम करणे सुरु ठेवू शकतात. एफवाय 2021-22 साठीच्या एससीए/एसए ची नेमणुक होईपर्यंत, ह्या परिपत्रकाच्या आवश्यकता व लागु असलेल्या वैधानिक तरतुदीनुसार, एफवाय 2020-21 चे एससीए/एसए, प्रश्न 1, प्रश्न 2 इत्यादींच्या मर्यादित पुनरावलोकनासाठी काम करणे सुरु ठेवू शकतात.
(5) परिच्छेद 6.3 अनुसार, संस्थेला मोठे एक्सपोझर2 असलेल्या कोणत्याही कंपनीचे/संस्थेचे ऑडिट करणा-या ऑडिट कंपनीला, त्या संस्थेचे एससीए/एसए म्हणून नेमणुक केली जाण्यास मनाई आहे काय ?
ह्या परिपत्रकानुसार, संस्थेला मोठे एक्सपोझर असलेल्या कोणत्याही कंपनीचे/संस्थेचे ऑडिट करणा-या ऑडिट कंपनीला, त्या संस्थेचे एससीए/एसए म्हणून नेमणुक केली जाण्यास मनाई नाही. ह्याबाबत संचालक मंडळ/एसीबी/एएमएल ह्यांनी लक्ष द्यावे की, हितसंबंधाबाबत वाद निर्माण होणार नाही व ऑडिटर्सचे स्वातंत्र्य अबाधित राहील.
(6) परिच्छेद 8.3 अनुसार, चार वाणिज्य बँका, आठ युसीबी आणि आठ एनबीएफसी ह्यांचे एका वर्षात ऑडिट करावयाची मर्यादा, रु.1000 कोटी पेक्षा कमी अॅसेट आकारमान असलेल्या एनबीएफसींनाही लागु आहे काय ?
अॅसेट आकारमान कितीही असले तरी, सर्व आरबीआय विनियमित संस्थांच्या बाबतीत ह्या मर्यादा लागु आहेत.
|