(संदर्भ क्र. डीओएस. सेओ.पीपीजी/एसइसी.02/11.01.005/2020-21 दि. सप्टेंबर 11, 2020)
(1) परिच्छेद 2.1 अन्वये, इतर नियम, विनियम आणि आचार संहितांच्या व्यतिरिक्तही, अनुपालन कार्याने, लागु असलेल्या, सर्व वैधानिक तरतुदींचे पालन होत असल्याची खात्री करुन घेणे अपेक्षित आहे. बँकेमधील निरनिराळे गट/विभाग, निरनिराळ्या वैधानिक आवश्यकतांचे अनुपालन केले जाण्यास जबाबदार असल्याने, अनुपालन कार्याकडून असलेल्या नेमक्या अपेक्षा कोणत्या ?
लागु असलेल्या अर्व वैधानिक तरतुदी, नियम व विनियम, धोरणे व कार्यरीती, निरनिराळ्या आचार संहिता (ऐच्छिक संहितांसह) ह्यांचे अनुपालन केले जात असल्याची खात्री बँकांनी करुन घेणे आवश्यक आहे. तथापि, येथे पुनश्च सांगण्यात येते की, अनुपालन करणे ही व्यावसायिक एकके व अनुपालन कार्य ह्यांनी शेअर करण्याची जबाबदारी आहे. ह्यामुळे, लागु असलेल्या वैधानिक तरतुदी व विनियम ह्यांना धरुन कार्य करणे ही प्रत्येक बँक कर्मचा-याची जबाबदारी असणे आवश्यक असून, त्याची खात्री करुन घेण्याचे काम अनुपालन कार्याचेच आहे.
काही बँकांनी, निरनिराळ्या वैधानिक व इतर आवश्यकतांचे अनुपालन करण्यासाठी निरनिराळे विभाग असू शकतील, तरीही विनियम, अंतर्गत धोरणे व कार्यरीती व व्यवस्थापनाला रिपोर्ट देणे ह्याबाबतच्या अनुपालनावर देखरेख ठेवण्यासाठी अनुपालन कार्यच जबाबदार असू शकते. संबंधित विभागावर त्यांच्या-त्यांच्या क्षेत्राबाबतची मुख्य जबाबदारी असेल - ही क्षेत्रे स्पष्टपणे अधोरेखित केली जावीत - तर अनुपालन कार्याने सर्वंकष देखरेख करण्याबाबतची खात्री करुन घ्यावी. अशा अनुपालनांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यास, अनुपालन कार्याने अनुपालनातील त्या त्रुटी दूर करण्यास आवश्यक ती कारवाई करावी. निरनिराळे विभाग व मुख्य अनुपालन अधिकारी ह्यांच्या दरम्यान सहकार्य ठेवण्यासाठी सुयोग्य यंत्रणा असाव्यात.
(2) ह्या परिपत्रकाच्या परिच्छेद 2.4 मध्ये सीसीओची नेमणुक करण्यासाठीची वयोमर्यादा 55 वर्षांपर्यंत निर्देशित करण्यात आली आहे. ही वयोमर्यादा विचारात घेण्यासाठीचा संदर्भ बिंदु कोणता ?
वरील परिपत्रकाच्या परिच्छेद 2.4 मधील वयोमर्यादा ही अशासाठी ठेवण्यात आली होती की, सीसीओशी संबंधित जबाबदा-या एक खास/विशेष व मूलभूत कार्य म्हणून समजले जाण्याबाबत खात्री केली जावी. वरील तत्व लक्षात घेता, 55 वर्षांपेक्षा अधिक वयाचा सीसीओ निवडल्यास, - मग एक सीसीओ म्हणून किंवा अन्यथा त्या व्यक्तीचा अनुपालन कार्याशी सततचा संबंध असला तरी - 55 वर्षांची वयोमर्यादा ही, त्या निवडलेल्या व्यक्तीचा, अनुपालन कार्याशी सततचा संबंध आला असलेल्या तारखेपासून घेण्यात यावी. उदाहरणार्थ, निवडलेल्या सीसीओचे वय 55 वर्षांपेक्षा अधिक असून वयाची 55 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी, त्याचा/तिचा अनुपालन कार्याशी सतत संबंध आलेला असल्यास, ती व्यक्ती, अशा नेमणुकीसाठी पात्र असेल.
(3) परिच्छेद 2.4 विहित करतो की, सीसीओला बँकिंग किंवा वित्तीय सेवा क्षेत्रामधील किमान 15 वर्षांचा अनुभव असावा व त्यातील किमान 5 वर्षे ही, ऑडिट/वित्त/अनुपालन/कायदा/जोखीम व्यवस्थापन कार्यांमधील असावीत. असा 5 वर्षांचा किमान अनुभव विचारात घेण्यास अन्य क्षेत्रातील अनुभव योग्य असेल काय ?
ह्या आवश्यकतेमागील तत्त्व असे आहे की, निवडण्यात आलेला सीसीओ हा एक उत्तम अनुभवी अधिकारी असावा की ज्यामुळे तो/ती त्याला दिलेली कार्ये स्वतंत्रपणे व परिणामकारकतेने करु शकेल त्यानुसार वरील तत्त्वानुसार, जोखीम व्यवस्थापन कार्यांमध्ये व्यवसायांमधील नियंत्रण कार्येही समाविष्ट असतील. ह्यामुळे, एखाद्या प्रादेशिक/क्षेत्रीय/व्यावसायिक वरिष्ठ अधिका-यांकडे, 5 वर्षांपेक्षा अधिक असा व्यवसायांमधील नियंत्रण-कार्याचा अनुभव/जबाबदारी असल्यास, तो/ती, ह्या अटीखाली सीसीओ पदासाठी पात्र असेल.
(4) ब्रँच मॉडेलखाली कार्य करणा-या विदेशी बँकेबाबत (एफबीओबीएम) निवडणुक प्रक्रिया/रिपोर्टिंग लाईन (परिच्छेद 2.5 व 2.7 अनुसार) कोणती असेल ?
ब्रँच मॉडेलखाली कार्य करणा-या विदेशी बँकांनाही (एफबीओबीएम) निवड/काढून टाकणे/अर्हता ह्यांच्या प्रक्रियेसंबंधीच्या तरतुदी संपूर्णपणे लागु असतील. तथापि, एफबीओबीएम च्या बाबतीत, निवड प्रक्रियेचा तपशील देणा-या वरील परिपत्रकाच्या परिच्छेद 2.5 अनुसार, संचालक मंडळाबाबतचा कोणताही संदर्भ हा, प्रादेशिक किंवा मुख्य कार्यालयाच्या अनुपालनाच्या सममूल्य धरला जाईल. ह्याशिवाय, रिपोर्टिंग लाईनबाबत तपशील देणा-या परिच्छेद 2.7 अनुसार संचालक मंडळ/एसीबी बाबतचा कोणताही संदर्भ, एफ बी ओ बी एम च्या बाबत, प्रादेशिक किंवा मुख्य कार्यालयाच्या अनुपालनाच्या सममूल्य धरला जाईल.
(5) सीसीओची नेमणुक करतेवेळी अनुपालनाचे ठनेमके (फिट) व सुयोग्य (प्रॉपर) नियम कोणते ?
ह्या परिपत्रकाच्या परिच्छेद 2 अनुसार, एका योग्य ‘फिट व प्रॉपर’ मूल्यांकन/निवड निकषांनी, एका सुयोग्य प्रक्रियेद्वारे सीसीओची निवड करावयाची असते. ‘फिट व प्रॉपर’ निकषांचे परीक्षण केले जावे आणि ते सक्षमता, एकात्मता व हितसंबंधाच्या दृष्टीकोनातून रिपोर्ट केले जावेत.
(6) ह्या सर्व आवश्यकता पूर्ण करणा-या नवीन सीसीओची नेमणुक करण्यात अनेक बँकांना येणा-या अडचणींचा विचार करता, सीसीओची नेमणुक करण्यासाठीचा कालावधी, विहित केलेल्या सहा महिन्यांपेक्षा वाढविता येईल काय ?
बँकांनी व्यक्त केलेल्या अडचणी विचारात घेता, वरील परिपत्रकात सीसीओची निवड करण्यासाठी निर्देशित केलेल्या प्रक्रिया, ह्या परिपत्रकाच्या, तारखेपासून, म्हणजे सप्टेंबर 11, 2020 पासून, नऊ महिन्यांच्या आत बँकांनी अनुसराव्यात आणि तो/ती आवश्यकता पूर्ण करत असल्यास, विद्यमान व्यक्तीची पुनर् नेमणूक करण्याचे स्वातंत्र्य बँकांना आहे. |