Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 18/05/2020
टोकनायझेशन - कार्ड व्यवहार

(मे 18, 2020 रोजी अद्यावत केलेले)

(1) टोकनीकरण (टोकनायझेशन) म्हणजे काय ?

उत्तर :- टोकनीकरणाचा संदर्भ, प्रत्यक्ष कार्डावरील माहितीच्या ऐवजी ‘टोकन’ नावाच्या पर्यायी संकेताशी असून हे टोकन, कार्ड व टोकन रिक्वेस्टर (म्हणजे अशी एक संस्था की जी ग्राहकाकडून कार्डाच्या टोकनीकरणासाठीच्या विनंतीचा स्वीकार करते आणि संबंधित टोकन देण्यासाठी कार्ड नेटवर्ककडे पाठविते) आणि साधन/डिव्हाईस (ह्यानंतर ह्याला आयडेंटिफाईड डिव्हाईस म्हटले आहे) ह्यांच्या जुळणीसाठी एकमेव असे असेल.

(2) डि-टोकनायझेशन म्हणजे काय ?

उत्तर :- टोकनचे रुपांतरण परत पूर्वीच्या प्रत्यक्ष कार्डात करणे ह्याला डि-टोकनायझेशन म्हणतात.

(3) टोकनीकरणाचा फायदा काय ?

उत्तर :- टोकनीकृत कार्ड व्यवहार हा अधिक सुरक्षित समजला जातो कारण, व्यवहार-प्रक्रियेदरम्यान प्रत्यक्ष कार्डावरील तपशील व्यापा-याबरोबर शेअर केला जात नाही.

(4) टोकनीकरण कसे केले जाऊ शकते ?

उत्तर :- टोकन रिक्वेस्टर कडून उपलब्ध करण्यात आलेल्या अॅपवर, एक विनंती टाकून कार्ड धारक, ते कार्ड टोकनीकृत करुन घेऊ शकतो. टोकन रिक्वेस्टर ती विनंती कार्ड नेटवर्ककडे पाठवील व हे नेटवर्क, कार्ड देणाराच्या सहमतीने, कार्ड, टोकन रिक्वेस्टर व डिव्हाईस ह्यांच्या जुळणीनुसार एक टोकन देईल.

(5) ही सेवा मिळविण्यासाठी ग्राहकाने द्यावयाचा आकार किती असतो ?

उत्तर :- ही सेवा मिळविण्यासाठी ग्राहकाने कोणतेही आकार देण्याची गरज नाही.

(6) उपयोजितेच्या कोणत्या प्रकरणात (प्रसंग/परिस्थिती) टोकनीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे ?

उत्तर :- मोबाईल फोन्स आणि/किंवा टॅबलेट्स ह्यांच्या मार्फत सर्व उपयोग/वाहिन्यांसाठी (उदा. संपर्कहीन कार्ड व्यवहार, क्युअर कोड्स, अॅप्स इत्यादि मार्फत प्रदाने) टोकनीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे.

(7) स्मार्ट वॉच किंवा अशा इतर साधनांमार्फत टोकनीकरण करता येते काय ?

उत्तर :- टोकनीकरण सध्या मोबाईल फोन्स आणि/किंवा टॅबलेट्स पुरतेच निर्बंधित आहे.

(8) टोकनायझेशन व डि-टोकनायझेशन कोण करु शकते ?

उत्तर :- टोकनायझेशन व डि-टोकनायझेशन फक्त प्राधिकृत कार्ड नेटवर्ककडूनच केले जाऊ शकते. भारतामध्ये कार्य करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या कार्ड नेटवर्कची यादी आरबीआयच्या वेबसाईटवरील लिंकवर https://www.rbi.org.in/Scripts/PublicationsView.aspx?id=12043. उपलब्ध आहे.

(9) टोकनीकरण व्यवहारातील पक्ष/स्टेकहोल्डर्स कोणते ?

उत्तर :- सर्वसाधारणतः, टोकनीकृत कार्ड व्यवहारामधील पक्ष/स्टेकहोल्डर्स म्हणजे, व्यापारी, मर्चंटचा अॅक्वायरर, कार्ड पेमेंट नेटवर्क, टोकन रिक्वेस्टर, इश्युअर व ग्राहक हे असतात. तथापि, निर्देशित केल्याव्यतिरिक्त एखादी संस्था देखील त्या व्यवहारात भाग घेऊ शकते.

(10) टोकनीकरण केल्यानंतर ग्राहकाच्या कार्डावरील तपशील सुरक्षित असतो काय ?

उत्तर :- प्राधिकृत कार्ड नेटवर्कसकडून, प्रत्यक्ष कार्डावरील डेटा, टोकन व संबंधित इतर तपशील सुरक्षित रितीने साठविला जात असतो. टोकन रिक्वेस्टर, प्रायमरी अकाऊंट नंबर (पॅन) म्हणजे कार्ड नंबर किंवा कार्डाचा अन्य कोणताही तपशील साठवू शकत नाही. आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम कार्यरीती/जागतिक रितीने स्वीकृत मानके ह्यांना अनुसरुन असलेली सुरक्षा व सुरक्षितता ह्यासाठी टोकन रिक्वेस्टर प्रमाणित करुन घेणे कार्ड नेटर्वक्ससाठी अपरिहार्य करण्यात आले आहे.

(11) ग्राहकासाठी कार्डाचे टोकनीकरण करणे अपरिहार्य आहे काय ?

उत्तर :- नाही. आपल्या कार्डाचे टोकनीकरण करावयाचे की नाही ह्याची निवड ग्राहकच करु शकतो.

(12) एखाद्या विशिष्ट उपयोजितेसाठी टोकनीकरण निवडण्याचा पर्याय ग्राहकांना आहे काय ?

उत्तर :- एखाद्या विशिष्ट उपयोजितेसाठी - म्हणजे, संपर्कहीन, क्युआर कोड आधारित इन-अॅप प्रदाने इत्यादि - त्यांचे कार्ड रजिस्टर/डि-रजिस्टर करण्याचा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

(13) एखाद्या टोकनीकरण विनंतीसाठीची पंजीकरण प्रक्रिया कशी काम करते ?

उत्तर :- टोकनीकरणाच्या विनंतीचे पंजीकरण हे अॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन (एएफए) द्वारा, केवळ ग्राहकाच्या स्पष्ट सहमतीनेच केले जाते - चेक बॉक्स, रेडियो बटन इत्यादींच्या सक्तीच्या/बिनचुक/स्वयंचालित निवडीने नाही. उपयोगिता व निवडणे व मर्यादा ठेवणे ह्यासाठीही ग्राहकाला पसंतीचा पर्याय दिला जाईल.

(14) टोकनीकृत कार्ड व्यवहारांसाठी ग्राहक स्वतःच्या मर्यादा ठेवू/निवडू शकतो काय ?

उत्तर :- टोकनीकृत कार्ड व्यवहारांसाठी, प्रति व्यवहार व दैनंदिन व्यवहार मर्यादा निश्चित करण्यासाठी व बदलण्यासाठीचा पर्याय ग्राहकांना आहे.

(15) टोकनीकरणासाठी विनंती करण्याच्या कार्डांच्या संख्येवर काही मर्यादा आहे काय ?

उत्तर :- कितीही संख्येने असलेल्या कार्डांचे टोकनीकरण करण्याची विनंती ग्राहक करु शकतो. एखादा व्यवहार करण्यासाठी, टोकन रिक्वेस्टर अॅपकडे पंजीकृत केलेल्या कार्डांमधून कोणतेही कार्ड वापरण्यास ग्राहक मुक्त असेल.

(16) ग्राहकाजवळ टोकनीकृत केलेली एकापेक्षा अधिक कार्डे असल्यास कोणते कार्ड वापरावयाचे हे तो/ती निवडू शकते काय ?

उत्तर :- कोणताही व्यवहार करण्यासाठी, ग्राहक, टोकन रिक्वेस्टर अॅपकडे पंजीकृत केलेल्या कार्डांपैकी कोणतेही कार्ड वापरण्यास स्वतंत्र आहे.

(17) ज्यावर कार्ड टोकनीकृत केले जाते अशा साधनांच्या (डिव्हाईस) संख्येवर काही मर्यादा आहेत काय ?

उत्तर :- ग्राहक त्याच्या/तिच्या कार्डावर टोकनीकरण करण्यासाठीची विनंती कितीही (संख्येच्या) साधनांवर करु शकतो. तथापि, सध्या तरी, ही सुविधा फक्त मोबाईल फोन्स/टॅबलेट्सवरच देण्यात येत आहे.

(18) त्याच्या/तिच्या टोकनीकृत कार्डाबाबत काही समस्या निर्माण झाल्यास ग्राहकाने कुणाशी संपर्क साधावा ? साधन हरविले असल्याबाबत त्याने/तिने कुठे व कसे कळवावे ?

उत्तर :- सर्व तक्रारी कार्ड देणारांकडेच केल्या जाव्यात. ‘आयडेंटीफाईड डिव्हाईस’ हरवणे किंवा त्या टोकन्सचा अनधिकृत वापर होऊ शकेल असे प्रसंग कळविण्यासाठी, कार्ड देणारांनी ग्राहकांना सहज/सुलभ प्रवेश मिळेल ह्याची खात्री करुन घ्यावी.

(19) एखाद्या विशिष्ट कार्डाचे टोकनीकरण करण्यास कार्ड देणारा नकार देऊ शकतो काय ?

उत्तर :- दिसून येणारी जोखीम इत्यादींवर आधारित, कार्ड देणारे, त्यांनी दिलेल्या कार्डांचे, टोकन रिक्वेस्टर कडून पंजीकरण करण्यास परवानगी द्यावी की नाही हे ठरवू शकतात.

(20) टोकनीकरणावरील आरबीआयच्या सूचनांवरील अधिक माहिती कोठे मिळू शकेल ?

उत्तर :- आरबीआयने टोकनीकरणावर दिलेले परिपत्रक, आरबीआयच्या वेबसाईटवर https://www.rbi.org.in/scripts/FS_Notification.aspx?Id=11449&fn=9&Mode=0. ह्या पाथवर उपलब्ध आहे.

हे एफएक्यु, भारतीय रिझर्व्ह बँकेने माहिती व सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी दिले आहेत. ह्यांच्या आधारावर केलेल्या कृती आणि/किंवा निर्णय ह्यासाठी रिझर्व्ह बँक जबाबदार असणार नाही. स्पष्टीकरणे किंवा अर्थ ह्यासाठी, रिझर्व्ह बँकेने व सरकारने वेळोवेळी दिलेल्या संबंधित परिपत्रकांचे व अधिसूचनांचे मार्गदर्शन घेण्याची विनंती वाचकाला करण्यात येत आहे.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä