Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ���E�ɴɽ�ɮ�
 Sɱ�x�
 ���n����� Sɱ�x�
 �ɮ�E�ɮ�� ����J�� ���V�ɮ�{��`�
 Bx� ��� B�� ���V�
 |�n��x� |�h�ɱ��
����� >> B�� B C���V� - Display
Date: 13/04/2020
प्रिपेड प्रदान संलेख (पीपीआय)

(एप्रिल 13, 2020 रोजी अद्यावत केलेले)

(1) भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कोणत्या अधिकारांखाली, प्रिपेड संलेख (पीपीआय) देणे व कार्यकृती वरील महानिर्देश (एमडी) दि. ऑक्टोबर 11, 2017 (पीपीआय - एमडी) दिले आहेत ?

उत्तर :- प्रदान व समायोजन प्रणाली (पीएसएस) अधिनियम 2007 च्या कलम 10(2) सह वाचित कलम 18 खाली दिलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने हे महानिर्देश दिले आहेत.

(2) पीपीआय म्हणजे काय ?

उत्तर :- पीपीआय हे असे संलेख आहेत की त्यात/त्यावर असलेल्या मूल्याविरुध्द - (अ) वित्तीय सेवांसह वस्तु व सेवांची खरेदी (ब) प्रेषणे (क) निधी हस्तांतरण इत्यादी करण्यास मदत होते.

(3) पीपीआय कोण देतात/देऊ शकतात ?

उत्तर :- पीपीआय देणा-या संस्था म्हणजे, भारतामध्ये इन्कॉर्पोरेट झालेल्या व कंपनीज अधिनियम 1956/कंपनीज अधिनियम 2013 खाली पंजीकृत झालेल्या कंपन्या आहेत. व्यक्ती/संस्था ह्यांना पीपीआय देण्यासाठीच्या एका प्रदान प्रणालीमध्ये त्या काम करतात/भाग घेतात. आरबीआयकडून प्राधिकृतता मिळाल्यावर एखादी कंपनी पीपीआय देऊ व ऑपरेट करु शकते.

(4) पीपीआय धारक कोण असतो/कोणास म्हणावे ?

उत्तर :- पीपीआय धारक ही, पीपीआय देणाराकडून पीपीआय मिळविणारी/खरेदी करणारी व्यक्ती असते. तथापि, देणगी स्वरुप पीपीआयबाबत, अन्य अपेक्षित/नेमकी लाभार्थी व्यक्ती स्वतः खरेदीदार नसली तरीही एक धारकही असू शकते.

(5) पीपीआय धारकांकडून गोळा केलेल्या पैशांचे पीपीआय संस्था काय करतात ?

उत्तर :- अशा प्रकारे गोळा केलेल्या पैशांचा उपयोग, त्या संस्थांकडून, स्वीकार करारनाम्याचा एक भाग/पक्ष असलेल्या व्यापा-यांना प्रदान करण्यास, आणि पीपीआय धारकाच्या वतीने निधी हस्तांतरण/प्रेषण सेवा करण्यासाठी केला जातो.

(6) आरबीआयकडून किती पीपीआय देणारांना मंजुरी देण्यात आली आहे ? प्राधिकृत असलेल्या बँक व बँक नसलेल्या पीपीआय देणारांची यादी मला कुठे मिळेल ?

उत्तर :- ही यादी आरबीआयच्या वेबसाईटवरील https://www.rbi.org.in/Scripts/PublicationsView.aspx?id=12043 ह्या आणि https://www.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=2491 ह्या लिंकवर उपलब्ध आहे.

(7) पीपीआयचे निरनिराळे प्रकार कोणते ?

उत्तर :- आपल्या देशात पुढील तीन प्रकारांखाली पीपीआय दिले जाऊ शकतात.

(अ) क्लोज्ड सिस्टिम पीपीआय :- हे पीपीआय, त्या संस्थेच्याच वस्तु व सेवा खरेदी करण्यासाठी त्या संस्थेकडून दिले जातात. रोख रकमेच्या निकासीसाठी परवानगी नसते. हे संलेख, तृतीय पक्षाने दिलेल्या सेवांच्या समायोजनासाठी वापरता येत नाहीत. असे संलेख देणे व कार्यान्वित करणे हे एक प्रदान प्रणाली म्हणून वर्गीकृत केले जात नाही आणि म्हणून त्यासाठी आरबीआयकडून मंजुरी/प्राधिकृतता घेण्याची आवश्यकता नसते.

(ब) सेमी-क्लोज्ड सिस्टिम पीपीआय :- हे पीपीआय, बँका (आरबीआयने मंजुर केलेल्या) व बिगर-बँका (आरबीआयने प्राधिकृत केलेल्या) ह्यांच्याकडून, स्पष्ट ओळख असलेल्या मर्चंट लोकेशन्स/आस्थापनांच्या एका गटाच्या उपयोगासाठी, वित्तीय सेवा, प्रेषण सुविधा इत्यादींसह, वस्तु व सेवा विकत घेण्यासाठी दिले जातात. ह्या मर्चंट लोकेशन्स/आस्थापना ह्यांच्याकडे, हे पीपीआय प्रदान संलेख म्हणून स्वीकारण्यासाठीचे, पीपीआय देणाराबरोबर विशिष्ट कंत्राट (किंवा पेमेंट अॅग्रिगेटर/पेमेंट गेटवेमार्फत कंत्राट) असते. ह्या संलेखाबाबतही रोख रक्कम निकासीसाठी परवानगी नाही - मग ते बँकांनी दिलेले असोत किंवा नॉन बँकांनी दिलेले असोत.

(क) ओपन सिस्टिम पीपीआय :- हे पीपीआय बँकांनी (आरबीआयने मंजुर केलेल्या) दिलेले असून त्यांचा वापर कोणत्याही व्यापा-याकडे, वित्तीय सेवा, प्रेषण सुविधांसह वस्तु व सेवा खरेदी करण्यासाठी केला जातो. ह्या पीपीआयमार्फत एटीएम/पॉईंट ऑफ सेल (पीओएस) केंद्रे/बिझिनेस कॉरेस्पाँडंट्स येथे रोख रक्कम काढण्यासाठीही करता येतो.

(8) सेमी क्लोज्ड पीपीआयचे प्रकार कोणते ?

उत्तर :- सेमी क्लोज्ड पीपीआय तीन प्रकारचे असू शकतात :-

(अ) रु.10,000/- पर्यंतचे पीपीआय - जेथे पीपीआय धारकाचा किमान तपशील घेतला जातो (किमान-तपशील पीपीआय)

(ब) रु.10,000/- पर्यंतचे पीपीआय - केवळ बँक खात्यातूनच लोडिंगसह

(क) रु.1,00,000/- पर्यंतचे पीपीआय - जेथे पीपीआय धारकाचे केवायसी पूर्ण केलेले असते (फुल केवायसी पीपीआय)

(9) पीपीआय कसे लोड करता येते ?

उत्तर :- पीपीआयचे लोडिंग/रिलोडिंग रोख रकमेने (केवळ बँक खात्यामधून लोडिंग असलेल्या पीपीआयमध्ये ह्यास परवानगी नाही), बँक खात्यात डेबिट करुन, क्रेडिट/डेबिट कार्डने किंवा इतर पीपीआयमधून केले जाऊ शकते. पीपीआयचे लोडिंग/रिलोडिंग हे भारतामधील विनियमित असलेल्या प्रदान संलेखामार्फत व केवळ भारतीय रुपयातच (आयएनआर) केले जाईल.

(10) रोख रकमेने किंवा इलेक्ट्रॉनिक रितीने पीपीआयचे लोडिंग करण्यावर काही मर्यादा आहे काय ?

उत्तर :- होय. पीपीआयचे रोख लोडिंग करणे प्रति महिना रु.50,000/- पर्यंत सीमित असून त्यास पीपीआयची सर्वसमावेशक मर्यादाही लागु आहे. (केवळ बँक खात्यांमधून लोडिंग करावयाच्या पीपीआयमध्ये ह्यास परवानगी नाही)

(11) ‘किमान तपशील पीपीआय’ आणि ‘केवळ बँक खात्यातूनच लोडिंग पीपीआय’ मधील किमान तपशीलामध्ये कशाकशाचा समावेश असतो ?

उत्तर :- ‘किमान तपशील पीपीआय’ व ‘केवळ बँक खात्यातूनच लोडिंग पीपीआय’ मधील किमान तपशील समान असून तो पुढील प्रमाणे आहे :-

(अ) वन टाईम पिन (ओटीपी) द्वारा पडताळणी केलेला मोबाईल नंबर.

(ब) आरबीआयचे केवायसीवरील महानिर्देश/पीएमएल नियम 2005 (वेळोवेळी सुधारित केल्यानुसार) चा नियम 2 (ड) मध्ये निर्देशित केलेले ‘कोणतेही अपरिहार्य डॉक्युमेंट’ किंवा ‘प्राधिकृत वैध डॉक्युमेंट’ (ओव्हीडी) अपरिहार्य डॉक्युमेंट/ओव्हीडीच्या विद्यमान यादीमध्ये, पॅन, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड, आधार नंबर असल्याचा पुरावा व राष्ट्रीय लोकसंख्या पंजीने दिलेले पत्र ह्यांचा समावेश आहेत.

(12) ‘किमान तपशील पीपीआय’ व ‘केवळ बँक खात्यामधून लोडिंग पीपीआय’ची मुख्य लक्षणे कोणती ?

उत्तर :- ‘किमान तपशील पीपीआय’ व ‘केवळ बँक खात्यामधून लोडिंग पीपीआय’ हे रिलोडेबल असतात व ते केवळ माल/वस्तु व सेवा खरेदी करण्यासाठी वापरले जावेत. प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे :-

किमान तपशील पीपीआय :

(अ) कोणत्याही महिन्यात लोड केलेली रक्कम रु.10,000/- पेक्षा अधिक नसेल.
(ब) वित्तीय वर्षात लोड केलेली एकूण रक्कम रु.1,00,000/- पेक्षा अधिक नसेल.
(क) कोणत्याही वेळी आऊटस्टँडिंग असलेली रक्कम रु.10,000/- पेक्षा अधिक नसेल.
(ड) कोणत्याही दिलेल्या महिन्यामध्ये डेबिट केलेली एकूण रक्कम रु.10,000/- पेक्षा अधिक नसेल.

केवळ बँक खात्यामधून लोडिंग असलेले पीपीआय :-

(अ) कोणत्याही महिन्यात लोड केलेली रक्कम रु.10,000/- पेक्षा अधिक नसेल.
(ब) वित्तीय वर्षात लोड केलेली एकूण रक्कम रु.1,20,000/- पेक्षा अधिक नसेल.
(क) कोणत्याही वेळी आऊटस्टँडिंग असलेली रक्कम रु.10,000/- पेक्षा अधिक नसेल.
(ड) लोडिंग/रिलोडिंग हे बँक खाते आणि/किंवा क्रेडिट कार्डामधून केले जाईल.
(ई) पीपीआय धारकाला तसे वाटल्यास, डिसेंबर 24, 2019 रोजी विद्यमान असलेल्या किमान तपशील पीपीआयचे रुपांतरण ह्या पीपीआयमध्ये करता येते.

(13) ‘किमान तपशील पीपीआय’ व ‘केवळ बँक खात्यामधूनच लोडिंग पीपीआय’ ह्यामधून निधी हस्तांतरण करण्यास परवानगी आहे काय ?

उत्तर :- वरील दोन प्रकारच्या पीपीआयमधून निधी हस्तांतरणास परवानगी नाही.

(14) एखादा ग्राहक, ‘किमान तपशील’ पीपीआय किती काळपर्यंत घेऊ शकतो ? अटीनुसार असलेला काळ संपल्यावर शिल्लक रकमेचे काय होते ?

उत्तर :- ‘किमान तपशील’ पीपीआय कमाल 24 महिन्यांपर्यंतच ठेवता येऊ शकतो. हा 24 महिन्यांचा कालावधी असा पीपीआय उघडण्याच्या दिवसापासून मोजला जातो. ह्या 24 महिन्यांच्या कालावधीत, तो, संपूर्ण केवायसी केलेल्या पीपीआयमध्ये रुपांतरित करावयाचा असतो व तसे न केल्यास अशा पीपीआयमध्ये पुढे क्रेडिट दिले जाण्यास परवानगी नाही. तथापि, पीपीआय धारकाला उरलेली शिल्लक वापरण्यास परवानगी दिली जाईल. फेब्रुवारी 28, 2018 रोजी विद्यमान/अस्तित्वात असलेले असे सर्व पीपीआय, फेब्रुवारी 29, 2020 पर्यंत संपूर्ण-केवाययुक्त पीपीआयमध्ये रुपांतरित केले जाणे आवश्यक आहे.

(15) एखादा क्लोज्ड ‘किमान तपशील’ पीपीआय, 24 महिन्यांचा कमाल काल संपल्यानंतर पुनः उघडता येतो काय ?

उत्तर :- तोच मोबाईल क्र. व तेच किमान तपशील वापरुन असे पीपीआय पुनः देण्यास परवानगी नाही.

(16) एखादा ‘किमान तपशील’ पीपीआय नको असल्यास व तो बंद करावयाचा असल्यास आऊटस्टँडिंग शिल्लकेचे काय होते ?

उत्तर :- पीपीआय धारकाला, तो पीपीआय कोणत्याही वेळी बंद करुन त्यातील निधी ‘मूळ स्त्रोताकडे’ (तो पीपीआय ज्यातून भारित केला तो स्त्रोत) हस्तांतरित करण्याचा पर्याय पीपीआय बंद करतेवेळी उपलब्ध आहे. केवायसी आवश्यकता पूर्ण केल्यानंतर पीपीआय धारक आऊटस्टँडिंग शिल्लक, त्याच्या/तिच्या ‘स्वतःच्या बँक खात्यात’ हस्तांतरित करु शकते. असे हस्तांतरण करण्यास परवानगी देण्यापूर्वी, बंद करण्याबाबतचा निधी हस्तांतरित करावयाचा आहे. त्या खात्याची ‘पीपीआय देणाराने आधीच पडताळणी केलेली असावी.’

(17) ‘देणाराने आधीच पडताळणी केलेले’ म्हणजे काय ? ते पीपीआय धारकाचेच स्वतःचेच बँक खाते ह्याची खात्री पीपीआय देणाराने कशी करुन घ्यावी ?

उत्तर :- ते खाते पीपीआय धारकाचेच असल्याबाबत पडताळणी करण्यास पीपीआय देणाराच जबाबदार आहे व त्यासाठी पीपीआय देणाराने पडताळणीच्या सुयोग्य रीती ठेवाव्यात.

(18) ‘केवळ बँक खात्यामधूनच लोडिंग करावयाचा पीपीआय’ पुढे नको असल्यास व बंद करावयाचा असल्यास त्यातील आऊटस्टँडिंग शिल्लकेचे काय होते ?

उत्तर :- पीपीआय धारकाला, तो पीपीआय कोणत्याही वेळी बंद करुन त्यातील निधी ‘मूळ स्त्रोताकडे’ (तो पीपीआय ज्यातून भारित केला तो स्त्रोत) हस्तांतरित करण्याचा पर्याय पीपीआय बंद करतेवेळी उपलब्ध आहे. पीपीआय देणारा, हा पीपीआय एक संपूर्ण केवायसीयुक्त पीपीआय रुपांतरित करुन, संपूर्ण केवायसीयुक्त पीपीआयच्या लक्षणांनुसार निधी हस्तांतरित करु शकतो.

(19) सेमी क्लोज्ड ‘फुल केवायसी’ पीपीआयची मुख्य लक्षणे कोणती ?

उत्तर :- सेमी क्लोज्ड फुल केवायसी पीपीआयची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.

(अ) रिलोडेबल (पुनर् भारित-क्षम) स्वरुप
(ब) कोणत्याही वेळी आऊटस्टँडिंग रक्कम रु.1,00,000/- पेक्षा अधिक असणार नाही.
(क) एखाद्या महिन्यामधील एकूण क्रेडिट व डेबिट्ससाठी कोणतीही विहित मर्यादा नाही.
(ड) हे पीपीआय निधी हस्तांतरणासह माल-वस्तु व सेवा विकत घेण्यासाठीही वापरता येतात.

(20) सेमी क्लोज्ड फुल केवायसी पीपीआयमधून निधी हस्तांतरण करण्यास परवानगी आहे काय ?

उत्तर :- होय. प्रति धारक, प्रति महिना, रु.10,000/- पर्यंतच्या मर्यादेत, फुल केवायसी पीपीआयमधून निधी हस्तांतरणास परवानगी आहे. तथापि, पीपीआय धारकाने लाभार्थीला ‘पूर्व पंजीकृत’ केले असल्यास, प्रति महिना, प्रति लाभार्थी, रु.1,00,000/- पर्यंतची वाढीव मर्यादा मिळविता येते. तथापि, पीपीआय धारकाची जोखीम रुपरेषा व इतर कार्यकारी जोखमी विचारात घेऊन, पीपीआय देणारा ह्यापेक्षा कमी मर्यादा ठेवू शकेल.

(21) पीपीआय धारक, ‘फुल केवायसी’ पीपीआय बंद करु शकते काय ? होय असल्यास आऊटस्टँडिंग शिल्लकेचे काय होते ?

उत्तर :- पीपीआय देणारे, ह्या फुल केवायसी पीपीआय धारकांना, तो पीपीआय बंद करुन त्यातील शिल्लक रक्कम, ह्या प्रकारच्या पीपीआयसाठी लागु असलेल्या मर्यादांनुसार बँक खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय देतील. ह्यासाठी, पीपीआय देणारा, पीपीआय देतेवेळी, पीपीआय धारकाला पर्याय देईल की त्याने, पीपीआय बंद केल्यास किंवा अशा पीपीआयचा वैधता काल समाप्त झाल्यास, त्या पीपीआयमधील उपलब्ध शिल्लक रक्कम हस्तांतरित करता येण्यासाठी असलेले डेसिग्नेटेड बँक खाते किंवा अन्य पीपीआयचे तपशील द्यावेत. बंद करतेवेळी, पीपीआय धारक, त्याने आधी दिलेल्या प्रि-डेसिग्नेटेड खात्यापेक्षा वेगळे बँक खाते विहित करु शकतो.

(22) ओपन सिस्टिम पीपीआय कोण देऊ शकते व अशा पीपीआयचे प्रकार कोणते ?

उत्तर :- असे पीपीआय देण्यास आरबीआयकडून मंजुरी मिळालेल्या बँकांच ओपन सिस्टिम पीपीआय देऊ शकतात. केवळ एकाच प्रकारचा ओपन सिस्टिम पीपीआय आहे - म्हणजे, शिल्लक रु.1,00,000/- पर्यंतचा पीपीआय व तो पीपीआय धारकाचा केवायसी पूर्ण केल्यावर दिला जाऊ शकतो (फुल केवायसी पीपीआय).

(23) ओपन सिस्टिम पीपीआयची मुख्य लक्षणे कोणती ?

उत्तर :- ओपन सिस्टिम पीपीआयची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.

(अ) रिलोडेबल (पुनर् भारित-क्षम) स्वरुप
(ब) कोणत्याही वेळी आऊटस्टँडिंग रक्कम रु.1,00,000/- पेक्षा अधिक असणार नाही.
(क) माल, वस्तु व सेवांची खरेदी, निधी हस्तांतरण व रोख निकासीसाठी वापरता येतात.

(24) वर निर्देशित केलेल्या सेमी क्लोज्ड पीपीआय व ओपन सिस्टिम पीपीआय ह्या व्यतिरिक्त इतर प्रकारचे पीपीआय कोणते ?

उत्तर :- वरील पीपीआय व्यतिरिक्त सेमी क्लोज्ड पीपीआयचे पुढील दोन वर्ग असू शकतात.

(अ) गिफ्ट पीपीआय
(ब) मास ट्रान्झिट सिस्टिमसाठीचे पीपीआय (पीपीआय - एमटीएस)

(25) गिफ्ट पीपीआयची मुख्य लक्षणे कोणती ?

उत्तर :- गिफ्ट पीपीआयची मुख्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत :-

(अ) अशा प्रत्येक प्रिपेड गिफ्ट संलेखाची कमाल किंमत रु.10,000/- पेक्षा अधिक असणार नाही.
(ब) ते रिलोडेबल नाहीत.
(क) कॅश आऊट किंवा परतावा किंवा निधी हस्तांतरणास परवानगी नाही.
(ड) देणाराच्या संचालक मंडळाने मंजुर केलेल्या धोरणानुसार त्यांचे पुनर् वैधकरण करता येते (नव्या संलेखाच्या थेट देणाराला)

(26) मास ट्रान्झिट सिस्टिम्ससाठीच्या पीपीआयची (पीपीआय - एमटीएस) मुख्य लक्षणे कोणती ?

उत्तर :- पीपीआय-एमटीएसची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत -

(अ) मास ट्रान्झिट सिस्टिम ऑपरेटर्स कडून दिले गेलेले हे सेमी क्लोज्ड पीपीआय आहेत.
(ब) मास ट्रान्झिट सिस्टिम व्यतिरिक्त, हे पीपीआय केवळ, त्या ट्रान्झिट सिस्टिमच्या कार्यालयातच संबंधित/संलग्न करण्यात येतात. अशा व्यापा-यांकडेच वापरता येऊ शकतात.
(क) रिलोडेबल स्वरुप
(ड) कोणत्याही वेळी कमाल आऊटस्टँडिंग रक्कम रु.3,000/- पेक्षा अधिक असू शकत नाही.
(ई) कॅश आऊट किंवा परतावा किंवा निधी हस्तांतरणास परवानगी नाही.
(एफ) देणाराच्या संचालक मंडळाने मंजुर केलेल्या धोरणानुसार त्यांचे पुनर् वैधकरण करता येते (नव्या संलेखाच्या थेट देणाराला)
(ग) असे पीपीआय वापरुन केलेल्या व्यवहारांसाठी अॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन (एएफए) अनिवार्य नाही.

(27) प्रिपेड अन्न संलेखांची (मील इंन्स्ट्रुमेंट) लक्षणे कोणती ?

उत्तर :- प्रिपेड मील इंन्स्ट्रुमेंट्स केवळ, रोख निकासी किंवा निधी हस्तांतरणाशिवाय असा सेमी क्लोज्ड पीपीआय म्हणून दिले जाऊ शकतात.

(28) परिच्छेद क्रमांक 7.14, 8.1 (अ), 8.2 (क), 9.1 (आय)(क), 10.1 (ड) इत्यादि निरनिराळ्या ठिकाणी, पीपीआय-एमडी मध्ये निर्देशित केलेल्या केवायसी ह्या शब्दाचा अर्थ काय ?

उत्तर :- केवायसीची व्याख्या पीपीआय-एमडीच्या परिच्छेद 6 मध्ये करण्यात आली आहे.

(29) पीपीआय धारकाने, त्याचे/तिचे पीपीआय, पीपीआय-एमडीमध्ये परवानगी असलेल्या नव्या प्रवर्गात रुपांतरित करण्याचा पर्याय न घेतल्यास त्या पीपीआयचे व त्यामधील शिल्लकेचे काय होईल ?

उत्तर :- पीपीआय धारकाने, कोणत्याही एखाद्या प्रवर्गात रुपांतरण करण्याचा पर्याय न घेतल्यास, त्याला/तिला दिलेले पीपीआय अपरिहार्यतेने, मार्च 1, 2018 रोजी लागु असलेल्या सर्व लक्षणांसह किमान तपशील पीपीआयमध्ये अपरिहार्यतेने रुपांतरित होतील. त्यातील शिल्लक रक्कम, माल व सेवा खरेदी करण्यासाठी वापरण्याची परवानगी पीपीआयधारकाला दिली असली तरी, किमान तपशील मिळेपर्यंत कोणतेही क्रेडिट/लोडिंग करण्यास परवानगी नाही.

(30) पीपीआयमधील शिल्लकेवर धारकाला व्याज मिळते काय ?

उत्तर :- पीपीआय शिल्लकांवर कोणतेही व्याज दिले जात नाही.

(31) पीपीआय कोणत्या स्वरुपात देता येतो ?

उत्तर :- पीपीआय हा, कार्डे, वॉलेट्स व तो पीपीआय अॅक्सेस करण्यासाठीचे स्वरुप/संलेख अशा स्वरुपात देता येऊ शकतो. पेपर व्हाऊचर्सच्या स्वरुपातील पीपीआय देता येऊ शकत नाही.

(32) पीपीआय देतेवेळी पीपीआय देणाराने कोणकोणती प्रकटीकरणे द्यावयाची असतात ?

उत्तर :- हे संलेख देतेवेळी पीपीआय देणारांनी, पीपीआय धारकांना, सर्व महत्वाच्या अटी व शर्ती स्पष्ट व सुलभ भाषेत प्रकट करणे आवश्यक आहे. ह्यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत.

(अ) ह्या संलेखाच्या उपयोगाशी संबंधित सर्व आकार व शुल्के.
(ब) ह्या संलेखाचा समाप्ती काल व संलेखाच्या समाप्ती संबंधीच्या अटी व शर्ती.

(33) प्रत्येक कॅश आधारित प्रेषणासाठी पीपीआय देणारा नवीन पीपीआय निर्माण करु शकतो काय ?

उत्तर :- पीपीआय देणारे व त्यांचे एजटंस, इतर पीपीआय/बँक खात्यांमध्ये रोख रक्कम आधारित प्रेषणे करण्यासाठी दर वेळी नवीन पीपीआय निर्माण करणार नाहीत. त्याच व्यक्तीने मागील/आधीच्या प्रेषणासाठी निर्माण केलेले पीपीआय वापरले जातील.

(34) को-ब्रँडेड पीपीआय देता येऊ शकतात काय ?

उत्तर :- होय. एखाद्या पीपीआय देणाराकडून एकल/एकमेव धर्तीवर किंवा दुस-या संस्थांसह सह-नाममुद्रा (को-ब्रँडेड) धर्तीवर देखील पीपीआय दिले जाऊ शकतात.

(35) पीपीआय देणाराचा को-ब्रँडिंग भागीदार कोण होऊ शकतो.

उत्तर :- भारतात इनकॉर्पोरेट झालेली व कंपनीज अधिनियम, 1956/कंपनीज अधिनियम 2013 खाली पंजीकृत असलेली कंपनी को-ब्रँडिंग भागीदार होऊ शकते. को-ब्रँडिंग भागीदार एक बँक असल्यास ती आरबीआयकडून परवाना मिळालेली बँक असावी. एखादी बँक व बिगर बँक संस्था ह्यामधील को-ब्रँडिंग व्यवस्थेबाबत, बँक हीच पीपीआय देणारी संस्था असेल. दोन्हीही संस्था बिगर बँक असल्यास, त्या दोन्ही दरम्यान पीपीआय देणाराची भूमिका, आधीच/अग्रिम रितीने दोन्हीपैकी एकीला दिली गेली असेल.

(36) को-ब्रँडेड कार्डाच्या बाबतीत, ग्राहक सेवेचे सर्व प्रश्न सोडविण्यास कोण जबाबदार असेल ?

उत्तर :- ह्या दोन भागीदारांदरम्यान, एकीला पीपीआय दाता म्हणून नेमलेले असेल व को-ब्रँडेड पीपीआय संबंधीच्या ग्राहक सेवेबाबतचे सर्व प्रश्न सोडविण्याची जबाबदारी तिचीच असेल.

(37) सरहद्दीपलिकडील बाह्य व्यवहारांसाठी पीपीआय वापरता येतात काय ? त्याखाली परवानगी असलेले व्यवहार व त्यांच्या मर्यादा कोणत्या आहेत ?

उत्तर :- फेमा खालील परवानगीप्राप्त चालु खात्यातील व्यवहारांसाठी, सरहद्दीपलिकडील बाह्य व्यवहारांसाठी, म्हणजे, माल-वस्तु व सेवा विकत घेणे - प्राधिकृत डीलर वर्ग-1 बँकांनी दिलेल्या फुल-केवायसी सेमी-क्लोज्ड व ओपन सिस्टिम पीपीआयचा वापर करता येऊ शकतो. तथापि, ही सुविधा पीपीआय धारकाने तशी नेमकी विनंती केली असल्यासच दिली जाईल.

व्यवहार मर्यादा :

प्रति व्यवहार मर्यादा रु.10,000/- पेक्षा अधिक असणार नाही.
प्रति महिना मर्यादा रु.50,000/- पेक्षा अधिक असणार नाही.

परवानगी असलेले व्यवहार :

विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम (फेमा) खाली परवानगी असलेले चालु खात्यातील व्यवहार - उदा. माल व सेवांची खरेदी. मात्र त्यासाठी अशा व्यवहारांबाबतचा विद्यमान नॉर्म्सचे अनुसरण केले असले पाहिजे.

परवानगी नसलेले व्यवहार :

(अ) उदारीकृत प्रेषण योजनेखाली सरहद्दीबाहेर बाह्य निधी हस्तांतरण आणि/किंवा प्रेषणे करण्याचे व्यवहार.
(ब) मर्चंटचे खात्यात ऑनलाईन प्रि-फंडिंग करणे.

(38) सरहद्दीपलिकडून आवक व्यवहारांसाठी पीपीआय वापरता येऊ शकतात काय ? त्यासाठीच्या व्यवहार मर्यादा कोणत्या ?

उत्तर :- आरबीआयच्या धन हस्तांतरण सेवा योजनेखाली (एमटीएसएस), प्राधिकृत विदेशी प्रिंसिपालचे (ओपी) भारतीय एजंट्स असलेल्या बँका व बँक-नसलेल्या पीपीआय देणारांना, आवक प्रेषणांच्या लाभार्थींना, केवायसी पूर्ण केलेले पीपीआय देण्यास परवानगी आहे. ह्याचा अर्थ, म्हणजे, ही कार्यकृती करणारी संस्था ही प्राधिकृत पीपीआय देणारी असण्याबरोबरच एमटीएसएसखाली एक भारतीय एजंटही (आरबीआयच्या विदेशी मुद्रा विभागाकडून) असणे आवश्यक आहे.

लाभार्थींना दिलेल्या पीपीआयमध्ये लोडिंग किंवा रिलोडिंग करण्यास, व्यक्तिगत आवक एमटीएसएस प्रेषणांमधून रु.50,000/- पर्यंतच्या रकमेस परवानगी आहे. रु.50,000/- पेक्षा अधिक एकल व्यवहाराची रक्कम बँक खात्यात क्रेडिट करुनच प्रदान केली जाईल.

(39) एमटीएसएसखाली रु.75,000/- चे क्रॉस बॉर्डर आवक प्रेषण मिळविताना, रु.50,000/- पीपीआयमध्ये व उरलेली रक्कम बँक खात्यात क्रेडिट करता येऊ शकते काय ?

उत्तर :- नाही. पीपीआयमध्ये निधीचे लोडिंग केल्यानंतर क्रेडिटचे विभाजन करण्यास परवानगी नाही. व्यवहाराची रक्कम रु.50,000/- पेक्षा जास्त असल्याने ती संपूर्ण रक्कम बँक खात्यातच जमा करावी लागेल.

(40) पीपीआयचा वापर करुन केलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी ग्राहकाची नेमकी सहमती घेण्याची आवश्यकता असते काय ?

उत्तर :- पीपीआय-एमटीएसखाली दिलेले पीपीआय बाबत सोडल्यास, कार्डाच्या स्वरुपात (प्रत्यक्ष किंवा आभासी) दिलेल्या पीपीआयना, डेबिट कार्डासाठी असल्याप्रमाणे एएफए असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, पीपीआयचा वापर करुन नंतर केल्या जाणारा प्रत्येक प्रदान व्यवहार ग्राहकाची नेमकी सहमती घेऊन त्याचे सत्यापन करणे आवश्यक आहे. ग्राहकाची नेमकी सहमती घेऊन वॉलेटमध्ये केलेल्या एकामागोमागच्या व्यवहाराचे सत्यापन, पिन, पासवर्ड इत्यादी स्वरुपात असू शकते.

(41) पीपीआयचा किमान वैधता काल किती असतो ?

उत्तर :- पीपीआयमध्ये शेवटून लोडिंग/रिलोडिंग केल्याच्या तारखेपासून एक वर्षापर्यंतचा कालावधी, पीपीआयसाठीचा किमान वैधता कालावधी असेल. तथापि, ह्यापेक्षा जास्त वैधता देण्याचे स्वातंत्र्य पीपीआय देणारांना आहे. पीपीआय देतेवेळी तो देणारे, त्यांच्या त्या पीपीआयच्या समाप्तीचा कालही ग्राहकाला स्पष्टपणे सांगतील/कळवतील.

(42) काही काऴ वापर न केलेल्या पीपीआयचे काय होईल ?

उत्तर :- सलग एक वर्ष कोणताही वित्तीय व्यवहार नसलेला पीपीआय, पीपीआयधारकाला नोटिस पाठविल्यानंतर अकार्यक्षम समजला/केला जाईल. केवळ पुनर् वैधीकरण व लागु ड्यु डिलिजन्स केल्यानंतरच तो पुनर्-कार्यान्वित केला जाऊ शकेल.

(43) एखादी (पीपीआयची) योजना गुंडाळण्यात आल्यास किंवा ती खंडित केल्याचे निर्देश आरबीआयने दिल्यास अशा पीपीआयमधील आऊटस्टँडिंग शिल्लकेचे काय होते ?

उत्तर :- योजना गुंडाळली गेल्यास किंवा ती खंडित केल्याचे आरबीआयने निर्देश दिल्यास अशा पीपीआयच्या धारकांना त्या पीपीआयमधील आऊटस्टँडिंग शिल्लक परत मिळविण्यास परवानगी असते.

(44) व्यवहार अयशस्वी झाल्यास/परत केला गेल्यास/फेटाळला गेल्यास/रद्द केला गेल्यास त्याबाबतचे परतावे कसे मिळवावेत ?

उत्तर :- व्यवहारातील प्रदान त्या पीपीआयला डेबिट करुनच केले गेले असल्यास, अयशस्वी/परत केलेल्या/फेटाळलेल्या/रद्द केलेल्या व्यवहारांबाबत, त्या पीपीआयला परतावा लगेच लागु होईल - मग अशा निधीचे लागु होते, त्या पीपीआयच्या प्रकारा/वर्गासाठी विहित केलेल्या मर्यादेबाहेर असले तरीही.

(45) दुस-या एखाद्या प्रदान संलेखाचा वापर करुन अयशस्वी/परत केलेल्या/फेटाळलेल्या/रद्द केलेल्या व्यवहारांबाबतचे परतावे एखाद्या पीपीआयमध्ये जमा/क्रेडिट करता येतात काय ?

उत्तर :- दुस-या एखाद्या प्रदान संलेखाचा वापर करुन अयशस्वी/परत केलेल्या/फेटाळलेल्या/रद्द केलेल्या व्यवहारांबाबतचे परतावे एखाद्या पीपीआयमध्ये जमा/क्रेडिट केले जाऊ नयेत व ते त्याच प्रदान संलेखात परत जमा केले जावेत.

(46) पीपीआय देणारासाठी विहित केलेली तक्रार निवारण यंत्रणा कोणती ?

उत्तर :- पीपीआय देणारांनी, ग्राहक तक्रारी/अडचणी हाताळण्यासाठी नोडल अधिकारी नेमणे, तक्रारी वरच्या स्तरावर नेण्याची व्यवस्था, तक्रार निवारणासाठी कालावधी ह्यासह, एक पारंपरिक, सार्वजनिक केलेली तक्रार निवारण यंत्रणा/साचा ठेवावा. अशा साचामध्ये किमान पुढील गोष्टी समाविष्ट असाव्यात.

(अ) पीपीआय देणाराच्या ग्राहक संरक्षण व तक्रार निवारण धोरणाच्या माहितीचे सोप्या भाषेत प्रसारण.
(ब) वेबसाईट, मोबाईल अॅप्स व कार्डांवर, पीपीआय देणारांच्या ग्राहक सेवा संपर्क तपशीलाचे तक्रार निवारणसाठीच्या नोडल अधिका-याच्या तपशीलासह स्पष्ट निर्देश.
(क) वरील (ब) येथे दिलेल्या ग्राहक सेवा संपर्क तपशीलाचे, पीपीआय देणाराच्या एजंटांकडून सुयोग्य प्रदर्शन.
(ड) दाखल केलेल्या तक्रारींना विशिष्ट तक्रार क्रमांक देणे तसेच ग्राहकांकडून तक्रारींच्या स्थितीचा मागोवा घेण्याची सुविधा देणे.
(ई) ग्राहकाची तक्रार/अडचण ताबडतोब व शक्यतो 48 तासांच्या आत सोडविण्यासाठी कारवाई सुरु करणे व अशी तक्रार/अडचण मिळण्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत तिचे निराकरण करणे.
(फ) वेबसाईट/मोबाईल अॅपवर पीपीआय देणाराचे प्राधिकृत/नेमलेले एजंट्सची सविस्तर यादी (नाव, एजंट आयडी, पत्ता, संपर्क तपशील इत्यादि) प्रदर्शित करणे.
(ग) पीपीआयशी संबंधित वेबसाईट/मोबाईल अॅपवर, नेहमी विचारण्यात येणा-या प्रश्नांची (एफएक्यु) उत्तरे उपलब्ध करुन देणे.

(47) पीपीआय व्यवहारांचे लेखा विवरणपत्र किंवा व्यवहार इतिहास देण्याची गरज आहे काय ?

उत्तर :- मागील किमान 6 महिन्यांसाठीची लेखा विवरणपत्रे निर्माण करण्यासाठी/मिळण्यासाठीचा पर्याय, पीपीआय देणारे, पीपीआय धारकांना उपलब्ध करुन देतील. ह्या लेखा विवरणपत्रात किमानपक्षी, व्यवहाराची तारीख, डेबिट/क्रेडिट केलेली रक्कम, नक्त शिल्लक व व्यवहाराचे वर्णन ह्यांचा समावेश असेल. ह्याशिवाय पीपीआय देणारे, किमान 10 व्यवहारांचा इतिहासही देतील.

(48) पीपीआय व्यवहारांसाठी बँकिंग लोकपाल योजना लागु आहे काय ?

उत्तर :- बँकांनी दिलेल्या पीपीआयबाबत ग्राहक बँकिंग लोकपालाकडे (बीओ) जाऊ शकतात, बँक नसलेल्या संस्थांनी दिलेल्या पीपीआयसाठी, डिजिटल व्यवहारांसाठीची लोकपाल योजना (ओएसडीटी) ची मदत घेता येते. ह्या लोकपाल योजना आरबीआयच्या https://cms.rbi.org.in. लिंकवर उपलब्ध आहेत.

(49) एखादा पीपीआय देणारा त्याच ग्राहकाला अनेक/बहुविध पीपीआय देऊ शकतो काय ?

उत्तर :- पीपीआय देणारा ग्राहकाला पुढील तीन प्रकारातील एक प्रकार देऊ शकतो.

(अ) किमान-तपशील सेमी क्लोज्ड पीपीआय
(ब) केवळ बँक खात्यातूनच लोडिंग शक्य असलेले पीपीआय (सेमी क्लोज्ड पीपीआय)
(क) फुल केवायसी सेमी क्लोज्ड/ओपन सिस्टिम पीपीआय

(50) वर निर्देशित केलेल्या प्रकारांमध्ये एखादा पीपीआय देणारा, बहुविध को-ब्रॅडिंग भागीदार, वॉलेट व कार्ड ह्यासारखी निरनिराळी स्वरुपे इत्यादी कारणांमुळे, त्याच /एकाच ग्राहकाला अनेक पीपीआय देत असल्यास, त्या मर्यादांना कशी वागणूक दिली जाईल ?

उत्तर :- वर निर्देशित केलेल्या प्रकारांमध्ये, बहुविध को-ब्रॅडिंग भागीदार, वॉलेट व कार्ड ह्यासारखी निरनिराळी स्वरुपे इत्यादी निरनिराळ्या कारणांनी, पीपीआय देणारा त्याच ग्राहकाला बहुविध पीपीआय देत असल्यास तो पीपीआय देणारा, केंद्रीकृत डेटाबेस/व्यवस्थापन माहिती प्रणाली (एसआयए) द्वारे त्यावरील मर्यादांवर देखरेख ठेवील.

उदाहरणार्थ - कोणत्यावेळी रु.1,00,000/- ची मर्यादा, एखाद्या विशिष्ट पीपीआय देणाराने निरनिराळ्या व्यवस्था/फॉर्म फॅक्टरखाली दिलेल्या फुल केवायसी पीपीआय मधील मूल्ये एकत्रित करुन काढली जाईल. त्याचप्रमाणे, पीपीआय एमडीच्या परिच्छेद 9.1(i) मधील रु.10,000/- ची मर्यादा ही, सर्व किमान तपशील पीपीआय मधील आहे (पीपीआय देणाराने निरनिराळ्या व्यवस्था/फॉर्म फॅक्टरखाली दिलेल्या) एखादा पीपीआय देणारा, त्याच/एकाच वेळी, त्याच मोबाईल नंबरला ‘किमान तपशील पीपीआय’ व ‘केवळ बँक खात्यातूनच लोडिंग पीपीआय’ देऊ शकत नाही.

तथापि, ह्या मर्यादांमध्ये पीपीआय-एमडीच्या परिच्छेद 10 मध्ये निर्देशित केलेले दोन प्रकार (देणगी संलेख व एमटीएस साठीचे पीपीआय) समाविष्ट नाहीत.

(51) आंतर कार्यशीलता (इंटर ऑपरेटिबीलिटी) म्हणजे काय ? पीपीआय हे आंतर कार्यशील आहेत काय ?

उत्तर :- आंतरक्रियाशीलता म्हणजे, इतर प्रदान प्रणालींबरोबर वापरता येण्यासाठी एखाद्या प्रदान प्रणालीला मदत करणारी तांत्रिक सहयोग्यता (कॅपॅटिबिलिटी). परिपत्रक डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.808/02.14.006/2018-19 दि. ऑक्टोबर 16, 2018 अन्वये पीपीआयमध्ये आंतरक्रियाशीलतेला परवानगी देण्यात आली आहे. आंतरक्रियाशीलतेमुळे, पीपीआय देणारे, सिस्टिम प्रोव्हायडर्स व निरनिराळ्या प्रणालींमध्ये सहभाग घेणारे ह्यांना, बहुविध प्रणालींमध्ये भाग घेतल्याशिवाय निरनिराळ्या प्रणालींमधील व्यवहारांचे समायोजन करण्यास व ते पूर्ण करण्यास प्रत्यक्ष मदत होते. इच्छुक पीपीआय देणारे त्यांच्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करुन देऊ शकतात.

(52) पीपीआय आंतरक्रियाशीलतेची सुविधा कोण देऊ शकते ?

उत्तर :- कोणतीही प्राधिकृत बँक किंवा अ-बँक पीपीआय देणारा पीपीआय आंतरक्रियाशीलतेची सुविधा उपलब्ध करुन देऊ शकतो.

(53) पीपीआय देणारास आंतरक्रियाशीलतेसाठी परवानगी देणे अनिवार्य आहे काय ?

उत्तर :- नाही. आंतरक्रियाशीलतेसाठी परवानगी देणे पीपीआय देणारासाठी अनिवार्य नाही. तथापि, एखाद्या देणाराने तसे ठरविल्यास ती सर्व फुल केवायसी पीपीआय खाती व संपूर्ण स्वीकार-इंन्फ्रास्ट्रक्चरसाठीही लागु असेल/दिली जाईल.

(54) माझ्याकडे किमान तपशील पीपीआय/केवळ बँक खात्यातूनच लोडिंग पीपीआय आहे. परंतु माझा पीपीआय देणारा आंतरक्रियाशीलतेत परवानगी देत नाही असे का ?

उत्तर :- केवळ फुल केवायसी पीपीआयलाच आंतरक्रियाशीलतेची परवानगी आहे.

(55) आंतरक्रियाशीलतेच्या रीती/प्रकार कोणते ?

उत्तर :- तो पीपीआय वॉलेटच्या स्वरुपात दिला गेला असल्यास, पीपीआयमधील आंतरक्रियाशीलता युपीआयमार्फत दिली जाईल. पीपीआय कार्डाच्या स्वरुपातील असल्यास, ते कार्ड, आंतरक्रियाशीलतेसाठी प्राधिकृत कार्ड नेटवर्कशी संलग्न केले जाईल.

(56) बँकांनी दिलेल्या पीपीआय संबंधित अप्राधिकृत व्यवहारांबाबत कोणते संरक्षण उपलब्ध आहे ?

उत्तर :- ग्राहक संरक्षण - अप्राधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांचे दायित्व सीमित करणे ह्यांना लागु असलेल्या आरबीआयच्या परिपत्रक डीबीआर.क्र.एलईजी.बीसी.78/09.07.005/2017-18 दि. जुलै 6, 2017 व डीसीबीआर.बीपीडी.(पीसीबी/आरसीबी).सीआयआर.क्र.06/12.05.001/2017-18 डिसेंबर 14, 2017 चे मार्गदर्शन बँक पीपीआय देणारांनी घ्यावे.

(57) अ-बँकांनी दिलेल्या पीपीआय संबंधित अप्राधिकृत व्यवहारांबाबत कोणते संरक्षण उपलब्ध आहे ?

उत्तर :- अ-बँकीय देणारांनी दिलेल्या पीपीआय मधील अनधिकृत व्यवहारांविरुध्द ग्राहकांची (पीपीआय धारक) जबाबदारी सीमित करण्याचा साचा, पीपीआय-एमडीच्या परिच्छेद 16.4 मध्ये दिला असून तो, मार्च 1, 2019 पासून जारी झाला आहे. खाली दिलेले एफएक्यु क्रमांक 60 ते 74 हे बँक नसलेल्या पीपीआय देणारांनी दिलेल्या पीपीआयशी संबंधित आहेत.

(58) ह्या साचात पीपीआय-एमडी खाली दिलेल्या सर्व प्रकारचे पीपीआय समाविष्ट आहेत काय ?

उत्तर :- पीपीआय-एमडीच्या परिच्छेद 10.2 अनुसार पीपीआय-एमटीएसच्या (मास ट्रान्झिट सिस्टिम्स साठीचे पीपीआय) व्यवस्थेखाली दिलेले पीपीआय सोडल्यास हा साचा, प्राधिकृत अबँकीय पीपीआयदात्यांनी दिलेल्या सर्व पीपीआयना लागु आहे. पीपीआय-एमटीएसमध्ये काँट्रिब्युटरी फसवणुक/दुर्लक्ष/पीपीआय-एमटीएस देणारामधील कमतरता (त्रुटी) देखील समाविष्ट आहेत.

(59) ह्या साचाखाली इलेक्ट्रॉनिक प्रदान व्यवहार म्हणजे काय ?

उत्तर :- ह्या साचाबाबत, इलेक्ट्रॉनिक प्रदान व्यवहार पुढीलप्रमाणे असू शकतात.

(अ) दूरस्थ/ऑनलाईन प्रदान व्यवहार (व्यवहाराच्या ठिकाणी पीपीआय सादर करण्याची गरज नसलेले व्यवहार - उदा. वॉलेट्स, कार्ड नॉट प्रेझेंट (सीएनपी) व्यवहार इत्यादि) किंवा

(ब) समोरासमोर/जवळचे प्रदान व्यवहार (कार्डे किंवा मोबाईल फोन्स सारखे पीपीआय व्यवहाराचे ठिकाणी आवश्यक आहेत असे व्यवहार. उदा. - कार्ड, क्युआर कोड वापरुन विक्रीच्या ठिकाणी केलेले व्यवहार).

(60) एसएमएस अॅलर्ट्स पंजीकृत करणे ग्राहकासाठी (पीपीआय धारक) अनिवार्य आहे काय ?

उत्तर :- ह्या साचाखाली संरक्षण मिळविण्यासाठी, एसएमएस अॅलर्ट्ससाठी पंजीकृत करणे ग्राहकासाठी (पीपीआय धारक) अनिवार्य आहे.

(61) ग्राहकाला त्याच्या/तिच्या पीपीआय खात्यातील व्यवहाराचा इशारा (अॅलर्ट) मिळू शकतो काय ?

उत्तर :- ग्राहकाच्या खात्यातील कोणत्याही प्रदान व्यवहारासाठी त्याला/तिला एसएमएस इशारा पाठविणे अ-बँक पीपीआय देणारांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. ह्याशिवाय, पंजीकृत झाले असल्यास ई-मेल अॅलर्टही पाठविता येऊ शकतो. व्यवहाराबाबतच्या अॅलर्टमध्ये असा एक संपर्क क्रमांक आणि/किंवा ई-मेल आयडी असावा की ज्यावर ग्राहक अनधिकृत व्यवहार कळवू शकेल किंवा आक्षेप कळवू शकेल.

(62) ग्राहक त्याच्या/तिच्या पीपीआय खात्यातील अनधिकृत व्यवहार कोठे कळवू शकतो ?

उत्तर :- अनधिकृत व्यवहार आणि/किंवा पीपीआय हरविणे किंवा चोरीस जाणे कळविण्यासाठी, अ-बँकीय पीपीआय देणारांनी, त्याच्या ग्राहकांना, वेबसाईट/एसएमएस/ई-मेल/विशेष टोल-फ्री हेल्पलाईन द्वारा 24 x 7 अॅक्सेस उपलब्ध करुन द्यावा. ह्याशिवाय, अबँकीय पीपीआय देणारांनी त्यांचे मोबाईल अॅप/त्यांच्या वेबसाईटचे होम पेज/अन्य कोणतीही उदयोन्मुख रीत ह्यावर, तक्रारी दाखल करण्यास व खास करुन अनधिकृत इलेक्ट्रॉनिक प्रदान व्यवहार कळविण्यास एक थेट लिंक उपलब्ध करुन द्यावी.

(63) एखाद्या अनधिकृत व्यवहाराबाबत किंवा संलेख हरविला असल्याबाबत पीपीआय देणाराला कळविल्यानंतर, एखाद्या अनधिकृत व्यवहाराविरुध्द ग्राहक संरक्षित असतो काय ?

उत्तर :- अनधिकृत प्रदान व्यवहार किंवा संलेख हरविला जाण्याबाबत कळविल्यानंतर, बँक नसलेल्या पीपीआय देणारांनी, त्यानंतरही 2 पीपीआय ग्राहकाच्या खात्यामध्ये अनधिकृत प्रदान व्यवहार होणार नाहीत ह्यासाठी ताबडतोब कारवाई केली पाहिजे. अशा संलेखावर नंतरही डेबिट झाल्यास ती जबाबदारी पीपीआय देणाराचीच असेल.

(64) बँक नसलेल्या पीपीआय देणाराबाबत, काँट्रिब्युटरी फसवणुक/दुर्लक्ष/त्रुटी ह्यांच्या विरुध्द ग्राहकाला संरक्षण मिळते काय ?

उत्तर :- बँक नसलेल्या पीपीआय देणाराकडील काँट्रिब्युटरी फसवणुक/दुर्लक्ष/त्रुटी ह्याबाबत ग्राहकाची जबाबदारी शून्य असेल. पीपीआय-एमटीएस देणारे देखील अशा कृती/घटनांबाबत समाविष्ट आहेत.

(65) बँक नसलेल्या पीपीआय देणाराकडून काँट्रिब्युटरी फसवणुक/दुर्लक्ष/त्रुटी झाल्यास ग्राहकाने पीपीआय देणाराला कळवावे काय ?

उत्तर :- ग्राहकाच्या खात्यातील कोणतीही अनधिकृत व्यवहार कळविणे नेहमीच योग्य असते. तथापि, बँक नसलेल्या पीपीआय देणाराकडून काँट्रिब्युटरी फसवणुक/दुर्लक्ष/त्रुटी विरुध्द भरपाई देण्यास, केवळ ग्राहकाने त्याच्या/तिच्या खात्यातील अनधिकृत व्यवहार कळविला नाही ह्या कारणाने, पीपीआय दाता नकार देऊ शकत नाही.

(66) तृतीय पक्षाकडूनच भंग/उल्लंघन झाले असून त्याबाबतच्या त्रुटी ह्या, बँक नसणारा पीपीआय देणारा किंवा ग्राहक ह्यांच्या नसून त्या प्रणालीमध्ये अन्यत्र असल्यास, आणि अनधिकृत प्रदान व्यवहार झाल्याबाबत ग्राहकाने त्या बँक-नसणा-या पीपीआय देणाराला कळविले असल्यास, ग्राहकाची जबाबदारी कशी निश्चित करता येईल ?

उत्तर :- अशा बाबतीमधील ‘प्रति व्यवहार ग्राहक जबाबदारी’ ही त्या अ-बँक पीपीआय देणाराकडून, त्या व्यवहाराबाबतच्या संदेश ग्राहकाला मिळणे, आणि ग्राहकाकडून अनधिकृत व्यवहार झाल्याबाबत त्या अ-बँक पीपीआय देणाराला कळविला जाणे ह्या दरम्यान उलटलेल्या दिवसांच्या संख्येवर अवलंबून असेल. संदेश मिळाल्यावर तीन दिवसांच्या आत देणाराला तसे कळविले गेल्यास ग्राहकाची जबाबदारी शून्य असेल. त्याचप्रमाणे संदेश मिळाल्यानंतर चार ते सात दिवसांच्या दरम्यान असा व्यवहार कळविला गेल्यास ग्राहकाची जबाबदारी कमाल रु.10,000/- पर्यंतच सीमित असेल. सात दिवसांनंतर कळविले गेल्यास, त्याबाबतची कारवाई, अ-बँक पीपीआय देणाराच्या संचालक मंडळाने मंजुर केलेल्या धोरणानुसार केली जाईल.

(67) वर निर्देशित केलेल्या दिवसांची संख्या कुठपासून मोजावी ?

उत्तर :- वर निर्देश केलेल्या दिवसांची संख्या, अ-बँक पीपीआय दात्याकडून संदेश मिळण्याची तारीख वगळून मोजण्यात यावी.

(68) केवळ ग्राहकाच्या दुर्लक्ष केल्यामुळेच नुकसान झाले असल्यास - जसे - त्याने/तिने प्रदानाचे क्रेडेंशियल्स शेअर केले आहेत - ते नुकसान कोणी व किती पर्यंत सोसावे ?

उत्तर :- जेथे ग्राहकाच्या दुर्लक्षामुळे नुकसान झाले आहे, जसे - त्याने/तिने प्रदान क्रेडेंशियल्स शेअर केले आहेत - तेथे, त्याने/तिने तो अनधिकृत व्यवहार, अ-बँक पीपीआय देणाराला कळवीपर्यंत, ते संपूर्ण नुकसान ग्राहकालाच सोसावे लागेल.

(69) अनधिकृत व्यवहार पीपीआय देणाराला कळविल्यानंतरही झालेल्या अनधिकृत व्यवहारांवरील नुकसान कोणी सोसावे ?

उत्तर :- अनधिकृत व्यवहार कळविल्यानंतरही होत असलेले नुकसान अ-बँक पीपीआय देणारानेच सोसावयाचे आहेत.

(70) पात्र असलेली रक्कम किती दिवसांनंतर ग्राहकाच्या खात्यात जमा केली जाईल ?

उत्तर :- अ-बँक पीपीआय देणाराने, अनधिकृत इलेक्ट्रॉनिक प्रदान व्यवहाराबाबतची रक्कम, ग्राहकाने त्याबाबत कळविलेल्या तारखेपासून 10 दिवसांच्या आत ग्राहकाच्या खात्यात क्रेडिट (नोशनल रिव्हर्स) करणे आवश्यक आहे. असे उलट करणे (रिव्हर्सल), त्या पीपीआयचा प्रकार/वर्ग ह्यांना लागु असलेल्या कमाल परवानगीप्राप्त मर्यादेचा भंग करणारे असले तरीही अवश्य केले जावे. ते क्रेडिट त्या अनधिकृत व्यवहाराच्या तारखेस असलेल्या मूल्यानुसार दिले जावे.

(71) असे मिळालेले नोशनल क्रेडिट केव्हा वापरता येऊ शकते ?

उत्तर :- हे नोशनल क्रेडिट त्या तक्रारीचे निवारण झाल्यावर व अ-बँक पीपीआय देणाराने ग्राहकाची जबाबदारी सिध्द केल्यानंतर वापरता येऊ शकते. तथापि, कोणत्याही परिस्थितीत, हा कालावधी, तक्रार मिळाल्याच्या तारखेपासून 90 दिवसांपेक्षा अधिक असणार नाही.

(72) एखादा व्यवहार अनधिकृत व्यवहार नाही हे सिध्द करण्याची जबाबदारी कोणाची आहे ?

उत्तर :- अनधिकृत इलेक्ट्रॉनिक प्रदान व्यवहारांच्या बाबतीत ग्राहकाचे दायित्व सिध्द करण्याची जबाबदारी अ-बँक पीपीआय देणारावरच असते.

हे एफएक्यु, भारतीय रिझर्व्ह बँकेने माहिती व सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी दिले आहेत. ह्यांच्या आधारावर केलेल्या कृती आणि/किंवा निर्णय ह्यासाठी रिझर्व्ह बँक जबाबदार असणार नाही. स्पष्टीकरणे किंवा अर्थ ह्यासाठी, रिझर्व्ह बँकेने व सरकारने वेळोवेळी दिलेल्या संबंधित परिपत्रकांचे व अधिसूचनांचे मार्गदर्शन घेण्याची विनंती वाचकाला करण्यात येत आहे.

 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��