Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 06/04/2017
एशियन क्लियरिंग युनियन

(मार्च 27, 2017 रोजी)

(1) एशियन क्लियरिंग युनियन (एसीयु) म्हणजे काय ?
(2) एसीयुचे सभासद कोण आहेत ?
(3) एसीयु संबंधीच्या सूचना कोठे उपलब्ध आहेत ?
(4) भारतामधील प्राधिकृत डीलर्सनी एसीयुचे व्यवहार कसे हाताळावेत/करावेत ?
(5) एसीयु व्यवहारांचे समायोजन-एकक म्हणजे काय ?
(6) एसीयु व्यवहारांच्या समायोजनाची कार्यरीत कोणती ?
(7) प्राधिकृत डीलर वर्ग-1 बँका, भारतीय रिझर्व बँकेची पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय, पाकिस्तान सह सर्व सभासद देशांमधील सर्व बँकांच्या नावे एसीयु डॉलर व एसीयु युरो खाती उघडू शकतात काय ?
(8) एसीयु मार्फत समायोजन करण्यासाठीची यंत्रणा काय आहे ?
(9) एसीयु मार्फत समायोजन करण्यास पात्र असलेले व्यवहार कोणते ?
(10) एसीयु मार्फत समायोजित करण्यास पात्र नसलेली प्रदाने कोणती ?
(11) सभासद देशांदरम्यान करावयाचे सर्व पत्र व्यवहार एसीयुमार्फतच करणे आवश्यक आहे काय ?

(1) एशियन क्लियरिंग युनियन (एसीयु) म्हणजे काय ?

उत्तर : एशियन क्लियरिंग युनियन (एसीयु) ची स्थापना, डिसेंबर 9, 1974 रोजी, प्रादेशिक सहकार्य वाढविण्यासाठी, युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड पॅसिफिकच्या (ईएससीएपी) पुढाकाराने करण्यात आली. ह्या क्लियरिंग युनियनचा मुख्य उद्देश म्हणजे, सभासद देशांदरम्यान बहुपक्षीय धर्तीवर पात्र असलेल्या व्यवहारांसाठी प्रदाने करण्यास साह्य करणे. त्यामुळे, विदेशी मुद्रेचा साठा व हस्तांतरण करण्याचे खर्च कमी होतील आणि त्याचबरोबर सहभागी देशांमधील व्यापारही वृध्दिंगत होईल.

(2) एसीयुचे सभासद कोण आहेत ?

उत्तर :- बांगला देश, भूतान, भारत, इराण, मालदीव द्वीपसमूह, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका ह्या देशांच्या केंद्रीय बँका व नाणेविषयक प्राधिकरणे सध्या एसीयुचे सभासद आहेत.

(3) एसीयु संबंधीच्या सूचना कोठे उपलब्ध आहेत ?

उत्तर : आरबीआयने दिलेल्या सविस्तर कार्यकारी सूचना, एपी.(डीआयआर मालिका) परिपत्रक क्र. 35 दि. फेब्रुवारी 17, 2010 आणि माल व सेवांची निर्यात ह्यावरील वेळोवेळी सुधारित केलेले महानिदेश 16/20115-16 दि. जानेवारी 1, 2016 मध्ये दिल्या आहेत.

(4) भारतामधील प्राधिकृत डीलर्सनी एसीयुचे व्यवहार कसे हाताळावेत/करावेत ?

उत्तर : एसीयुमार्फत हाताळावयाचे सर्व व्यवहार, एडी वर्ग-1 बँकांद्वारे, त्यांच्या संगत व्यवस्थांमार्फत, नेहमीच्या विदेशी मुद्रा व्यवहारांच्या रीतीप्रमाणेच केले जातील.

(5) एसीयु व्यवहारांचे समायोजन-एकक म्हणजे काय ?

उत्तर : दि एशियन मोनेटरी युनिट्स (एएमयुज) हे एसीयुच्या खात्याचे सामान्य एकक असून त्याला ‘एसीयु डॉलर’ व ‘एसीयु युरो’ असे मूल्य देण्यात आले असून त्याची किंमत अनुक्रमे एक डॉलर व एक युरो च्या सममूल्य आहे. एसीयु खालील सर्व प्रदान संलेखांना एएमयुज च्या स्वरुपातच मूल्याधिष्ठित करावे लागते. अशा संलेखांचे समायोजन, एडी वर्ग-1 बँकांनी, एसीयु डॉलर खाती व एसीयु युरो खाती ह्यांच्या मार्फतच करावे. ही खाती, एसीयु नसलेल्या व्यवहारांसाठी ठेवलेल्या, अनुक्रमे डॉलर व युरो खात्यांपेक्षा स्पष्टपणे वेगळी असावीत. ‘एसीयु युरो’ बाबत प्रक्रिया करण्यासाठीच्या प्रदान वाहिनीचे पुनरावलोकन केले जात असल्याने, जुलै 1, 2016 पासून ‘एसीयु युरो’ मधील कार्ये तात्पुरती प्रलंबित ठेवण्यात आली आहेत व त्यामुळे ‘युरो’ मधील व्यापारी व्यवहारांसह पात्र असलेले सर्व विद्यमान खात्यांचे व्यवहार, पुढील सूचना दिली जाईपर्यंत, एसीयु यंत्रणेबाहेरच समायोजित केले जातील.

(6) एसीयु व्यवहारांच्या समायोजनाची कार्यरीत कोणती ?

उत्तर : (1) शक्य तोवर बरेचसे व्यवहार, एडी वर्ग-1 बँकांनी इतर सहभागी देशातील बँकांमध्येच ठेवलेल्या खात्यांमधून समायोजित केले जावेत. (ह्या उलट, सहभागी देशातील बँकांनीही व्यवहार करावा). केवळ दोन्हीही देशांमधील किरकोळ/गळलेले व्यवहार, संबंधित देशांमधील केंद्रीय बँकांनी, क्लियरिंग युनियम मार्फत समायोजित करण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही वेळी, एसीयु डॉलर व एसीयु युरो खात्यांमधील शिल्लक नेहमीच्या व्यवसायांसाठी पुरेशी असेल अशी ठेवली जावी. जुलै 1, 2016 पासून, व्यापारी व्यवहारांसह, पात्र असलेले सर्व विद्यमान/चालु खात्यांचे ‘युरो’ मधील व्यवहार, पुढील सूचना दिली जाईपर्यंत एसीयु यंत्रणेच्या बाहेरच समायोजित करण्यास परवानगी आहे. (2) एडी वर्ग-1 बँकांना, वाणिज्य व पात्र असलेले इतर व्यवहार, नेहमीच्या इतर विदेशी मुद्रा व्यवहारांप्रमाणेच समायोजित करण्यास परवानगी आहे.

(7) प्राधिकृत डीलर वर्ग-1 बँका, भारतीय रिझर्व बँकेची पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय, पाकिस्तान सह सर्व सभासद देशांमधील सर्व बँकांच्या नावे एसीयु डॉलर व एसीयु युरो खाती उघडू शकतात काय ?

उत्तर : होय. ह्यास परवानगी आहे. जुलै 1, 2016 पासून, व्यापारी व्यवहारांसह, पात्र असलेले ‘युरो’ मधील इतर सर्व विद्यमान खात्यातील व्यवहार, पुढील सूचना दिली जाईपर्यंत, एसीयु यंत्रणेबाहेर समायोजित करण्यास परवानगी आहे.

(8) एसीयु मार्फत समायोजन करण्यासाठीची यंत्रणा काय आहे ?

उत्तर : सविस्तर कार्यकारी मार्गदर्शक तत्वे, वेळोवेळी सुधारित केलेल्या, माल व सेवांची निर्यात वरील, एपी (डीआयआर मालिका) परिपत्रक क्र. 35, दि. फेब्रुवारी 17, 2010 आणि महापरिपत्रक 16/2015-16 जानेवारी 1, 2016 मध्ये उपलब्ध आहेत.

(9) एसीयु मार्फत समायोजन करण्यास पात्र असलेले व्यवहार कोणते ?

उत्तर : पुढील प्रदाने एसीयु मार्फत समायोजित करण्यास पात्र आहेत.

(1) एसीयु सभासद देशांमधील, डिफर्ड पेमेंटच्या अटीवरील निर्यात/आयात व्यवहार आणि

(2) प्रश्न क्र.10 खाली अपात्र म्हणून घोषित न केलेले.

टीप :- म्यानमार बरोबर केलेले व्यापारी व्यवहार, एसीयु यंत्रणेव्यतिरिक्त, मुक्तपणे रुपांतरणीय असलेल्या इतर कोणत्याही चलनात समायोजित केले जाऊ शकतात.

(10) एसीयु मार्फत समायोजित करण्यास पात्र नसलेली प्रदाने कोणती ?

उत्तर : पुढील प्रदाने एसीयु मार्फत समायोजन करण्यास पात्र नाहीत.

(1) नेपाळ व भारत आणि भूतान व भारत ह्यादरम्यानची प्रदाने अपवाद - नेपाळ राष्ट्र बँकेने विदेशी मुद्रेत प्रदान करण्यास परवानगी दिली आहे. अशा, नेपाळमध्ये निकासी असलेल्या आयातदाराने भारतामधून मालाची आयात केली असल्यास, अशी प्रदाने एसीयु यंत्रणेबाहेर समायोजित केली जाऊ शकतात. आणि,

(2) रिझर्व बँक व इतर सहभागी सभासद ह्यांच्यादरम्यान उभयपक्षी सहमती असलेली प्रदाने सोडून, एसीयुच्या सभासद देशांमधील, निर्यात/आयात कारणाने नसलेली प्रदाने.

(3) इराणबरोबर व्यापारी व्यवहारांसह केलेले सर्व चालु खाते व्यवहार, पुढील सूचना दिली जाईपर्यंत, एसीयु यंत्रणेबाहेरील, परवानगीप्राप्त असलेल्या कोणत्याही चलनात समायोजित केले जावेत.

(11) सभासद देशांदरम्यान करावयाचे सर्व पत्र व्यवहार एसीयुमार्फतच करणे आवश्यक आहे काय ?

उत्तर : होय. वरील प्रश्न 10 मध्ये निर्देशित केलेले व्यवहार सोडून, म्यानमार बरोबर केलेले व्यापारी व्यवहार एसीयु यंत्रणे व्यतिरिक्त मुक्तपणे रुपांतरणीय असलेल्या कोणत्याही चलनात समायोजित केले जावेत. ह्याशिवाय, जुलै 1, 2016 पासून, ‘युरो’ मधील व्यापारी व्यवहारांसह, पात्र असलेले सर्व चालु खाते व्यवहार, पुढील सूचना मिळेपर्यंत, एसीयु यंत्रणेबाहेर समायोजित करण्यास परवानगी आहे.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä