(फेब्रुवारी 28, 2017 रोजी अद्यावत केलेली)
(1) प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस) 2016 काय आहे ?
प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस) 2016 ही, भारत सरकारने, डिसेंबर 16, 2016 रोजी अधिसूचित केलेली एक योजना असून, ती प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2016 साठीच्या टॅक्सेशन अँड इनवेस्टमेंट रेजिस खालील, प्रत्येक घोषणार्कत्याला लागु आहे.
(2) पीएमजीकेडीएस मध्ये ठेव ठेवण्यासाठी कोण पात्र आहे ?
टॅक्सेशन अँड इनवेस्टमेंट रेजिम फॉर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, 2016 च्या कलम 199 क च्या पोटकलम (1) खाली, आपले अघोषित उत्पन्न घोषित करणारी प्रत्येक व्यक्ती, ह्या योजनेखाली ठेव ठेवील.
(3) ह्या योजनेखालील ठेवी कोणत्या स्वरुपात ठेवल्या जातील ?
ह्या ठेवी, भारतीय रिझर्व बँकेमध्ये, बाँड लेजर अकाऊंट्स (बीएलए) च्या स्वरुपात, घोषणार्कत्याच्या नावे ठेवल्या जातील.
(4) अर्ज व ठेवीची रक्कम स्वीकारणारे प्राधिकृत प्रतिनिधी कोणते ?
सहकारी बँका सोडून, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (1949 चा 10) लागु होणा-या कोणत्याही बँकिंग कंपनीकडून (प्राधिकृत बँका) अर्ज व ठेवीची रक्कम (बाँड लेजर अकाऊंटच्या स्वरुपात) स्वीकारली जाईल.
(5) घोषणार्कत्यांना हे अर्जाचे फॉर्म्स कोठे मिळतील ?
ठेवीसाठीचे अर्जाचे फॉर्म्स प्राधिकृत बँकांच्या शाखांमध्ये उपलब्ध असतील. भारतीय रिझर्व बँकेच्या वेबसाईटवरही ते उपलब्ध आहेत.
(6) ह्या योजनेत घोषणाकर्ता ठेव केव्हा ठेवू शकतो ?
ह्या योजनेखाली, (प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजना, अधिसूचना क्र. एस ओ, 4061 ई मधील सुधारणतेनुसार, 7 फेब्रुवारी 2017 पासून) ते 31 मार्च 2017 पर्यंत, कोणत्याही प्राधिकृत बँकेमध्ये, कामकाजाच्या दिवशी (काही शाखांमध्ये रविवारी कामकाज सुरु असले तरीही रविवार सोडून) नेहमीच्या कामकाजाच्या वेळेमध्ये, एकापेक्षा अधिक वेळा ठेवी ठेवता येतील.
(7) तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) नॉर्म्स म्हणजे काय ?
ह्या योजनेमध्ये ठेव ठेवणा-या व्यक्तींसाठी पर्मनंट अकाऊंट नंबर (पॅन) हेच केवायसी दस्त आहे. एखाद्या घोषणार्कत्याकडे पॅन नसल्यास तो पॅनसाठी अर्ज करील, आणि पॅनसाठीच्या केलेल्या अशा अर्जाचा तपशील व त्याच्या पोचपावतीचा क्रमांक, अर्ज करतेवेळी बँकेला सादर करील. पॅन मिळाल्यानंतर त्याबाबतचा तपशील अर्ज केलेल्या बँकेमध्ये अद्यावत केला जाईल.
(8) ह्या योजनेत ठेव ठेवण्यासाठीची किमान मर्यादा कोणती ?
ह्या योजनेत घोषणार्कत्याने ठेवलेली ठेव, टॅक्सेशन अँड इनवेस्टमेंट रेजिम फॉर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2016 च्या कलम 199 क च्या पोटकलम (1) खाली, घोषित केलेल्या, अघोषित उत्पन्नाच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी नसेल. ही ठेव रु.100 च्या पटीत असेल.
(9) ह्या योजनेखालील ठेवींवर व्याज दिले जाईल काय ?
ह्या योजनेखाली ठेवलेल्या ठेवींवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
(10) एकदा ठेव ठेवल्यावर कागदोपत्री पुरावा दिला जाईल काय ?
ठेव ठेवल्यावर, घोषणार्कत्याचे नाव आणि ठेवलेली रक्कम निर्देशित केलेली पावती, अर्ज केला असलेल्या बँकेकडून दिली जाईल. त्यानंतर, बीएलए साठीचे एक धारण प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र, ज्याच्यामार्फत अर्ज केला आहे त्या प्राधिकृत बँकेकडून गोळा केले जावे.
(11) ही ठेव अंशतः रोखीने व अंशतः चेक अथवा अन्य रितीने ठेवता येईल काय ?
होय. ही ठेव प्रदानाच्या एकापेक्षा अधिक रितींनी एकाच वेळी करता येईल. तथापि, ठेवीची संपूर्ण रक्कम बँकेला मिळण्याची तारीखच त्या ठेवीची तारीख समजली जाईल.
(12) मी कोणत्याही वेळी माझी ठेव रद्द करु शकतो काय ?
एकदा बाँड लेजर अकाऊंट निर्माण झाल्यावर ही ठेव रद्द करण्याचा पर्याय उपलब्ध नाही.
(13) ही ठेव परत केव्हा केली जाईल ?
ह्या ठेवीची परतफेड, ती ठेवण्याच्या परिणामकारक तारखेपासून (म्हणजे, रोख रक्कम भरण्याची किंवा चेक/ड्राफ्ट वटविला जाण्याची किंवा इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण केले जाण्याची तारीख) 4 वर्षांनी केली जाईल.
(14) घोषणार्कत्याला विमोचनाची रक्कम कशी मिळेल ?
घोषणार्कत्याने अर्जामध्ये दिलेल्या बँक खात्यात विमिचनाची रक्कम जमा केली जाईल.
(15) विमोचनासाठी कोणत्या प्रक्रिया आहेत ?
परिपक्वतेच्या तारखेस, रेकॉर्डवर असलेल्या तपशीलानुसार ती रक्कम त्या बँक खात्यात जमा केली जाईल.
तपशीलामध्ये बदल झाले असल्यास, (खाते क्रमांक, आयएफएससी कोड, इत्यादि) निवेशकाने, त्या प्राधिकृत बँकेमार्फत भारतीय रिझर्व बँकेला ताबडतोब कळविणे आवश्यक आहे.
(16) ह्या योजनेत ठेवलेली ठेव, मुदतीपूर्वीच परत मिळविता येते काय ?
नाही. बीएलएच्या मुदतपूर्व विमोचनाचा पर्याय उपलब्ध नाही.
(17) एखाद्या विशेष प्रसंगी हा बीएलए, एखाद्या नातेवाईकाला किंवा मित्राला भेट/हस्तांतरित करता येऊ शकतो काय ?
नाही. कोणत्याही नातेवाईकाला किंवा मित्राला, बीएलए भेट म्हणून/हस्तांतरित करता येणार नाही. केवळ घोषणार्कत्याचा मृत्यु झाल्यासच बाँड लेजर अकाऊंटचे हस्तांतरण, व्यक्तिगत धारकाच्या नामनिर्देशिताकडे किंवा कायदेशीर वारसाकडे केले जाऊ शकते.
(18) ह्या योजनेत ठेव ठेवल्यानंतर, घोषणार्कत्यांना इतर सेवा कोण देऊ करील ?
ह्या योजनेत ज्यांच्या मार्फत ठेवी ठेवल्या गेल्या, त्या बँकांच, ग्राहकाला बँक खात्याच्या तपशीलामधील बदल, नामनिर्देशिताचे रद्दीकरण ह्यासारख्या सेवा देऊ करतील.
(19) पीएमजीकेडीएसमध्ये ठेव ठेवण्यास प्रदानाचे पर्याय कोणते ?
ही ठेव, रोख रक्कम किंवा अशी ठेव स्वीकारणा-या प्राधिकृत बँकेच्या नावे चेक किंवा ड्राफ्ट देऊन किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फरने केली जाईल.
(20) ह्या गुंतवणुकींसाठी नामनिर्देशन सुविधा उपलब्ध आहे काय ?
होय. सरकारी प्रतिभूती अधिनियम 2006 आणि सरकारी प्रतिभूती विनियम 2007 च्या तरतुदीनुसार नामनिर्देशन सुविधा उपलब्ध आहे. अर्जाच्या फॉर्मबरोबर नामनिर्देशनाचा फॉर्मही उपलब्ध असतो. नामनिर्देशनाचे रद्दीकरण/बदल ह्यासाठी एक वेगळा फॉर्म भरुन प्राधिकृत बँकेकडे सादर करावयाचा असतो.
(21) हे बीएलए व्यापारक्षम आहेत काय ?
नाही. बाँड लेजर अकाऊंट्स व्यापारक्षम नाहीत.
(22) पीएमजीकेडीएस बाबतच्या प्रश्नांसाठी मी आरबीआयशी कसा संपर्क साधावा ?
ह्या योजनेबाबतचे प्रश्न/चौकशा ई-मेलने पाठवाव्यात.
(23) ह्या योजनेत ठेव ठेवण्यासाठी इन्फलेशन इंडेक्स बाँड (आयआयबी) किंवा सार्वभौम सुवर्ण रोखे (एसजीबी) मधील विद्यमान निवेशक, तोच इनवेस्टर आयडी वापरु शकतो काय ?
होय. आयआयबी किंवा एसजीबी योजनेमधील निवेशक, पीएमजीकेडीएसमध्ये ठेव ठेवण्यासाठी तोच इनवेस्टर आयडी वापरु शकतो - मात्र त्यासाठी, त्या इनवेस्टर आयडीशी जोडलेले वैय्यक्तिक ओळख दस्त (पीआयडी) हे परमनंट अकाऊंट नंबर असले पाहिजे.
(24) कर, दंड, अधिभार व ठेव ह्यांचे प्रदान व पीएमजीकेडीएस खालील ठेव, एसबीएनमध्ये करता येते काय ?
भारत सरकारने ठरविले आहे की, 30-12-2016 पर्यंत, कर, अधिभार, दंड आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) ह्याबाबतची प्रदाने, आरबीआयने दिलेल्या रु.500 व रु.1000 च्या जुन्या बँक नोटांनी करता येतील. दि टॅक्सेशन अँड इनवेस्टमेंट रेजिम फॉर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) 2016, डिसेंबर 17, 2016 रोजी सुरु झाली असून ती, मार्च 31, 2017 पर्यंत घोषणा करण्यासाठी खुली आहे. ह्या योजनेखालील अधिभार व दंड, चलान आयटीएनएस-287 मधून प्रदान करावयाचा असून, ठेवी मात्र, प्रधानमंत्री गरीब कल्याण ठेव योजना, 2016 मध्ये करावयाच्या आहेत. पीएमजीकेवाय बाबतची अधिसूचना www.incometaxindia.gov.in ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
|