Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 02/09/2016
अचल मालमत्तेची खरेदी

विभाग 1 : निवासी व्यक्तींकडून भारताबाहेर अचल मालमत्तेची खरेदी

उपभोक्त्यांच्या, ह्या विषयावरील सर्वसाधारण प्रश्नांची उत्तरे सहजपणे समजणा-या भाषेत देण्याचा प्रयत्न हे एफएक्यु करतात. तथापि, एखादा व्यवहार करण्यासाठी, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 (फेमा) आणि त्याखाली तयार केलेले विनियम किंवा देण्यात आलेले निदेश ह्यांचाही संदर्भ घेण्यात यावा. ह्यातील संबंधित मुख्य विनियम म्हणजे, अधिसूचना क्र. फेमा 7(आर)/2015-आरबी दि. जानेवारी 21, 2016 अन्वये देण्यात आलेले, विदेशी मुद्रा व्यवस्थापन (भारताबाहेर अचल मालमत्ता मिळविणे व हस्तांतरित करणे) विनियम, 2015. तसेच त्याबाबत दिलेले निदेश, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 खाली, अचल मालमत्ता मिळविणे व हस्तांतरित करणे ह्यावरील, महानिदेश क्र.12 च्या विभाग 1 मध्ये एकत्रित करण्यात आले आहेत. मुख्य विनियमांमधील सुधारणा (असल्यास) परिशिष्टात दिल्या आहेत.

प्रश्न 1 - अनिवासी असताना एखाद्या व्यक्तीने भारताबाहेर मिळविलेली मालमत्ता, ती व्यक्ती निवासी व्यक्ती झाल्यानंतरही धारण करणे सुरु ठेवू शकते काय ?
प्रश्न 2 - एखादी निवासी व्यक्ती प्रेषणे पाठवून भारताबाहेर मालमत्ता विकत घेऊ शकते काय ?
प्रश्न 3 - भारताबाहेरील मालमत्तेचे हस्तांतरण करण्याचे निर्बंध कोणाला लागु होत नाहीत ?
प्रश्न 4 - एखादी निवासी व्यक्ती भारताबाहेरील मालमत्ता कशा प्रकारे मिळवू शकते ?

प्रश्न 1- अनिवासी असताना एखाद्या व्यक्तीने भारताबाहेर मिळविलेली मालमत्ता, ती व्यक्ती निवासी व्यक्ती झाल्यानंतरही धारण करणे सुरु ठेवू शकते काय ?

उत्तर - फेमाच्या कलम 6(4) अन्वये, भारतात निवासी असलेली व्यक्ती, भारताबाहेर असलेली कोणतीही मालमत्ता धारण करु शकते, मालकी ठेवू शकते, हस्तांतरित करु शकते किंवा त्यात गुंतवणुकी करु शकते - मात्र, अशी मालमत्ता, त्याने/तिने, ती व्यक्ती भारताबाहेर निवासी असताना मिळविली, धारण केलेली किंवा मालकीची असावी किंवा भारताबाहेर निवासी असलेल्या व्यक्तीकडून वारशाने मिळविलेली असावी.

प्रश्न 2 - एखादी निवासी व्यक्ती प्रेषणे पाठवून भारताबाहेर मालमत्ता विकत घेऊ शकते काय ?

उत्तर - भारताबाहेर अचल मालमत्ता खरेदी करण्यासाठी, उदारीकृत प्रेषण योजनेखाली (एलआरएस), निवासी व्यक्ती, प्रेषणे करु शकते. एखादी मालमत्ता विकत घेण्यासाठी एखाद्या कुटुंबातील सभासदांनी त्यांची प्रेषणे एकत्रित केल्यास, अशी मालमत्ता अशी प्रेषणे एकत्रितपणे करणा-या सर्व सभासदांच्या नावे असावी.

प्रश्न 3 - भारताबाहेरील मालमत्तेचे हस्तांतरण करण्याचे निर्बंध कोणाला लागु होत नाहीत ?

उत्तर - भारताबाहेर मालमत्ता मिळविण्याबाबत एखाद्या निवासी व्यक्तीवरील मनाई पुढील बाबतीत लागु नाही.

(अ) ती निवासी व्यक्ती एक विदेशी राष्ट्रीयत्वाची असल्यास किंवा

(ब) ती मालमत्ता जुलै 8, 1947 पूर्वी मिळविण्यात आली असून, परवानगी घेतल्यानंतर ती धारण करणे सुरु असल्यास किंवा

(क) ती मालमत्ता, पाच वर्षांपेक्षा अधिक नसलेल्या भाडेपट्ट्यावर मिळविलेली असल्यास.

प्रश्न 4 - एखादी निवासी व्यक्ती भारताबाहेरील मालमत्ता कशा प्रकारे मिळवू शकते ?

उत्तर - भारताबाहेरील अचल मालमत्ता पुढील प्रकारांनी मिळविता येऊ शकते.

(अ) फेमाच्या कलम 6(4) खाली

(ब) (1) फेमाच्या कलम 6(4) मध्ये संदर्भित केलेल्या व्यक्तीकडून वारसाहक्काने/देणगी म्हणून किंवा (2) जुलै 8, 1947 पूर्वीच जिने मिळविली आहे अशा व्यक्तीकडून वारसाहक्काने/देणगी म्हणून (3) ती मालमत्ता मिळवितेवेळी जारी/लागु असलेल्या विदेशी मुद्रा तरतुदीनुसार जिने मालमत्ता मिळविली आहे अशा व्यक्तीकडून वारसा हक्काने/देणगी म्हणून.

(क) त्या निवासी व्यक्तीच्या, निवासी विदेशी मुद्रा (आरएफसी) खात्यामधील शिल्लकेमधून खरेदी केल्यास.

(ड) वरील (ब) व (क) मधील व्यक्तींकडून मिळालेली देणगी म्हणून - मात्र ती व्यक्ती, अशा व्यक्तींची नातेवाईक असली पाहिजे.

(ई) उदारीकृत प्रेषण योजनेखाली (एलआरएस) केलेल्या प्रेषणांमधून खरेदी केल्यास.

(फ) एखाद्या नातेवाईकाबरोबर संयुक्तपणे खरेदी केल्यास - मात्र भारताबाहेर निधी पाठविला जाऊ नये.

(ग) व्यवसायाच्या जागेसाठी किंवा कर्मचा-यांच्या निकासासाठी, विदेशात कार्यालये असलेल्या भारतीय कंपनीकडून.

विभाग 2 : अनिवासी व्यक्तींकडून भारतामध्ये अचल मालमत्तेची खरेदी

उपभोक्त्यांच्या, ह्या विषयावरील सर्वसाधारण प्रश्नांची उत्तरे सहजपणे समजणा-या भाषेत देण्याचा प्रयत्न हे एफएक्यु करतात. तथापि, एखादा व्यवहार करण्यासाठी, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 (फेमा) आणि त्याखाली तयार केलेले विनियम किंवा देण्यात आलेले निदेश ह्यांचाही संदर्भ घेण्यात यावा. ह्यातील संबंधित मुख्य विनियम म्हणजे, अधिसूचना क्र. फेमा 21/2000-आरबी दि. मे 03, 2000 अन्वये देण्यात आलेले, विदेशी मुद्रा व्यवस्थापन (भारताबाहेर अचल मालमत्ता मिळविणे व हस्तांतरित करणे) विनियम, 2000. तसेच त्याबाबत दिलेले निदेश, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 खाली, अचल मालमत्ता मिळविणे व हस्तांतरित करणे ह्यावरील, महानिदेश क्र.12 च्या विभाग 2 मध्ये एकत्रित करण्यात आले आहेत. मुख्य विनियमांमधील सुधारणा (असल्यास) परिशिष्टात दिल्या आहेत.

प्रश्न 1 - अनिवासी भारतीय (एनआरआय)/भारतीय वंशाच्या व्यक्ती (पीआयओ) भारतामध्ये अचल मालमत्ता कशा प्रकारे मिळवू शकतात
प्रश्न 2 - भारतामध्ये मिळविलेल्या मालमत्तेचे प्रदान करण्यासाठीच्या स्वीकार्य रीती कोणत्या ?
प्रश्न 3 - विदेशी वकिलाती/राजनीतिज्ञ/कॉन्सुलेट जनरल्स भारतामध्ये मालमत्ता मिळवू शकतात काय ?
प्रश्न 4 - विदेशी राष्ट्रीयत्वाच्या व्यक्ती भारतामध्ये मालमत्ता मिळवू शकतात काय ?
प्रश्न 5 - एखादी अनिवासी व्यक्ती, भारतामधील मालमत्तेच्या विक्रीच्या उत्पन्नाचे प्रत्यावर्तन करु शकते काय ?
प्रश्न 6 - हस्तांतरण म्हणजे काय ?

प्रश्न 1 - अनिवासी भारतीय (एनआरआय)i/भारतीय वंशाच्या व्यक्ती (पीआयओ)ii भारतामध्ये अचल मालमत्ता कशा प्रकारे मिळवू शकतात ?

तपशील एनआरआय पीआयओ.
कडून खरेदी (शेतजमीन/फार्महाऊस/प्लाटेंशन इत्यादी सोडून) निवासी/एनआरआय. निवासी/एनआरआय.
देणगी म्हणून मिळविणे (शेतजमीन/फार्महाऊस/प्लाटेंशन इत्यादी सोडून) निवासी/एनआरआय/पीआयओ निवासी/एनआरआय/पीआयओ
कडून वारसाहक्काने (कोणतीही अचल मालमत्ता) मिळविणे. (अ) जारी असलेल्या कायद्याखाली मिळविणारी कोणतीही व्यक्ती.
(ब) फेमाच्या कलम 6(5)iii खाली.
ह्यांना विकणे (शेतजमीन/फार्महाऊस/प्लाटेंशन इत्यादी सोडून). निवासी/एनआरआय/पीआयओ निवासी
ह्यांना विकणे (शेतजमीन). निवासी भारताचा नागरीक असलेली निवासी व्यक्ती.
ह्यांना देणगी म्हणून देणे (शेतजमीन सोडून). निवासी/एनआरआय/पीआयओ निवासी/एनआरआय/पीआयओ
ह्यांना देणगीदाखल (शेतजमीन) निवासी भारताचा नागरीक असलेली निवासी व्यक्ती.
ह्यांना निवासी/व्यापारी मालमत्ता देणगी दाखल देणे. निवासी/एनआरआय/पीआयओ निवासी/एनआरआय/पीआयओ

प्रश्न 2 - भारतामध्ये मिळविलेल्या मालमत्तेचे प्रदान करण्यासाठीच्या स्वीकार्य रीती कोणत्या ?

उत्तर - अचल मालमत्तेबाबतचे प्रदान भारतामध्ये मिळालेले असावे/मिळविण्यात यावे आणि त्याबाबत भारतामधील सर्व कर इतर ड्युटीज्/लेव्हीज् प्रदान करणे लागु असेल. हे प्रदान, बँकिंग वाहिन्यांमार्फत भारतात प्रेषण केलेल्या निधीच्या स्वरुपात किंवा त्या एनआरआय/पीआयओंच्या, एनआरई/एफसीएनआर(बी)/एनआरओ खात्यांमधील निधी मधून केले जावे. प्रवासी चेक्स किंवा विदेशी चलनातील नोटांनी प्रदान करण्यात येऊ नये. एनआरआय/पीआयओ, भारतामधील एखाद्या प्राधिकृत डीलरकडून किंवा गृहनिर्माण संस्थेकडून रुपयांच्या स्वरुपात गृहकर्ज मिळवू शकतात.

प्रश्न 3 - विदेशी वकिलाती/राजनीतिज्ञ/कॉन्सुलेट जनरल्स भारतामध्ये मालमत्ता मिळवू शकतात काय ?

उत्तर - विदेशी वकिलाती/राजनीतिज्ञ/काँशुलेट जनरल्स भारतामधील अचल मालमत्तेची (शेतजमीन/प्लांटेशन/फार्महाऊस सोडून)खरेदी/विक्री पुढील अटींवर करु शकतात.

(अ) अशा खरेदी/विक्रीसाठी, बाह्य बाबी विभाग, बाह्य बाबी मंत्रालय, भारत सरकार ह्यांच्याकडून ना हरकत प्राप्त करुन आणि

(ब) भारतामधील अचल मालमत्ता मिळविण्यासाठीचा निधी, विदेशातून प्रचलित बँकिंग वाहिन्यांमार्फत प्रेषित केला असावा.

प्रश्न 4 - विदेशी राष्ट्रीयत्वाच्या व्यक्ती भारतामध्ये मालमत्ता मिळवू शकतात काय ?

उत्तर - पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, अफगाणिस्थान, चीन, इराण, नेपाळ, भूतान, मकाव किंवा हाँगकाँगचे नागरिक, (त्यांचा निवासी दर्जा कोणताही असला तरीही), पाच वर्षापेक्षा अधिक नसल्यास भाडेपट्ट्यातील मालमत्ता सोडल्यास, भारतीय रिझर्व बँकेची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय, भारतामध्ये अचल मालमत्ता मिळवू किंवा हस्तांतरित करु शकणार नाहीत.

(ब) भारतामध्ये निवासी असलेले, भारतीय वंशाचे नसलेले विदेशी राष्ट्रीयत्वाचे नागरिक (वरील (अ) मध्ये निर्देशित केलेल्या 10 देशातील सोडून) भारतामध्ये अचल मालमत्ता मिळवू शकतात.

(क) भारताबाहेर निवासी असलेले, भारतीय वंशाचे नसलेले, विदेशी राष्ट्रीयत्वाचे लोक, पाच वर्षापेक्षा अधिक नसलेल्या लीजवर भारतामध्ये अचल मालमत्ता मिळवू/हस्तांतरित करु शकतात, आणि येथील निवासी व्यक्तीकडून वारशाने भारतात अचल मालमत्ता मिळवू शकतात. इतर सर्व प्राप्तींसाठी/हस्तांतरणासाठी आरबीआयची पूर्व मंजुरी घेणे आवश्यक आहे.

प्रश्न 5 - एखादी अनिवासी व्यक्ती, भारतामधील मालमत्तेच्या विक्रीच्या उत्पन्नाचे प्रत्यावर्तन करु शकते काय ?

उत्तर - फेमाच्या कलम 6(5) खाली मालमत्ता मिळविणारी व्यक्ती किंवा तिचा वंशज, त्या मालमत्तेच्या विक्रीची रक्कम/उत्पन्न आरबीआयच्या मंजुरीशिवाय प्रत्यावर्तित करु शकत नाही. तथापि, एनआरआय/पीआयओ ह्यांना आणि अशी विदेशी नागरिक (नेपाळ/भूतान/पीआयओ सोडून) की,

(अ) ज्याने, फेमाच्या कलम 6(5) मध्ये संदर्भित केलेल्या व्यक्तीकडून वारशाने मिळविली आहे, किंवा (ब) जो भारतामधील नोकरीतून निवृत्त झालेला आहे किंवा, (क) जो/जी निवासी विधुर/विधवा असून ज्याने/जिने, त्याच्या/तिच्या भारतीय राष्ट्रीयत्वाच्या नागरिक असलेल्या मृत पत्नी/पती कडून ती मालमत्ता वारसाहक्काने मिळविली आहे, त्याला इतर मालमत्तेसह विदेशी मुद्रा व्यवस्थापन (मालमत्तेचे प्रेषण) विनियम, 2016 खाली) प्रति आर्थिक वर्ष युएसडी 10 लाख पर्यंतचे प्रत्यावर्तन करण्यास परवानगी आहे.

एनआरआय/पीआयओ भारतामधील त्यांच्या अचल मालमत्तेच्या (शेतजमीन/फार्महाऊस/प्लांटेशन मालमत्ता सोडून) विक्रीच्या उत्पन्नाचे प्रेषण पुढील अटींवर करु शकतात.

(अ) ही अचल मालमत्ता, त्याने मिळविली असतेवेळी जारी असलेल्या, विदेशी मुद्रा कायद्याच्या तरतुदीनुसार, किंवा विदेशी मुद्रा व्यवस्थापन (भारतामधील अचल मालमत्ता मिळविणे व हस्तांतरण) विनियम 2000 च्या तरतुदीनुसार मिळविलेली असावी.

(ब) प्रत्यावर्तन करावयाची रक्कम, नॉर्मल बँकिंग चॅनल्समार्फत किंवा एफसीएनआर(बी) खाते किंवा एनआरई खाते ह्यामध्ये ठेवलेल्या निधीमधून मिळालेल्या व ती मालमत्ता मिळविण्यासाठी देण्यात आलेल्या रकमेपेक्षा जास्त नसावी.

(क) निवासी मालमत्तेबाबत, विक्री-उत्पन्नाचे प्रत्यावर्तन, अशा केवळ दोन मालमत्तांपुरतेच निर्बंधित आहे

प्रश्न 6 - हस्तांतरण म्हणजे काय ?

उत्तर - फेमाच्या कलम 2 (झेडई) अनुसार, हस्तांतरण म्हणजे, हक्क, मालकी/शीर्षक, ताबा किंवा लिएन ह्यांची विक्री, खरेदी, अदलाबदल, तारण/गहाणवट, प्लेज, देणगी किंवा हस्तांतरणाचे इतर कोणतेही स्वरुप.

मुख्य विनियमांमधील सुधारणा/बदल

1. अधिसूचना क्र. फेमा 65/2002-आरबी दिनांक जून 29, 2002
2. अधिसूचना क्र. फेमा 93/2003-आरबी दिनांक जून 9, 2003
3. अधिसूचना क्र. फेमा 146/2006-आरबी दिनांक फेब्रुवारी 10, 2006
4. अधिसूचना क्र. फेमा 186/2009-आरबी दिनांक फेब्रुवारी 3, 2009
5. अधिसूचना क्र. फेमा 200/2009-आरबी दिनांक ऑक्टोबर 5, 2009
6. अधिसूचना क्र. फेमा 321/2014-आरबी दिनांक सप्टेंबर 26, 2014
7. अधिसूचना क्र. फेमा 335/2015-आरबी दिनांक फेब्रुवारी 4, 2015

(1) एनआरआय म्हणजे भारताचा नागरिक असलेली, भारताबाहेर निवास करणारी व्यक्ती.

(2) पीआयओ म्हणजे, पाकिस्तान/बांगलादेश/इराण/नेपाळ/भूतान/चीन/अफगाणिस्थान/श्रीलंका ह्या देशांचा नागरिक नसलेली व भारताबाहेर निवास करणारी अशी व्यक्ती की (अ) जिच्याकडे केव्हातरी भारतीय पारपत्र होते किंवा (ब) जी स्वतः किंवा तिची आई किंवा वडील किंवा आजोबा किंवा आजी हे भारताचे नागरिक होते (संविधानाने किंवा नागरिकत्व अधिनियमानुसार)

(3) फेमाच्या कलम 6(5) अनुसार, भारताबाहेर निवासी व्यक्ती, भारतामध्ये असलेली कोणतीही अचल मालमत्ता धारण करु शकते, मालकीची ठेवू शकते, हस्तांतरित करु शकते किंवा त्यात गुंतवणुक करु शकते - मात्र, अशी मालमत्ता, ती व्यक्ती भारतातील रहिवासी असतांना तिने मिळविली, धारण केली किंवा मालकीची केली असली पाहिजे किंवा, भारतात निवास करणा-या व्यक्तीकडून वारसाहक्काने मिळविली असली पाहिजे.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä