(जानेवारी 18, 2017 रोजी अद्यावत)
प्रेषणे हा कौटुंबिक व राष्ट्रीय उत्पन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून, बाह्य वित्तसहाय्याचाही तो एक खूप मोठा स्त्रोत आहे. भारतामधील लाभार्थी, त्यामुळे, बँकिंग व पोस्टल वाहिन्यांमार्फत सरहद्दी पलिकडील प्रेषणे प्राप्त करु शकतात. हा प्रेषण-व्यवसाय करण्यासाठी, इतर बँकांशी भागीदारी करण्यास बँकांना सर्वसाधारण परवानगी देण्यात आली आहे. युनिव्हर्सल पोस्ट युनियनचा (युपीयु) आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीचा (आयएफएस) मंच हा सर्वसाधारणतः पोस्टाच्या वाहिनीसाठी वापरला जातो. ह्याशिवाय, आत येणारी प्रेषणे स्वीकारण्यासाठी आणखी दोन वाहिन्या उपलब्ध आहेत - उदा. रुपी ड्रॉईंग अरेंजमेंट (आरडीए) आणि धन हस्तांतरण सेवा योजना (एमटीएसएस). देशांमध्ये प्रेषणांचा स्वीकार करण्यासाठी, ह्या दोन सर्वात सामान्य व्यवस्था आहेत.
हे एफएक्यु मुख्यतः आरडीए व एमटीएसएस संबंधित असलेल्या सर्वसामान्य प्रश्नांशी संबंधित आहेत. तशीच आवश्यकता असल्यास, प्राधिकृत व्यक्ती व त्यांच्या घटक संस्था, तपशीलवार माहितीसाठी संबंधित परिपत्रके/अधिसूचनांचा संदर्भ घेऊ शकतात.
रुपी ड्रॉईंग अरेंजमेंट (आरडीए)
(1) रुपी ड्रॉईंग अरेंजमेंट (आरडीए) म्हणजे काय ?
देशाबाहेरील अधिकार क्षेत्रामधून सरहद्दीपलिकडील प्रेषणे मिळविण्यासाठी, रुपी ड्रॉईंग अरेंजमेंट (आरडीए) ही एक वाहिनी आहे. ह्या व्यवस्थेखाली, प्राधिकृत वर्ग बँका, त्यांचे व्होस्ट्रो खाते उघडण्यासाठी व ठेवण्यासाठी, एफएटीएफ पूर्ण करणा-या देशांमधील अनिवासी विनिमय गृहांशी करार/जोडणी करतात.
(2) अनिवासी विनिमय गृहे म्हणजे कोण ?
पैसा पाठविणा-या देशामधील सक्षम प्राधिकरणाद्वारे विनियमित केलेल्या व प्रेषणर्कत्या कडील निधीचे प्रेषण करण्याचा परवाना प्राप्त केलेल्या ह्या कंपन्या किंवा संस्था आहेत.
(3) अशा व्यवस्था करण्यासाठी कोणकोणत्या परवानग्या घेणे आवश्यक आहे ?
एडी वर्ग 1 बँकेने आरडीए करण्यासाठी, अनिवासी विनिमय गृहाशी केलेल्या केवळ प्रथम करारासाठीच आरबीआयची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यानंतर, विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले असल्यास, एडी वर्ग 1 बँकांनी आरडीए करुन, रिझर्व बँकेला ताबडतोब कळविणे आवश्यक आहे.
(4) आरडीएखाली पाठविता येऊ शकणा-या प्रेषणांचे प्रकार कोणते ?
भारतामध्ये आरडीएखालील क्रॉसबॉर्डर आवक प्रेषणे प्राथमिकतः खाजगी खात्यावरील असतात. काही अपवाद सोडल्यास, प्रेषणकर्ता व लाभार्थी ह्या व्यक्तीच असाव्यात. व्यापारी व्यवहारांना वित्तसहाय्य करण्यासाठीचे विनिमय गृहांमार्फत केलेली प्रेषणेही काही मर्यादेपर्यंत करण्यास परवानगी आहे. परंतु भारतामधून सरहद्दीपलिकडे जावक प्रेषणे करण्यास ही योजना वापरता येत नाही.
(5) आरडीएखाली पाठविता येऊ शकणा-या पैशांच्या रकमेवर काही मर्यादा आहे काय ?
प्रेषणाची रक्कम व प्रेषणांची संख्या ह्यावर कोणतीही मर्यादा नाही. तथापि, व्यापाराशी संबंधित व्यवहारांबाबत रु.15.00 लाख ही वरील मर्यादा आहे.
(6) आरडीएखाली, लाभार्थीला रोख रकमेचे प्रदान करता येऊ शकते काय ?
नाही. आरडीएखाली रोख रकमेने प्रदान करण्यास परवानगी नाही. ही प्रेषणे लाभार्थींच्या बँक खात्यातच जमा करावयाची असतात.
(7) अनिवासी विनिमय गृहाशी बँकेची जोडणी नसली तरीही, प्रेषणाची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते काय ?
होय. एखाद्या अनिवासी विनिमय गृहाशी आरडीए असलेल्या एडी वर्ग 1 बँकेला मिळालेले आवक प्रेषण, ती एडी वर्ग 1 बँक सोडून अन्य बँकेत लाभार्थीने ठेवलेल्या खात्यात, एनईएफटी, आयएमपीएस इत्यादि इलेक्ट्रॉनिक रितींनी थेट जमा केली जाऊ शकते.
धन हस्तांतरण सेवा योजना (एमटीएसएस)
(8) धन हस्तांतरण सेवा योजना (एमटीएसएस) म्हणजे काय ?
धन हस्तांतरण सेवा योजना (एमटीएसएस) हा, वैय्यक्तिक प्रेषणे परदेशातून, भारतामधील लाभार्थीना हस्तांतरित करण्यासाठीचा एक मार्ग आहे. ह्या योजनेखाली, केवळ कुटुंबाच्या उदरनिर्वाह खर्चासाठी आणि भारताला भेट देणा-या पर्यटकांसाठी ह्यासारखी भारतामध्ये आवक वैय्यक्तिक प्रेषणे करण्यासच परवानगी आहे. ह्या योजनेखाली, ओव्हरसीज प्रिंसिपाल्स म्हणून ओळखण्यात आलेल्या, विदेशातील नावाजलेल्या धन हस्तांतरण कंपन्या, आणि भारतीय एजंट्स म्हटले गेलेल्या भारतामधील एजंट्स ह्यांच्या दरम्यान जोडणी असते. आणि हे भारतीय एजंट्स, प्रचलित विनिमय दराने, भारतामधील लाभार्थींना निधीचे वाटप करतात.
(9) ओव्हरसीज प्रिंसिपाल कोण असतो ?
ओव्हरसीज प्रिंसिपाल हा, संबंधित देशाच्या, वित्तीय विनियामक प्राधिकरणाने, किंवा केंद्रीय बँकेने/सरकारने, धन हस्तांतरण कार्यकृती करण्यास परवाना दिलेली पंजीकृत संस्था असणे आवश्यक आहे. ओव्हरसीज प्रिंसिपालचे पंजीकरण करणारा देशही एएमएल निकषांचे पालन करणारा असला पाहिजे. ह्या ओव्हरसीज प्रिंसिपालने, प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम (पीएसएस अधिनियम) 2007 च्या तरतुदीनुसार, भारतीय रिझर्व बँकेच्या प्रदान व समायोजन प्रणाली विभागाकडून, एक प्रदान प्रणाली सुरु करण्यासाठी/चालविण्यासाठी, आवश्यक ती प्राधिकृतता घेणे आवश्यक आहे.
(10) भारतीय एजंट म्हणजे कोण ?
भारतीय एजंट होण्यासाठी, अर्जदार, एक प्राधिकृत डीलर वर्ग-1 बँक किंवा प्राधिकृत डीलर वर्ग-2 किंवा संपूर्णतया मनी चेंजर (एएफएमसी) किंवा, टपाल खाते असणे आवश्यक आहे. ह्याशिवाय, भारतीय एजंट्स, पोट-एजंट्सही नेमू शकतात - म्हणजे, ज्यांचा खरेपणा भारतीय एजंटांना मान्य/स्वीकार्य आहे अशी रिटेल आऊटलेट्स, स्वतःची व्यवसायाची जागा असलेल्या वाणिज्य संस्था.
(11) एमटीएसएस करण्यासाठी कोणकोणत्या परवानग्या घ्याव्या लागतात ?
एमटीएसएस साच्या खाली कार्य करण्यासाठी, भारतीय एजंटांना, भारतीय रिझर्व बँकेच्या, विदेशी मुद्रा विभागाच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. ह्याशिवाय, ओव्हरसीज प्रिंसिपालनेही, प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम (पीएसएस अधिनियम) 2007 च्या तरतुदीखाली, भारतीय रिझर्व बँकेच्या प्रदान व समायोजन प्रणाली विभागाकडून आवश्यक ती प्राधिकृतता घेणे आवश्यक असते.
(12) एमटीएसएस खाली कोणत्या प्रकारची प्रेषणे मिळविता येतात ?
ह्या व्यवस्थेखाली केवळ, कुटुंबाच्या चरितार्थासाठी प्रेषणे व विदेशी पर्यटकांसाठी ह्या सारखी सरहद्दी पलिकडील व्यक्तीगत प्रेषणे करण्यासच परवानगी आहे. धर्मादाय ट्रस्टना दिलेल्या देणग्या/वर्गण्या, व्यापार संबंधित प्रेषणे, मालमत्ता विकत घेण्यासाठीची प्रेषणे, एनआरई खात्यांमध्ये जमा करण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी प्रेषणे करण्यास परवानगी नाही.
(13) एमटीएसएसखाली पाठविण्याच्या रकमेवर काही मर्यादा आहेत काय ?
ह्या योजनेखाली करावयाच्या वैय्यक्तिक प्रेषणांवर युएसडी 2500 ची मर्यादा घालण्यात आली आहे. ह्याशिवाय, एका कॅलेंडर वर्षात, एक लाभार्थी केवळ तीस प्रेषणेच मिळवू शकतो.
(14) एमटीएसएसखाली, लाभार्थीला रोखीने प्रदान करता येते काय ?
भारतामध्ये एखाद्या लाभार्थीला, रु.50,000 पर्यंतची रक्कम रोखीने देता येऊ शकते. ही रक्कम, बँकांनी दिलेल्या प्रिपेड कार्डावरही लोड करता येऊ शकते. ह्या रकमेपेक्षा अधिक असलेली रक्कम, अकाऊंट पेयी चेक/डिमांड ड्राफ्ट/पेमेंट ऑर्डरने देता येऊ शकते, किंवा थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते. तथापि, अपवादात्मक परिस्थितीत, लाभार्थी हा विदेशी पर्यटक असल्यास, ह्यापेक्षा अधिक रकमाही रोखीने देता येऊ शकतात. |