Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ���E�ɴɽ�ɮ�
 Sɱ�x�
 ���n����� Sɱ�x�
 �ɮ�E�ɮ�� ����J�� ���V�ɮ�{��`�
 Bx� ��� B�� ���V�
 |�n��x� |�h�ɱ��
����� >> B�� B C���V� - Display
Date: 23/03/2016
सुवर्ण चलनीकरण योजना, 2015

(मार्च 23, 2016 रोजी अद्यावत केल्यानुसार)

(1) प्रश्न : सुवर्ण चलनीकरण योजना 2015 मध्ये भाग घेण्यासाठी, बँकांनी आरबीआयची मंजुरी घेणे आवश्यक आहे काय ?

उत्तर : नाही. तथापि, बँकांनी ज्यांच्याबरोबर त्रिपक्षीय करार केला आहे अशा सीपीटीसी व रिफायनर्सची नावे आणि ही योजना राबविणा-या शाखा ह्यासह, ह्या योजनेच्या अंमलबजावणीचा तपशील आरबीआयकडे सादर करावा. त्याचप्रमाणे, सर्व शाखांनी ह्या योजनेखाली प्रचलित केलेल्या सोन्याची रक्कम, विहित केलेल्या नमुन्यात एकत्रित करुन, मासिक धर्तीवर सादर करावी.

(2) प्रश्न : ह्या योजनेखालील ठेव 4 वर्षांसाठी करता येते की 8 वर्षांसाठी ?

उत्तर : नाही. तथापि, 3 वर्षांसाठीच्या लघु मुदतीसाठी केलेली ठेव आणखी एक वर्ष पुढे नेता येते. ही पुढे नेण्याची सुविधा मध्यम मुदत व दीर्घ मुदत ठेवींसाठी उपलब्ध नाही.

(3) प्रश्न : जीएमएसच्या भावी ग्राहकांसाठी, सोने ठेवण्यापूर्वी केवायसी करणे अनिवार्य आहे काय ?

उत्तर : होय. भावी ठेवीदार, त्या बँकेचा केवायसी पालन केलेला ग्राहक नसल्यास.

(4) प्रश्न : एखादा ठेवीदार केवायसी पूर्ण केलेला असल्याचे संकलन व शुध्दता चाचणी केंद्राला (सीपीटीसी) कसे कळेल ?

उत्तर : बँका व सीपीटीसी मिळून ह्याबाबत एक उभयसंमत कार्यरीत ठेवून ती सीपीटीसीला कळवू शकतात.

(5) प्रश्न : सीपीटीसीने ठरविलेली शुध्दता त्याला/तिला मान्य नसल्यास व त्याला/तिला, जीएमएस मध्ये गुंतवणुक करावयाची नसल्यास, ग्राहकाला त्याचे/तिचे अलंकार परत मिळतील काय ?

उत्तर : अग्निपरीक्षा करण्यासाठी सीपीटीसीला ते अलंकार वितळवावे लागतात आणि ग्राहकाला ते सोने वितळवण्यानंतरच्या स्वरुपातच परत मिळू शकते. असे अलंकार, अग्निपरीक्षा करण्यापूर्वीच मूळ स्वरुपात परत घेता येऊ शकतात. अशा रितीने, अलंकार मूळ स्वरुपात परत मागून घेण्याचा निर्णय एक्सआरएफ चाचणी केल्यानंतर व अग्निपरीक्षा करण्यास परवानगी देण्यापूर्वीच ग्राहकाने घ्यावयाचा आहे.

(6) प्रश्न : केवळ सीपीटीसीने दिलेली ठेव पावती ग्राहकाला मिळाल्यानंतरच ठेवण्यात आलेल्या शुध्द (रिफाईंड) सोन्याची रक्कम क्रेडिट केली जाईल काय ? ग्राहकाने बँकेत प्रमाणपत्र सादर केले, पण सीपीटीसी किंवा रिफायनर्सकडून कोणताही संदेश मिळाला नाही, तर काय ?

उत्तर : नाही. सीपीटीसीकडून ठेवी बाबतची सूचना मिळाल्यावर शुध्दीकृत सोने आता बँकेकडून वापरण्यास तयार झाले आहे अशी रिफायनर कडून सूचना मिळाल्यावर (सीपीटीसी मध्ये ठेव ठेवल्याच्या 30 दिवसांच्या आत) ठेव ठेवणारी बँक, त्या ठेवीच्या खात्यात, शुध्दीकृत सोन्याची रक्कम जमा करील - मग ग्राहकाने ठेवीची पावती सादर केली असो किंवा नसो. सीपीटीसी/रिफायनरीकडून संबंधित सूचना मिळण्यापूर्वीच, ग्राहकाने ठेव पावती सादर केल्यास, बँकेने ह्या संस्थांकडे चौकशी करावी आणि मिळालेल्या उत्तरानुसार पुढील कारवाई करावी.

(7) प्रश्न : परिपक्वतेनंतर ग्राहकाला त्याचे सोने कोणत्या स्वरुपात परत मिळेल ?

उत्तर : ठेवीदाराने सोन्याच्या स्वरुपातच ठेवीच्या विमोचनाचा पर्याय निवडल्यास, त्याला परिपक्वतेनंतर, बुलियनच्या स्वरुपात प्रत्यक्ष सोने परत मिळेल.

(8) प्रश्न : सोन्याच्या स्वरुपातच ठेवीचे विमोचन करण्याचा पर्याय लघु मुदतीच्या ठेवी व मध्यम मुदतीच्या ठेवी अशा दोन्हींहीसाठी उपलब्ध आहेत काय ?

उत्तर : नाही. सोन्याच्याच स्वरुपात विमोचन करण्याचा पर्याय केवळ लघु मुदत बँक ठेवींसाठीच उपलब्ध आहे. मध्यम व दीर्घ मुदतीच्या ठेवींचे विमोचम केवळ भारतीय रुपयांमध्येच (आयएनआर) केले जाईल.

(9) प्रश्न : सोन्याच्या स्वरुपात विमोचन करावयाच्या बाबतीत, त्याच्या अंशतः भागाची (एक ग्रामपेक्षा कमी) परतफेड बँक आयएनआरमध्ये करु शकते काय ?

उत्तर : होय. जेथे परिपक्वतेची रक्कम (समजा) 302.86 ग्राम सोन्याच्या किंमतीएवढी होते आणि ग्राहकाला सोन्याच्या स्वरुपातच प्रदान करावयाचे आहे, तेथे बँक 302 ग्राम सोने देऊन, 0.086 ग्राम्स सोन्याचे मूल्य सममूल्य आयएनआरमध्ये देऊ शकते.

(10) प्रश्न : मध्यम व दीर्घ मुदत ठेवींवरील व्याजदर कोण ठरविते ?

उत्तर : हे केंद्र सरकार ठरवील आणि आरबीआयकडून बँकांना कळविले जाईल.

(11) प्रश्न : ह्या एमएलटीडी उत्पादाचे सर्व्हिसिंग करण्यासाठी नेमण्यात आलेल्या बँकेला काही दलाली मिळेल काय ?

उत्तर : होय.

(12) प्रश्न : मध्यम व दीर्घ ठेव योजनेखाली गोळा केलेल्या सोन्याच्या लिलावात बँकांनी भाग घेणे सक्तीचे आहे काय ?

उत्तर : नाही.

(13) प्रश्न : परिपक्वतेचे जीएमएस सोने/सोन्याचा साठा पुनः भरण्यासाठी, एखादी नेमलेली बँक, स्थानिक बँका व रिफायनर्सकडून सोने खरेदी/कर्ज म्हणून घेऊ शकते काय ?

उत्तर : होय.

(14) प्रश्न : जीएमएस ही योजना कार्यान्वित केल्याने निर्माण होणा-या त्यांच्या जोखमी बँका हेज करु शकतात काय ?

उत्तर : होय. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये.

(15) प्रश्न : सुवर्ण चलनीकरण योजना, 2015 खालील सोन्याची मूल्य जोखीम, स्थानिक कमोडिटी एक्सचेंजमध्ये हेज करण्यास बँकांना परवानगी आहे काय ?

उत्तर : होय. सुवर्ण चलनीकरण योजनेखाली, त्यांचे एक्सपोझर स्थानिक कमोडिटी मार्केटमध्ये हेज करण्यास बँकांना परवानगी आहे.

(16) प्रश्न : जीएमएस ठेवींच्या तारणाविरुध्द रुपयांच्या स्वरुपातील कर्जांसाठी परवानगी आहे काय ?

उत्तर : होय. सुवर्ण चलनीकरण योजनेखालील सोन्याच्या ठेवींच्या तारणाविरुध्द रुपये स्वरुपातील कर्जे दिली जाऊ शकतात.

(17) प्रश्न : एमएलटीजीडी खाली व्याज प्रदानाची नियतकालिकता काय आहे ?

उत्तर : मध्यम व दीर्घ मुदतीच्या सरकारी ठेवींच्या (एमएलटीजीडी) बाबतीत, व्याज-प्रदानाची नियतकालिकता वार्षिक आहे.

(18) प्रश्न : जीएमएसखाली प्रचलित सोन्याचे आंतर बँकीय कर्ज दिले/घेतले जाण्यास परवानगी आहे काय ?

उत्तर : होय. नेमण्यात आलेल्या बँकांना, ह्या योजनेखाली प्रचलित केलेले सोने, नेमण्यात आलेल्या इतर बँकांना ह्या योजनेखाली विहित केलेल्या उपयोगासाठी कर्जाऊ देण्यास परवानगी आहे.

 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��