Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 18/05/2020
कार्ड व्यवहार

(मे 18, 2020 रोजी अद्यावत केलेले)

(1) कार्डांचे निरनिराळे प्रकार कोणते ?

उत्तर :- कार्डांचे वर्गीकरण हे, ती दिली जाणे, त्यांचा वापर व कार्ड धारकाने केलेले प्रदान ह्यांच्या धर्तीवर केले जाऊ शकते. कार्डांचे चार प्रकार आहेत - (अ) डेबिट (ब) क्रेडिट (क) प्रिपेड (ड) इलेक्ट्रॉनिक

(2) ही कार्डे कोण देते ?

उत्तर :- डेबिट कार्डे बँकांकडून दिली जातात व ती एखाद्या बँक खात्याशी जोडलेली असतात. क्रेडिट कार्डे ही सर्वसामान्यतः बँका व नॉन-बकांकडून दिली जातात. परंतु ती मंजुरी मिळालेल्या इतर संस्थांकडूनही दिली जाऊ शकतात. प्रिपेड कार्डे ही, कार्ड धारकाने आधीच/अग्रिम प्रदान केलेल्या मूल्याविरुध्द (व ते मूल्य अशा कार्डांमध्ये साठविले जाते) बँका/नॉन बँकांकडून, कार्डे किंवा वॉलेट्स अशा स्वरुपात दिली जातात.

(3) डेबिट कार्डांचे उपयोग कोणते ?

उत्तर :- डेबिट कार्डांचा उपयोग, एटीएममधून रोख रक्कम काढणे, पॉईंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनल्स किंवा ई-कॉमर्सद्वारा (ऑनलाईन खरेदी) मालवस्तु व सेवा खरेदी करणे ह्यासाठी केला जाऊ शकतो. ही कार्डे देशांतर्गत वापरता येत असली तरी कार्ड धारकाने विनंती केल्यास त्यांचा आंतरराष्ट्रीय वापर करण्यासही परवानगी दिली जाते. विहित केलेल्या मर्यादा व अटींवर, ही कार्डे एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीला देशांतर्गत निधी हस्तांतरण करण्यासाठीही वापरता येऊ शकतात.

(4) क्रेडिट कार्डांचे उपयोग कोणते ?

उत्तर :- क्रेडिट कार्डे पीओएस टर्मिनल्स/ई-कॉमर्स येथून मालवस्तु व सेवा विकत घेण्यास वापरता येऊ शकतात. ही कार्डे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी (त्यासाठी त्यांना सक्षम केले असल्यास) वापरता येऊ शकतात. विहित केलेल्या मर्यादा व अटींवर ही क्रेडिट कार्डे, एटीएममधून रोख रक्कम काढण्यास, आणि बँक खाती, डेबिट कार्डे, क्रेडिट कार्डे व प्रिपेड कार्डे ह्यात निधी हस्तांतरण करण्यासाठीही वापरता येतात.

(5) प्रिपेड कार्डांचे उपयोग कोणते ?

उत्तर :- प्रिपेड कार्डांचा उपयोग, अशी कार्डे कोणी दिली ह्यावर अवलंबून आहे. प्रिपेड कार्डे ही ओपन किंवा सेमी-क्लोज्ड स्वरुपात असू शकतात आणि त्यांचा उपयोग एटीएममधून रोकड काढणे, पीओएस टर्मिनल्स/ई-कॉमर्स येथे वस्तु व सेवा खरेदी करणे आणि विहित केलेल्या मर्यादा व अटींवर, देशामध्येच एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे निधी हस्तांतरण करण्यासाठी केला जाऊ शकतो. ओपन सिस्टिम प्रिपेड कार्डे बँकांकडून दिली जातात तर सेमी-क्लोज्ड सिस्टिम प्रिपेड कार्डे बँका तसेच नॉन-बँक संस्थांकडूनही दिली जाऊ शकतात.

प्रिपेड संलेखांवरील (पीपीआय) एफएक्यु, पीपीआय वर पुढील सविस्तर माहिती देतात.

(6) इलेक्ट्रॉनिक कार्डे म्हणजे काय ?

उत्तर :- इलेक्ट्रॉनिक कार्डांना विशेष असे अंतिम उपयोगावरील निर्बंध नसलेल्या व्यक्तिगत कर्जाच्या स्वरुपात असलेल्या विशिष्ट ओव्हरड्राफ्ट खात्यांमध्ये दिलेली डेबिट कार्डे म्हणून समजता येऊ शकते. ओव्हरड्राफ्ट खाती असलेल्या नैसर्गिक व्यक्तींना, अशा खात्यांमध्ये देशांतर्गत डिजिटल व्यवहार करण्यास सहाय्य होण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक कार्डे देण्यास बँकांना परवानगी देण्यात आली आहे. सुरक्षा, अॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन (एएफए) मर्चंट डिसकाऊंट रेट (एमडीआर) इत्यादि सारख्या सर्व हेतूंसाठी, डेबिट कार्डासंबंधीच्या सूचना इलेक्ट्रॉनिक कार्डांनाही लागु आहेत.

(7) पीओएस टर्मिनलमध्ये कार्डाचा वापर करण्यासाठी असलेल्या निरनिराळ्या रीती कोणत्या ?

उत्तर :- पीओएस मध्ये एखादे कार्ड स्वाईप करता येते (मॅग्नेटिक स्ट्रिप), डिप करता येते (चिप आधारित कार्ड) किंवा टॅप करता येते (काँटॅक्टलेस नीयर फील्ड कम्युनिकेशन {एनएफसी} कार्ड).

(8) मॅग्नेटिक स्ट्रीप कार्डे, ईएमव्ही चिप व पिन कार्डे व स्पर्शरहित एनएफसी कार्डे म्हणजे काय ?

उत्तर :- मॅग्नेटिक स्ट्रीप कार्ड हे, त्या कार्डावर असलेल्या मॅग्नेटिक स्ट्रीप वर कार्ड-डेटा साठवून ठेवते तर इएमव्ही चिप व पिन कार्डांमधील डेटा, त्या कार्डावरील चिप मध्ये साठविला जातो. काँटॅक्टलेस एनएफसी कार्डामध्ये, त्या कार्डाचे वाचन (माहितीचे वाचन), ते कार्ड, कार्ड रीडरच्या जवळ ठेवून केले जाते. मॅग्नेटिक स्ट्रीप कार्डांच्या तुलनेत, इएमव्ही चिप व पिन कार्डे आणि स्पर्शरहित एनएफसी कार्डे अधिक सुरक्षित समजली जातात.

(9) कार्ड प्रेझेंट (सीपी) व कार्ड नॉट प्रेझेंट (सीएनपी) व्यवहार म्हणजे काय ?

उत्तर :- सीपी व्यवहार म्हणजे, व्यवहाराच्या ठिकाणी, कार्डाच्या प्रत्यक्ष हजेरीद्वारा केलेला व्यवहार. ह्याला फेस टु फेस (समोरासमोरील) किंवा प्रॉक्सीमिटी (जवळीक) प्रदान व्यवहार असेही म्हटले जाते. ह्याचे उदाहरण म्हणजे, एखाद्या एटीएम किंवा पीओएस टर्मिनलमध्ये केलेला व्यवहार सीएनपी व्यवहारामध्ये, व्यवहार करण्याच्या जागी कार्ड प्रत्यक्ष असणे गरजेचे नसते. ह्याला दूरस्थ (रिमोट) व्यवहार असेही म्हणतात. ह्याचे उदाहरण म्हणजे ऑनलाईन व्यवहार किंवा कार्ड वापरुन केलेला मोबाईल बँकिंग व्यवहार.

(10) कार्डामार्फत करावयाच्या रोख निकासीच्या किंवा माल-वस्तु व सेवा खरेदीच्या मर्यादा कोण ठरविते ?

उत्तर :- एटीएममधील रोख निकासी व वस्तु व सेवांची खरेदी ह्यावरील मर्यादा कार्ड देणाराकडून ठरविल्या जातात. पीओएस टर्मिनल्सवर, डेबिट कार्डे व ओपन सिस्टिम प्रिपेड कार्डे वापरुन रोख निकासी करण्यास भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) परवानगी दिली असून त्यानुसार दररोज, प्रति कार्ड कमाल रु.2,000/- रोख निकासी करता येईल. कार्ड धारकांनी त्यांच्या कार्ड देणारांकडून त्यांनी दिलेल्या अशा सुविधांची माहिती मिळवावी.

(11) त्याचे/तिचे कार्ड वापरुन एखादा फसवणुकीचा व्यवहार केला गेला आहे काय हे ग्राहकाला जलदतेने समजण्यासाठी एखादा मार्ग आहे काय ?

उत्तर :- कार्ड-प्रदानाचे पर्यावरण सुरक्षित व सुरक्षायुक्त असण्याची खात्री करण्यासाठी, आरबीआय निरनिराळी पाऊले उचलत आहे. कार्ड धारकाच्या कार्डावर होत असलेल्या व्यवहारांची त्याला/तिला जाणीव व्हावी ह्यासाठी, सर्व कार्ड व्यवहारांसाठी अॅलर्ट्स (इशारे) पाठविणे, आरबीआयने कार्ड देणारांसाठी अपरिहार्य/सक्तीचे केले आहे. ह्यापासून लाभ घेण्यासाठी कार्ड धारकांना एसएमएस/ई-मेल अॅलर्टसाठी पंजीकरण करण्यास सांगण्यात येत आहे.

(12) फसवणुकीने वापर करणा-याविरुध्द संरक्षित असलेल्या कार्डांमार्फत व्यवहार कसे केले जातात ?

उत्तर :- भारतात देण्यात आलेल्या कार्डांवरील सर्व सीपी व सीएनपी व्यवहार एएफएने सुरक्षित केले जातात. हा एएफए कोणत्याही स्वरुपात असू शकतो आणि काही सामान्यतः वापरली जाणारी स्वरुपे म्हणजे, पिन, डायनॅमिक वन टाईम पासवर्ड (ओटीपी), स्टॅटिक कोड इत्यादि. जेथे विदेशी मुद्रा बाहेर पाठविण्यात येत आहे (आऊट फ्लो) अशा व्यवहारांसाठी एएफए अनिवार्य नाही. त्याचप्रमाणे एनएफसी स्पर्शरहित तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेल्या सीपी व्यवहारांबाबत (एटीएम व्यवहार सोडून) ईएमव्ही मानकांचे अनुसरण केले असल्याच्या अटींवर, प्रति व्यवहार कमाल रु.2,000/- साठीचे व्यवहार, एएफएच्या आवश्यकतेशिवाय करण्यास परवानगी आहे.

(13) एखाद्या अनधिकृत व्यक्तीने कार्डाचा उपयोग फसवून केला असल्यास, कार्ड देणाराची दायित्वे कोणती ?

उत्तर :- सीएनपी व्यवहारांच्या बाबतीत, देशांतर्गत व्यवहारांसाठी एएफए उपलब्ध करणे आरबीआयने अनिवार्य/सक्तीचे केले आहे. एएफएशिवाय एखादा व्यवहार केला गेला असून ग्राहकाने तक्रार केली की तो व्यवहार त्याने/तिने केलेला नाही, तेव्हा कार्ड देणारी बँक ग्राहकाला त्या नुकसानाची भरपाई देईल. ह्याशिवाय, आरबीआयची परिपत्रके डीबीआर.क्र.एलईजी.बीसी.78/09.07.005/2017-18 दि. जुलै 6, 2017, डीसीबीआर.बीपीडी.(पीसीबी/आरसीबी).सीआयआर.क्र.06/12.05.001/2017-18 दि. डिसेंबर 14, 2017 आणि डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.1417/02.14.006/2018-19 दि. जानेवारी 4, 2019 अनुसार, अनधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहाराबाबत ग्राहकाची जबाबदारी वरील परिपत्रकांनुसार सीमित आहे.

हे एफएक्यु, भारतीय रिझर्व्ह बँकेने माहिती व सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी दिले आहेत. ह्यांच्या आधारावर केलेल्या कृती आणि/किंवा निर्णय ह्यासाठी रिझर्व्ह बँक जबाबदार असणार नाही. स्पष्टीकरणे किंवा अर्थ ह्यासाठी, रिझर्व्ह बँकेने व सरकारने वेळोवेळी दिलेल्या संबंधित परिपत्रकांचे व अधिसूचनांचे मार्गदर्शन घेण्याची विनंती वाचकाला करण्यात येत आहे.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä