Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 26/12/2016
भारतामध्ये विदेशी संस्थांकडून शाखा/संपर्क/प्रकल्प कार्यालय

(डिसेंबर 26, 2016 रोजी असल्यानुसार)

हे एफएक्यु, ह्या विषयावर उपयोजकांना असलेल्या प्रश्नांची उत्तरे समजण्यास सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतात. तथापि, एखादा व्यवहार करण्यासाठी, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 (फेमा) आणि त्याखाली तयार करण्यात आलेले निदेश किंवा विनियम ह्यांचाच संदर्भ घेतला जावा. संबंधित प्रमुख विनियम म्हणजे, अधिसूचना क्र. फेमा 22 (आर)/2016 - आरबी दि. मार्च 31, 2016 अन्वये दिलेले; विदेशी मुद्रा व्यवस्थापन (भारतामध्ये शाखा कार्यालय किंवा संपर्क कार्यालय किंवा प्रकल्प कार्यालय किंवा व्यवसायाची कोणतीही जागा स्थापन करणे) विनियम, 2016 हीच आहेत. देण्यात आलेले हे निदेश, भारतामध्ये विदेशी संस्थांकडून शाखा कार्यालय (बीओ)/संपर्क कार्यालय (एलओ)/प्रकल्प कार्यालय (पीओ) किंवा व्यवसायाची कोणतीही जागा स्थापन करणे ह्यावरील महानिदेशांमध्ये एकत्रित करण्यात आले आहेत.

प्रश्न 1 - एलओ/बीओ ह्यांच्या वार्षिक कार्यकृती प्रमाणपत्रात (एएसी) विपरीत/चुकीचे रिपोर्टिंग केले गेले असल्यास किंवा एएसी सादर न केल्यास एडीने कोणती कारवाई करणे आवश्यक आहे ?
प्रश्न 2 -एलओ/बीओ, भारतात एकापेक्षा अधिक खाती ठेवू शकतात काय ?
प्रश्न 3 - एलओ/बीओनी पोलिस प्राधिकरणाकडे पंजीकरण करणे/रिपोर्टिंग करणे आवश्यक आहे काय ?
प्रश्न 4 - एलओ/बीओ/पीओ त्यांच्या कार्यकृतीसाठी मालमत्ता मिळवू शकतात काय ?
प्रश्न 5 - बीओ म्हणून उन्नती झालेली एलओ तोच पॅन व बँक खाते ठेवू शकते काय ?
प्रश्न 6 - पीओसाठी विदेशी चलनामध्ये कर्ज सुविधा देता येते काय ?
प्रश्न 7 - भारतामध्ये एखादा विशिष्ट प्रकल्प करण्यासाठी, सर्वसाधारण परवानगीखाली, परवानगी दिली गेल्यावर अनेकदा तिला त्याच किंवा अन्य प्रकल्पदात्या संस्थेकडून आणखी एक प्रकल्प दिला जातो. ह्याचा विचार करता, संस्थेच्या स्तरावर बँक खाते ठेवणे, एएसी सादर करणे, प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याच्या समाप्तीबाबतचे कागदपत्र सादर करणे, आणि संस्था-स्तरावर लेखा-पुस्तके ठेवणे ही कार्ये, विशिष्ट प्रकल्प स्तराऐवजी पीओ संस्था स्तरावर करता येतील काय ?
प्रश्न 8 - विदेशातील शिपिंग किंवा विमान कंपन्यांनी भारतात बीओ स्थापन केल्यानंतर, त्या कंपन्यांचे एजंट्स, भारतामधील नेमस्त एडी बँका मध्ये विदेशी मुद्रा खाते ठेवणे सुरु ठेवू शकतात काय ?
प्रश्न 9 - पंजीकरण करण्यासाठी राज्य पोलिसांकडे सादर करण्यासाठी अर्जाचा एखादा विशिष्ट नमुना आहे काय ?
प्रश्न 10 - विदेशी संस्था, सर्वसाधारण परवानगीखाली बीओ उघडण्यास पात्र असल्यास, एडीच्या मंजुरीने स्वयंचलित मार्गाखाली, एखादी एलओ, बीओ म्हणून प्रगत होऊ शकते काय ?
प्रश्न 11 - एखादे अतिरिक्त कार्यालय बंद करण्यासाठी, बीओ/एलओ/पीओ बंद करणे मध्ये निर्देशित केलेल्या कार्य रीतींचा अवलंब केला जाऊ शकतो काय ?
प्रश्न 12 - एडी बँकांनी पीओसाठी आरबीआयकडून युआयएन मिळविणे आवश्यक आहे काय ?
प्रश्न 13 - अर्जदार हा, बांगला देश, श्रीलंका, अफगाणिस्तान, इराण, चीन, हाँगकाँग किंवा मकाव चा नागरिक असल्यास किंवा तेथे पंजीकृत/सुसंस्थापितझालेला असल्यास, आणि जम्मू व काश्मिर, ईशान्येकडील प्रदेश व अंदमान व निकोबार बेटे ह्यांना सोडून, इतर शहरात/राज्यांमध्ये बीओ/एलओ/पीओ उघडण्यासाठी अर्ज आला असल्यास, त्याबाबत रिझर्व बँकेचा संदर्भ घेतल्याशिवाय एडी बँक त्यासाठी परवानगी देऊ शकते काय ?
प्रश्न 14 - एलओ/बीओ/पीओ ह्यांच्या मालमत्तेचे तृतीय निवासी पक्षाला हस्तांतरण करण्यास एडी बँक मंजुरी देऊ शकते काय ?
प्रश्न 15 -एखाद्या भारतीय कंपनीची दुय्यम कंपनी आर्थिक दृष्ट्या भक्कम नसल्यास, एक भारतीय कंपनी असलेल्या प्रमुख/मूळ कंपनीकडून ती लेटर ऑफ कंफर्ट सादर करु शकते काय ?
प्रश्न 16 - विदेशात असलेली भारतीय कंपनी, भारतात एक बीओ उघडू शकते काय आणि हे स्वयंचलित मार्गाखाली असेल काय ?
प्रश्न 17 - वॉरंटीचा कालावधी पूर्ण झाला आहे, तसेच, आय कर, व्हॅट, सर्व्हिस टॅक्स ह्यांचे मूल्यमापन करायचे आहे, मालमत्तेच्या विक्रीची व्यवस्था करावयाची आहे अशा ख-या वैधानिक कारणांसाठी, प्रकल्पाची मुदत संपल्यावरही, एडी बँक त्या प्रकल्पाच्या मुदतवाढीसाठी मंजुरी देऊ शकते काय ?
प्रश्न 18 - नेहमीचे/सर्वसामान्य व्यावसायिक व्यवहार करण्यासाठी, बीओ, एखादे एफसीवाय खाते उघडू शकते काय ?
प्रश्न 19 - जेथे खाते उघडण्यात आले आहे ती एडी बँक ही एजन्सी बँक नसल्यास, बीओ/एलओ/पीओ, वैधानिक प्रदाने करण्यासाठी, दुस-या एका एडी बँकेत (कर प्रदानासाठीची एजन्सी बँक आणखी एक खाते उघडू शकते काय ?
प्रश्न 20 - प्रकल्प कार्यालयासाठी आयएनआर खात्यातील परवानगी असलेले क्रेडिट व डेबिट कोणते ?
प्रश्न 21 - भारतात असलेल्या बीओसाठी, माल आयात/निर्यात करण्यासाठी एलसी उघडता येते काय ? आणि पीओच्या बाबतीत, भारतामध्ये माल विकत घेण्यासाठी (एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिक खरेदी करण्यासाठी) स्थानिक एलसी उघडता येते काय ?
प्रश्न 22 - एखादे शाखा कार्यालय (बीओ) किंवा प्रकल्प कार्यालय (पीओ), फेमाखाली परवानगी असलेली बाह्य/जावक प्रेषणे, कोणत्याही एडी वर्ग 1 बँकेमार्फत पाठवू शकते काय, की अशी प्रेषणे केवळ त्यासाठी नेमलेल्या एडी वर्ग 1 बँकेमार्फतच पाठविली जावीत ?

प्रश्न 1 - एलओ/बीओ ह्यांच्या वार्षिक कार्यकृती प्रमाणपत्रात (एएसी) विपरीत/चुकीचे रिपोर्टिंग केले गेले असल्यास किंवा एएसी सादर न केल्यास एडीने कोणती कारवाई करणे आवश्यक आहे ?

उत्तर - एलओ/बीओच्या बाबतीत, नेमलेल्या एडी वर्ग 1 बँकेच्या ऑडिटरला काही विपरीत बाबी/गोष्टी आढळून आल्यास किंवा एलओ/बीओ, एएसी सादर करण्यात कसुरी करत असल्यास, ते ताबडतोब रिझर्व बँकेला कळविण्यात यावे.

प्रश्न 2 - एलओ/बीओ, भारतात एकापेक्षा अधिक खाती ठेवू शकतात काय ?

उत्तर - नाही. एलओ/बीओला एकापेक्षा अधिक खाती उघडावयाची असल्यास, असे अतिरिक्त खाते उघडण्यासाठीची कारणे देऊन, त्यांनी त्यांच्या एडी वर्ग 1 बँकेमार्फत रिझर्व बँकेची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

प्रश्न 3 - एलओ/बीओनी पोलिस प्राधिकरणाकडे पंजीकरण करणे/रिपोर्टिंग करणे आवश्यक आहे काय ?

उत्तर - केवळ बांगला देश, श्रीलंका, अफगाणिस्थान, इराण, चीन, हाँगकाँग, मकाव आणि पाकिस्तान मधील अर्जदारांनाच, राज्य पोलिस प्राधिकरणाकडे पंजीकरण करणे आवश्यक आहे. ह्या देशांमधील व्यक्तींसाठीच्या मंजुरी पत्राची प्रत, एडी वर्ग 1 बँकेकडून, गृह मंत्रालय, अंतर्गत सुरक्षा विभाग-1, भारत सरकार, नवी दिल्ली ह्यांचेकडे आवश्यक ती कारवाई करण्यासाठी व रेकॉर्ड ठेवण्यासाठी पाठविली जाईल. इतर सर्व देशांना, राज्य पोलिस प्राधिकरणांकडे पंजीकरण करण्याबाबत सूट देण्यात आली आहे.

प्रश्न 4 - एलओ/बीओ/पीओ त्यांच्या कार्यकृतीसाठी मालमत्ता मिळवू शकतात काय ?

उत्तर - एलओ सोडल्यास, एखाद्या विदेशी संस्थेच्या बीओ/पीओला, स्वतःच्या उपयोगासाठी व परवानगीप्राप्त/प्रसंगोपात्त कार्यकृती करण्यासाठी मालमत्ता मिळविण्यास परवानगी आहे. परंतु ती भाडेकराराने किंवा भाड्याने देण्यासाठी नाही. तथापि, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्थान, इराण, नेपाळ, भूतान, चीन, हाँगकाँग व मकाव येथील संस्थांनी भारतात बीओ/पीओसाठी अचल मालमत्ता मिळविण्यासाठी, रिझर्व बँकेची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. बीओ/एलओ/पीओ ह्यांना, भाडेकराराच्या मालमत्तेमधून, परवानगीप्राप्त/प्रसंगोपात्त कार्यकृती करण्यास सर्वसाधारण परवानगी आहे. मात्र, भाडेकराराचा कालावधी पाच वर्षांपेक्षा अधिक नसावा.

प्रश्न 5 - बीओ म्हणून उन्नती झालेली एलओ तोच पॅन व बँक खाते ठेवू शकते काय ?

उत्तर - होय. मात्र त्यासाठी, ते बँक खाते बीओ खाते म्हणून पुनर्-नामांकित केलेले असावे.

प्रश्न 6 - पीओसाठी विदेशी चलनामध्ये कर्ज सुविधा देता येते काय ?

उत्तर - होय. त्यासाठी बँकिंग विनियम विभागाने ह्याबाबत दिलेल्या विद्यमान सूचनांचे पालन एडी बँकेकडून केले जात असल्याची खात्री केली जावी.

प्रश्न 7 - भारतामध्ये एखादा विशिष्ट प्रकल्प करण्यासाठी, सर्वसाधारण परवानगीखाली, परवानगी दिली गेल्यावर अनेकदा तिला त्याच किंवा अन्य प्रकल्पदात्या संस्थेकडून आणखी एक प्रकल्प दिला जातो. ह्याचा विचार करता, संस्थेच्या स्तरावर बँक खाते ठेवणे, एएसी सादर करणे, प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याच्या समाप्तीबाबतचे कागदपत्र सादर करणे, आणि संस्था-स्तरावर लेखा-पुस्तके ठेवणे ही कार्ये, विशिष्ट प्रकल्प स्तराऐवजी पीओ संस्था स्तरावर करता येतील काय ?

उत्तर - नाही.

प्रश्न 8 - विदेशातील शिपिंग किंवा विमान कंपन्यांनी भारतात बीओ स्थापन केल्यानंतर, त्या कंपन्यांचे एजंट्स, भारतामधील नेमस्त एडी बँका मध्ये विदेशी मुद्रा खाते ठेवणे सुरु ठेवू शकतात काय ?

उत्तर - होय. तथापि, त्या बीओचे व्यवहार, नेमून दिलेल्या आयएनआर खात्यापुरतेच निर्बंधित असावेत, आणि कोणतेही व्यवहार, एजंटाच्या विदेशी मुद्रा खात्यामार्फत/मधून केले जाऊ नयेत.

प्रश्न 9 - पंजीकरण करण्यासाठी राज्य पोलिसांकडे सादर करण्यासाठी अर्जाचा एखादा विशिष्ट नमुना आहे काय ?

उत्तर - होय. कृपया रिपोर्टिंग वरील महानिदेशांचा संदर्भ घेण्यात यावा ((https://www.rbi.org.in/Scripts/BS_ViewMasDirections.aspx?id=10202). कार्यालय स्थापन करण्यासाठी एडी बँकेची मंजुरी मिळताच पंजीकरण करणे आवश्यक आहे.

प्रश्न 10 - विदेशी संस्था, सर्वसाधारण परवानगीखाली बीओ उघडण्यास पात्र असल्यास, एडीच्या मंजुरीने स्वयंचलित मार्गाखाली, एखादी एलओ, बीओ म्हणून प्रगत होऊ शकते काय ?

उत्तर - होय. रिझर्व बँक, एफईडी, सीओ कक्ष, संसद मार्ग, नवी दिल्ली-110001 ह्यांना कळवून तसे करता येते.

प्रश्न 11 - एखादे अतिरिक्त कार्यालय बंद करण्यासाठी, बीओ/एलओ/पीओ बंद करणे मध्ये निर्देशित केलेल्या कार्य रीतींचा अवलंब केला जाऊ शकतो काय ?

उत्तर - होय.

प्रश्न 12 - एडी बँकांनी पीओसाठी आरबीआयकडून युआयएन मिळविणे आवश्यक आहे काय ?

उत्तर - नाही.

प्रश्न 13 - अर्जदार हा, बांगला देश, श्रीलंका, अफगाणिस्तान, इराण, चीन, हाँगकाँग किंवा मकाव चा नागरिक असल्यास किंवा तेथे पंजीकृत/सुसंस्थापित झालेला असल्यास, आणि जम्मू व काश्मिर, ईशान्येकडील प्रदेश व अंदमान व निकोबार बेटे ह्यांना सोडून, इतर शहरात/राज्यांमध्ये बीओ/एलओ/पीओ उघडण्यासाठी अर्ज आला असल्यास, त्याबाबत रिझर्व बँकेचा संदर्भ घेतल्याशिवाय एडी बँक त्यासाठी परवानगी देऊ शकते काय ?

उत्तर - होय.

प्रश्न 14 - एलओ/बीओ/पीओ ह्यांच्या मालमत्तेचे तृतीय निवासी पक्षाला हस्तांतरण करण्यास एडी बँक मंजुरी देऊ शकते काय ?

उत्तर - होय.

प्रश्न 15 - एखाद्या भारतीय कंपनीची दुय्यम कंपनी आर्थिक दृष्ट्या भक्कम नसल्यास, एक भारतीय कंपनी असलेल्या प्रमुख/मूळ कंपनीकडून ती लेटर ऑफ कंफर्ट सादर करु शकते काय ?

उत्तर - नाही.

प्रश्न 16 - विदेशात असलेली भारतीय कंपनी, भारतात एक बीओ उघडू शकते काय आणि हे स्वयंचलित मार्गाखाली असेल काय ?

उत्तर - नाही.

प्रश्न 17 - वॉरंटीचा कालावधी पूर्ण झाला आहे, तसेच, आय कर, व्हॅट, सर्व्हिस टॅक्स ह्यांचे मूल्यमापन करायचे आहे, मालमत्तेच्या विक्रीची व्यवस्था करावयाची आहे अशा ख-या वैधानिक कारणांसाठी, प्रकल्पाची मुदत संपल्यावरही, एडी बँक त्या प्रकल्पाच्या मुदतवाढीसाठी मंजुरी देऊ शकते काय ?

उत्तर - होय. रिझर्व बँक, एफईडी, सीओ कक्ष, संसद मार्ग, नवी दिल्ली-110001 ह्यांना कळवून तसे करता येते.

प्रश्न 18 - नेहमीचे/सर्वसामान्य व्यावसायिक व्यवहार करण्यासाठी, बीओ, एखादे एफसीवाय खाते उघडू शकते काय ?

उत्तर - नाही.

प्रश्न 19 - जेथे खाते उघडण्यात आले आहे ती एडी बँक ही एजन्सी बँक नसल्यास, बीओ/एलओ/पीओ, वैधानिक प्रदाने करण्यासाठी, दुस-या एका एडी बँकेत (कर प्रदानासाठीची एजन्सी बँक आणखी एक खाते उघडू शकते काय ?

उत्तर - होय.

प्रश्न 20 - प्रकल्प कार्यालयासाठी आयएनआर खात्यातील परवानगी असलेले क्रेडिट व डेबिट कोणते ?

उत्तर - ह्या खात्यातील क्रेडिट म्हणजे त्या कार्यालयाचा खर्च भागविण्यासाठी मुख्य कार्यालयाकडून, प्रचलित (नॉर्मल) बँकिंग वाहिन्यांमार्फत आलेला निधी, आणि/किंवा, कंत्राटाखाली रुपयांच्या स्वरुपात मिळणारी रक्कम असावी आणि रिझर्व बँकेच्या पूर्व परवानगी घेतल्याशिवाय इतर कोणतीही रक्कम जमा केली जाऊ नये. त्याचप्रमाणे ह्या खात्यातील डेबिट्स, केवळ त्या कार्यालयाचे स्थानिक खर्च भागविण्याबाबतची रक्कम व तो प्रकल्प गुंडाळला/पूर्ण केला जाण्यापूर्वी अधूनमधून केलेली प्रेषणे असतील.

अधूनमधून केलेल्या प्रदानांसाठी, त्या व्यवहारांच्या खरेपणाबाबत, एडी बँकेचे समाधान झाले असले पाहिजे आणि तिने पुढील कागदपत्र मिळाले असल्याची खात्री करुन घ्यावी.

(अ) आय कर इत्यादिसह, भारतामधील दायित्वे पूर्ण करण्यासाठी पुरेशी तरतुद करण्यात आली आहे असे, ऑडिटरचे/चार्टर्ड अकाऊंटंटचे प्रमाणपत्र.

पीओ कडून घ्यावयाचा वचननामा की, ह्या प्रेषणांमुळे भारतातील प्रकल्प पूर्ण करण्यात बाधा निर्माण होणार नाही आणि भारतामधील कोणतेही दायित्व पूर्ण करण्यात येणारी आर्थिक तूट, विदेशातून प्रेषण करुन भरुन काढण्यात येईल.

प्रश्न 21 - भारतात असलेल्या बीओसाठी, माल आयात/निर्यात करण्यासाठी एलसी उघडता येते काय ? आणि पीओच्या बाबतीत, भारतामध्ये माल विकत घेण्यासाठी (एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिक खरेदी करण्यासाठी) स्थानिक एलसी उघडता येते काय ?

उत्तर - होय.

प्रश्न 22 - एखादे शाखा कार्यालय (बीओ) किंवा प्रकल्प कार्यालय (पीओ), फेमाखाली परवानगी असलेली बाह्य/जावक प्रेषणे, कोणत्याही एडी वर्ग 1 बँकेमार्फत पाठवू शकते काय, की अशी प्रेषणे केवळ त्यासाठी नेमलेल्या एडी वर्ग 1 बँकेमार्फतच पाठविली जावीत ?

उत्तर - बीओ किंवा पीओ ह्यांना जेव्हा भारताबाहेर निधी प्रेषण करणे आवश्यक असेल, तेव्हां फेमाखाली लागु असलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या व्याप्तीत, केवळ नेमलेल्या एडी वर्ग 1 बँकेच्या मार्फतच नव्हे, तर त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही एडी वर्ग 1 बँकेच्या मार्फत तसे केले जाऊ शकते - मात्र त्यासाठी, नेमलेल्या एडी वर्ग 1 बँकेकडून त्यांची त्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेतले पाहिजे. ही प्रेषणे केवळ रोख/टॉम/स्पॉट धर्तीवर समायोजित केलेल्या व्यवहारांसाठीच असावीत. ही प्रेषणे पुढील दोन पैकी एका प्रकारच्या बँकिंग वाहिनी मार्फतच केली गेली पाहिजेत.

(1) नेमण्यात आलेली एडी वर्ग 1 बँक, सममूल्य आयएनआर रक्कम, व्यवहार हाताळणा-या बँकेकडे हस्तांतरित करील. व्यवहार हाताळणारी बँक, ही रक्कम, स्विफ्टच्या (एसडब्ल्युआयएफटी) मार्फत, बीओ/पीओच्या मूळ विदेशी कार्यालयाकडे प्रेषित करु शकते. तथापि, व्यवहार हाताळणा-या बँकेला केवायसीचे अनुपालन व आवश्यक कागदपत्रे ह्याबाबत खात्री करुन घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे तिला, युआयएन क्र., लाभार्थीचा व प्रेषणाचा तपशील इत्यादी माहितीसह, स्विफ्ट संदेश, एडी वर्ग 1 बँकेबरोबर शेअर करावा लागेल.

(2) नेमलेली एडी वर्ग 1 बँक, सममूल्य आयएनआर रक्कम, व्यवहार हाताळणा-या बँकेकडे हस्तांतरित करील. त्यानंतर, व्यवहार हाताळणारी बँक, नेमण्यात आलेल्या एडी वर्ग 1 बँकेच्या नोस्ट्रो (एनओएसटीआरओ) खात्यात जमा करील व ती एडी वर्ग 1 बँक ती रक्कम अंतिम लाभार्थीकडे हस्तांतरित करील.

  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä