Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (254.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 14/06/2019
एटीएम्ससाठी सुरक्षा उपाय

आरबीआय/2018-19/214
डीसीएम (पीएलजी) क्र.2968/10.25.007/2018-19

जून 14, 2019

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/
मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व बँका

महोदय/महोदया,

एटीएम्ससाठी सुरक्षा उपाय

ऑक्टोबर 4, 2016 रोजीच्या नाणेविषयक धोरण निवेदनाच्या परिच्छेद 15 मध्ये सांगण्यात आल्यानुसार, ह्या बँकेने, खजिन्याची ने-आण करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी, चलनाच्या ने-आणीवरील एक समिती स्थापन केली होती (अध्यक्ष : श्री डी के मोहंती, कार्यकारी संचालक). ह्या समितीच्या शिफारशींचे परीक्षण करण्यात आले असून त्यानुसार, एटीएमच्या कारभारातील जोखमी कमी करण्यासाठी व सुरक्षा वाढविण्यासाठी असलेले काही उपाय पुढे दिले आहेत.

(अ) सर्व एटीएममध्ये रोख रक्कम, केवळ डिजिटल वन टाईम काँबिनेशन (ओटीसी) कुलुपांद्वारे ऑपरेट केली जातील.

(ब) विमानतळ इत्यादीसारख्या अतिसुरक्षित असलेल्या, व सुयोग्य सीसीटीव्ही योजना असलेल्या व राज्य/केंद्र सरकारचे सुरक्षा रक्षक असलेल्या जागा सोडल्यास, सप्टेंबर 30, 2019 पर्यंत, सर्व एटीएम, एखाद्या पक्क्या बांधकामाशी (भिंत, खांब, जमीन इत्यादि) पक्के जोडले (ग्राउटेड) जातील.

(क) वेळेवारी सावधानतेचा इशारा देण्यासाठी व जलद प्रतिसादासाठी, एखादी सर्वसमावेशक ई-सर्व्हिलन्स यंत्रणा एटीएममध्ये ठेवण्याचा विचार बँका करु शकतात.

(2) भारतीय रिझर्व बँक व कायद्यांची अंमलबजावणी करणा-या एजन्सीजने दिलेल्या विद्यमान सूचना, कार्यरीती व मार्गदर्शन ह्यांच्या व्यतिरिक्त वरील उपायांची अंमलबजावणी केली जाईल. कालमर्यादांचे उल्लंघन/अनुपालन न करणे, केले गेल्यास दंडासह विनियामक कारवाई केली जाईल.

आपला,

(अजय मिचयारी)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä