Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (354.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 02/03/2017
एफएलसी (वित्तीय साक्षरता केंद्रे) आणि ग्रामीण शाखांकडून वित्तीय साक्षरता - धोरणाचा आढावा

आरबीआय/2016-17/236
एफआयडीडी.एफएलसी.बीसी.क्र.22/12.01.018/2016-17

मार्च 2, 2017

अध्यक्ष/एमडी/सीईओ,
अनुसूचित वाणिज्य बँका,
(आरआरबींसह)

महोदय/महोदया,

एफएलसी (वित्तीय साक्षरता केंद्रे) आणि ग्रामीण शाखांकडून वित्तीय साक्षरता - धोरणाचा आढावा

कृपया, एफएलसी व ग्रामीण शाखांसाठी मार्गदर्शक तत्वांवरील आमचे परिपत्रक एफआयडीडी. एफएलसी. बीसी.क्र. 18/12.01.018/2015-16 दि. जानेवारी 14, 2016 चा संदर्भ घ्यावा. ह्या परिपत्रकानुसार, एफएलसी व शाखा ह्यांना दोन प्रकारची शिबिरे चालविण्यास सांगण्यात आले होते - म्हणजे, वित्तीय प्रणालींमध्ये नव्यानेच प्रवेश केलेल्या नवीन लोकांसाठी, एक वर्षासाठी (प्रति महिना 1 शिबिर); असलेली विशेष शिबिरे; आणि साध्य करावयाच्या गटांपैकी (म्हणजे, शेतकरी, छोटे उद्योजक, शाळेतील मुले, ज्येष्ठ नागरिक आणि एसएचजी) प्रत्येकी एका गटासाठीच घेतलेली विशेष शिबिरे वित्तीय प्रणालीमध्ये नव्यानेच प्रवेश केलेल्या लोकांसाठीची विशेष शिबिरे, जानेवारी 2017 मध्ये समाप्त झाली आहेत.

(2) विहित बँक नोटांचे वैध चलन असण्याचे काढून टाकणे आणि डिजिटल व्यवहार करण्यावर देण्यात येणारे लक्ष विचारात घेऊन, एफएलसींकडून व बँकांच्या ग्रामीण शाखांकडून आयोजित करण्यात येत असलेल्या शिबिरांवरील धोरण पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात आले आहे.

वित्तीय साक्षरता केंद्रे (एफएलसी) - युपीआय व *99# (युएसएसडी) मार्फत डिजिटल व्यवहार वर, एप्रिल 1, 2017 पासून एक वर्षासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यासाठी एफएलसींना सांगण्यात येत आहे. प्रशिक्षक व सहभागी स्त्रोते ह्यांचेसाठी दोन पोस्टर्स (एक युपीआय वर व एक *99# वर) तयार करण्यात आली आहेत. ह्या दोन पोस्टरांच्या इंग्रजी, हिंदी व स्थानिक भाषांमधील आवृत्त्या, डाऊनलोड करुन छापण्यासाठी ह्या बँकेच्या फायनान्शियल एज्युकेशन वेबपेजवर टाकण्यात आल्या आहेत. ह्या शिबिरात ए2 व ए3 आकारातील पोस्टर्स ही प्रशिक्षकांसाठी, तर ए4 व ए5 आकारातील पोस्टर्स सर्वसाधारण जनतेसाठी असतील.

डिजिटल व्यवहार करण्याबाबत असलेल्या विशेष शिबिरांव्यतिरिक्त, परिपत्रक दि. जानेवारी 14, 2016 मध्ये विहिते केल्यानुसार निरनिराळ्या साध्य गटांसाठी खास घेतलेली शिबिरेही एफएलसींनी आयोजित करावीत. प्रत्येक साध्य-गटासाठी खास तयार केलेला मजकुर/कंटेंट सध्या तयार केला जात असून, पुढील काही कालावधीत तो बँकांना/एफएलसींना दिला जाईल. एफएलसींनी ठेवावयाचा प्रायोजित दृष्टिकोन, आणि विशेष शिबिरे चालविण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे, जोडपत्र 1 मध्ये दिली आहेत.

बँकांच्या ग्रामीण शाखा - बँकांच्या ग्रामीण शाखांनी, ह्यापुढे, प्रत्येक महिन्यात एक शिबिरच चालविणे आवश्यक आहे (प्रत्येक महिन्याच्या तिस-या शुक्रवारी, बँकेचे कामकाज संपल्यावर). ह्या शिबिरामध्ये, वित्तीय जाणीव संदेश (एफएएमई) पुस्तिका आणि युपीआय व *99#(युएसएसडी) हे दोन डिजिटल मंच ह्यांचा भाग असलेले सर्व संदेश समाविष्ट केले जातील. ग्रामीण बँकांनी ठेवावयाचा प्रायोजित दृष्टिकोन जोडपत्र 1 मध्ये दिला आहे. एखाद्या खेड्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक शाखा असल्यास, एलडीएमने खात्री करुन घ्यावी की, त्या ग्रामीण शाखा, दर महिन्याला, चक्रगतीनुसार (रोटेशन) शिबिरे चालवीत आहेत.

एफआयएफकडून निधी स्वाथ्य :- वित्तीय साक्षरता शिबिरांसाठी, एफएलसी व बँकांच्या ग्रामीण शाखा, त्या शिबिराच्या एकूण खर्चाच्या 60% पर्यंत खर्चाचे (रु.15,000/- प्रति शिबिर कमाल मर्यादा) निधी सहाय्य मिळविण्यास पात्र आहेत. निधीसहाय्यबाबतच्या तपशीलासाठी, कृपया, नाबार्डने दिलेले परिपत्रक 240/डीएफआयबीटी-33/2015दि. नोव्हेंबर 13, 2015 चा संदर्भ घ्यावा.

अहवाल यंत्रणा :- परिपत्रक एफआयडीडी.एफएलसी.बीसी.क्र.12/12.01.018/2016-17 दि. ऑगस्ट 25, 2016 अन्वये विहित केलेले अहवाल नमुने सुधारित करण्यात आले असून, सुधारित अहवाल नमुने, एफएलसींसाठी जोडपत्र 2 (भाग अ, ब, व क) प्रमाणे आणि ग्रामीण शाखांसाठी जोडपत्र 3 प्रमाणे आहेत. एफएलसीवरील तिमाही अहवाल (जोडपत्र 2), एसएलबीसी/युटीएलबीसींकडून, ती तिमाही संपल्याच्या 20 दिवसांच्या आत आरबीआयच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाकडे सादर केला जाईल आणि ग्रामीण शाखांवरील तिमाही अहवाल (जोडपत्र 3), ती तिमाही संपल्याच्या 30 दिवसांच्या आत सादर केला जाईल.

वरील मार्गदर्शक तत्वे एप्रिल 1, 2017 पासून जारी होतील, आणि सुधारित अहवाल-नमुने, जून 30, 2017 रोजी संपणा-या तिमाही पासून जारी होतील. मार्च 2017 रोजी संपणा-या तिमाहीसाठीचे तिमाही अहवाल, परिपत्रक एफआयडीडी.एफएलसी.बीसी.क्र.12/12.01.018/2016-17 दि. ऑगस्ट 25, 2016 मध्ये विहित केलेल्या नमुन्यात सादर केले जावेत.

वित्तीय साक्षरता शिबिरांच्या प्रभावाचे मूल्यांकन/मूल्यमापन, भारतीय रिझर्व बँकेच्या लीड जिल्हा अधिका-यांकडून (एलडीओ) सातत्याने केले जाईल.

आपली विश्वासु,

(उमा शंकर)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक.

सोबत - वरीलप्रमाणे

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä