Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (153.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 20/10/2016
सार्वभौम सुवर्ण रोखे, 2016-17 - मालिका 3

आरबीआय/2016-17/98
आयडीएमडी.सीडीडी.क्र.893/14.04.050/2016-17

ऑक्टोबर 20, 2016

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबी सोडून),
नेमलेली पोस्ट ऑफिसे,
स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसएचसीआयएल),
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. व बाँबे स्टॉक एक्सचेंज

महोदय/महोदया,

सार्वभौम सुवर्ण रोखे, 2016-17 - मालिका 3

भारत सरकारने ह्याची अधिसूचना एफ क्र.4(16)-ड्ब्ल्यु अँड ड्ब्ल्यु/2016, दि. ऑक्टोबर 20, 2016 अन्वये घोषित केले आहे की, सार्वभौम सुवर्ण रोखे 2016-17 - मालिका 3 (हे रोखे), ऑक्टोबर 24, 2016 ते नोव्हेंबर 2, 2016 पर्यंत वर्गणीसाठी खुले असतील. भारत सरकार पूर्व सूचना देऊन, ही योजना, विहित केलेल्या कालावधीपूर्वीच बंद करु शकते. हे रोखे देण्याच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे असतील.

(1) गुंतवणुकीसाठी पात्रता

ह्या योजनेखालील हे रोखे, भारतात निवासी असलेली एक व्यक्ती म्हणून असलेल्या व्यक्तीद्वारे किंवा अल्पवयीन मुलाच्या वतीने किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीबरोबर संयुक्तपणे धारण केले जाऊ शकतात. हे रोखे एखादा ट्रस्ट, धर्मादाय संस्था व विश्वविद्यालय ह्यांच्याद्वारेही धारण केले जाऊ शकतात. ‘भारतात निवासी असलेली व्यक्ती’ ची व्याख्या, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 च्या कलम 2 (यु) सह वाचित कलम 2 (व्ही) खाली करण्यात आली आहे.

(2) प्रतिभूतीचे स्वरुप

हे रोखे, सरकारी प्रतिभूती अधिनियम, 2006 च्या कलम 3 नुसार भारत सरकारच्या स्टॉकच्या स्वरुपात दिले जातील. निवेशकांना एक धारण-प्रमाणपत्र (फॉर्म क) दिले जाईल. हे रोखे, डि-मॅट स्वरुपात परिवर्तन करण्यास पात्र असतील.

(3) देण्याची तारीख

नोव्हेंबर 17, 2016 ही देण्याची तारीख असेल.

(4) मूल्य

ह्या रोख्यांचे मूल्य एक ग्राम सोन्याचे एकक व त्याच्या पटीत असेल. ह्या रोख्यामधील किमान गुंतवणुक एक ग्राम व वर्गणीची कमाल मर्यादा, प्रति व्यक्ती, प्रति आर्थिक वर्ष (एप्रिल-मार्च) 500 ग्राम असेल.

(5) देण्याचे मूल्य/किंमत

ह्या रोख्यांची नाममात्र किंमत/मूल्य, वर्गणी-कालावधी आधीच्या सप्ताहात, इंडियन बुलियन अँड ज्युवेलर्स असोशिएशन लि. ह्यांनी, त्या सप्ताहासाठी (सोमवार ते शुक्रवार) 999 शुध्दतेच्या सोन्यासाठीच्या बंद किंमतीच्या साध्या सरासरीवर आधारित, भारतीय रुपयात ठरविले जाईल. देण्याचे मूल्य नाममात्र मूल्यापेक्षा प्रति ग्राम रु.50 ने कमी असेल.

(6) व्याज

ह्या रोख्यांवर त्यांच्या नाममात्र मूल्यावर दरसाल 2.50 टक्के (स्थिर दर) दराने व्याज मिळेल. हे व्याज सहामाही आवधासाने दिले जाईल आणि शेवटचे व्याज परिपक्व झाल्यावर मुद्दलासह दिले जाईल.

(7) स्वीकारकर्ती कार्यालये

ह्या रोख्यांकरिता थेट किंवा एजंटांमार्फत अर्ज स्वीकारल्यास, अधिसूचित वाणिज्य बँका, (आरआरबी सोडून), नेमलेली पोस्ट ऑफिसे, (अधिसूचित केल्यानुसार), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (एसएचआयएल) आणि मान्यता/ओळखप्राप्त स्टॉक एक्सचेंजेस (उदा. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. व बाँबे स्टॉक एक्सचेंज) ह्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

(8) प्रदान पर्याय

रोख रकमेत (रु.20,000/- पर्यंत) किंवा डिमांड ड्राफ्ट किंवा चेक्स किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंगने भारतीय रुपयांच्या स्वरुपात प्रदाने स्वीकारली जातील. जेथे चेक्स किंवा डिमांड ड्राफ्ट्सने प्रदान करण्यात आले आहे तेथे, ते संलेख स्वीकारर्कत्या कार्यालयाच्या नावे काढले जावेत.

(9) विमोचन

(1) नोव्हेंबर 17, 2016 ह्या सुवर्ण रोखे देण्याच्या तारखेपासून आठ वर्षे पूर्ण झाल्यावर ह्या रोख्यांचे पुनर् प्रदान केले जाईल. ह्या रोख्यांचे मुदतपूर्व विमोचन, ते दिल्या गेल्याच्या तारखेच्या पाचव्या वर्षानंतर व व्याज प्रदानाच्या तारखेस करण्याची परवानगी आहे.

(2) विमोचनाची किंमत/मूल्य, आयबीजेएने प्रसिध्द केलेल्या मागील आठवड्यातील (सोमवार ते शुक्रवार), 999 शुध्दतेच्या सोन्याच्या बंद किंमतीच्या साध्या सरासरीवर आधारित ठरविली जाईल.

(3) सुवर्ण रोखा परिपक्व होण्याच्या एक महिना आधी, स्वीकारकर्ते कार्यालय गुंतवणुकदाराला, परिपक्वतेची तारीख कळवील.

(10) पुनर् प्रदान

सुवर्ण रोखा परिपक्व होण्याच्या एक महिना आधी, स्वीकारकर्ते कार्यालय गुंतवणुकदाराला, परिपक्वतेची तारीख कळवील.

(11) वैधानिक तरलता गुणोतरांसाठी (एसएलआर) पात्रता

ह्या रोख्यांमधील गुंतवणुक एसएलआरसाठी पात्र असेल.

(12) रोख्यांविरुध्द कर्ज

हे रोखे कर्जासाठी तारण/गहाणवट म्हणून वापरले जाऊ शकतात. ह्यासाठीचे कर्ज-मूल्य गुणोत्तर, आरबीआयने वेळोवेळी अपरिहार्य केलेल्या, सर्वसामान्य सुवर्ण-कर्जासाठी लागु असल्याप्रमाणेच असेल. ह्या रोख्यांवरील लिएन, प्राधिकृत बँकांद्वारे डिपॉझिटरीमध्ये मार्क केले जाईल.

(13) कराबाबत वागणुक

आय कर अधिनियम 1961 च्या तरतुदीनुसार ह्या रोख्यांवरील उत्पन्न करपात्र असेल. ह्या एसजीबीचे विमोचन केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला लागु असलेला भांडवली लाभ कर माफ करण्यात आला आहे. हे रोखे हस्तांतरित केल्यामुळे निर्माण झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यांसाठी, इंडेक्सशेन लाभ दिले जातील.

(14) अर्ज

ह्या रोख्यांबाबतच्या वर्गणीसाठीचे अर्ज, विहित अर्ज नमुन्यात (फॉर्म अ) किंवा त्याच्या शक्य तेवढ्या जवळपास असलेल्या इतर कोणत्याही स्वरुपात, किती ग्राम सुवर्ण व अर्जदाराचे नाव व पत्ता स्पष्टपणे लिहून केले जाऊ शकतात. स्वीकारकर्ते कार्यालय, अर्जदाराला, फॉर्म ब मध्ये पावती देईल.

(15) नामनिर्देशन

सरकारी प्रतिभूती अधिनियम, 2006 (2006 चा 38) आणि भारतीय राजपत्र दि. डिसेंबर 1, 2007 च्या विभाग 3, कलम 4 मध्ये प्रसिध्द केलेल्या सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या तरतुदीनुसार, नामनिर्देशन व त्याचे रद्दीकरण हे, अनुक्रमे फॉर्म ड व फॉर्म ई मध्ये केले जाईल.

(16) हस्तांतरणियता

सरकारी प्रतिभूती अधिनियम, 2006 (2006 चा 38) आणि भारतीय राजपत्र दि. 1 डिसेंबर 2007 च्या विभाग 3, कलम 4 मध्ये प्रसिध्द केलेल्या सरकारी प्रतिभूती विनियम 2007 ह्यांच्या तरतुदीनुसार, हे रोखे, फॉर्म फ मध्ये दिलेला हस्तांतरण संलेख देऊन हस्तांतरणीय असतील.

(17) ह्या रोख्यांची ट्रेडिंग-क्षमता

भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केलेल्या तारखेस हे रोखे ट्रेडिंग करण्यासाठी पात्र असतील.

(18) वितरणासाठी दलाली

स्वीकारर्कत्या कार्यालयांना मिळालेल्या अर्जावरील एकूण वर्गणीच्या प्रति शंभरासाठी रु. एक ह्या दराने वितरणासाठीची दलाली दिली जाईल आणि एजंट्स किंवा सब एजंट्स ह्यांनी आणलेल्या व्यवसायासाठी, त्यांच्याबरोबर ह्या दलालीच्या किमान 50% शेअर करतील.

(19) भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या (आर्थिक बाबी विभाग) क्र. एफ क्र.4(13) ड्ब्ल्यु अँड ड्ब्ल्यु/2008, दि. ऑक्टोबर 8, 2008 च्या अधिसूचनेत विहित केलेल्या इतर सर्व अटी व शर्ती, ह्या रोख्यांसाठी लागु असतील.

(20) सार्वभौम सुवर्ण रोखे 2016-17 - मालिका 3 संबंधित कार्यकारी मार्गदर्शक तत्वे, परिपत्रक आयडीएमडी .सीडीडी.क्र.894/14.04.050/2016-17. मध्ये देण्यात आली आहेत.

आपला विश्वासु,

(राजेंद्र कुमार)
महाव्यवस्थापक

सोबत : वरील प्रमाणे

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä