Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 24/06/2021
भारतामधील म्युच्युअल फंड (एमएफ) अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांची (एएमसी) विदेशी दायित्वे व अॅसेट्स ह्यावरील सर्वेक्षण

सर्वसाधारण सूचना

भारतामधील निवासी म्युच्युअल फंड (एमएफ) व अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांची (एएमसी) विदेशी दायित्वे व अॅसेट्स (एफएल 9) वरील रिझर्व्ह बँकेने दरसाल केलेल्या सर्वेक्षणात, म्युच्युअल फंड कंपन्या व अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांकडून, अगदी अलिकडील वित्तीय वर्षाच्या (एफआय) मार्च अखेरीस असल्याप्रमाणे, त्यांच्या बाह्य वित्तीय जबाबदा-या/दायित्वे व अॅसेट्स वरील माहिती गोळा केली जाते. ह्या सर्वेक्षणातून गोळा केलेल्या माहितीचा उपयोग, भारताचा जमाखर्चाचा ताळेबंद (बीओपी), आंतरराष्ट्रीय गुंतवणुक स्थिती (आयआयपी) आणि इतर बाह्य क्षेत्र संबंधित आकडेवारी तयार करण्यास केला जातो. ही आकडेवारी, धक्का सहन करण्यासाठीची आपली तुलनात्मक शक्ती प्रकट करते आणि त्याचबरोबर, जगातील इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत, आंतरराष्ट्रीय निवेशकांच्या भारतामधील व्यवसाय-विश्वासाच्या दर्जाचे एक स्पष्ट चित्र दर्शविते.

गोपनीयतेचा खंड :- रिझर्व्ह बँक केवळ एकूण/एकंदरीत स्तरावर ह्या सर्वेक्षणाचे परिणाम/निष्कर्ष वितरित करील आणि ह्या शेड्युलमध्ये दिलेली संस्थानिहाय माहिती गोपनीय ठेवील.

सूचना :- प्रतिवादी कंपन्या ह्यांनी र्सव्हे शेड्युल, आरबीआयच्या वेबसाईटवर व वृत्तपत्र निवेदनात दिलेल्या एक्सेल फॉरमॅटमध्ये (*.xls) भरावे. र्सव्हे शेड्युल भरण्यापूर्वी सूचना पत्र (र्सव्हे शेड्युल मध्ये उपलब्ध) संपूर्णतः वाचावे अशी आपणास विनंती करण्यात येत आहे.

महत्त्वाचे मुद्दे :- प्रतिवादी कंपन्या/एलएलपी/मालकी कंपन्या ह्यांनी खाली दिलेले मुद्दे वाचावेत :-

(1) कोणतेही मॅक्रोज नसलेल्या .xls फॉरमॅट मध्ये असलेल्या अगदी अलिकडील र्सव्हे शेड्युलचा उपयोग कंपनीने करावा.

(2) हे र्सव्हे शेड्युल केवळ एक्सेल 97-2003 वर्कबुकमध्ये, म्हणजे .xls फॉरमॅट मध्येच कंपनीने सेव्ह करणे आवश्यक आहे.

(3) र्सव्हे शेड्युल .xls फॉरमॅट मध्ये सेव्ह करण्यासाठी पुढील पाय-यांचे अनुसरण करावे.

(अ) Office Button / File → Save As → Save As type येथे पोहोचा

(ब) “Excel 97-2003 Workbook” सिलेक्ट करा आणि सर्व्हे शेड्युल .xls फॉरमॅट मध्ये सेव्ह करा.

(4) त्या कंपनीने, आरबीआयने दिलेल्या, .xls फॉरमॅट ह्या र्सव्हे शेड्युलचा वापर केलाच पाहिजे आणि ते सादर करतेवेळी त्या र्सव्हे शेड्युलमध्ये कोणतेही मॅक्रो न टाकण्याची विनंती करण्यात येत आहे.

(5) कृपया नोंद घ्यावी की अन्य कोणत्याही नमुन्यात (.xls फॉरमॅट सोडून अन्य) सादर केलेले र्सव्हे शेड्युल प्रणालीकडून आपोआपच फेटाळले जाईल.

(6) र्सव्हे शेड्युलमध्ये देण्यात आलेली माहिती संपूर्ण असावी व कोणतीही माहिती गाळण्यात आलेली नसावी.

(7) विभाग 1 ते 2 भरल्यानंतर, कंपनीने घोषणापत्र भरावयाचे आहे. कंपनीने दिलेली/भरलेली माहिती आरबीआयला सादर करण्यापूर्वी दोनदा तपासली जाण्यास व वैध करण्यास ह्या घोषणापत्राचे सहाय्य होते. ह्यामुळे डेटा एंट्रीच्या चुका, डेटा गाळला जाणे ह्यासारख्या चुका टाळण्यास मदत होते.

(1) आरबीआय, एमएफ र्सव्हे कोणत्या महिन्यात सुरु करते ?

उत्तर :- भारतामधील, म्युच्युअल फंड (एमएफ) व अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या (एएमसी) ह्यांच्या विदेशी दायित्वे व अॅसेट्स (एफएलए) वरील विद्यमान संदर्भ कालावधीसाठीचा र्सव्हे, आरबीआय जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरु करते.

(2) ह्या सर्वेक्षणाची वारंवारता किती ?

उत्तर :- हे सर्वेक्षण दर वर्षी केले जाते.

(3) ह्या सर्वेक्षणात कोणकोणत्या संस्था भाग घेऊ शकतात ?

उत्तर :- भारतामधील म्युच्युअल फंड (एमएफ) कंपन्या आणि अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या (एएमसी) ह्या सर्वेक्षणात भाग घेऊ शकतात.

(4) एखादी एमएफ कंपनी, एमएफ र्सव्हेचे शेड्युल आरबीआयला कसे सादर करते ?

उत्तर :- आरबीआयने सर्वेक्षण सुरु केल्यानंतर, त्या कंपनीला, एक्सेल फॉरमॅट मधील र्सव्हे शेड्युल (शेड्युल 4) च्या सॉफ्ट कॉपीच्या स्वरुपातील अटॅचमेंटसह एक ई-मेल मिळेल/येईल. तपशील भरण्यासाठी त्या कंपनीने ह्या र्सव्हे शेड्युलचा उपयोग करावा. एक्सेल फॉरमॅट मध्ये (.xls) भरलेला र्सव्हे शेड्युल (शेड्युल 4) ई-मेल ने mf@rbi.org.in कडे पाठविला जावा. ह्या एमएफ र्सव्हे शेड्युल बरोबर इतर कोणतीही अटॅचमेंट पाठविली जाऊ नये.

(5) त्या एमएफ कंपनीला, ई-मेलने र्सव्हे शेड्युलची सॉफ्ट कॉपी न मिळाल्यास काय ?

उत्तर :- त्या एमएफ कंपनीला शेड्युल 4 ची सॉफ्ट कॉपी न मिळाल्यास, ती कंपनी, आरबीआयच्या www.rbi.org.inFormsSurvey वेबसाईटवरुन ती डाऊनलोड करु शकते किंवा mfquery@rbi.org.in ह्या ई-मेलवर विनंती पाठवू शकते.

(6) एमएफ र्सव्हे सादर करण्याची कालरेषा कोणती ?

उत्तर :- म्युच्युअल फंड कंपन्या, त्यांचे प्रतिसाद, शेड्युल 4 (एक्सेल फॉरमॅट) मार्फत, दर वर्षीच्या जुलै 31 पूर्वी (र्सव्हे सुरु केल्याच्या एक महिन्याच्या आत) सादर करु शकतात.

(7) अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांकडून (एएमसी) एमएफ र्सव्हे सादर करण्यासाठीची कालरेषा कोणती ?

उत्तर :- अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी (एएमसी), विदेशी दायित्वे व अॅसेट्स (एफएलए) वरील त्यांचा वार्षिक रिटर्न, न्न् हा अॅड्रेस असलेल्या वेब-आधारित ‘https://flair.rbi.org.in’ ह्या पोर्टलद्वारा जुलै 31 पर्यंत (र्सव्हे सुरु केल्याच्या 1 महिन्याच्या आत) सादर करणे आवश्यक आहे.

(8) एएमसी आरबीआयला डेटा कसा कळवितात व एफएलए रिटर्न कसा सादर करतात ?

उत्तर :- विदेशी थेट गुंतवणुक प्राप्त झालेल्या/विदेशात थेट गुंतवणुक केली असलेल्या सर्व भारतीय कंपन्यांसाठी, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम (फेमा) 1999 खाली (आरबीआय परिपत्रक: आरबीआय/2018-19/226 ए.पी. (डीआयआर सिरीज) परिपत्रक क्र.37 दि. जून 28, 2019 अन्वये), एफएलए वरील वार्षिक अहवाल पाठविणे सक्तीचे/अपरिहार्य आहे. https://flair.rbi.org.in. हा पत्ता असलेल्या वेब आधारित ऑनलाईन पोर्टल मार्फत, संस्था, एफएलए वरील वार्षिक अहवाल सादर करु शकतात.

एफएलए वरील वार्षिक अहवालाचे ऑनलाईन वेब आधारित रिपोर्टिंग करण्यासाठीच्या एफएल करुन सर्व पाय-या युजर मॅन्युअलमध्ये दिल्या आहेत. संस्थांनी पुढील पुस्तिका वाचाव्यात :-

(अ) ‘एलएफए युजर रजिस्ट्रेशन फॉर्म’ वरील युजर मॅन्युअल

(ब) एफएलए रिटर्न भरण्यासाठीच्या पायरी व पायरी निहाय कार्यरीतीसाठी, सर्व विभागांसाठी असलेले, ‘अॅन्युअल रिटर्न ऑन एफ एल ए’ चे रिपोर्टिंग करण्यावरील युजर मॅन्युअल.

(क) एफएलए साठीचे एफएक्यु

(9) एमएफ र्सव्हेसाठीचा संदर्भ कालावधी कोणता ?

उत्तर :- एप्रिल वववव पासून सुरु ते मार्च वववव पर्यंतचे वित्तीय वर्ष (एफवाय)

(10) जर एमएफ कंपनी/एएमसी चे संदर्भ कालावधीमध्ये विदेशी दायित्व व अॅसेट्स नसल्यास त्यांनी ह्या र्सव्हेमध्ये भाग घेण्याची गरज आहे काय ?

उत्तर :- संदर्भ कालावधीत एमएफ कंपनी/एएमसीचे विदेशात दायित्व व अॅसेट्स नसल्यास, त्या कंपनीने, अनुक्रमे, निल र्सव्हे शेड्युल/फ्लेअर पोर्टलवरील ऑनलाईन एफएलए फॉर्म भरणे आवश्यक आहे.

(11) एक्सेल आधारित भरलेले एमएफ र्सव्हे शेड्युल mf@rbi.org.in कडे पाठविल्यानंतर, त्या एमएफ र्सव्हेची प्रणाली निर्मित पोचपावती तुम्हाला मिळेल. ह्याबाबत कोणतीही मेल वेगळ्याने पाठविली जाणार नाही. प्रक्रिया यशस्वी झाल्याची पोचपावती तुम्हाला मिळाली असल्याची खात्री करुन घ्या. त्या पोचपावतीत काही चूक निर्देशित केली असल्यास, ही चूक दुरुस्त करुन तो फॉर्म तुम्ही पुनश्च सादर करणे आवश्यक आहे.

(12) सादर करण्यासाठीच्या तारखेपूर्वी कंपनीच्या ताळेबंदाचे ऑडिट झालेले नसल्यास, एमएफ र्सव्हेमध्ये कोणती माहिती कळविली जावी ?

उत्तर :- सादरीकरणाच्या तारखेपूर्वी, म्हणजे 31 जुलै पूर्वी, कंपनीच्या लेखांचे ऑडिट झालेले नसल्यास, ऑडिट न केलेल्या (तात्पुरत्या) लेखेवर आधारित एमएफ र्सव्हे शेड्युल सादर केले जावे.

(13) एमएफ कंपनी/एएमसीचा लेखा बंद कालावधी संदर्भ कालावधीपेक्षा (मार्च अखेर) निराळा असल्यास लेखा बंद कालावधीनुसार माहिती कळवू शकतो काय ?

उत्तर :- नाही. संदर्भ कालावधीपेक्षा (मार्च अखेर) वेगळा असल्यास, तिच्या लेखा बंद कालावधीनुसार ती कंपनी माहिती कळवू शकत नाही. केवळ संदर्भ कालावधीसाठीचीच माहिती, म्हणजे मागील मार्च व अलिकडील मार्च, कंपनीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर दिली जावी.

(14) र्सव्हे शेड्युल (शेड्युल 4) भरण्यापूर्वी एमएफ कंपन्यांनी कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंद घ्यावी ?

उत्तर :- र्सव्हे शेड्युल भरण्यापूर्वी एमएफ कंपन्यांनी खालील बाबतीत खात्री करुन घ्यावी.

(1) कंपनीने, .xls फॉरमॅटमधील व कोणतेही मॅक्रोज् नसलेल्या अद्यावत र्सव्हे शेड्युलचा वापर करावा.

(2) कंपनीने ते र्सव्हे शेड्युल केवळ Excel 97-2003 वर्कबुक मध्येच म्हणजे .xls फॉरमॅट मध्येच सेव्ह करणे आवश्यक आहे.

(3) .xls फॉरमॅटमध्ये र्सव्हे शेड्युल सेव्ह करण्यास खालील पाय-या अनुसरायात :-

(अ) Office Button / File → Save As → Save As type येथे पोहोचा

(ब) “Excel 97-2003 Workbook” सिलेक्ट करा आणि सर्व्हे शेड्युल .xls फॉरमॅट मध्ये सेव्ह करा.

(4) कंपनीने केवळ आरबीआयने दिलेल्या र्सव्हे शेड्युलच्या .xls फॉरमॅटचा उपयोग करावा आणि ते सादर करतेवेळी त्या र्सव्हे शेड्युलमध्ये कोणतेही मॅक्रो समाविष्ट करु नयेत.

(5) कृपया नोंद घ्यावी की, अन्य कोणत्याही फॉरमॅटमध्ये (.xls फॉरमॅट सोडून अन्य) सादर केलेले र्सव्हे शेड्युल प्रणालीकडून आपोआप फेटाळले जाईल. ते एमएफ शेड्युल एक्सेल 07-2003 वर्कबुक मध्ये (.xls फॉरमॅट) सेव्ह करणे आवश्यक आहे.

(6) र्सव्हे शेड्युल भरण्यापूर्वी एमएफ कंपनीने सूचना पत्रक संपूर्णपणे वाचणे आवश्यक आहे.

(15) आरबीआयला र्सव्हे शेड्युल सादर करण्यापूर्वी, एमएफ कंपन्यांनी खात्री करुन घेण्याचे व पडताळणी करावयाचे इतर महत्त्वाए मुद्दे कोणते ?

उत्तर :- एमएफ कंपन्यांनी पुढीलबाबत खात्री करुन घ्यावी.

(1) र्सव्हे शेड्युलमध्ये दिलेली सर्व माहिती संपूर्ण असून कोणतीही माहिती गाळण्यात आलेली नाही.

(2) विभाग 1 व विभाग 2 भरल्यानंतर, कंपनीने घोषणापत्रक भरावयाचे आहे. ह्या घोषणापत्रकामुळे, कंपनीने भरलेली माहिती, ती आरबीआयला सादर करण्यापूर्वी दोन वेळा तपासली जाऊन तिला दुजोरा मिळतो. ह्यामुळे डेटा एंट्रीमधील चुका, माहिती गाळली जाणे टाळण्यास मदत होईल.

(16) घातक असलेल्या (फेटल) व घातक नसलेल्या (नॉन फेटल) चुकांची यादी व वर्णन द्यावे

उत्तर :- कृपया एरर कोड्स (फेटल एरर, नॉन फेटल एरर) च्या त्यांच्या वर्णनासह दिलेल्या खालील कोष्टकाचा संदर्भ घ्यावा. तुम्हाला फेटल एरर कोड्स असलेली प्रक्रियाकृत डेटाची पोचपावती मिळाल्यास, खाली दिलेल्या फेटल एरर संदेशाचे/वर्णनाचे अनुसरण करुन त्यानुसार तुमचा डेटा सुधारित करावा.

हा सुधारित डेटा mf@rbi.org.in वर पुनः सादर केला जाऊ शकतो. तुम्हाला प्रक्रियाकृत डेटाची नॉन फेटल एरर कोड्स असलेली पोचपावती मिळाल्यास, निर्देशित केलेल्या चुकांवरील समर्थन/स्पष्टीकरण ई-मेलने mfquery@rbi.org.in कडे पाठवावे. नॉन फेटल एरर वर आधारित माहिती सुधारित करण्याची इच्छा असल्यास, माहिती सुधारित करुन ती mf@rbi.org.in ला पुनः सादर करु शकता.

अनुक्र. निकष एरर कोड वर्णन
फेटल एरर
1 विभाग 1 च्या ब्लॉक 1 च्या बाब 1 (1) मध्ये दिलेले म्युच्युअल फंड कंपनीचे नाव (NULL) नक्त असल्यास. MF_F_003 म्युच्युअल फंड कंपनीचे नाव दिलेले नाही. कृपया विभाग 1 मध्ये म्युच्युअल फंड कंपनीचे नाव द्या.
2 विभाग 1 च्या ब्लॉक 1 च्या बाब 1 (3) मध्ये दिलेले अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे नाव नक्त (NULL) असल्यास. MF_F_004 अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे (एएमसी) नाव दिलेले नाही. कृपया विभाग 1 मध्ये एएमसीचे नाव द्या.
3 म्युच्युअल फंड कंपनीचा सीआयएन क्रमांक रिकामा (ब्लँक) असल्यास किंवा 21 पेक्षा कमी खुणांचा असल्यास. MF_F_006 विभाग 1 मध्ये अवैध असलेला सीआयएन क्रमांक दिला आहे. कृपया खात्री करुन घ्या की कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने दिलेला, अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा योग्य 21 अंकी सीआयएन क्रमांक भरण्यात आला आहे.
4 विभाग 1 च्या ब्लॉक 1 च्या बाब 2 (1) मध्ये दिलेले संपर्क व्यक्तीचे नाव (NULL) असल्यास. MF_F_007 संपर्क व्यक्तीचे नाव दिलेले नाही. कृपया विभाग 1 मध्ये संपर्क व्यक्तीचे नाव द्या.
5 विभाग 1 च्या ब्लॉकच्या बाब 2 (5) मधील संपर्कासाठीचा ई-मेल आयडी (NULL) असल्यास. MF_F_008 संपर्क व्यक्तीचा ई-मेल दिलेला नाही. कृपया विभाग 1 मध्ये संपर्क व्यक्तीचा ई-मेल आयडी द्या.
  नॉन-फेटल एरर
6 कंपनीच्या नावात बदल झाला असून जुन्या कंपनीचे नाव दिले गेले नसल्यास. MF_NF_001 जुन्या कंपनीचे नाव दिलेले नाही. कृपया विभाग 1 मध्ये जुन्या कंपनीचे नाव द्या.
7 कंपनीच्या नावात बदल झाला असून नव्या कंपनीचे नाव दिले गेले नसल्यास. MF_NF_002 नवीन कंपनीचे नाव दिलेले नाही. कृपया विभाग 1 मध्ये नवीन कंपनीचे नाव द्या.
8 कंपनीच्या नावात बदल झाला असून बदलाची परिणामकारक तारीख दिली गेली नसल्यास. MF_NF_003 म्युच्युअल फंड कंपनीच्या नावातील बदलाची परिणामकारक तारीख दिलेली नाही. कृपया विभाग 1 मध्ये त्या कंपनीच्या नावातील बदलाची परिणामकारक तारीख द्या.
9 ब्लॉक 1 मधील, अनिवासी व्यक्तींना दिलेल्या आणि त्यांच्या नावे आऊटस्टँडिंग असलेल्या युनिट्समधील दर्शनी मूल्यातील विचलन (डेव्हिएशन) 10% पेक्षा अधिक असल्यास. (पॅरा)(विचलन ? (चालु वर्षातील दर्शनी मूल्याची एकूण बेरीज वजा मागील वर्षाच्या दर्शनी मूल्याची एकूण बेरीज)* 100/मागील वर्षाच्या दर्शनी मूल्याची एकूण बेरीज MF_NF_004 ब्लॉक 1 :- विद्यमान र्सव्हे वर्षात (2021-21 राऊंड) रिपोर्ट केलेले, व मागील वर्षात (मार्च अखेर 2020) अनिवासी व्यक्तीने धारण केलेल्या युनिट्सचे एकूण दर्शनी मूल्य हे, मागील र्सव्हे वर्षातील (2019-20 राऊंड), विद्यमान वर्षासाठीच्या रिपोर्टिंगला धरुन/जुळणारे नाही.
10 ब्लॉक 1 मधील अनिवासी व्यक्तींना दिलेल्या आणि त्यांच्या नावे आऊटस्टँडिंग असलेल्या युनिट्सचे मार्केट मूल्य विचलन 10% पेक्षा अधिक असल्यास. MF_NF_005 ब्लॉक 1 :- विद्यमान र्सव्हे वर्षात (2021-21 राऊंड) रिपोर्ट केलेले, व मागील वर्षात (मार्च अखेर 2020) अनिवासी व्यक्तीने धारण केलेल्या युनिट्सचे एकूण मार्केट मूल्य हे, मागील र्सव्हे वर्षातील (2019-20 राऊंड), विद्यमान वर्षासाठीच्या रिपोर्टिंगला धरुन/जुळणारे नाही.
11 ब्लॉक 1 मधील अनिवासी व्यक्तींना दिलेल्या आणि त्यांचे नावे आऊटस्टँडिंग असलेल्या युनिट्स मध्ये, मागील व विद्यमान वर्षातील दर्शनी मूल्ये 1000 (रु. लाख मध्ये) असल्यास व विचलन 50% पेक्षा जास्त असल्यास. MF_NF_006 ब्लॉक 1 - अनिवासी व्यक्तींनी धारण केलेल्या युनिट्सच्या दर्शनी मूल्यात मागील वर्ष ते विद्यमान वर्ष ह्यात उच्चतर विचलन आहे.
12 ब्लॉक 1 मधील अनिवासी व्यक्तींना दिलेल्या आणि त्यांचे नावे आऊटस्टँडिंग असलेल्या युनिट्स मध्ये, मागील व विद्यमान वर्षातील मार्केट मूल्ये 1000 (रु. लाख मध्ये) असल्यास व विचलन 50% पेक्षा जास्त असल्यास. MF_NF_007 ब्लॉक 1 - अनिवासी व्यक्तींनी धारण केलेल्या युनिट्सच्या मार्केट मूल्यात मागील वर्ष ते विद्यमान वर्ष ह्यात उच्चतर विचलन आहे.
13 ब्लॉक 1 मधील दर्शनी मूल्यासाठी (स्तंभ 6) मधील अनिवासी व्यक्तींना दिलेल्या व त्यांच्या नावे आऊटस्टँडिंग असलेल्या, विद्यमान वर्षासाठीच्या न्न् (कोणताही विशिष्ट देश नाही) आणि भारतामधील डेटाची बेरीज रु.50,000 लाखांपेक्षा अधिक असून त्याचे एकूण बेरजेमधील प्रमाण 50% पेक्षा अधिक असल्यास. MF_NF_008 अनिवासी व्यक्तींनी धारण केलेल्या युनिट्सच्या दर्शनी मूल्यासाठी, परदेशाच्या नावाऐवजी ‘कोणताही विशिष्ट देश किंवा भारत नाही’ सिलेक्ट करण्यात आले आहे.
14 ब्लॉक 2 - इतर विदेशी दायित्वे मधील विदेशी दायित्वांचे विचलन 10% पेक्षा अधिक असल्यास. MF_NF_009 ब्लॉक 2 - विद्यमान र्सव्हे वर्षात (2021-21 राऊंड) रिपोर्ट केलेले, व मागील वर्षात (मार्च अखेर 2020) इतर विदेशी दायित्वे, मागील र्सव्हे वर्षातील (2019-20 राऊंड), विद्यमान वर्षासाठीच्या रिपोर्टिंगला धरुन/जुळणारे नाही.
15 ब्लॉक 2 - इतर विदेशी दायित्वे मधील मागील व विद्यमान अशा दोन्हीही वर्षांची विदेशी दायित्वे 1000 (रुपये लाख मध्ये) असल्यास. MF_NF_010 ब्लॉक 2 - इतर विदेशी दायित्वांमध्ये मागील वर्ष ते विद्यमान वर्ष ह्या दरम्यान उच्चतर विचलन आहे.
16 ब्लॉक 3 इतर विदेशी अॅसेट्स मधील विदेशी अॅसेट्सचे विचलन 10% पेक्षा जास्त असल्यास. MF_NF_011 ब्लॉक 3 - विद्यमान र्सव्हे वर्षात (2021-21 राऊंड) रिपोर्ट केलेले, व मागील वर्षात (मार्च अखेर 2020) इतर विदेशी अॅसेट्स, मागील र्सव्हे वर्षातील (2019-20 राऊंड), विद्यमान वर्षासाठीच्या रिपोर्टिंगला धरुन/जुळणारे नाही.
17 ब्लॉक 3 इतर विदेशी अॅसेट्स मधील मागील व विद्यमान अशा दोन्हीही वर्षांचे विदेशी अॅसेट्स 1000 (रुपये लाख मध्ये) असून विचलन 50% पेक्षा जास्त असल्यास. MF_NF_012 ब्लॉक 3 - इतर विदेशी अॅसेट्समध्ये मागील वर्ष ते विद्यमान वर्ष ह्या दरम्यान उच्चतर विचलन आहे.
18 खालील सर्व ब्लॉक्सची (ब्लॉक 1 स्तंभ 6 व 8, ब्लॉक 2 स्तंभ 12, ब्लॉक कॉलम 19) बेरीज नक्त किंवा शून्य असल्यास. MF_NF_013 कंपनीने शून्य (निल) माहिती दिली आहे. म्हणजे, त्या कंपनीची कोणतीही विदेशी दायित्वे व अॅसेट्स नाहीत
19 ब्लॉक 1 - अनिवासी व्यक्तींना दिलेले व त्यांचे नावे आऊटस्टँडिंग असलेले युनिट्स मध्ये त्या वर्षासाठी देश उपलब्ध नसल्यास (अनिवासी व्यक्तींसाठीचे युनिट्स) MF_NF_014_B1 ब्लॉक 1 - ब्लॉक 1 मध्ये युनिट धारकाचा निवासी देश दिलेला नाही.
20 ब्लॉक 2 - इतर विदेशी दायित्वे मध्ये देश उपलब्ध नसल्यास (दायित्व प्रकारचा) MF_NF_014_B2 ब्लॉक 2 - अनिवासी व्यक्तीचा (इतर विदेशी दायित्वे) देश ब्लॉक 2 मध्ये दिलेला नाही.
21 ब्लॉक 3 इतर विदेशी अॅसेट्स मध्ये देश उपलब्ध नसल्यास (अॅसेटच्या प्रकारचा) MF_NF_014_B3 ब्लॉक 2 - अनिवासी व्यक्तीचा (इतर विदेशी अॅसेट्स) देश ब्लॉक 2 मध्ये दिलेला नाही
22 ब्लॉक 1 मधील मार्केट मूल्यासाठी (स्तंभ 8)मधील अनिवासी व्यक्तींना दिलेल्या व त्यांच्या नावे आऊटस्टँडिंग असलेल्या, विद्यमान वर्षासाठीच्या XX (कोणताही विशिष्ट देश नाही) आणि भारतामधील डेटाची बेरीज रु.50,000 लाखांपेक्षा अधिक असून त्याचे एकूण बेरजेमधील प्रमाण 50% पेक्षा अधिक असल्यास. MF_NF_015 ब्लॉक 1- अनिवासी व्यक्तींनी धारण केलेल्या युनिट्सच्या मार्केट मूल्यासाठी, परदेशाच्या नावाऐवजी ‘कोणताही विशिष्ट देश किंवा भारत नाही’ सिलेक्ट करण्यात आले आहे.
 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä