Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (349.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 27/08/2026
भारतीय रिझर्व बँकेने जालना डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि., महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

27 ऑगस्ट 2026

भारतीय रिझर्व बँकेने जालना डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि., महाराष्ट्र वर आर्थिक
दंड ठोठावला

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 25 ऑगस्ट 2026 रोजीच्या आदेशाद्वारे जालना डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि., महाराष्ट्र (बँक) वर 'सहकारी बँकांचे क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांचे (CICs) सदस्यत्व' आणि 'आपला ग्राहक जाणून घ्या' (KYC) यासंबंधी आरबीआयने जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹50,000/- (केवळ पन्नास हजार रुपये)) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (रेग्युलेशन) ॲक्ट, 2005 च्या कलम 23(4) सह लागू असलेल्या कलम 25(1)(iii) तसेच बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये आरबीआयला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

31 मार्च 2025 रोजीच्या आर्थिक स्थिती वर आधारित बँकेची वैधानिक तपासणी राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँकेद्वारे (NABARD) केली गेली होती. या तपासणी अहवालातील आरबीआयच्या दिशानिर्देशांचे पालन न केल्याचे पर्यवेक्षी निष्कर्ष आणि त्या संदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये, सदर तरतुदींचे आणि निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल दंड का लावू नये याची कारणे दाखवा, अशी विचारणा करण्यात आली होती. नोटीसला बँकेने दिलेले उत्तर, त्यानंतर सादर केलेले अतिरिक्त निवेदन आणि वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता आरबीआय, इतर गोष्टींबरोबर या निष्कर्षावर पोहोचली की आरबीआयच्या खालील निर्देशाचे पालन न केल्याचे आरोप सिद्ध होतात आणि आर्थिक दंड लावला जाणे आवश्यक आहे.

बँक

  1. कर्जदारांची क्रेडिट माहिती सर्व 'क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यां' सादर करण्यात अयशस्वी ठरली; आणि

  2. खात्यांच्या जोखमीच्या वर्गीकरणाचा कालांतराने पुनरावलोकन करण्यास अयशस्वी ठरली, ज्याचा कालावधी किमान सहा महिन्यांतून एकदा असणे आवश्यक आहे.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यात बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किंवा करारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. तसेच, बँकेविरुद्ध आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईबद्दल पूर्वग्रह न ठेवता हा आर्थिक दंड लावला आहे.

(ब्रिज राज)   
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रसिद्धीपत्रक: 2026-2027/975

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä