23 जुलै 2026
भारतीय रिझर्व बँकेने अरविंद सहकारी बँक मर्यादित, काटोल, महाराष्ट्र वर आर्थिक दंड
ठोठावला
भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) दिनांक 16 जुलै 2026, रोजीच्या आदेशाद्वारे अरविंद सहकारी बँक लि., काटोल, महाराष्ट्र (बँक) वर ‘आवास योजनांसाठी वित्त व्यवस्था-यूसीबीज्' आणि 'ठेवींवरील व्याजदर' यासंबंधी आरबीआयने जारी केलेल्या काही दिशानिर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹11 लाख रुपये (केवळ रुपये अकरा लाख) आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये आरबीआयला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.
31 मार्च 2025 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेची वैधानिक तपासणी आरबीआय द्वारा केली गेली होती. या तपासणी अहवालातील आरबीआयच्या दिशानिर्देशांचे पालन न केल्याचे पर्यवेक्षी निष्कर्ष आणि त्या संदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये, सदर निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल दंड का लावू नये याची कारणे दाखवा, अशी विचारणा करण्यात आली होती. नोटीसला बँकेने दिलेले उत्तर, त्यानंतर सादर केलेले अतिरिक्त निवेदन आणि वैयक्तिक सुनावणीच्या वेळी सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता आरबीआय, इतर गोष्टींबरोबर या निष्कर्षावर पोहोचली की आरबीआयच्या खालील निर्देशांचे पालन न केल्याचे आरोप सिद्ध होतात आणि आर्थिक दंड लावला जाणे आवश्यक आहे.
बँकेने
-
बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डर्स)/ कंत्राटदारांना जमीन अधिग्रहणासाठी कर्ज मंजूर केले; आणि
-
काही अपात्र ठेवीदारांना अतिरिक्त व्याज दिले होते.
ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यात बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किंवा करारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. तसेच, बँकेविरुद्ध आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईबद्दल पूर्वग्रह न ठेवता हा आर्थिक दंड लावला आहे.
(ब्रिज राज)
मुख्य महाप्रबंधक
प्रेस प्रकाशनी: 2026-2027/744 |