Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (260.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 21/05/2026
भारतीय रिजर्व बँकेने एकेजी इन्फिन प्रायव्हेट लिमिटेड वर आर्थिक दंड ठोठावला

21 मे 2026

भारतीय रिजर्व बँकेने एकेजी इन्फिन प्रायव्हेट लिमिटेड वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिजर्व बँकेने 18 मे 2026 रोजीच्या आदेशाद्वारे एकेजी इन्फिन प्रायव्हेट लिमिटेड (कंपनी) वर ‘भागभांडवल किंवा नियंत्रणाचे संपादन’ यावर दिलेल्या काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल 1.80 लाख (केवळ एकलाख ऐंशी हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. आरबीआई कायदा, 1934 च्या कलम 58जी(1)(बी) सह कलम 58बी(5)(एए) अंतर्गत प्रदान केलेल्या भारतीय रिजर्व बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

नवीन गुंतवणूकदारांकडून कंपनीच्या पेड-अप इक्विटी कॅपिटलच्या २६% पेक्षा जास्त शेअरहोल्डिंग / नियंत्रणाच्या अधिग्रहणासाठीच्या पूर्वलक्षी मंजुरीसंदर्भात आरबीआय आणि कंपनी यांच्यातील पत्रव्यवहारातून, आरबीआयच्या निर्देशांचे पालन न झाल्याचे उघड झाले. त्याच आधारावर, कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का लावला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती. कंपनीने नोटिशीला दिलेले उत्तर आणि वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेले तोंडी सादरीकरण यांचा विचार केल्यानंतर, भारतीय रिजर्व बँकेला, आढळले की, कंपनीविरुद्ध पुढील आरोप कायम आहे, ज्यामुळे कंपनीवर आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे.

कंपनीला तिच्या पेड-अप इक्विटी कॅपिटलच्या २६ टक्क्यांपेक्षा जास्त शेअरहोल्डिंगमध्ये बदल करण्यासाठी आरबीआयची पूर्व लेखी परवानगी मिळवण्यात अपयश आले होते.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे कंपनीने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. याशिवाय, हा आर्थिक दंड लादणे हे कंपनीच्या विरोधात आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईचा पूर्वग्रह न ठेवता आहे.

(ब्रिज राज)   
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2026-2027/304

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä