Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (397.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 27/05/2026
भारतीय रिजर्व बँकेने श्री लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड, पुणे (बँक) वर आर्थिक दंड ठोठावला

27 मई 2026

भारतीय रिजर्व बँकेने श्री लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड, पुणे (बँक) वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 22 मई 2026 रोजीच्या एका आदेशाद्वारे श्री लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड, पुणे (बँक) यावर काही RBI ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याबद्दल २ लाख (फक्त दोन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे, ज्यामध्ये ‘तुमच्या ग्राहकांना जाणून घ्या’ (केवायसी)'; 'ठेवी खाते देखभाल – प्राथमिक (शहरी) सहकारी बँका' आणि बँकांमधील निष्क्रिय खाती / दावा न केलेल्या ठेवी – सुधारित सूचना' यांचा समावेश आहे. बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अंतर्गत प्रदान केलेल्या भारतीय रिजर्व बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतीय रिजर्व बँकेद्वारे, बँकेची 31 मार्च 2025 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात वैधानिक तपासणी करण्यात आली होती. आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याच्या पर्यवेक्षी निष्कर्ष आणि त्या संदर्भात संबंधित पत्रव्यवहार यांवर आधारित, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का लावला जाऊ नये याची कारणे दाखवा, अशी विचारणा करण्यात आली होती. नोटिशीला बँकेने दिलेल्या उत्तराचा विचार केल्यानंतर, भारतीय रिजर्व बँकेला, आढळले की, बँकेविरुद्ध पुढील आरोप कायम आहे, ज्यामुळे बँकेवर आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे.

बँक:

i) खात्यांच्या जोखमीच्या वर्गीकरणाचा कालांतराने पुनरावलोकन करण्यास अपयशी ठरली, ज्याचा कालावधी किमान सहा महिन्यांतून एकदा असणे आवश्यक आहे;

ii) ग्राहकांच्या KYC नोंदी ‘केंद्रीय नो योर कस्टमर रजिस्ट्रेशन' (CKYCR) मध्ये निर्दिष्ट वेळेत अपलोड करण्यात अपयशी ठरली;

iii) खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल, ग्राहकांना सूचना न देता, दंड आकारत होती, आणि

iv) जिथे एक वर्षाहून जास्त काळ ग्राहकांद्वारे कोणतेही व्यवहार झाले नव्हते, अशा खात्यांचे वार्षिक पुनरावलोकन करण्यात अपयशी ठरली.

ही कारवाई नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि बँकेने आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहार किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. याशिवाय, हा आर्थिक दंड लादणे हे बँकेच्या विरोधात आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईचा पूर्वग्रह न ठेवता आहे.

(ब्रिज राज)   
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2026-2027/337

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä