Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (210.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 23/04/2026
भारतीय रिझर्व बँकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक लिमिटेड, औरंगाबाद, वर आर्थिक दंड ठोठावला

23 एप्रिल 2026

भारतीय रिझर्व बँकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक लिमिटेड, औरंगाबाद, वर
आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) दिनांक 17 एप्रिल 2026, रोजीच्या आदेशाद्वारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक लिमिटेड, औरंगाबाद, (बँक) वर, 'एक्सपोजर नॉर्म्स आणि वैधानिक/ इतर निर्बंध – युसीबीज (UCBs)’ वर आरबीआयने जारी केलेल्या काही निर्देशांचे व ‘पर्यवेक्षकीय कृती चौकट (SAF)’ या अंतर्गत जारी केलेल्या कार्यान्वयन सूचनांचे पालन न केल्याबद्दल 80,000 (केवळ ऐंशी हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये आरबीआयला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

31 मार्च 2025 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेची वैधानिक तपासणी आरबीआयद्वारे केली गेली होती. या तपासणी अहवालातील आरबीआयच्या दिशानिर्देशां चे पालन न केल्याचे पर्यवेक्षी निष्कर्ष आणि त्या संदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये, सदर तरतुदींचे आणि निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल दंड का लावू नये याची कारणे दाखवा, अशी विचारणा करण्यात आली होती. नोटीसला बँकेने दिलेले उत्तर, त्यानंतर सादर केलेले अतिरिक्त निवेदन आणि वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता आरबीआय, इतर गोष्टींबरोबर या निष्कर्षावर पोहोचली की आरबीआयच्या खालील निर्देशाचे पालन न केल्याचे आरोप सिद्ध होतात आणि आर्थिक दंड लावला जाणे आवश्यक आहे.

  1. बँक काही विशिष्ट कर्जांवरील विहित नियामक मर्यादेचे पालन करण्यात अयशस्वी ठरली.

  2. बँकेने, पर्यवेक्षकीय कृती चौकटी (SAF) अंतर्गत जारी केलेल्या निर्देशांचे पालन न करता, काही विशिष्ट ठेवींवर भारतीय स्टेट बँकेने देऊ केलेल्या दरांपेक्षा जास्त व्याजदर देऊ केले.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यात बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किंवा करारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. तसेच, बँकेविरुद्ध आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईबद्दल पूर्वग्रह न ठेवता हा आर्थिक दंड लावला आहे.

(ब्रिज राज)   
मुख्य महा प्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2026–2027/132

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä