Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (269.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 23/04/2026
भारतीय रिजर्व बँकेने एबिक्स पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, वर आर्थिक दंड ठोठावला

23 एप्रिल 2026

भारतीय रिजर्व बँकेने एबिक्स पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिजर्व बँकेने 17 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशाद्वारे एबिक्स पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (कंपनी) वर ‘तुमच्या ग्राहकांना जाणून घ्या (केवायसी)’ यावर दिलेल्या काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल 80,000/- (केवळ ऐंशी हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ॲक्ट, 2007 च्या कलम 30(1) सह कलम 26(6) अंतर्गत प्रदान केलेल्या भारतीय रिजर्व बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतीय रिजर्व बँकेद्वारे कंपनीची जून २०२४ ते मे २०२५ या संदर्भ कालावधीच्या संदर्भात वैधानिक तपासणी करण्यात आली होती. आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याच्या पर्यवेक्षी निष्कर्ष आणि त्या संदर्भात संबंधित पत्रव्यवहार यांवर आधारित, कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का लावला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती. कंपनीने नोटिशीला दिलेल्या उत्तराचा विचार केल्यानंतर, भारतीय रिजर्व बँकेला, आढळले की, कंपनीविरुद्ध पुढील आरोप कायम आहे, ज्यामुळे कंपनीवर आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे.

कंपनी आपल्या ग्राहकांचे जोखमीचे वर्गीकरण करण्यात अयशस्वी ठरली होती.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे कंपनीने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. याशिवाय, हा आर्थिक दंड लादणे हे कंपनीच्या विरोधात आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईचा पूर्वग्रह न ठेवता आहे.

(ब्रिज राज)    
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2026-2027/130

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä