05 फेब्रुवारी 2026
भारतीय रिझर्व्ह बँकेने दौंड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, दौंड, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला
भारतीय रिझर्व्ह बँकेने 02 फेब्रुवारी 2026 रोजीच्या आदेशाद्वारे दौंड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, दौंड, महाराष्ट्र (बँक) वर ‘क्रेडिट इन्फोर्मेशन रिपोर्टिंग’ यावर दिलेल्या काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल ₹5,000/- (केवळ पाच हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (नियमन) कायदा 2005 कलम 25 सह वाचलेल्या कलम 23 च्या तरतुदींनुसार आरबीआयला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे बँकेची 31 मार्च 2025 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात वैधानिक तपासणी करण्यात आली होती. आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याच्या पर्यवेक्षी निष्कर्ष आणि त्या संदर्भात संबंधित पत्रव्यवहार यांवर आधारित, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का लावला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती. बँकेने नोटिशीला दिलेले उत्तर आणि वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेले तोंडी सादरीकरण यांचा विचार केल्यानंतर, भारतीय रिझर्व्ह बँकेला, आढळले की, बँकेविरुद्ध पुढील आरोप कायम आहे, ज्यामुळे बँकेवर आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे.
बँकेने आपल्या ग्राहकांची क्रेडिट माहिती कोणत्याही क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी (CIC) ला सादर केली नाही.
ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. याशिवाय, हा आर्थिक दंड लादणे हे बँकेच्या विरोधात आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईचा पूर्वग्रह न ठेवता आहे.
(ब्रिज राज)
मुख्य महाप्रबंधक
प्रेस प्रकाशनी: 2025-2026/2051 |