29 सप्टेंबर 2025
भारतीय रिझर्व्ह बँकेने बीड डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, बीड (महाराष्ट्र) वर
आर्थिक दंड ठोठावला
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजीच्या आदेशाद्वारे बीड डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, बीड, महाराष्ट्र (बँक) वर, बँकिंग नियमन कायदा 1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह कलम 26A मधील काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल आणि 'सहकारी बँकां द्वारा स्वीकारलेले क्रेडिट माहिती कंपन्यांचे (CICs) सदस्यत्व' आणि ‘आपला ग्राहक जाणून घ्या (KYC)’ याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या काही दिशानिर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹2.25 लाख (रुपये दोन लाख पंचवीस हजार केवळ) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. BR कायद्याच्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) आणि क्रेडिट माहिती कंपन्या (नियमन) अधिनियम, 2005 च्या कलम 25 अन्वये आरबीआयला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.
31 मार्च 2024 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेची वैधानिक तपासणी राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँकेद्वारे (NABARD) केली गेली होती. या तपासणी अहवालातील आरबीआयच्या निर्देशांचे व वैधानिक तरतुदींचे पालन न केल्याचे पर्यवेक्षी निष्कर्ष आणि यासंबंधी केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती. ज्यामध्ये, वरील तरतुदी व निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये, याची कारणे दाखवा, अशी विचारणा करण्यात आली होती. नोटीसला बँकेने दिलेले उत्तर, त्यानंतर सादर केलेले अतिरिक्त निवेदन व वैयक्तिक सुनावणीच्या वेळी सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता आरबीआय, इतर गोष्टींबरोबर,या निष्कर्षावर पोहोचली की, आरबीआयच्या खालील निर्देशांचे पालन न केल्याचे आरोप सिद्ध होतात आणि आर्थिक दंड लावला जाणे आवश्यक आहे.
बँक,
-
दावा न केलेली पात्र रक्कम ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी (DEA Fund) मध्ये निर्धारित वेळेत हस्तांतरित करण्यात अयशस्वी ठरली;
-
तिच्या कर्जदारांची क्रेडिट माहिती चारही सीआयसीना (CICs) सादर करण्यात अयशस्वी ठरली;
-
काही विशिष्ट खात्यांबाबतीत खाते-आधारित संबंध स्थापित करताना, आवश्यक ग्राहक उचित पूर्वतपासणी (Customer Due Diligence – CDD) प्रक्रिया पार पाडण्यात अयशस्वी ठरली.
ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यात बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किवा करारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. तसेच, बँकेविरुद्ध आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईबद्दल पूर्वग्रह न ठेवता हा आर्थिक दंड लावला आहे.
(पुनीत पंचोली)
मुख्य महाप्रबंधक
प्रेस प्रकाशनी: 2025-2026/1194 |