Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (264.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 27/05/2022
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35A अंतर्गत निदेश –
रूपी को-ओपरेटीव बैंक लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र - कालावधी वाढविणे

27 मे 2022

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35A अंतर्गत निदेश –
रूपी को-ओपरेटीव बैंक लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र - कालावधी वाढविणे

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 21 फेब्रुवारी, 2013 रोजी दिलेल्या निर्देश सं. UBD.CO.BSD-I/D-28/12.22.2018/2012-13 च्या अनुषंगाने रूपी को-ओपरेटीव बैंक लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र वर दिनांक 22 फेब्रुवारी, 2013 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून दिशानिर्देश लादण्यात आले होते. या नियमावलीचा कालावधी वेळोवेळी वाढवण्यात आला असून आता, शेवटची 31 मे, 2022 पर्यंत हे नियम लागू होते.

2. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35A चे उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिशानिर्देशचा कालावधि हा दिनांक 26 मे, 2022 च्या सुधारित निर्देश सं. DOR.MON/D-14/12.22.218/2022-23 द्वारा 31 ऑगस्ट, 2022 पर्यंत वाढवण्यात आला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.

3. संदर्भाधीन निर्देशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी बदललेल्या नाहीत. दिनांक 26 मे, 2022 च्या सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या आवारात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.

4. भारतीय रिझर्व बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व बँक समाधानी आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2022-2023/276

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä