Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
����� >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (149.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 12/07/2019
नोबल को-ऑपरेटिव बँक लि. नॉयडा (यु.पी.) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

जुलै 12, 2019

नोबल को-ऑपरेटिव बँक लि. नॉयडा (यु.पी.) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने नोबल को-ऑपरेटिव बँक लि. नॉयडा (यु.पी.) ह्यांचेवर रु 1,00,000/- (रुपये एक लाख) आर्थिक दंड लागु केला असून, तो दंड फसवणुकींचे वर्गीकरण व अहवाल ह्याबाबत आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले असल्याने लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/131

 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��