Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (206.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 04/07/2019
अमानाथ को-ऑपरेटिव बँक लि. बंगळुरु - बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील सर्वसमावेशक निर्देशांना मुदतवाढ

जुलै 4, 2019

अमानाथ को-ऑपरेटिव बँक लि. बंगळुरु - बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील
सर्वसमावेशक निर्देशांना मुदतवाढ

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित केले जाते की, जनतेच्या हितासाठी, अमानाथ को-ऑपरेटिव बँक लि. बंगळुरु ह्यांना, दि. एप्रिल 1, 2013 रोजी व त्यानंतर दिलेल्या निर्देशांसह वाचित व शेवटून डिसेंबर 21, 2018 रोजी दिलेल्या निर्देशाचा कार्यकारी काळ आणखी सहा महिन्यांसाठी वाढविला जावा ह्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे.

त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, अमानाथ को-ऑपरेटिव बँक लि. बंगळुरु ह्यांना देण्यात आलेल्या, व शेवटून जुलै 4, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या दि. एप्रिल 1, 2013 रोजीचे निर्देश पुनरावलोकनाच्या अटीवर, वरील बँकेला आणखी सहा महिन्यांसाठी म्हणजे जुलै 5, 2019 ते जानेवारी 4, 2020 पर्यंत लागु असणे सुरुच राहील.

संदर्भित निर्देशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. आरबीआयने हे निर्देश दिले ह्याचा अर्थ, रिझर्व्ह बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व्ह बँक करु शकते.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/50

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä