Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (108.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 09/05/2017
भारत देयक प्रदान प्रणाली (बीबीपीएस) - अंतिम तारीख विस्तारित

मे 9, 2017

भारत देयक प्रदान प्रणाली (बीबीपीएस) - अंतिम तारीख विस्तारित

भारतीय रिझर्व बँकेने, बीबीपीएसच्या विद्यमान व्याप्तीखाली बिलींग व्यवसाय करणा-या संस्थांबाबत, एखाद्या प्राधिकृत बीबीपीओयुचे एजंट होण्याबाबत किंवा देयक प्रदानाचा व्यवसाय सोडून देण्याबाबत असलेली अंतिम तारीख, मे 31, 2017 पासून, डिसेंबर 31, 2017 पर्यंत वाढविण्याचे ठरविले आहे. ही टाईमलाईन पुढील प्रकारच्या संस्थांना लागु असेल.

  1. बीबीपीओयु म्हणून प्राधिकृत होण्यासाठी अर्ज केलेला नाही अशा संस्था.

  2. बीबीपीओयुसाठी ज्यांचा अर्ज आरबीआयने परत केला आहे अशा संस्था.

  3. ज्यांना आरबीआयने वेळ/मुदत वाढवून दिली होती परंतु आवश्यक असलेली निव्वळ अर्हता मिळवू न शकणा-या व डिसेंबर 31, 2016 पर्यंत त्याबाबत कळवू न शकणा-या संस्था.

(2) अंतिम तारीख समय करण्यात निरनिराळ्या संस्थांनी व्यक्त केलेल्या अडचणी विचारात घेऊन ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

(3) बीबीपीएसमधील घडामोडी, वाढ व व्याप्तीमधील विस्तार ह्यावर अवलंबून, बीबीपीओयु म्हणून कार्य करण्यासाठी मंजु-या/प्राधिकृतता देण्याची प्रक्रिया, भविष्यातील एखाद्या तारखेस नव्याने अर्ज मागवून सुरु करण्याचा विचार आरबीआय करु शकते.

पार्श्वभूमी

येथे स्मरण व्हावे की, बीबीपीएसच्या अंमलबजावणीसाठीची मार्गदर्शक तत्वे दि. नोव्हेंबर 28, 2014 अन्वये, बीबीपीएसच्या विद्यमान व्याप्तीखाली सध्या देयक प्रदान कार्यकृती करणा-या बँका व अबँकीय संस्था, भारत देयक प्रदान कार्यकारी एकके (बीबीपीओयु) म्हणून किंवा एखाद्या प्राधिकृत बीबीपीओयुचे एजंट म्हणून, ह्या बीबीपीएसमध्ये भाग घेऊ शकतात.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3031

संबंधित परिपत्रके, एफएक्यु व वृत्तपत्र निवेदने
ऑगस्ट 30, 2016 भारत देयक प्रदान कार्यकारी एकक (बीबीपीओयु) म्हणून कार्य करण्यासाठीची प्राधिकृतता
मे 13, 2016 बीबीपीओयुना प्राधिकृत करण्यासाठीचे अर्ज : दर्जा/स्थिती.
नोव्हेंबर 24, 2015 भारत देयक प्रदान प्रणाली (बीबीपीएस) साठीचे केंद्रीय एकक म्हणून कार्य करण्यास एनपीसीआयला आरबीआयकडून ‘तत्वतः’ मंजुरी.
नोव्हेंबर 13, 2015 भारत देयक प्रदान प्रणाली कार्यकारी एककांना (बीबीपीओयु) प्राधिकृतता देण्यासाठीच्या अर्जांसाठीच्या अंतिम तारखेचा आरबीआयकडून विस्तार
नोव्हेंबर 13, 2015 एफएक्यु-भारत देयक प्रदान प्रणाली (बीबीपीएस)
ऑक्टोबर 20, 2015 भारत देयक प्रदान प्रणाली कार्यकारी एकके (बीबीपीओयु) ना प्राधिकृत करण्यासाठीच्या अर्जांसाठी आरबीआयचे आवाहन.
नोव्हेंबर 28, 2014 भारत देयक प्रदान प्रणालीची (बीबीपीएस) अंमलबजावणी
 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä