Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
����� >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (99.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 29/03/2017
प्रगती सहकारी बँक लि. बंगळुरु, कर्नाटक - ह्यांना दंड लागु

मार्च 29, 2017

प्रगती सहकारी बँक लि. बंगळुरु, कर्नाटक - ह्यांना दंड लागु

भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेल्या) च्या कलम 46 (4) सह वाचित कलम 47 अ (1)(ब) ने तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, प्रगती सहकारी बँक लि. बंगळुरु, ह्यांना रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला आहे. हा दंड, गृह निर्माण, रियल इस्टेट व वाणिज्य रियल इस्टेट क्षेत्र आणि ग्राहकांची जोखीम ठरविणे/वर्गीकृत करणे आणि जुने अभिलेख अद्यावत करणे ह्याबाबत रिझर्व बँकेने विहित केलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबाबत लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने, वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती आणि त्यावर वरील बँकेने वैय्यक्तिक सुनावणी व लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व त्या बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, रिझर्व बँक निष्कर्षाप्रत आली की ही उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2601

 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��