Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (107.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 20/12/2016
आपली आयटी थकबाकी प्राधिकृत बँक शाखांमध्ये किंवा आरबीआयमध्ये जमा करा - डिसेंबर 2016

नोव्हेंबर 17, 2016

आपली आयटी थकबाकी प्राधिकृत बँक शाखांमध्ये किंवा आरबीआयमध्ये जमा करा - डिसेंबर 2016.

असे दिसून आले आहे की, भारतीय रिझर्व बँकेच्या मार्फत आपली आयटी थकबाकी जमा करण्यासाठीची गर्दी डिसेंबर 2016 च्या अखेरीस खूपच होत आहे. आणि ह्या कामासाठी जास्तीत जास्त अतिरिक्त काऊंटर्स उपलब्ध केले असूनही ह्या बँकेसाठी हा भार सांभाळणे कठीण होते. त्यामुळे, जनतेला, ह्या बँकेमध्ये अनावश्यकतेने बराच काळ रांगांमध्ये बराच काळपर्यंत तिष्ठत उभे रहावे लागते. ह्यामुळे होणारी असुविधा कमी करण्यासाठी करनिर्धारितींना सांगण्यात येते की, शेवटी-शेवटी होणारी गर्दी-गडबड टाळण्यासाठी त्यांनी त्यांची आय कर थकबाकी ठरलेल्या तारखेच्या पुरेशा आधीच प्रदान करावी.

ह्याशिवाय, मुंबई येथे, खाली दिलेल्या मान्यता प्राप्त एजन्सी बँकांच्या शाखाही आय कर थकबाकी जमा करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आहेत. ह्यापैकी बहुतेक बँका, कर प्रदान करण्यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन देत आहेत. करनिर्धारितींनी त्यांच्या सोयीसाठी ह्या व्यवस्थांचा लाभ घ्यावा.

1. अलाहाबाद बँक 12. इंडियन ओव्हरसीज बँक 23. स्टेट बँक ऑफ हैदराबाद
2. आंध्र बँक 13. ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स 24. स्टेट बँक ऑफ त्रावणकोर
3. बँक ऑफ बडोदा 14. पंजाब आणि सिंध बँक 25. स्टेट बँक ऑफ म्हैसूर
4. बँक ऑफ इंडिया 15. पंजाब नॅशनल बँक 26. स्टेट बँक ऑफ पतियाळा
5. बँक ऑफ महाराष्ट्र 16. सिंडिकेट बँक 27. एचडीएफसी बँक लि
6. कॅनरा बँक 17. युको बँक 28. अॅक्सिस बँक लि
7. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 18. युनियन बँक ऑफ इंडिया 29. आयसीआयसीआय बँक लि
8. कॉर्पोरेशन बँक 19. युनायटेड बँक ऑफ इंडिया    
9. देना बँक 20. विजया बँक    
10. आयडीबीआय बँक 21. स्टेट बँक ऑफ इंडिया    
11. इंडियन बँक 22. स्टेट बॅंक ऑफ बिकानेर आणि जयपूर    

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1236

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä