Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (280.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 04/06/2021
द्रवीकरण साचा (रिझोल्युशन फ्रेमवर्क) - 2.0 – सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) कोविड-19 संबंधित ताणतणावाचे द्रवीकरण – एकुण एक्सपोझर साठीच्या मर्यादेत सुधारणा

आरबीआय/2021-22/47
डीओआर.एसटीआर.आरईसी.21/21.04.048/2021-22

दि. जून 4, 2021

सर्व वाणिज्य बँका (लघु वित्त बँका, स्थानिक क्षेत्र बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकां सह)
सर्व प्राथमिक (शहरी) सहकारी बँका / राज्य सहकारी बँका / जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,
सर्व अखिल भारतीय वित्तीय संस्था
सर्व अबँकिय वित्तीय कंपन्या (गृहनिर्माण वित्त कंपन्यांसह)

महोदय/महोदया,

द्रवीकरण साचा (रिझोल्युशन फ्रेमवर्क) - 2.0 – सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) कोविड-19
संबंधित ताणतणावाचे द्रवीकरण – एकुण एक्सपोझर साठीच्या मर्यादेत सुधारणा

“द्रवीकरण साचा - 2.0 – सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) कोविड-19 संबंधित ताणतणावाचे द्रवीकरण” परिपत्रक डीओआर.एसटीआर.आरईसी.12/21.04.048/2021-22 दि. मे 5, 2021 चा संदर्भ घेण्यात यावा.

2. वरील परिपत्रकातील खंड 2 मध्ये, ह्या साचाखाली पुनररचनेसाठी विचारात घ्यावयाच्या पात्रता अटी विहित केल्या असून त्यात पोटखंड 3 समाविष्ट करण्यात आला आहे. व त्या पोटखंडानुसार, एमएसएमई कर्जदारांना, सर्व कर्जदायी संस्थांनी दिलेल्या निधीयुक्त नसलेल्या सुविधांसहचे एकुण एक्सपोझर, मार्च 31, 2021 रोजी रु. 25 कोटींपेक्षा अधिक असू नये.

3. पुनरावलोकनावर आधारित ठरविण्यात आले आहे की, वरील मर्यादा रु. 25 कोटींपासून रु. 50 कोटींपर्यंत वाढविण्यात यावी

4. त्यानुसार, खंड 2(5) पुढिल प्रमाणे सुधारित करण्यात आला आहे.

“(v) परिपत्रक डीओआर.क्र.बीपी.बीसी/4/21.04.048/2020-21 दि. ऑगस्ट 6, 2020 व डीओआर.क्र.बीपी.बीसी.34/21.04.048/2019-20 दि. फेब्रुवारी 11, 2020, किंवा डीबीआर.क्र.बीपी.बीसी.18/21.04.048/2018-19 दि. जानेवारी 1, 2019 (ह्यांचा एकत्रीत पणे एमएसएमई पुनररचना परिपत्रके असे संदर्भित करण्यात आले आहे.) किंवा कोविड-19 संबंधित-द्रवीकरण साचा” वरील परिपत्रक डीओआर.क्र.बीपी.बीसी/3/21.04.048/2020-21 दि. ऑगस्ट 6, 2020 ह्यांच्या अनुसार कर्जदाराचे खाते पुनरर्चित करण्यात आले नव्हते.”

5. ह्या परिपत्रकातील इतर तरतुदींमध्ये कोणताही बदल नाही.

आपला विश्वासु,

(मनोरंजन मिश्रा)
मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä