Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (203.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 26/08/2020
बँकिंग विनियात्मक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 31 खाली अहवाल सादर करणे - मुदतवाढ

आरबीआय/2020-21/28
डीओआर (पीसीबी).बीपीडी.परिपत्रक.क्र.2/12.05.001/2020-21

ऑगस्ट 26, 2020

मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व प्राथमिक (शहरी) सहकारी बँका

महोदय/महोदया,

बँकिंग विनियात्मक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 31 खाली अहवाल सादर करणे - मुदतवाढ

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (बँकिंग विनियामक (सुधारणा) वटहुकुम 2020 अन्वये सुधारित) कलम 56 सह वाचित ह्या अधिनियमाच्या कलम 31 अन्वये, ऑडिटरच्या रिपोर्टसह, ह्या अधिनियमाच्या कलम 29 मध्ये संदर्भित अशा लेखा व ताळेबंद हे विहित केलेल्या रितीने प्रसिध्द केले जातील आणि त्यांच्या तीन प्रती, संदर्भित कालावधीच्या समाप्तीपासून तीन महिन्यांच्या आत रिझर्व बँकेकडे अहवाल म्हणून पाठविल्या जातील. वरील कलमाच्या प्रथम तरतुदीनुसार, भारतीय रिझर्व बँक, कोणत्याही परिस्थितीत, असे अहवाल पाठविणा-या तीन महिन्यांचा कालावधी आणखी तीन महिन्यांपर्यंत वाढवू शकते.

(2) कलम 31 सुधारित करणारा वरील वटहुकुम, प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांसाठी (युसीबी) जून 29, 2020 रोजी अधिसूचित करण्यात आला असल्याने, व सुरु असलेल्या देशव्यापी कोविड-19 साथीमुळे वरील अहवाल सादर करण्यास युसीबींना अडचणी येऊ शकत असल्यामुळे, मार्च 31, 2020 रोजी समाप्त झालेल्या वित्तीय वर्षासाठीचा वरील अहवाल सादर करण्यास आणखी वेळ देणे आवश्यक असल्याचा विचार केला जात आहे.

(3) वरील बाबी विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँक, येथे, मार्च 31, 2020 रोजी समाप्त झालेल्या वित्तीय वर्षासाठीचा, ह्या अधिनियमाच्या कलम 31 खाली सादर करण्यासाठीचा तीन महिन्यांचा कालावधी आणखी तीन महिन्यांनी वाढवून देत आहे. त्यानुसार, वरील अहवाल, सप्टेंबर 30, 2020 रोजी किंवा त्यापूर्वी रिझर्व बँकेला सादर केला जाण्याची खात्री युसीबींनी करुन घ्यावी.

आपला विश्वासु,

(निरज निगम)
मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä