Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (220.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 06/04/2018
बँकांच्या रोख-रक्कम व्यवस्थापनाच्या कार्यकृती - सेवा देणारे व त्यांचे पोट-कंत्राटदार ह्यांच्या नेमणुकीसाठीची मानके

आरबीआय/2017-18/152
डीसीएम(पीएलजी) क्र.3563/10.25.07/2017-18

एप्रिल 6, 2018

अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक / मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका / खासगी क्षेत्रातील बँका / विदेशी बॅंक /
प्रादेशिक ग्रामीण बँका / प्राथमिक (शहरी) सहकारी बँका /
राज्य सहकारी बँका / जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका

महोदय/महोदया,

बँकांच्या रोख-रक्कम व्यवस्थापनाच्या कार्यकृती - सेवा देणारे व त्यांचे पोट-कंत्राटदार ह्यांच्या नेमणुकीसाठीची मानके

एप्रिल 5, 2018 रोजीच्या, विकास व विनियामक धोरणावरील निवेदनाच्या परिच्छेद 11 अन्वये घोषित करण्यात आले होते की, रोकड व्यवस्थापनामधील ने आण करण्यासाठी (लॉजिस्टिक्स), बाहेरील सेवादाते व त्यांचे पोट-कंत्राटदार नेमण्याबाबत बँका अधिकाधिक अवलंबून राहत असल्याचे विचारात घेता, ह्या कामासाठी बँकांकडून नेमले जाणारे सेवा दाते/पोट कंत्राटदार ह्यांच्यासाठी काही किमान मानके विहित केली जातील. त्यानुसार ठरविण्यात आले आहे की, बँकांनी, त्यांच्या रोकड व्यवहारात संबंधित कार्यकृतींसाठी ठेवलेल्या/नेमलेल्या सेवादात्यांसाठी काही किमान मानके ठेवावीत. ह्याबाबतची सविस्तर माहिती जोडपत्रात दिली आहे. ह्या परिपत्रकाच्या तारखेच्या 90 दिवसांच्या आत, बँकांनी, त्यांच्या विद्यमान बाह्य सेवा व्यवस्थांचे पुनरावलोकन करुन, पुढे दिलेल्या सूचनांशी जुळणा-या असल्याची खात्री करुन घ्यावी.

(2) ह्याशिवाय, सेवादाते व त्यांचे पोट-कंत्राटदार ह्यांच्याकडे असलेली रोकड ही बँकांचीच मालमत्ता असल्याने व त्याबाबतच्या सर्व जोखमींसाठी बँकाच जबाबदार असल्याने, त्यासंबंधित उदभवणा-या आकस्मिक प्रसंगांना तोंड देण्यासाठी, बँकांनीच, त्यांच्या संचालक मंडळाने मंजूरी सुयोग्य अशी व्यवसाय सातत्य योजना ठेवावी.

आपला विश्वासु,

(अविरल जैन)
महाव्यवस्थापक


जोडपत्र

सेवादाते व त्यांचे पोट-कंत्राटदार नेमण्यासाठीची मानके

(अ) पात्रता निकष

(1) रु. 1 बिलियनची निव्वळ मूल्य(1) आवश्यकता किमान रु.1 बिलियनचे निव्वळ मूल्य सदासर्वदा ठेवले जावे.

बँकांद्वारे बाह्य सेवांच्या सर्व करारांसाठी, वरील निव्वळ मूल्य आवश्यकता ताबडतोब जारी असेल. विद्यमान करारांबाबत, बँकांनी खात्री करुन घ्यावी की, वरील निव्वळ मूल्य-आवश्यकता, मार्च 31, 2019 रोजी असल्यानुसार (संबंधित बँकेकडे, ऑडिट केलेला ताळेबंद जून 30, 2019 पर्यंत सादर केला जावा) किंवा कराराचे नूतनीकरण करतेवेळी (ह्यापैकी जे आधी असेल ते) पूर्ण करण्यात आली आहे.

(ब) प्रत्यक्ष/सुरक्षा पायाभूत सोयी

(1) खास बनावटीच्या किमान 300 रोकड वाहक गाड्या (मालकीच्या/भाड्याच्या)

(2) केवळ सेवादात्याच्या किंवा त्याच्या प्रथम-स्तरीय पोट-कंत्राटदारांच्या मालकीच्या/भाड्याच्या सुरक्षित रोकड वाहक गाड्यांमधूनच रोख रकमेची ने-आण केली जावी. ह्यातील प्रत्येक रोकड वाहक गाडी ही एक विशेषत्वाने डिझाईन व तयार केलेली लाइट कमर्शियल व्हेईकल (एलसीव्ही) असावी आणि तिच्यामध्ये, प्रवासी व रोकड ह्यासाठी वेगवेगळे विभाग/खण व दोन्हीही विभाग दर्शविणारा सीसीटीव्ही असावा.

(3) प्रवासी खणामध्ये, ड्रायव्हर व्यतिरिक्त दोन रक्षक (कस्टडियन्स), दोन सशस्त्र गार्ड्स (बंदुकधारी) असावेत.

(4) कोणतीही रोकड वाहक गाडी सशस्त्र गार्ड शिवाय हलविली जाऊ नये. बंदुकधारी व्यक्तींनी, बंदुकीसाठीच्या वैध परवान्यासह, त्यांची शस्त्रे ‘तयार’ कृतीशील अवस्थेत ठेवावीत. सेवादाता किंवा त्याचा प्रथम-स्तरीय पोट-कंत्राटदार ह्यांनी, ठेवण्यात आलेल्या बंदुकधा-यांची नावेही संबंधित पोलिस प्राधिकरणाला कळवावीत.

(5) प्रत्येक गाडीमध्ये जीपीएस यंत्रणा असावी व ती जिओ-फेनसींग मॅपिंगने प्रत्यक्ष देखरेख ठेवता येणारी असावी आणि त्याशिवाय, आकस्मिक घटनेसाठी सर्वात जवळचे पोलिस स्टेशनही त्यात दर्शविलेले असावे.

(6) प्रत्येक रोकड वाहक गाडीमध्ये ट्युबलेस टायर्स, वायरलेस (मोबाईल) संदेश व्यवस्था व भोंगे असावेत. सहजपणे अंदाज बांधता येऊ नये ह्यासाठी, ह्या गाड्यांनी एकाच/त्याच त्याच मार्गाने जाऊ नये. नियमित मार्गावरील अंदाज बांधता येतील अशी हालचाल टाळावी. कर्मचा-यांचे परिवलन केले जावे आणि त्यांना केवळ ट्रिपच्या दिवशीच ते काम दिले जावे. सुरक्षेच्या बाबतीत, खाजगी सुरक्षा एजन्सीज् (विनियम) अधिनियम, 2005 च्या आणि भारत सरकार व राज्य सरकार ह्यांनी वेळोवेळी विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले गेलेच पाहिजे.

(7) रोकड वाहक गाड्या रात्रीचे वेळी बाहेर काढण्यास प्रोत्साहन दिले जाऊ नये. रोकड संबंधित सर्व व्यवसाय दिवसा उजेडीच केले जावेत. मात्र, महानगर व नागरी क्षेत्रांमध्ये, विशिष्ट क्षेत्रांबाबतच्या कायदा व सुव्यवस्थेवर अवलंबून किंवा स्थानिक पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार ह्यात काही शिथिलीकरण असू शकते. रोकड वाहक गाडी रात्रीच्या वेळी एखाद्या थाबविणे/ठेवली जाणे आवश्यक असल्यास, ती केवळ पोलिस स्टेशनमध्येच ठेवली जावी. आंतर-राज्यीय ने-आण करण्याबाबत, राज्यांच्या सीमा रेषेवरील सुरक्षा रक्षक बदलणे आधीच ठरविण्यात आलेले असावे.

(8) सर्वच वेळी, आणि विशेषतः चलनाची आंतर-राज्यीय ने-आण करीत असताना रोकड पाठविणा-या बँकेच्या पत्रासह, योग्य ती कागदपत्रे रोकड वाहक गाडीमध्ये ठेवण्यात यावी.

(9) एटीएमच्या बाबतीत असलेल्या कार्यकृती, वर्गामधील किमान शिक्षणाचे व प्रशिक्षणाचे कमीत कमी तास पूर्ण केलेल्या प्रमाणित अधिका-यांनी/कर्मचा-यांकडूनच करविल्या जाव्यात. अशा प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम स्वयं नियामक संस्थेद्वारे प्रमाणित (एसआरओ), कॅश इन ट्रान्झिट (सीआयटी) कंपन्या/कॅश रिप्लेनिशमेंट एजन्सीज (सीआरए) द्वारे प्रमाणित केलेला असावा व ह्या कंपन्या, असे अभ्यासक्रम देण्यासाठी, राष्ट्रीय कौशल्य विकास निगम सारख्या एजन्सीजशी जोडणी करु शकतात.

(10) रोकड हाताळणा-या कर्मचा-यांना सुयोग्य प्रशिक्षण दिलेले असावे, आणि एखाद्या अॅक्रेडिटेशन प्रक्रियेने ते प्रमाणित केलेले असावे. असे प्रमाणित करण्याचे कार्य, एसआरओ किंवा नेमलेल्या इतर एजन्सींकडून करविण्यात यावे.

(11) रोकड वाहक गाडीच्या हालचालीशी संबंधित सर्व कर्मचा-यांचे शील/नियत व पूर्वेतिहास ह्यांची पडताळणी अत्यंत काटेकोरपणे केली जावी. कर्मचा-यांच्या पार्श्वभूमीची कडक तपासणीमध्ये, त्यांच्या मागील किमान दोन पत्त्यांच्या पोलिस-पडताळणीचा समावेश असावा. अशी पडताळणी नियतकालिकतेने अद्यावत केली जावी. आणि उद्योग-स्तरांवर, ती एका सामान्य डेटबेसवरुन शेअर केली जावी. उद्योगासाठी सामान्य डेटाबेस तयार करण्यात एसआरओ एक सक्रीय भूमिका बजावू शकतो. एखाद्या कर्मचा-याला कामावरुन काढून टाकले असल्यास, संबंधित सीआयटी/सीआरए ह्यांनी, सविस्तर माहितीसह, पोलिसांना ताबडतोब कळवावे.

(12) रोख रकमेवरील प्रक्रिय/हाताळणी व तिजोरीत ठेवणे ह्यासाठी, सुयोग्य आकाराची सुरक्षित व विश्वसनीय जागा असणे आवश्यक आहे. ही जागा इलेक्ट्रॉनिक निरीक्षणाखाली असून चोवीस तास देखरेखीखाली असावी. अशा व्हॉल्टबाबतचे तांत्रिक गुणविशेष, रिझर्व बँकेने, धनकोषांसाठी विहित केलेल्या किमान मानकांपेक्षा कमी नसावेत. ह्या व्हॉल्टची कार्यकृती, केवळ संयुक्तपणे केली जावी व त्यात निरनिराळी चलने सुलभतेने साठविता व काढून घेता येण्यासाठी कलर कोड असलेल्या चिप्स असाव्यात.

(13) व्हॉल्टमध्ये सर्व प्रकारची अग्नीशामक उपकरणे उपलब्ध असावीत व ती चालू/तयार स्थितीत असावीत, तसेच त्यात, सीसीटीव्ही मॉनिटरिंग व त्याचे किमान 90 दिवसांसाठीचे रेकॉर्डिंग, इमर्जन्सी अलार्म, बर्गलर अलार्म, जवळच्या पोलिस स्टेशनशी हॉटलाईन, उजेडासाठी पॉवर बॅक अप व व्हॉल्ट मध्ये शिरण्याच्या दरवाजांचे इंटरलॉकिंग ह्यासारख्या इतर प्रमाणित सुरक्षा प्रणाली असाव्यात.

(14) काम करण्याची जागा/क्षेत्र व रोकड ठेवण्याची जागा वेगवेगळी असावी. ही जागा सशस्त्र रक्षकांच्या सुरक्षेखाली असावी व रक्षकांची संख्या, त्या विशिष्ट जागेत केल्या जाणा-या कार्यकृतींशी निगडित, परंतु कोणत्याही परिस्थितीत पाच पेक्षा कमी नसावी.

(15) ग्राहकांच्या खात्याचा तपशील ह्यासारखी महत्वाची माहिती अत्यंत सुरक्षित ठेवली जावी. स्विच र्सव्हर मधील प्रवेश केवळ बँकांपुरताच सीमित असावा. बँकेने एखाद्या सेवा-दात्याला किंव त्याच्या पोट कंत्राटदाराला, बँकेच्या अंतर्गत र्सव्हरमध्ये प्रवेश देण्याबाबतचा इंटरफेस हा, केवळ संबंधित माहितीपुरताच सीमित असावा व तो सुरक्षित ठेवला जावा.


(1)निव्वळ मूल्यामध्ये संचयित तोटा शिल्लक, अमूर्त अॅसेट्सचे पुस्तकी मूल्य व असल्यास स्थगित महसुली खर्च ह्यासाठी समायोजित केलेले, भरणा झालेले इक्विटी भांडवल, मुक्त राखीव निधी, शेअर प्रिमियम खात्यातील शिल्लका, आणि अॅसेट्सच्या विक्रीमधून निर्मित अतिरिक्त राखीव निधी (परंतु अॅसेट्सचे पुनर्-मूल्यांकन केल्याने निर्माण झालेला राखीव निधी नव्हे) येतात.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä