Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (260.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 28/11/2016
बँक ठेव खात्यामधून रोख रक्कम काढणे - शिथिलीकरण

आरबीआय/2016-17/163
डीसीएम.क्र.1437/10.27.00/2016-17

नोव्हेंबर 28, 2016

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी
बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका/
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका

महोदय,

बँक ठेव खात्यामधून रोख रक्कम काढणे - शिथिलीकरण

असे कळविण्यात आले आहे की, खात्यांमधून रोख रक्कम काढण्यावरील विद्यमान मर्यादांमुळे काही ठेवीदार, त्यांचा पैसा बँक खात्यात जमा करण्यात चाल ढकल करत आहेत.

(2) ह्याचा परिणाम बँक नोटांच्या प्रत्यक्ष प्रसारावर होत असल्या कारणाने काळजीपूर्वक विचार करुन असे ठरविण्यात आले आहे की, नोव्हेंबर 29, 2016 रोजी किंवा त्यानंतर, विद्यमान वैध चलनी नोटांमध्ये केलेल्या ठेंवीची (जमा रकमेचे) निकासी, विद्यमान मर्यादेपलिकडे, करण्यास परवानगी दिली जावी. ह्यासाठी शक्यतो रु.2000 व रु.500 अशा उच्च मूल्याच्या नोटा अशा निकासींसाठी दिल्या जाव्यात.

आपली विश्वासु,

(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä