Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (110.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 20/11/2016
रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - मर्यादांमध्ये सुधारणा/बदल

आरबीआय/2016-17/141
डीसीएम(पीएलजी)क्र.1304/10.27.00/2016-17

नोव्हेंबर 20, 2016

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी
बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका/
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका

महोदय,

रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - मर्यादांमध्ये सुधारणा/बदल

कृपया आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र. 1272/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 13, 2016 च्या परिच्छेद 1(2) चा संदर्भ घ्यावा. त्यानुसार, रिकॅलिब्रेट केलेल्या एटीएम्समधून काढावयाच्या रोख रकमेची दैनिक मर्यादा, रु.2000/- वरुन रु.2500/- पर्यंत वाढविण्यात आली असून, बँकांच्या एटीएम्सचे रिकॅलिब्रेशन होईपर्यंत ती रु.2000/- एवढीच ठेवण्यात आली आहे.

(2) एटीएम्सच्या रिकॅलिब्रेशनवर जवळून नजर ठेवण्यात येत आहे व त्याबाबत लक्षणीय प्रगती केली गेली आहे. पुनरावलोकन केल्यावर, पुढील सूचना मिळेपर्यंत ह्या मर्यादांमध्ये बदल न करण्याचे ठरविण्यात आले आहे. कॅलिब्रेट न केलेल्या एटीएम्समधून, ती एटीएम्स रिकॅलिब्रेट होईपर्यंत, त्यांच्यामधून रु.50 व रु.100 च्या नोटा वितरित करणे बँकांनी सुरुच ठेवावे.

(3) कृपया पोच द्यावी.

आपली विश्वासु

(सुमन रे)
महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä