Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (121.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 14/11/2016
विहित बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून घेणे - रोख रक्कम काढण्यासाठी, वितरण-जागांचा विस्तार

आरबीआय/2016-17/131
डीसीएम(पीएलजी)क्र.1274/10.27.00/2016-17

नोव्हेंबर 14, 2016

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी/
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी बँका/
प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका/
जिल्हा केंद्रीय सहकारी बँका

महोदय,

विहित बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून घेणे - रोख रक्कम काढण्यासाठी, वितरण-जागांचा विस्तार

कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक क्र. डीसीएम(पीएलजी)क्र.1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 चा संदर्भ घ्यावा. विहित बँक नोटा बदलून घेण्यासाठी/जमा करण्यासाठी आणि खात्यांमधून रोख रक्कम काढण्यासाठी असलेल्या विद्यमान सुविधा वाढविण्यासाठी, बँकांना सांगण्यात येते की ह्या सुविधा जनतेसाठी जास्तीत जास्त सोयीस्कर व्हाव्यात ह्यासाठी त्यांनी पुढील अतिरिक्त उपाय योजावेत.

अतिरिक्त सुविधा

(1) चालु खाते धारकांना (मागील 3 महिने किंवा अधिक काळ कार्यवाहीत असलेल्या चालु खात्यांना लागु) प्रति सप्ताह रु.50,000/- काढण्यास परवानगी आहे. असे प्रदान केवळ रु.2000 मूल्याच्या नोटांमध्येच केले जाईल.

(2) ग्राम-पंचायत कार्यालये, पोलिस ठाणी/पोलिस व मिलिटरी आऊट पोस्ट, सरकारी खाती, सार्वजनिक क्षेत्रातील एकके, पेट्रोल पंप आणि इतर सुरक्षित ठिकाणी बँका त्यांचे मायक्रो एटीएम (बाल मित्र इत्यादि) ठेवू शकतात. ह्यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असणे आवश्यक असल्याने, बँका त्यांच्या मायक्रो एटीएमच्या मर्यादा किमान रु.50,000/- पर्यंत ठेवू शकतात आणि त्यात वारंवार रोख रक्कम ठेवण्याची व्यवस्था करु शकतात.

(3) दूरवरच्या व बँक नसलेल्या क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांना बदलून देणे/जमा करणे/निकासी करणे ह्या सुविधा देण्यासाठी, बँका मोबाईल व्हॅन्सचा वापर करु शकतात.

(4) चहा/कॉफी व इतर मळ्यांमधील कर्मचारी आणि ह्यासारखे इतर कर्मचारी गट, अशा प्रदान-घनता असलेल्या ठिकाणी, त्या कर्मचा-यांसाठी बँकांनी, कॅम्प-रितीने खाती उघडावीत. त्यामुळे त्या कर्मचा-यांना खात्यात जमा करण्यासाठी व निकासी साठी अधिक चांगली सेवा देता येईल.

(5) येथे पुनश्च सांगण्यात येते की, कामाचा भार वाढला असल्याने बँका, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना अल्प काळासाठी कामावर ठेवण्याचा विचार करु शकतात.

देखरेख

(6) बँकांनी खात्री करुन घेतली पाहिजे की, विहित बँक नोटा आणि इतर वैध चलन नोटा जमा करण्यासाठी ग्राहक वेगवेगळ्या स्लिप्स भरत आहेत (एखाद्या ग्राहकाजवळ एसबीएन व वैध चलन नोटा एकत्र मिसळलेल्या असल्यास त्याने त्या वेगवेगळ्या करुन त्यासाठी वेगवेगळ्या स्लिप्स भराव्यात). बँकांनी सीबीएसमध्ये अशी एक यंत्रणा बसवावी की ज्यामुळे, ग्राहकनिहाय व मूल्यनिहाय स्वीकारण्यात आलेल्या एसबीएनचे रेकॉर्ड, एखाद्या फ्लॅग मार्फत त्याची पडताळणी करण्यासाठी ठेवले जाईल. मग त्या एसबीएन बदलून घेण्यासाठी असोत किंवा जमा करण्यासाठी असोत.

आपली विश्वासु,

(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä