Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
����� >> +?vɺ��S�x�� - Display
Note : To obtain an aligned printout please download the (142.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 09/11/2016
रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे/बाद करणे

आरबीआय/2016-17/115
डीसीएम(पीएलजी)क्र. 1241/10.27.00/2016-17

नोव्हेंबर 09, 2016

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/विदेशी बँका/
प्रादेशिक ग्रामीण बँका/नागरी सहकारी बँका/राज्य सहकारी बँका

महोदय,

रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे/बाद करणे

कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र.1226/10.27.00/2016-17, दि. नोव्हेंबर 8, 2016 चा संदर्भ घ्यावा. एटीएम्स मधून रु.500 व रु.1000 च्या विहित बँक नोटा दिले जाणे बंद केले गेले असल्याची आणि, ही एटीएम्स आम जनतेच्या व्यवहारांसाठी खुली झाल्यावर ती, फक्त रु.100 व रु.50 च्या नोटाच देण्याची खात्री करुन घेण्यासाठी पुढील कारवाई करणे आवश्यक आहे.

(1) नोव्हेंबर 11, 2016 पासून एटीएम्सचे पुनर्-उद्घाटन

एटीएम्समधील संबंधित कॅसेट्समधून एसबीएनचे वितरण बंद/अशक्य करण्यासाठी, आणि एटीएम्समध्ये असलेल्या विद्यमान एसबीएन काढून टाकण्यासाठी, स्विच लेबलवर आवश्यक ते बदल (तशीच गरज असल्यास बाहेरील/मॅनेज केलेल्या सर्व्हिस प्रोव्हायडर्स मार्फत) केले जावेत.

(2) एटीएम्समधून रु.100 व रु.50 च्या नोटा वितरित करण्यासाठी एटीएम्सचे रिकॅलिब्रेशन

बँकांनी पुढील गोष्टींची खात्री करुन घ्यावी (तशीच गरज पडल्यास बाहेरील/मॅनेज केलेल्या सेवादात्यांच्या मार्फत)

(अ) प्रत्येक एटीएममधील किमान एक तरी कॅसेट, रु.100 च्या नोटा वितरित करण्यासाठी ताबडतोब कनफिगर करण्यात यावी.

(ब) वरील गोष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक त्या एजन्सींना, एटीएमसाठी योग्य असलेल्या (नव्या आणि/किंवा रिसायक्लेबल) नोटा पुरविल्या जाव्यात.

(क) शक्य असल्यास, एसबीएन नसलेल्या बँक नोटा वितरित करण्यासाठी, एटीएममध्ये अतिरिक्त कॅसेट्स टाकल्या जाव्यात.

(3) प्रति दिन प्रति कार्ड रु.2000 ची निकासी मर्यादा

बँकांनी (कार्डे देणा-या) त्यांच्या कार्ड व्यवस्थापन प्रणालीत/कोअर बँकिंग प्रणालीत पुढील गोष्टींची खात्री करण्यासाठी आवश्यक ते बदल करावेत.

(1) एटीएममधून पैसे काढण्यासाठी, प्रति दिन प्रति कार्ड रु. 2000 ची निकासी मर्यादा लागु करण्यात आली आहे.

(2) ही मर्यादा, एका आठवड्यात रु.20,000 च्या सर्वसमावेशक निकासी मर्यादेमध्ये (एटीएममधून व पाँईंट ऑफ सेल येथील निकासी सह) सर्व चॅनल्समध्ये ठेवली गेली आहे.

(3) ह्या मर्यादांमध्ये सुधारणा केल्या गेल्यास आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.

(4) बँकिंग कॉरेस्पॉडंट्सच्या मार्फत निकासी

बीसी हे बँकेचे एजंटच असल्याने एसबीएनचा स्वीकार व वितरण हे विद्यमान सूचना व इतर बाबींसह बँक काऊंटर्सवरुन निकासी करण्यासाठीच्या मर्यादांमध्येच आहे (जीओआय वृत्तपत्र निवेदन दि. नोव्हेंबर 8, 2016) मध्ये निर्देशित केल्यानुसार ह्याची खात्री करुन घेण्यासाठी, मायक्रो-एटीएम्स व आधार साह्य प्रदान प्रणाली (एईपीएस) मार्फत केलेल्या निकासी व्यवहारांबाबत, बँकांनी त्यांच्या बीसींना योग्य त्या सूचना द्याव्यात.

(5) कॅश डिपॉझिट मशीन्स व कॅश रिसायक्लर्स मार्फत ठेवींचा स्वीकार

(अ) केवळ पुढील अटी त्यांनी पूर्ण केल्या असल्यासच, बँका, कॅश डिपॉझिट मशीन्स (सीडीएम्स) व कॅश रिसायक्लर्स (सीआर) ह्यांना कार्यान्वित ठेवतील.

(1) ही सीडीएम्स व सीआर, एसबीएन वितरित देण्यासाठी असमर्थ केली जातील.

(2) सीडीएम व सीआर ह्यांचे कार्य (कनफिगरेशन) अशा प्रकारे ठेवले जाईल की (केवळ डिसेंबर 30, 2016 पर्यंत), ती यंत्रे, कार्ड आधारित सत्यांकनाचा उपयोग करुन (एसबीएन जमा करण्यासाठी विना कार्ड डिपॉझिट करता येणार नाही), केवळ कार्ड धारकांसाठीच ती रक्कम जमा करता येईल (दुस-या शब्दात, तृतीय पक्षाच्या खात्यात जमा केलेल्या ठेवी स्वीकारल्या जाणार नाहीत)

(ब) हा सीडीएम व सीआर, एसबीएन नसलेल्या नोटांचा स्वीकार आणि/किंवा वितरण करणे सुरुच ठेवतील - मात्र त्यासाठी, एटीएम मार्फत निकासीच्या मर्यादा त्या व्यवहारांना लागु होतील.

(6) उच्च मूल्याच्या बँक नोटा (रु.500 व रु.2000) नवीन मालिकेमधील बँक नोटा वितरित करण्यासाठी व स्वीकारण्यासाठीची तयारी

बँका ह्याचीही खात्री करुन घेतील की, महात्मा गांधी मालिकेमधील (नवी) उच्च मूल्याच्या नोटा उपलब्ध होतील तेव्हा, त्यांची एटीएम्स व सीआर, त्या नोटा वितरीत करण्यासाठी (निकासी) व स्वीकारण्यासाठी (जमा) तयार ठेवली जातील.

(2) संदर्भित परिपत्रकाच्या बाब क्र. 2(1) व 2(6) मधील सूचनांच्या बदलानुसार, बँकांना आता सांगण्यात येते की, व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सनी, माघारी घेतलेल्या बँक नोटा जमा करण्यासाठी, त्यांच्या रोकड पुरविणा-या बँकांकडे जावे.

(3) ग्राहक सेवेत सुधारणा करण्यासाठी, पुढील अतिरिक्त व्यवस्था ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे.

(1) बदलून देण्याच्या सेवा देण्यासाठी, बँकेचे काऊंटर्स विस्तारित काळासाठी खुले ठेवले जावेत.

(2) बदलून देण्याच्या सेवांबाबत जनतेला मदत करण्यासाठी बँकांनी हेल्पलाईन ठेवावी. अशा हेल्पलाईन बाबतची माहिती बँक शाखांमध्ये प्रदर्शित केली जावी तसेच त्या बँकेच्या वेबसाईटवरही टाकली जावी.

(3) पूर्वी विहित केलेल्या अटीवर, प्रति दिन कार्ड रु.2000/- रोख रक्कम, पीओएस टर्मिनल्स मार्फत काढण्यास परवानगी असावी.

(4) पुनरावलोकन केल्यानंतर, आमचे दि. 8, नोव्हेंबर 2016 च्या परिपत्रकाच्या परिच्छेद 3(4) मध्ये निर्देशित केलेली, बिझिनेस कॉरेस्पॉडंट्स मार्फत अदलाबदलीची सुविधा रद्द करण्यात आली आहे.

(5) वरील सूचनांची अंमलबजावणी ताबडतोब करावयाची आहे.

(6) कृपया पोच द्यावी.

आपली विश्वासु,

(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��