Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 22/03/2021
केंद्रीकृत प्रदान प्रणालीमधील मोठ्या मूल्याच्या व्यवहारांसाठी लीगल एंटीटी आयडेंटीफायर – (एलईआय)

(मार्च 22, 2021 रोजी अद्यावत केलेले)

(1) एल ई आय म्हणजे काय व त्याचा हेतु/उपयोग काय ?

उत्तर :- जगभरातील वित्तीय व्यवहार करणा-या पक्षांना एकमेव रीतीने ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा 20 कॅरॅक्टर अल्फा न्युमरिक कोड म्हणजेच लीगल एंटीटी आयडेंटीफायर (एलईआय). अधिक चांगल्या जोखीम व्यवस्थापनासाठी, वित्तीय डेटा रिपोर्टिंग प्रणालींचा दर्जा व बिनचुकपणा सुधारण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. एखाद्या वित्तीय व्यवहारामध्ये एक पक्ष असलेल्या अधिकार क्षेत्रातील प्रत्येक कायदेशीर संस्थेला एकमेव अशा रितीने ओळखणारी एक जागतिक संदर्भ डेटा प्रणाली निर्माण करण्यास तिचा वापर केला जातो. एलईआयची अंमलबजावणी व उपयोगाला साह्य करणारी संस्था, म्हणजेच ग्लोबल लीगल एंटीटी आयडेंटीफायर फाऊंडेशन (जीएलइआयएफ) ह्या संस्थेने मान्यता दिलेल्या कोणत्याही स्थानिक कार्यकारी एककांकडून (एल ओ यू) तो संकेत मिळविता येऊ शकतो. भारतामध्ये, लीगल एंटिटी आयडेंटीफायर इंडिया लि. (एलईआयएल) कडून (https://www.ccilindia-lei.co.in) एलईआय मिळविता येऊ शकतो. आणि ह्या संस्थेला एलईआय देणारी संस्था म्हणून आरबीआयनेही मान्यता दिली आहे.

(2) कोणत्या व्यवहारांमध्ये एलईआय माहिती समाविष्ट असावी ?

उत्तर :- संस्थांनी (वैय्यक्तिक/व्यक्तिगत नसलेल्या) रु.50 कोटी व त्यावरील मूल्याच्या एकल प्रदान व्यवहारांमध्ये प्रेषक व लाभार्थीची एलईआय माहिती समाविष्ट केली जावी. एनईएफटी व आरटीजीएस प्रदान प्रणालीमार्फत केलेल्या व्यवहारांनाही हे लागु आहे.

आरटीजीएसच्या बाबतीत, वरील निकष पूर्ण करणा-या ग्राहक प्रदान व आंतर बँकीय व्यवहार ह्या दोन्हीहीमध्ये एलईआय माहिती समाविष्ट केली जावी.

(3) वैय्यक्तिक ग्राहक व्यवहारांसाठी एलईआय आवश्यक आहे काय ?

उत्तर :- नाही. प्रेषक व लाभार्थी हे दोन्हीही पक्ष व्यक्ती असलेल्या ग्राहक व्यवहारात एलईआयची आवश्यकता नाही. ह्यापैकी एक किंवा दोन्हीही पक्ष व्यक्ती नसल्यास एलईआय आवश्यक आहे.

(4) एनईएफटी व आरटीजीएस मध्ये व सभासद संस्थांच्या संदेशांमध्ये एलईआय टाकण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शक तत्त्वे कोणती ?

उत्तर :- (1) एनईएफटी प्रदान संदेशांमध्ये फील्ड 7495 हे एक फ्री फॉरमॅट ऑप्शनल फील्ड असून त्यात अल्फा न्युमरिक पर्याय असलेल्या प्रत्येकी 35 कॅरॅक्टर्स असलेल्या 6 लाईन्स असतात. ह्या फील्डच्या पहिल्या दोन लाईन्स अनुक्रमे प्रेषक व लाभार्थींची एलईआय माहिती - लागु असेल तेथे व उपलब्ध असल्यास साठविण्यास/भरण्यास वापरल्या जातील. एलईआय माहिती, भरल्यानंतर नॅरेशन, रिमार्क्स इत्यादि फील्डच्या शेष 4 लाईन्सचा भाग असतील. प्रेषक व लाभार्थींची माहिती पुढील नमुन्यात घेतली/भरली जाईल.

7495: line 1 -> SL/20 digit sender LEI/

line 2 -> BL/20 digit beneficiary LEI/

(2) आरटीजीएसच्या ग्राहक प्रदान व आंतर बँकीय संदेशांमध्ये, ऑप्शनल फील्ड न्न् मध्ये प्रत्येकी 140 कॅरॅक्टर्स असलेले 4 रिपीट टॅग्ज् असतात. ह्या फील्डचे प्रथम दोन लूप्स, अनुक्रमे प्रेषक व लाभार्थी ग्राहकाची एलईआय माहिती भरण्यास - लागु असेल तेथे व उपलब्ध असल्यास - वापरले जातील. एलईआय माहिती भरली गेल्यावर, नॅरेशन, रिमार्क्स इत्यादि ह्या फील्डच्या शेष दोन लूप्सचा भाग असतील. प्रेषक व लाभार्थींची माहिती पुढील नमुन्यात घेतली/भरली जाईल.

<-RmtInf-> loop 1 -> /SL/20 digit sender LEI/

loop 2 -> /BL/20 digit beneficiary LEI/

(5) एलईआय रेकॉर्ड केले जावेत असे खात्यांचे प्रकार कोणते ?

उत्तर :- वैय्यक्तिक/व्यक्तिगत नसलेल्या सर्व एनईएफटी/आरटीजीएस संदेश/व्यवहार ह्यासाठी एलईआयची नोंद दिली जाईल. संस्थांच्या प्रकारांची निर्देशक यादी, लीगल एंटीटी आयडेंटिफायर इंडिया लि. (एल ई आय एल) ह्यांनी https://www.ccilindia-lei.co.in/Documents/FAQs.pdf. येथे दिली आहे.

(6) प्रतिपक्षाची एलईआय माहिती, म्हणजे आवक व्यवहारासाठी प्रेषकाची व जावक व्यवहारासाठी लाभार्थीची, बँकांनी घेणे आवश्यक आहे काय ?

उत्तर :- प्रेषक बँकेने खात्री करुन घ्यावी की प्रेषक व लाभार्थी ह्या दोन्हीही साठीची एलईआय माहिती घेण्यात आली आहे. तथापि, प्रेषक तसेच लाभार्थी अशा दोन्हीही बँकांनी रु.50 कोटी व त्यावरील रकमेच्या सर्व प्रदान व्यवहारांची माहिती रेकॉर्ड करुन ठेवावी.

(7) पोट-सभासद बँका/बँका/बीसी/डब्ल्युएलए इत्यादिसारख्या वित्तीय संस्थांनी केलेले रु.50 कोटी व त्यावरील कार्यकारी व्यवहार ह्या मार्गदर्शक तत्त्वांतून वगळण्यात आले आहे काय ?

उत्तर :- लागु असलेल्या व्यवहार-प्रकारांसाठी प्रश्न 2 च्या उत्तराचा संदर्भ घ्यावा.

(8) बँकांनी, त्यांच्या अंतर्गत प्रदानांसाठी, कॉर्पोरेट संस्थांना कर्ज वाटपासाठी, मुदत ठेवी, परिपक्वतेनंतरच्या कार्यकृती, खाती बंद करण्याच्या कार्यरीती ह्यासाठी केलेल्या व्यवहारांसाठी एलईआय लागु असेल काय ?

उत्तर :- लागु असलेल्या व्यवहार-प्रकारांसाठी प्रश्न 2 च्या उत्तराचा संदर्भ घ्यावा.

(9) डब्ल्यु ई बी - एपीआय संदेशांसाठी नमुन्यामधील हा बदल लागु आहे काय ?

उत्तर :- आरटीजीएसला जोडण्यासाठी वापरण्यात येणा-या सर्व चॅनल्सना, उदा. - थिक-क्लायंट, वेब एपीआय (इन्फीनेट किंवा अन्य मान्यताप्राप्त नेटवर्क मार्फत) आणि पेमेंट ओरिजिनेटर मॉड्युल साठी ह्या एलईआय सूचना लागु आहेत.

हे एफएक्यु आरबीआयने केवळ सर्वसाधारण मार्गदर्शन व माहितीसाठी दिले आहेत. ह्यांच्या आधारावर केलेल्या कृती आणि/किंवा घेतलेले निर्णय ह्यासाठी ही बँक जबाबदार असणार नाही. स्पष्टीकरणे व इंटरप्रिटेशन्स पाहिजे असल्यास, ह्या बँकेने वेळोवेळी दिलेल्या संबंधित परिपत्रकांचे व अधिसूचनांचे मार्गदर्शन घेतले जावे.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä