Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 19/11/2020
विशेष अनिवासी रुपये खाती

(नोव्हेंबर 19, 2020)

सूचना :- (अ) भारताबाहेर निवासी असलेल्या व्यक्तीकडून, प्रत्येक व्यवहारासाठी, परिवर्तनीय विदेशी मुद्रेमध्ये निवासी व्यक्तीला, किंवा ह्या उलट, अंतर्गत/आवक (बाह्य) प्रेषणे पाठविली जाण्याऐवजी, एसएनआरआर खात्याचा वापर, ट्रेडिंग, विदेशी गुंतवणुकी, बाह्य वाणिज्य कर्जे इत्यादीमधील विहित/विशिष्ट व्यवहारांसाठी करण्यास परवानगी देण्यात आली असल्याने, अशा व्यवहारांमधील प्रतिपक्षांच्या ओळखीची खात्री करुन घेण्याबाबत प्राधिकृत डीलर (एडी) बँकांनी सर्व प्रकारच्या सावधानता ठेवणे आवश्यक आहे. खालील एफएक्युंमध्ये ह्यापैकी काही सावधानता दिल्या आहेत. मार्गदर्शन तत्त्वांनुसार एसएनआरआर व्यवहारांचा वापर व ओळख ह्यांची खात्री करुन घेण्याची जबाबदारी एडी बँकांवरच असेल.

(ब) ह्या एफएक्युंच्या तरतुदी, एफपीआय, एफव्हीसीआय ह्यांच्या एसएनआरआर खात्यांना आणि कस्टडियन मार्फत चालविण्यात येणा-या डिपॉझिटरी रिसीट/एफसीसीपी कनव्हर्शन खात्यांना लागु असणार नाहीत व त्या ‘ठेवी व खाती ह्यावरील महानिर्देश’ च्या विभाग 2 च्या परिच्छेद 7.1 (1) खाली येतात.

(1) एसएनआरआर खात्यांमधून केलेल्या व्यवहारांसाठी अनुसरावयाच्या प्रक्रिया कोणत्या ?

(अ) एसएनआरआर खात्यात डेबिट करण्यासाठीची प्रदाने :- भारतामध्ये निवासी असलेल्या व्यक्तीच्या हितसंबंधात, एसएनआरआर खात्यात डेबिट करावयाची आयएनआर प्रदाने हाताळताना, एडी बँकेने खात्री करुन घ्यावी की, तो व्यवहार, प्राप्तर्कत्या बँकेला, इलेक्ट्रॉनिक रितीने किंवा मानवी संदेशाने, एक एसएनआरआर व्यवहार म्हणून (लागु असल्यास पारपत्र कोड व देशाचा तपशील ह्यासह) कळविण्यात आला आहे.

(ब) एसएनआरआर खात्यात क्रेडिट करण्यासाठी मिळालेली प्रदाने :- ते एसएनआरआर खाते ठेवणा-या एडी बँकेने खात्री करुन घ्यावी की, त्या एसएनआरआर खात्यात क्रेडिट करण्यासाठी आलेले कोणत्याही देशांतर्गत अंतर्गत प्रेषण हे वरील अ प्रमाणे एसएनआरआर व्यवहार असल्याचे निश्चित केले जाईल.

(क) एडी बँकांनी खात्री करुन घ्यावी की, फेमामध्ये किंवा त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमांमध्ये किंवा विनियमांमध्ये असलेल्या निरनिराळ्या फेमा तरतुदींचे किंवा एसएनआरआर खात्यांशी संबंधित व्यवहारांबाबत त्याखाली देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यात येत/आले आहे.

(2) ट्रेडिंग व्यवहारांबाबतच्या फेमा अनुपालनासाठी कोण जबाबदार आहे ?

(अ) एसएनआरआर खात्यात डेबिट करण्यासाठी (देशांतर्गत ऑनवर्ड कर्जासाठी)

विदेशातील खरेदीदाराच्या एसएनआरआर खात्यात डेबिट करुन भारतीय पक्षाकडून निर्यात उत्पन्न/रक्कम मिळण्याबाबत :-

  • निर्यात प्रदानासाठी मिळालेल्या कोणत्याही अंतर्गत प्रेषणाप्रमाणेच, निर्यातीचे कागदपत्र हाताळणारी एडी बँक खात्री करुन घेईल की, फेमाखाली विहित केलेले निर्यात संबंधित सर्व नियम/विनियम/मार्गदर्शक तत्त्वे ह्यांचे अनुपालन करण्यात आले आहे.

  • विदेशातील ग्राहकाचे ड्यु डिलिजन्स करण्यासाठी व संबंधित फेमा अनुपालनांसाठी, ते एसएनआरआर खाते ठेवणारी एडी बँक जबाबदार असेल. ह्याशिवाय ती बँक भारतीय निर्यातदाराच्या एडी बँकेकडे (लाभार्थीची बँक) निधी हस्तांतरण करतेवेळी संबंधित प्रेषणाबाबतच्या ईडीपीएसएस मधील एंट्रीज समाप्त करण्यास लाभार्थी बँकेला मदत करण्यासाठी, त्या खातेदाराचा संपूर्ण केवायसी तपशील, प्रेषणाचा हेतु, प्रेषणाचे चलन व रक्कम, लाभार्थीचे नाव, खाते क्रमांक इत्यादी उपलब्ध करुन देईल.

(ब) एसएनआरआर खात्यात क्रेडिट करण्यासाठी (देशांतर्गत खात्यातून मिळालेले)

विदेशातील विक्रेत्याच्या एसएनआरआर खात्यात क्रेडिट करुन, भारतीय पक्षाकडून आयातीचे प्रदान करण्याबाबत :-

  • आयातीचे प्रदान करण्यासाठी पाठविलेल्या कोणत्याही जावक प्रेषणाप्रमाणेच, आयातीचे कागदपत्र हाताळणा-या व निधी पाठविणा-या एडी बँकेने (आयातकाराची बँक), फेमाखाली विहित केलेल्या आयात-संबंधित सर्व नियम/विनियम/मार्गदर्शक तत्त्वे ह्यांचे पालन केले गेले असल्याची खात्री करुन घ्यावी.

  • त्याचप्रमाणे विदेशातील ग्राहकाचे एसएनआरआर खाते ठेवणा-या एडी बँकेला आवश्यक असल्यानुसार, तिने, आयातकाराशी संबंधित सर्व तपशील कळवावा.

(क) त्याचप्रमाणे, ईसीबी, व्यापारी कर्जे, विदेशी गुंतवणुकी इत्यादींच्या बाबतीत, निवासी ग्राहकाचे खाते ठेवणारी, नेमण्यात आलेली एडी बँक, आवक (इनवर्ड) प्रेषणाद्वारे व मुक्तपणे परिवर्तनीय मुद्रेमध्ये मिळालेल्या पैशांच्या बाबतीत तिने (त्या एडी बँकेने) केले असले त्याप्रमाणेच, लागु असेल तेथे एफआयआरसी देण्यासह, फेमा तरतुदीचे पालन करण्यास जबाबदार असेल. ह्याशिवाय, त्या व्यवहारात गुंतलेल्या/भाग घेणा-या बँकांही, वरील प्रमाणेच त्या व्यवहारांचा तपशील शेअर करण्यास जबाबदार असतील.

(3) निधी प्रेषण करणा-या बँकेने ए2 रिपोर्टिंग करणे आवश्यक आहे काय ?

होय, विदेशात प्रेषण करण्यासाठी ए2 रिपोर्टिंग आवश्यक असलेल्या देशांतर्गत भारतीय पक्षाने केलेल्या कोणत्याही व्यवहारासाठी, एखाद्या एसएनआरआर खात्यात क्रेडिट करण्यासाठी केलेल्या देशांतर्गत प्रेषणासाठीही त्याची आवश्यकता असेल.

(4) परपज कोड वापरावयाचे असते काय व एफईटीईआरएस रिपोर्टिंगसाठी कोण जबाबदार आहे ?

(अ) फेटर्सखाली (आर रिटर्न) विनियामक रिपोर्टिंग करण्याचे काम एसएनआरआर खाते ठेवणारी बँक वरील

(ब) एसएनआरआर खाते ठेवणा-या अनिवासी संस्थेच्या, एसएनआरआर खात्यातून/खात्यामध्ये, त्याच्या ऑफ शोअर खात्यात झालेले डेबिट/क्रेडिट, एडी बँक हस्तांतरणाखाली वळविले जाईल.

(क) एखाद्या एसएनआरआर खात्यामध्ये/खात्यामधून एखाद्या देशांतर्गत (भारतीय) पक्षाला करण्यात आलेले क्रेडिट/डेबिट, संबंधित व्यवहाराच्या आधारावर (आयात, निर्यात, ट्रेड क्रेडिट, सेवा, ईसीबी इत्यादि) कळविले जाईल.

कृपया नोंद घेण्यात यावी की, एसएनआरआर खाते ठेवणारी बँक, तिने ठेवलेल्या इतर आयएनआर व्होस्ट्रो खात्यांना लागु असलेल्या रिपोर्टिंग रीतीचे पालन करतील. कृपया, कंपायलेशन ऑफ आर-रिर्टन्स :- रिपोर्टिंग अंडर फेटर्स वरील ए.पी. (डीआयआर सिरीज) परिपत्रक क्र. 25 दि. मार्च 20, 2019 चा संदर्भ घ्यावा.

(5) एसएनआरआर खात्यात परवानगी असलेले व्यवहारांचे प्रकार कोणते ?

ए.पी. (डीआयआर सिरीज) परिपत्रक क्र. 09 दि. नोव्हेंबर 22, 2019 खाली परवानगी देण्यात आलेल्या व्यवहारांसाठी एसएनआरआर खात्याचा उपयोग केला जाऊ शकतो. तथापि, इतर फेमा अनुपालनांव्यतिरिक्त, अशा व्यवहारांचे फेटर्सखाली रेकॉर्डिंग करणे व रिपोर्ट करणे केले जाणे शक्य असल्यासच असे व्यवहार केले जावेत. येथे नोंद घेण्यात यावी की, उदारीकृत प्रेषण योजनेखालील (एलआरएस) व्यवहार, एसएनआरआर खात्यांमधून करण्यास परवानगी नाही.

(6) एका एसएनआरआर खात्यामधून दुस-या एसएनआरआर खात्यामध्ये हस्तांतरण करण्यास परवानगी आहे काय ?

केवळ ट्रेडिंग, ईसीबी, ट्रेड क्रेडिट्स इत्यादींसारख्या व्यवहारांच्या वर्गांसाठी करण्याच्या हेतूसाठीच, त्याच अनिवासी व्यक्तीच्या एसएनआरआर खात्यांमध्ये/खात्यांदरम्यान हस्तांतरण करण्यासाठी अशी हस्तांतरणे फेटर्स रिपोर्टिंगचा एक भाग असणार नाहीत.

(7) एसएनआरआर खातेधारक, इतर ऑफ शोअर संस्थांच्या/व्यक्तींच्या (म्हणजे, अनिवासी एसएनआरआर खाते धारक सोडून अन्य) खात्यांमधून उत्पन्न मिळवू शकतो काय/खात्यांमध्ये प्रदान करु शकतो काय ?

नाही. केवळ एसएनआरआर खाते धारक अशा अनिवासी व्यक्ती/संस्थांच्या ऑफ शोअर खात्यात, पात्र असलेल्या रिसीट्स/प्रदाने करण्यास परवानगी आहे.

(8) एसीयु देशांना माल पाठविण्यासाठी एसीयु मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे लागेल काय?

एसीयु देशांबरोबर केलेले व्यापारी/ट्रेडिंग व्यवहार, वेळोवेळी सुधारित केलेल्या अधिसूचना फेमा 14 (आर) च्या विनियम 3(1)(अ) व विनियम 5(1)(अ) ने नियंत्रित असून त्यांचे समायोजन/तडजोड एसीयु यंत्रणेखाली किंवा त्यात व्याख्या केल्यानुसार/दिल्यानुसार केले जावे. ह्यासाठी एसीयु देशांदरम्यानचे व्यवहार स्पष्ट व वेगळे ठेवले जावेत व ते व्यवहार एसएनआरआर व्यवस्थेच्या बाहेर, विद्यमान सूचनांनुसार तडजोडित केले जावेत.

(9) एसएनआरआर खात्यातील शिल्लकांवर किंवा मुदत ठेवीवर व्याज मिळविता येते काय ?

नाही.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä