Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 12/12/2020
कोविड-19 संबंधित तणावासाठी, द्रवीकरण (रिझोल्युशन) साचा वरील एफएक्यु (डिसेंबर 12, 2020 रोजी अद्यावत केलेले)

(1) द्रवीकरण साचाच्या जोडपत्रातील परिच्छेद 4 मध्ये निर्देशित केले आहे की, द्रवीकरण करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या कर्ज थकबाकीच्या रकमेसाठीची संदर्भ-तारीख मार्च 1, 2020 असेल. ह्याचा अर्थ असा आहे काय की, ह्या द्रवीकरण साचाखाली केवळ मार्च 1, 2020 रोजीच असलेली कर्ज थकबाकी द्रवीभूत केली जाऊ शकते ?

द्रवीकरण साचाच्या जोडपत्रातील परिच्छेद 4 मध्ये दिलेली अट ही, द्रवीकरण साचाखाली द्रवीकरण करण्यासाठी मूल्यमापन करण्यासाठीच्या पात्रता निकषांच्या तारखेबाबतचा एक सर्वसाधारण खंड आहे. द्रवीकरण साचाच्या जोडपत्रामधील विभाग अ व विभाग ब खाली द्रवीकरण करण्यासाठी खात्यांची पात्रता ठरविण्यासंबंधाने, संदर्भित तारीख विशिष्ट/नेमक्या रितीने लागु करण्याबाबत अनुक्रमे परिच्छेद 6 व 13 मध्ये वेगळ्याने निर्देशित करण्यात आले आहे. म्हणजे, मार्च 1, 2020 रोजी, कोणत्याही कर्ज देणा-या संस्थेमधील, 30 दिवसांपेक्षा जास्त कसुरी न केलेल्या कर्जदारांना प्रमाणभूत म्हणून वर्गीकृत करण्याची आवश्यकता. द्रवीकरण करण्यासाठी विचारात घ्यावयाचे कर्ज हे, आवाहन (इनवोकेशन) करण्याच्या तारखेस थकित असलेले कर्ज असेल.

(2) महानिर्देश एफआयडीडी.सीओ.प्लान.1/04.09.01/2016-17 दि. जुलै 7, 2016 (अद्यावत केल्यानुसार) मधील परिच्छेद 6.1 मध्ये निर्देशित केलेली सर्वच्या सर्व कृषी कर्जे ह्या द्रवीकरण साचाखाली अपात्र ठरतात काय ? एमएफआयनी कृषी-घरांना दिलेली सर्व जेएलजी कर्जे, ह्या द्रवीकरण साचाखालील द्रवीकरण योजनेसाठी पात्र आहेत काय ?

महानिर्देश एफआयडीडी.सीओ.प्लान./04.09.01/2016-17 दि. जुलै 7, 2016 (अद्यावत केल्यानुसार) च्या परिच्छेद 6.1 मध्ये निर्देशित केलेल्या स्वरुपाची, एनबीएफसींसह सर्व कर्जदायी संस्थांनी, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, पशुपालन, कुक्कुट पालन, मधुमक्षिका पालन व सेरीकल्चर ह्यासारख्या संबंधित कार्यकृती सोडून अन्यथा दिलेली सर्व कृषी कर्जे, ह्या द्रवीकरण साचाच्या व्याप्तीमधून वगळण्यात आली आहेत. वरील अटीनुसार, द्रवीकरण साचामधील वगळण्याच्या/वगळण्यासाठीच्या इतर अटी पूर्ण केलेल्या नसल्यास, शेतक-यांना दिलेली घरगुती कर्जे (हाऊसहोल्ड) देखील, ह्या द्रवीकरण साचाखाली समाप्त करण्यास पात्र असतील.

(3) रियल इस्टेट क्षेत्र व बहुविध संलेखांद्वारे एखाद्या कंपनीने अनेक प्रकल्पांना वित्तसहाय्य केले आहे अशा अन्य क्षेत्रांमध्ये, आयसीए एसक्रो अकाऊंट आणि विहित केलेल्या मर्यादेसह वित्तीय पॅरामीटर्स ह्या बाबी, कर्ज देणा-या संस्थांना ज्यांच्याबाबत एक्सपोझर आहे अशा कायदेशीर संस्थांऐवजी, प्रकल्प स्तरावर लागु करता येईल काय ?

कर्जदायी संस्थांना ज्यांच्या बाबतीत एक्सपोझर आहे अशा संस्थांच्या बाबतीत आयसीएची आवश्यकता असणे हे, प्रुडेंशियल फ्रेमवर्क फॉर रिझोल्युशन ऑफ स्ट्रेस्ड् अॅसेट्स दि. जून 7, 2019 चे व परिणामी द्रवीकरण साचाचेही एक मूलभूत लक्षण आहे. जिच्या बाबत एक्सपोझर आहे अशा एखद्या कायदेशीर संस्थेबाबत आयसीए तयार करण्यास, कर्जदायी संस्थांना पुरेशी लवचिकता मिळाली असून, हे एखपोझर प्रकरण निहाय प्रत्येक कर्जदाराच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याबाबत, तसेच त्याच एका आयसीए खाली/मध्ये, त्याच कर्जदाराखाली असलेल्या निरनिराळ्या प्रकल्पांच्या द्रवीकरणासाठी निराळाच दृष्टिकोन ठेवण्याबाबत असू शकेल. त्याचप्रमाणे, द्रवीकरण साचानुसार, त्या कायदेशीर संस्थेच्या स्तरावर एसक्रो अकाऊंट ठेवणा-या आवश्यकते व्यतिरिक्त, धनकोंना तसे वाटत असल्यास, प्रत्येक प्रकल्प स्तरावरही अतिरिक्त असे वेगवेगळे एसक्रो अकाऊंट ठेवण्यास प्रतिबंध नाही. मात्र, रियल इस्टेट क्षेत्रातील कर्जदारांबाबत व निवासी तसेच व्यापारी रियल इस्टेट असे दोन्हीही व्यवसाय असणारांबाबत, वित्तीय पॅरामीटर्ससाठी विहित केलेल्या मर्यादा, प्रकल्प स्तरावर लागु केल्या जाऊ शकतात.

(4) द्रवीकरण साचा निर्देशित करतो की, पात्रतेच्या अटी पूर्ण न करणा-या खात्यांना संस्थेच्या विशिष्ट वर्गाला लागु असलेल्या प्रुडेंशियल साचाखाली विचारात घेतले जावे. ह्याचा अर्थ असा होतो काय की, गृहनिर्माण वित्त कंपन्यांसाठी असलेल्या, महापरिपत्रक - गृहनिर्माण वित्त कंपन्या (एन एच बी) निर्देश, 2020 च्या परिच्छेद 2 (1) (झेडसी) (2) सारख्या आणि नागरी सहकारी बँकांसाठी असलेल्या, महापरिपत्रक - उत्पन्न ओळख व अॅसेट वर्गीकरण, तरतुदीकरण व इतर संबंधित बाबी - युसीबी, दि. जुलै 1, 2015 च्या परिच्छेद 2.2.7.21 सारख्या विशिष्ट संस्था-वर्गांना लागु असलेले पर्यायी द्रवीकरण साचे, कोविड-बाधित नसलेल्या कर्जदारांनाही लागु होत राहतील ?

कोविड-19 संबंधित ताण-तणावासाठीच्या द्रवीकरण साचावरील परिपत्रक दि. ऑगस्ट 6, 2020 खाली द्रवीकरणासाठी पात्र असलेल्या कर्जदारांसाठी, त्या परिपत्रकाखालील द्रवीकरण प्रक्रिया अवाहित केल्यास, परिपत्रक दि. ऑगस्ट 6, 2020 लागु असेल. इतर सर्व कर्जदारांसाठी, अन्यथा लागु असलेल्या विद्यमान सूचना जारी असतील. तथापि, एखादी संस्था, ह्या द्रवीकरण साचाखाली द्रवीकरण करण्यासाठी अन्यथा पात्र असल्यास, देशभरातील स्पर्धा मधून निर्माण झालेल्या तणावाचे द्रवीकरण करण्यासाठी केवळ द्रवीकरण साचाचाच उपयोग केला जाऊ शकतो.

(5) जेएलजी कर्जदारांसह, व्यक्तीने दिलेली सूक्ष्म वित्त कर्जे, ह्या द्रवीकरण साचाखाली द्रवीकरण करण्यास पात्र आहेत काय ? त्याचप्रमाणे, अकृषिक कार्यकृती करणा-या स्वयंसेवा गटांना (एसएचजी) मंजुर केलेली कर्जेही, ह्या द्रवीकरण साचाखाली लाभ घेण्यास पात्र आहेत काय ?

द्रवीकरण साचाच्या जोडपत्राच्या परिच्छेद 2 मध्ये दिलेल्या अपवादाखाली येत नसल्यास, पात्रतेचे निकष पूर्ण करणारी सर्व कर्जे, वर अनुक्रमांक 2 मध्ये दिलेल्या स्पष्टीकरणाच्या अटीवर, ह्या साचाखालील द्रवीकरणाच्या व्याप्तीत येतात. द्रवीकरण साचाच्या जोडपत्रातील परिच्छेदामध्ये निर्देशित केलेल्या वर्गात येत नसल्यास, ही कर्जे, ‘एक्सबीआरएल रिर्टन्स - हार्मोनायझेशन ऑफ बँकिंग स्टॅटिस्टिक्स’ वरील परिपत्रक डीबीआर.क्र.बीपी.बीसी.99/08.13.100/2017-18 दि. जानेवारी 4, 2018 मध्ये व्याख्या केलेल्या ‘व्यक्तिगत कर्जे’ खाली येत असल्यास, व कोणत्याही विनियामक/पर्यवेक्षकीय रिपोर्टिंगमध्ये किंवा अन्यथा ह्या जोडपत्राच्या विभाग ब खाली तशा प्रकारे खास वर्गीकृत केलेली नसली तरीही, ह्या जोडपत्राच्या विभाग अ खाली द्रवीकरणासाठी पात्र आहेत.

(6) द्रवीकरण योजनेच्या परिच्छेद 8 मध्ये निर्देशित करण्यात आले आहे की, ह्या साचाखालील द्रवीकरण 31 डिसेंबर, 2020 पर्यंतच आवाहित केले जाऊ शकते. व त्याची अंमलबजावणी आवाहित करणा-या तारखेपासून 90 दिवसांच्या आतच केली जाणे आवश्यक आहे. ह्या संदर्भात ‘आवाहित करणे’ (इनवोकेशन) व ‘अंमलबजावणी’ ह्या संज्ञांचा अर्थ काय ?

पात्र असलेल्या व्यक्तिगत कर्जाबाबत, आवाहित करणे व अंमलबजावणी ह्यांच्या व्याख्या द्रवीकरण साचाच्या जोडपत्रातील, अनुक्रमे परिच्छेद 7 व 10 मध्ये दिल्या आहेत. पात्र असलेल्या इतर कर्जांबाबत, आवाहित करण्याचा अर्थ, द्रवीकरण साचाच्या जोडपत्रातील परिच्छेद 14 व 15 प्रमाणे असेल व अंमलबजावणीचा अर्थ, प्रुडेंशियल फ्रेमवर्क फॉर रिझोल्युशन ऑफ स्ट्रेस्ड् अॅसेट्स वरील परिपत्रक दि. जून 7, 2019 च्या परिच्छेद 14-16 प्रमाणे असेल.

(7) कॉर्पोरेट बाँड्स, कमर्शियल पेपर्स इत्यादींसारख्या कर्ज पर्यायांसारख्या गुंतवणुक एक्सपोझर्स सह, हा द्रवीकरण साचा सर्व एक्सपोझर्सना लागु आहे काय ?

हा द्रवीकरण साचा, गुंतवणुकीतील एक्सपोझर्ससह, कर्जदायी संस्थांच्या, पात्र असलेल्या ग्राहकांबाबत असलेल्या सर्व एक्सपोझर्सच्या द्रवीकरणासाठी आवाहित केला जाऊ शकतो. तथापि, एखाद्या विशिष्ट एक्सपोझर बाबत, संबंधित वित्तीय क्षेत्र विनियामक व आरबीआयचे अन्य विभाग ह्यांनी दिलेल्या लागु असलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांच्या विरुध्द हा द्रवीकरण साचा नाही.

(8) ह्या द्रवीकरण साचामध्ये विहित केलेल्या अतिरिक्त तरतुदी, आयएनडीएएस चे पालन करणा-या एनबीएफसींना लागु आहे काय ?

भारतीय लेखा मानकांचे (आयएनडीएएस) चे पालन करणे आवश्यक असलेल्या एनबीएफसी देखील, कर्ज जोखमीतील लक्षणीय वाढ ओळखणे व अपेक्षित कर्ज-तोट्याचे गणन करणे ह्यासाठी, त्यांच्या संचालक मंडळाने मंजुर केलेल्या व आयसीएआय सल्लागार ह्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे मार्गदर्शन घेतील. तथापि, परिपत्रक दि. ऑगस्ट 6, 2020 मध्ये निर्देशित केलेल्या निरनिराळ्या अतिरिक्त तरतुदी, भारतीय लेखामानकांची अंमलबजावणी ह्यावरील परिपत्रक (एनबीएफसी).सीसी.पीडी.क्र.109/22.10.106/2019-20 दि. मार्च 13, 2020 च्या जोडपत्रातील परिच्छेद 2 साठी प्रुडेंशियल पायाभूत तत्त्वे असतील.

(9) तज्ज्ञ समितीने विहित केलेली व आरबीआयने सप्टेंबर 7, 2020 रोजी अधिसूचित केलेली वित्तीय पॅरामीटर्सची यादी ही केवळ रु.1,500 कोटीपेक्षा अधिक एक्सपोझर असलेल्या कर्जदारांनाच लागु आहे की, द्रवीकरण साचानुसार केलेल्या सर्व द्रवीकरण योजनांनाही लागु आहे ?

परिपत्रक दि. सप्टेंबर 7, 2020 मधील सूचना ही, द्रवीकरण साचावरील ऑगस्ट 6, 2020 रोजीच्या परिपत्रकाच्या जोडपत्रामधील विभाग ब अनुसार, ज्यांच्याबाबत द्रवीकरण केले जात आहे अशा सर्व कर्जदारांच्या बाबतीत लागु आहे.

(10) द्रवीकरण साचाखाली विहित केलेल्या अतिरिक्त तरतुदींना, ठेवण्यात येणा-या विशिष्ट तरतुदी म्हणून समजण्यात यावे की, टायर 2 भांडवल म्हणून समावेश करण्यासाठी अंशतः पात्र अशा सर्वसामान्य तरतुदी समजण्यात यावे ?

ह्या द्रवीकरण साचाखाली विहित केलेल्या निरनिराळ्या अतिरिक्त तरतुदी ह्या, विचाराखाली असलेल्या प्रत्येक एक्सपोझरबाबत ठेवावयाच्या विशिष्ट तरतुदीच आहेत.

(11) अंमलबजावणीखाली असलेल्या प्रकल्पांच्या बाबतीत, द्रवीकरण साचाखाली, कर्ज देणा-या संस्था, वाणिज्य कार्यकृती सुरु करण्याची तारीख (डीसीसीओ) विलंबित (डिफर) असलेल्या द्रवीकरण योजनांची अंमलबजावणी करु शकतात काय ?

डीसीसीओचे विलंबीकरण (डिफरमेंट) असलेल्या, अंमलबजावणी खालील प्रकल्पांच्या बाबतीत, केलेल्या पुनर्रचना, ह्या द्रवीकरण साचाच्या व्याप्तीच्या बाहेर आहेत. परिपत्रक डीबीआर.क्र.बीपी.बीसी.2/21.04.048/2015-16 दि. जुलै 1, 2015 व परिपत्रक डीओआर.क्र.बीपी.बीसी.33/21.04.048/2019-20 दि. फेब्रुवारी 7, 2020 च्या परिच्छेद 4.2.15 मधील विद्यमान विनियम आणि कर्जदायी संस्थांच्या विशिष्ट वर्गाला लागु असलेल्या संबंधित सूचना ह्यानुसार, डीसीसीओची पुनरावृत्ती करण्यास व त्यामुळे प्रदान वेळापत्रकात बदल करण्यास, पुनर् रचना न समजण्यात येता, परवानगी आहे. मात्र त्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांसाठी कमाल चार वर्षे व इन्फ्रास्ट्रक्चर नसलेल्या प्रकल्पांसाठी कमाल दोन वर्षे (वाणिज्य रियल इस्टेट एक्सपोझर्स सह) अशी अट आहे. ह्याशिवाय, मालकीमध्ये बदल झाल्यास, प्रकल्पांचा डीसीसीओ आणखी दोन वर्षांनी वाढविता येऊ शकतो - मात्र त्यासाठी वरील सूचनांमध्ये विहित केलेल्या अटी लागु असतील.

(12) ह्या द्रवीकरण साचाखाली, बँकिंग प्रणालीबाबतच्या एकूण आऊटस्टँडिंग (थकित) एक्सपोझर संबंधाने, अपरिहार्यतेने आयसीए तयार करण्यासाठी काही कमाल कट-ऑफ मूल्य आहे काय ? तसेच, व्यक्तींनी दोन किंवा त्यापेक्षा अधिक बँकांकडून घेतलेल्या कर्जांना हे आयसीए नॉर्म्स लागु आहेत काय ?

द्रवीकरण साचाच्या जोडपत्रामधील विभाग ब अनुसार द्रवीकरण करण्यात आलेल्या कर्जदाराबाबत, अनेक धनको/कर्जदायी संस्थांना एक्सपोझर असल्यास, अशा कर्जदाराबाबत एक्सपोझर असलेल्या सर्व कर्जदायी संस्थांनी आयसीए करणे आवश्यक आहे.

(13) द्रवीकरण साचाच्या जोडपत्रामधील परिच्छेद 33 मध्ये निर्देशित करण्यात आले आहे की, द्रवीकरण प्रक्रिया आवाहित करतेवेळी, कर्जदायी संस्थांचे एकूण एक्सपोझर रु.100 कोटी व त्यापेक्षा अधिक असलेल्या खात्यांबाबतच्या द्रवीकरण योजना करण्यासाठी, प्रुडेंशियल साचाखाली, रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही एका क्रेडिट रेटिंग एजन्सी (सीआरए) द्वारा, स्वतंत्र कर्ज मूल्यमापन (आयसीई) केले जाणे आवश्यक आहे. ह्यासाठीच किमान वाजवी आयसीई सिंबॉल (चिन्ह) कोणता ?

केवळ सीआरएंकडून, उर्वरित/अवशिष्ट कर्जासाठी आरपी 4 किंवा त्यापेक्षा चांगले क्रेडिट ओपिनियन मिळाले असलेल्या द्रवीकरण योजनांनाच, ह्या द्रवीकरण साचाखाली, अंमलबजावणीसाठी विचारात घेतले जाईल. एकापेक्षा अधिक सीआरएंकडून क्रेडिट ओपिनियम मिळविले असल्यास, अशी सर्व क्रेडिट मते, आरपी 4 किंवा त्यापेक्षा चांगली असली पाहिजेत.

(14) राजपत्र अधिसूचना दि. जून 26, 2020 अन्वये एमएसएमई ची व्याख्या सरकारकडून बदलण्यात आली आहे. द्रवीकरण साचाची संदर्भ तारीख मार्च 1, 2020 असल्याने, ह्या द्रवीकरण योजनेखाली द्रवीकरण करण्यासाठीच्या पात्रतेसाठी, एमएसएमई ची कोणती व्याख्या लागु असेल ?

ह्या द्रवीकरण साचाखाली द्रवीकरण करण्याच्या पात्रतेसाठी लागु असलेली एमएसएमई ची व्याख्या मार्च 1, 2020 रोजी असलेल्या व्याख्येनुसार असेल.

(15) सप्टेंबर 7, 2020 रोजीच्या परिपत्रकात, ज्यांच्यासाठी अपरिहार्य वित्तीय पॅरामीटर्ससाठीची थ्रेशहोल्ड मूल्ये विहित केली आहेत अशी केवळ थोडी क्षेत्रे दिली आहेत. ह्याचा अर्थ असा होतो काय की, इतर क्षेत्रांमधील कर्जदारांसाठी हा द्रवीकरण साचा लागू होत नाही ?

परिपत्रक दि. ऑगस्ट 6, 2020 च्या जोडपत्रातील परिच्छेद 2 मध्ये विहिते केलेले अपवाद सोडल्यास, हा द्रवीकरण साचा पात्र असलेल्या सर्व कर्जदारांना लागु आहे. सप्टेंबर 7, 2020 रोजीच्या परिपत्रकात, क्षेत्र-विशिष्ट थ्रेशहोल्ड्स विहित केले नसलेल्या क्षेत्रांच्या बाबतीत, कर्जदायी संस्था, TOL/ATNW व एकूण कर्ज/ EBITDA संबंधाने स्वतःचीच अंतर्गत मूल्यमापने करतील. तथापि, सर्व प्रकरणांमधील विद्यमान गुणोत्तर व डीएससीआर 1.0 व त्यापेक्षा अधिक असावे आणि ADSCR हा 1.2 व त्यापेक्षा अधिक असावा.

(16) एखादे कर्ज खाते मार्च 1, 2020 रोजी 30 डीपीडी पेक्षा अधिक होते व त्यानंतर थकित रक्कम मिळाल्यानंतर ते नियमित झाले असल्यास, अशी खाती, ह्या साचाखालील द्रवीकरण योजनेसाठी पात्र असतील काय ?

अशी खाती, ह्या द्रवीकरण साचाखाली द्रवीकरण करण्यासाठी पात्र नाहीत, कारण केवळ प्रमाणभूत म्हणून वर्गीकृत केले गेलेल्या पण मार्च 1, 2020 रोजी 3 दिवसांपेक्षा अधिक काळ कसुरी न केलेल्या पात्र असलेल्या कर्जदारांनाच हा द्रवीकरण साचा लागु आहे. तथापि, प्रुडेंशियल फ्रेमवर्क दि. जून 7, 2019 खाली अशा खात्यांचे द्रवीकरण केले जाऊ शकते.

(17) पुढे दिलेले कर्ज-वर्ग, व्यक्तिगत कर्ज म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकतात काय ?

(अ) ‘मालमत्तेविरुध्द कर्जे’ - व्यवसायासाठी घेतलेली व अचल मालमत्तेने प्रतिभूतित केलेली कर्जे.

(ब) व्यक्तींना दिलेली कर्जे, की जेथे, मालमत्ता एखाद्या व्यक्तीच्या नावे आहे व एक संबंधित कंपनी/अव्यक्तिगत संस्थेला, कर्ज फेड करण्यास पूरक म्हणून त्या कर्ज रचनेवर सह-कर्जदार म्हणून घेण्यात आले आहे.

तसे नसल्यास, कोविड-19 संबंधित तणावासाठी असे ग्राहक कोणत्या व्याप्ती खाली येतील ?

परिपत्रक डीबीआर.क्र.बीपी.बीसी.99/08.13.100/2017-18 दि. जानेवारी 4, 2018 अन्वये, वरील एक्सपोझर्स व्यक्तीगत कर्जे म्हणून पात्र नाहीत. अशा बाबतीत, पात्र असलेल्या कर्जदारांचे द्रवीकरण, ह्या द्रवीकरण साचाच्या जोडपत्रातील विभाग ब खाली केले जाऊ शकते.

(18) द्रवीकरण साचाखाली आवाहित करण्यासाठी कर्जदारांनी एखादी विशिष्ट द्रवीकरण योजना सादर करणे व धनकोंनी तिची अंमलबजावणी डिसेंबर 31, 2020 पूर्वी करण्यास सहमती देणे आवश्यक आहे काय ?

उत्तर :- नाही. आवाहित करण्याची विनंती करतेवेळी, ह्या द्रवीकरण साचानुसार, कर्ज देणा-या संस्थांना कोणत्याही स्वरुपात कोणतीही द्रवीकरण योजना सादर करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, आवाहित करण्यासाठी, कर्जदारांनी, ह्या द्रवीकरण योजनेखाली विचार केला. ज्यासाठी, कर्ज देणा-या संस्थांकडे केवळ एक विनंती सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर, त्या कर्जदायी संस्था त्यांच्या संचालक मंडळांनी मंजुर केलेल्या धोरणानुसार, द्रवीकरण साचा आवाहित करण्याचा निर्णय घेतील. अशा आवाहनानंतर, कर्जदायी संस्था, कर्जदाराशी विचारविनिमय करुन त्या द्रवीकरण योजनेच्या विशिष्ट घटकांची अंमलबजावणी करु शकतात. वैय्यक्तिक कर्जाबाबत मात्र, अशी द्रवीकरण योजना, आवाहित करण्याच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत अंमलात आणली जावी, तर इतर सर्व कर्जांसाठी, आवाहित करण्याच्या तारखेपासून 180 दिवसांचा कालावधी विहित करण्यात आला आहे.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä