Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 25/02/2020
सीआरआर सूट

(संदर्भ: परिपत्रक डीओआर.क्र.आरईटी.बीसी.30/12.01.001/2019-20 दिनांक. फेब्रुवारी 10, 2020)

फेब्रुवारी 6, 2020 रोजीच्या विकासात्मक व विनियामक धोरणांवरील निवेदनात घोषित केल्यानुसार रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 10, 2020 रोजी एक परिपत्रक दिले असून त्यानुसार बँकांना सांगण्यात आले आहे की, कर्जाची मुदत किंवा कर्ज सुरु होण्याच्या तारखेपासून पाच वर्षांचा कालावधी ह्यापैकी जे आधी असेल त्या कालावधीसाठी सीआरआरचे गणन करण्यासाठी, जानेवारी 31, 2020 पासून सुरु झालेल्या पंधरवड्यापासून व जुलै 31, 2020 रोजी संपलेल्या पंधरवड्यापर्यंत आऊटस्टँडिंग असलेल्या वाढीव कर्जाच्या सममूल्य रक्कम, एनडीसीएल मधून वजा करण्यास पात्र असेल. काही बँकांनी, वाढीव क्रेडिटचे गणन करणे, व सूट देण्यास पात्र असलेली क्षेत्रे/विभाग ह्यासारख्या प्रश्नांबाबत स्पष्टीकरणे मागितली आहेत. येथे स्पष्ट करण्यात येते की, तीन विभागांना (ऑटोमोबाईल्स, निवासी गृहे ह्यांना दिलेली फुटकळ कर्जे व एमएसएमईंना दिलेली कर्जे) दिलेल्या सममूल्य वाढीव कर्जांवर सूट उपलब्ध असून ती, ह्या विभागांना दिलेल्या जानेवारी 31, 2020 रोजीच्या व जुलै 31, 2020 पर्यंतच्या पंधरवड्यांमधील आऊटस्टँडिंग कर्जातील फरकावर आधारित आहे. विचारण्यात आलेले मुख्य प्रश्न व त्यांना आम्ही दिलेले प्रतिसाद खाली दिले आहेत.

अनुक्रमांक प्रश्न स्पष्टीकरण
1. सीआरआर काढण्यासाठी, एनडीटीएलमधून वजा करण्याजोगी/सूट मिळण्याजोगी वाढीव कर्जाची सममूल्य रक्कम कशी काढावी ? फेब्रुवारी 14, 2020 पासून सुरुवात करुन प्रत्येक रिपोर्टिंग शुक्रवार ते जुलै 31, 2020 रोजी समाप्त होणा-या रिपोर्टिंग शुक्रवार रोजी ऑटोमोबाईल्स, निवासी गृहनिर्माण व एमएसएमई (ह्यांना ह्यापुढे विहित विभाग म्हटले आहे) ह्यांना दिलेली आऊटस्टँडिंग फुटकळ कर्जे, जानेवारी 31, 2020 रोजी संबंधित विभागांना दिलेल्या आऊटस्टँडिंग कर्जामधून वजा केली जातील. ह्या आऊटस्टँडिंग कर्जामधील फरक धन असल्यास, सीआरआर ठेवण्यासाठी, ह्या फरकाची सममूल्य रक्कम एनडीटीएलमधून वजा केली जावी. कोणत्याही विहित विभागाला दिलेल्या कर्जांमधील फरक ऋण असल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जावे. हे वाढीव कर्ज विभाग-निहाय काढले/गणन केले जाईल (जोडपत्र 1 मधील उदाहरण पहा.)
2. ट्रेड रिसीव्हेबल्स डिसकाऊंटिंग सिस्टीम (टीआरईडीएस) खाली डिसकाऊंट केलेली एमएसएमईंची फॅक्टरिंग एकके वजावट करण्यास/सूट मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. अशा वजावटी/सूट ह्यांना किती काळासाठी परवानगी आहे ? जुलै 31, 2020 रोजी असलेली वाढीव कर्जाची रक्कम, (जानेवारी 31, 2020 रोजीच्या आऊटस्टँडिंग कर्जाव्यतिरिक्त) केलेली परतफेड व एनपीएच्या हिशेबाने कमी केली जाईल आणि वाढीव कर्जाची नक्त रक्कम, कमाल 5 वर्षांसाठी, म्हणजे जानेवारी 24, 2025 रोजी संपणा-या पंधरवड्यापर्यंत किंवा कर्जाची मुदत ह्यापैकी जे आधी असेल ते - एनडीटीएलमधून वजा केली जाण्यास पात्र असेल.
4. आरबीआयकडून ऑडिट करण्यासाठी एखादा विशिष्ट नमुना ठेवला जातो काय ? नाही. बँकांनी ठेवलेली माहिती पर्यवेक्षकीय पडताळणीसाठी पुरेशी असेल.

जोडपत्र 1

आऊटस्टँडिंग कर्ज (रु. कोटी) ऑटोमोबाईल्ससाठी फुटकळ कर्ज निवासी गृहांसाठी फुटकळ कर्ज एमएसएमईंना कर्ज
(अ) जानेवारी 31, 2020 रोजी असल्यानुसार 150 120 130
(ब) फेब्रुवारी 14, 2020 च्या रिपोर्टिंग शुक्रवारी असल्यानुसार 180 110 150
(क) जुलै 31, 2020 रोजीच्या रिपोर्टिंग शुक्रवारी असल्यानुसार 500 480 110
सिनेरियो 1
फेब्रुवारी 14, 2020 रोजीच्या रिपोर्टिंग शुक्रवारी असलेले वाढीव कर्ज (ब – अ)
30 (-)10 20
सिनेरियो 2
जुलै 31, 2020 रोजीच्या शुक्रवारी असलेले वाढीव कर्ज (क – अ)
350 360 (-)20
सिनेरियो 3 - (समजा 2 वर्षांनंतर)      
(ड) वाढीव कर्ज (जुलै 31, 2020 रोजी असल्याप्रमाणेच) 350 360 (-)20
(ई) परतफेडी 50 60 50
(फ) वाढीव कर्जासाठी एनपीए 40 10 10
वाढीव कर्ज (ड - ई - फ) 350-50-40=260 360-60-10=290 (-)20-50-10=(-)80
सिनेरिया 1 मध्ये, फेब्रुवारी 14, 2020 रोजी एनडीटीएलमधून वजा करण्यास पात्र असलेले विहित विभागांना दिलेले वाढीव कर्ज रु.50 कोटी असेल (ऑटोमोबाईल्सना दिलेले फुटकळ कर्ज रु.30 कोटी + एमएसएमईंना दिलेली कर्जे रु.20 कोटी) निवासी गृहनिर्माणांना दिलेल्या फुटकळ कर्जातील रु.10 कोटींचा ऋण फरक दुर्लक्षित केला जावा.

सिनेरियो 2 मध्ये, जुलै 31, 2020 रोजीच्या एनडीटीएलमधून वजा करण्यास पात्र असलेले, विहित विभागांना दिलेले वाढीव कर्ज रु.710 कोटी असेल (ऑटोमोबाईल्सना दिलेले फुटकळ कर्ज रु.350 कोटी + निवासी गृहनिर्माणाला दिलेले फुटकळ कर्ज रु.360 कोटी) एमएसएमईंना दिलेल्या कर्जांमधील रु.20 कोटींचा ऋण फरक दुर्लक्षित करावा.

सिनेरियो 3 मध्ये, एनडीटीएलमधून वजा करण्यास पात्र असलेले, विहित विभागांना दिलेले वाढीव कर्ज रु. 550 कोटी असेल (ऑटोमोबाईल्सना दिलेले फुटकळ कर्ज रु. 260 कोटी + निवासी गृहनिर्माणाला दिलेले फुटकळ कर्ज रु. 290 कोटी) एमएसएमईंना दिलेल्या कर्जांमधील रु. 80 कोटींचा ऋण फरक दुर्लक्षित करावा.
 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä