Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 12/02/2020
अनिवासी व्यक्तींची भारतामधील खाती

(फेब्रुवारी 12, 2020 रोजी असल्यानुसार)

प्रश्न 1 :- एनआरआय म्हणजे कोण?
प्रश्न 2 :- पीआयओ म्हणजे कोण?
प्रश्न 3 :- एखादी अनिवासी व्यक्ती भारतामध्ये कोणकोणती मुख्य खाती उघडू शकते?
प्रश्न 4 :- बांगलादेशी/पाकिस्तानी राष्ट्रीयत्व असलेली व्यक्ती किंवा बांगलादेश/पाकिस्तान मधून नियंत्रित केलेली/मालकी असलेली संस्था भारतामध्ये खाते ठेवू शकते काय?
प्रश्न 5 :- भारताला भेट देणारा पर्यटक उघडू शकेल अशी खाती कोणती?
प्रश्न 6 :- एसएनआरआर खाते म्हणजे काय ? ते एनआरओ खात्यापेक्षा कसे वेगळे आहे?
प्रश्न 7 :- भारतामधील विदेशी डिप्लोमॅटिक मिशन्स/अधिकारी व त्यांचे नातलग कोणत्या प्रकारच्या ठेवी ठेवू शकतात?
प्रश्न 8 :- नेपाळ व भूतानमधील रहिवासी व्यक्ती भारतात खाते ठेवू शकतात काय?
प्रश्न 9 :- एखादी बहुपक्षीय संस्था भारतामध्ये ठेवी ठेवू शकते काय?
प्रश्न 10 :- कंपनीज अधिनियम 2013 च्या कलम 160 च्या अनुसार/अन्वये, एखादी भारतीय कंपनी अनिवासी व्यक्ती/संस्थांकडून ठेवी स्वीकारु शकते काय?
प्रश्न 11 :- एखादा विदेशी पोर्टफोलियो निवेशक किंवा विदेशी व्हेंचर कॅपिटल निवेशक, भारतामध्ये विदेशी मुद्रा खाते उघडू शकतो काय?
प्रश्न 12 :- भारतामध्ये एस्क्रो खाते, कोण व कशासाठी उघडू शकते?

प्रश्न 1 :- एनआरआय म्हणजे कोण?

उत्तर :- एखादी ‘अनिवासी भारतीय’ (एनआरआय) म्हणजे, भारताची नागरिक असलेली भारताबाहेर निवासी असलेली व्यक्ती.

प्रश्न 2 :- पीआयओ म्हणजे कोण?

उत्तर :- ‘भारतीय वंशाची व्यक्ती’ (पीआयओ) म्हणजे, भारताबाहेर निवासी असलेली, बांगलादेश किंवा पाकिस्तान किंवा केंद्र सरकारने विहित केलेला अन्य देश सोडून, अन्य कोणत्याही देशांची नागरिक असलेली व पुढील अटी पूर्ण करणारी व्यक्ती :-

(अ) भारतीय संविधानाने किंवा नागरिकत्त्व अधिनियम 1955 अनुसार (1955 चा 57) भारताची नागरिक होती अशी व्यक्ती, किंवा

(ब) 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताचा एक भाग झालेल्या प्रदेशातील व्यक्ती किंवा

(क) भारताच्या नागरिकाचा किंवा वरील खंड (अ) किंवा (ब) मध्ये संदर्भित व्यक्तीचा मुलगा/मुलगी किंवा नातू/नात किंवा पणतु/पणती असलेली व्यक्ती किंवा

(ड) भारताच्या नागरिकाची विदेशी वंशाची पत्नी/पती असलेली किंवा वरील खंड (अ) किंवा (ब) किंवा (क) मध्ये संदर्भित व्यक्तीची विदेशी वंशाची पत्नी/पती.

नागरिकत्व अधिनियम 1955 च्या कलम 7(अ) च्या अर्थामध्ये, ‘विदेशातील भारताचा नागरिक’ कार्डधारकही समाविष्ट असेल.

प्रश्न 3 :- एखादी अनिवासी व्यक्ती भारतामध्ये कोणकोणती मुख्य खाती उघडू शकते?

तपशील अनिवासी (बाह्य) रुपये खाते योजना (एनआरई खाते) विदेशी मुद्रा (अनिवासी) खाते (बँका) योजना (एफसीएनआर (बी) खाते) अनिवासी सामान्य रुपये खाते योजना (एनआरओ खाते)
(1) (2) (3) (4)
खाते कोण उघडू शकते? एनआरआय व पीआयओ.

पाकिस्तान व बांगलादेश मधील व्यक्ती/संस्थांनी भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्व मंजुरी घेणे आवश्यक आहे.
रुपयांमधील प्रामाणिक व्यवहार करण्यासाठी भारताबाहेरील निवासी कोणतीही व्यक्ती.

पाकिस्तानी राष्ट्रीयत्व/मूळ वंश असलेल्या व्यक्ती/संस्था आणि बांगलादेशीय मूळ असलेल्या संस्थांनी भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्व मंजुरी घेणे आवश्यक आहे.

बांगलादेश/पाकिस्तान येथील अल्पसंख्याक जमातीमधील, म्हणजे हिंदु, शीख, बौध्द, जैन, पारशी व ख्रिश्चन व त्या देशाची नागरिक असलेली, व भारतात निवासी असलेली व जिला एलटीव्ही देण्यात आले आहे किंवा जिचा एलटीव्हीसाठीचा अर्ज विचाराधीन आहे अशी व्यक्ती वेळोवेळी सुधारित अधिसूचना क्र. फेमा 5(आर)/2016-आरबी दि. एप्रिल 1, 2016 मध्ये दिलेल्या अटींवर, एखाद्या एडी बँकेमध्ये केवळ एकच एनआरओ खाते उघडू शकते.

भारतामधील पोस्ट ऑफिसे, भारताबाहेर निकासी असलेल्या व्यक्तींच्या नावाने बचत खाती ठेवू शकतात, आणि प्राधिकृत डीलर/प्राधिकृत बँकेमध्ये ठेवलेल्या एनआरओ खात्यांना लागु असलेल्या अटींवर ह्या खात्यात कार्यकृती करण्यास/चालविण्यास परवानगी देऊ शकतात.
संयुक्त खाते दोन किंवा अधिक एनआरआय/पीआयओ च्या नावांनी संयुक्तपणे ठेवले जाऊ शकते.

एनआरआय/पीआयओ, निवासी नातलगाबरोबर, ‘आधीचा किंवा उत्तरजीवित’ धर्तीवर संयुक्तपणे ठेवू शकतात (नातलग - कंपनीज अधिनियम 2013 मध्ये व्याख्या केल्यानुसार). एनआरआय/पीआयओ ह्यांच्या जीवनकालामध्ये निवासी नातलग मुखत्यारनामा धारक म्हणून खाते चालवू शकतो.
दोन किंवा अधिक एनआरआय/पीआयओंच्या नावे संयुक्तपणे ठेवता येऊ शकते.

निवासी व्यक्तींबरोबर ‘आधीचा किंवा उत्तरजीवी’ धर्तीवर ठेवता येऊ शकते.
मुद्रा/चलन भारतीय रुपये कोणतेही परवानगीप्राप्त चलन, म्हणजे मुक्तपणे परिवर्तनीय असलेले विदेशी चलन. भारतीय रुपये
खात्याचा प्रकार बचत, चालु, आवर्ती, स्थिर ठेव केवळ मुदत ठेव बचत, चालु, आवर्ती, स्थिर ठेव
स्थिर ठेवीसाठीचा कालावधी एक ते तीन वर्षांपर्यंत. तथापि बँकांना, त्यांच्या अॅसेट लायाबिलिटी दृष्टिकोनानुसार तीन वर्षांपेक्षा अधिक कालासाठी एनआरई ठेवी स्वीकारण्यास परवानगी आहे. एक वर्षापेक्षा कमी नसलेल्या व पाच वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या मुदतीसाठी निवासी खात्यांना लागु असल्याप्रमाणे.
परवानगीप्राप्त क्रेडिट्स. ह्या खात्यात परवानगी असलेले क्रेडिट्स म्हणजे, भारताबाहेरून केलेली इनवर्ड (आवक) प्रेषणे, त्या खात्यावर उपार्जित होत असलेले व्याज, गुंतवणुकींवरील व्याज, इतर एनआरई/एफसीएनआर (बी) खात्यांमधून केलेले हस्तांतरण, गुंतवणुकींचे परिपक्वतेनंतरचे उत्पन्न (अशा गुंतवणुकी ह्या खात्यामधून किंवा इनवर्ड प्रेषणाद्वारे केल्या असल्यास)

भाडे, डिव्हिडंड, पेन्शन, व्याज इत्यादिसारखे विद्यमान उत्पन्न हे एनआरई खात्यात परवानगीप्राप्त क्रेडिट समजले जाईल.

काळजी :- केवळ परिवर्तनीय असल्याचे लक्षण न गमावलेली क्रेडिट्स.
भारताबाहेरून केलेली इनवर्ड प्रेषणे, भारतामधील कायदेशीर येणी (ड्युज्) आणि इतर एनआरओ खात्यांमधून केलेली हस्तांतरणे ही, एनआरओ खात्यातील परवानगीप्राप्त क्रेडिट्स आहेत.

उदारीकृत प्रेषण योजनेखाली विहित केलेल्या मर्यादांमधील, एखाद्या निवासी व्यक्तीने, एनआरआय/पीआयओ नातलगाला दिलेली देणगी/कर्ज हे त्या एनआरआय/पीआयओ नातलगाच्या खात्यात क्रेडिट केले जाऊ शकते.
परवानगीप्राप्त डेबिट्स स्थानिक निधी वाटप, भारताबाहेर केलेले प्रेषण, इतर एनआरई/एफसीएनआर(बी) खात्यात व भारतामधील गुंतवणुकींमध्ये केलेले हस्तांतरण ही परवानगीप्राप्त डेबिट्स आहेत. - स्थानिक प्रदाने, इतर एनआरओ खात्यांमध्ये हस्तांतरणे किंवा विद्यमान उत्पन्नाचे विदेशात प्रेषण ह्या हेतूंसाठी ह्या खात्यात डेबिट केले जाऊ शकते.

ह्याच्या व्यतिरिक्त, विदेशी मुद्रा व्यवस्थापन (अॅसेट्सचे प्रेषण) विनियम, 2016 मध्ये विहित केलेल्या अटींवर, एनआरआय व पीआयओ ह्यांनी विदेशात प्रत्यावर्तित केलेली युसडी 10 लक्ष पर्यंतची रक्कम सोडल्यास, एनआरओ खात्यातील शिल्लक विदेशात प्रत्यावर्तित केली जाऊ शकत नाही.

ह्या युएसडी 10 लाखाच्या सुविधेमध्ये/पर्यंत, एनआरई खात्यामध्ये निधी हस्तांतरण केले जाऊ शकते.
प्रत्यावर्तन क्षमता प्रत्यावर्तनक्षम सर्व विद्यमान उत्पन्न सोडल्यास प्रत्यावर्तनक्षम नाही.

एनआरआय/पीआयओंच्या एनआरओ खात्यामधील शिल्लक रकमा, त्यांच्या इतर पात्र अॅसेट्सह, प्रति लेखा वर्षी( एप्रिल-मार्च) , युएसडी 1 (एक) मिलियन पर्यंत प्रत्यावर्तनक्षम आहेत.
करपात्रता ह्या खात्यांमध्ये मिळालेल्या उत्पन्नाला आयकरापासून व शिल्लक रकमांना संपत्ती करापासून सूट आहे. करपात्र
भारतामधील कर्जे नेहमीच्या मार्जिन आवश्यकतांच्या अटींवर, एडी, भारतामध्ये खातेधारकाला/तृतीय पक्षाला कोणत्याही मर्यादेशिवाय कर्जे मंजुर करु शकते. ही कर्जे भारताबाहेर प्रत्यावर्तित केली जाऊ शकत नाहीत व ती केवळ भारतातच व विनियमांमध्ये विहित केलेल्या हेतूंसाठी वापरली जाऊ शकतात.

तृतीय पक्षाला दिलेल्या कर्जांच्या बाबतीत, निवासी व्यक्ती/संस्था/कंपनीला अशा सुविधा मिळविण्यास मदत व्हावी/करण्यासाठी, त्याच्या ठेवी प्लेज करण्यास संमती देणा-या/राजी होणा-या अनिवासी ठेवीदारासाठी, कोणत्याही प्रकारचे थेट/प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रोत्साहन देण्यात येऊ नये.

खातेदाराला मंजुर केलेल्या कर्जाच्या बाबतीत, त्याची परतफेड, ठेवींचे समायोजन करुन, किंवा भारताबाहेरुन बँकिंग वाहिन्यांमार्फत आवक (इनवर्ड) प्रेषणे करुन किंवा खातेधारकाच्या एनआरओ खात्यातील शिल्लक रकमेमधून केले जाऊ शकते.

अशा ठेवींच्या विरुध्द घेतलेल्या कर्जांबाबत, ठेंवीच्या मुदतपूर्व निकासीची सुविधा उपलब्ध असणार नाही.

‘कर्ज’ ह्या संज्ञेमध्ये, निधी आधारित असलेल्या/निधी आधारित नसलेल्या सर्व सुविधांचा समावेश असेल.
खातेदार किंवा तृतीय पक्ष ह्यांना, भारतामध्ये, ठेवींच्या विरुध्द कर्जे, नेहमीच्या नॉर्म्सवर आणि मार्जिन आवश्यकतांच्या अटीवर दिली जाऊ शकतात. कर्जाच्या रकमेचा उपयोग, पुनश्च कर्ज देण्यासाठी, शेतकीविषयक/मळा-उपद्यांच्या कार्यकृती करण्यासाठी किंवा रियल इस्टेटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी केला जाऊ शकणार नाही.

‘कर्ज’ ह्या संज्ञेमध्ये निधी आधारित असलेल्या/निधी आधारित नसलेल्या सर्व सुविधा समाविष्ट असतील.
भारताबाहेरील कर्जे प्राधिकृत डीलर्स, त्यांच्या भारताबाहेरील शाखांना/संगत संस्थांना, ठेवीदारांनी विनंती केल्यास, अनिवासी ठेवीदार किंवा तृतीय पक्षाला, सद्हेतूसाठी, भारतामध्ये ठेवलेल्या एनआरई/एफसीएनआर (बी) खात्यांमधील निधीच्या सिक्युरिटी विरुध्द व नेहमीच्या मार्जिन आवश्यकतांच्या अटींवर कर्जे देण्याची परवानगी देऊ शकतात.

‘कर्ज’ ह्या संज्ञेमध्ये निधी आधारित असलेल्या/नसलेल्या सर्व सुविधा समाविष्ट असतील.
परवानगी नाही.
व्याजाचा दर विनियम विभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार
एखाद्या निवासी व्यक्तीच्या नावे मुखत्यारनामा देऊन कार्यकृती करणे मुखत्यारनाम्याने खात्यामधील कार्यकृती, परवानगीप्राप्त स्थानिक प्रदानांसाठी निकासी किंवा नेहमीच्या बँकिंग वाहिन्यांमार्फत स्वतः खातेदाराला करावयाच्या प्रेषणांपुरताच मर्यादित आहेत. मुखत्यारनाम्याने करावयाच्या कार्यकृती, रुपयांमधील स्थानिक प्रदानांसाठी निकासी, भारताबाहेरील खातेदाराला विद्यमान उत्पन्नाचे प्रेषण करणे किंवा नेहमीच्या बँकिंग वाहिन्यांमार्फत स्वतः खातेदाराला प्रेषण करणे एवढ्यापुरत्याच सीमित आहेत. प्रेषणे करताना, प्रत्यावर्ततेच्या मर्यादा व अटी लागु असतील.
अनिवासी पासून निवासी असा निवासी दर्जातील बदल. भारतात नोकरी करण्यासाठी खातेदार भारतामध्ये परत आल्यावर किंवा त्याच्या निवासी दर्जात बदल झाल्यावर ताबडतोब, एनआरई खात्यांना निवासी खाती म्हटले जावे किंवा खातेदाराच्या पसंतीनुसार अशा खात्यांमधील निधी आरएफसी खात्यांमध्ये हस्तांतरित केले जावेत. निवासी दर्जात बदल झाल्यावर, खातेदाराची तशी इच्छा असल्यास, एफसीएनआर (बी) ठेवी, ठरविण्यात आलेल्या व्याजदराने, त्यांच्या परिपक्वतेपर्यंत ठेवल्या जाव्यात.

प्राधिकृत डीलर्सनी, एफसीएनआर (बी) ठेवी परिपक्व झाल्यावर त्यांचे रुपांतरण, खातेदाराच्या पसंतीनुसार निवासी रुपये ठेव खात्यात किंवा आरएफसी खात्यात (तो ठेवीदार आरएफसी खाते उघडण्यास पात्र असल्यास) करावे.
भारतामध्ये अनिश्चित कालासाठी राहण्याची इच्छा प्रकट करुन कोणत्याही हेतूने खातेदार परत आल्यावर, एनआरओ खात्यांना निवासी खाती म्हटले जावे.

त्याचप्रमाणे, एखादी निवासी भारतीय व्यक्ती, भारताबाहेर निवासी व्यक्ती होते तेव्हा, त्याच्या विद्यमान निवासी खात्याला एनआरओ खाते म्हटले जावे.

प्रश्न 4 :- बांगलादेशी/पाकिस्तानी राष्ट्रीयत्व असलेली व्यक्ती किंवा बांगलादेश/पाकिस्तान मधून नियंत्रित केलेली/मालकी असलेली संस्था भारतामध्ये खाते ठेवू शकते काय?

उत्तर :- पाकिस्तानी राष्ट्रीयत्व/मालकी असलेल्या व्यक्ती/संस्थांकडून आणि बांगलादेशाची मालकी असलेल्या संस्थांकडून खाती उघडली जाण्यासाठी रिझर्व बँकेच्या पूर्व मंजुरीची आवश्यकता आहे.

तथापि, बांगलादेशी राष्ट्रीयत्वाच्या व्यक्ती, त्यांच्याकडे वैध व्हिसा असल्यास व संबंधित फॉरिनर रजिस्ट्रेशन ऑफिस (एनआरओ)/फॉरिनर रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस (एफआरआरओं) ने दिलेला वैध निवासी परवाना असल्यास एनआरओ खाते उघडू शकतात.

ह्याशिवाय, बांगलादेश/पाकिस्तानमधील अल्पसंख्याक जमातीचे व भारतात राहणारे नागरिक, म्हणजे, हिंदु, शीख, बौध्द, जैन, पारशी व ख्रिश्चन, व ज्यांना दीर्घ मुदतीचा व्हिसा (एलटीव्ही) देण्यात आला आहे किंवा ज्याचा एलटीव्हीसाठीचा अर्ज विचाराधीन आहे अशा व्यक्तींना, वेळोवेळी सुधारित करण्यात आलेल्या अधिसूचना क्र. फेमा 5(आर)/2016-आरबी दि. एप्रिल 1, 2016 मध्ये निर्देशित केलेल्या अटींवर, भारतामधील एडी बँकेत एनआरओ खाते उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशी एनआरओ खाती उघडली गेल्यावर, एपी(डीआयआर सिरीज) परिपत्रक क्र. 28 दि. मार्च 28, 2019 अन्वये सूचित केल्यानुसार, संबंधित प्राधिकृत बँकेने उघडलेल्या त्या खात्यांबाबतचा तपशील, तिमाही धर्तीवर, गृहकार्य मंत्रालय (एमएचए) ह्यांना कळविण्याची अट आहे.

प्रश्न 5 :- भारताला भेट देणारा पर्यटक उघडू शकेल अशी खाती कोणती?

उत्तर :- भारताला भेट देणारी, भारतीय वंशाचा नसलेली विदेशी राष्ट्रीयत्व असलेली व्यक्ती, बँकिंग वाहिनीमधून भारताबाहेरुन निधी प्रेषण करुन किंवा तिने/त्याने बरोबर आणलेल्या विदेशी मुद्रेची विक्री करुन एक एनआरओ (चालु/बचत) खाते उघडू शकते. त्या एनआरओ खात्यातील शिल्लक, त्या खातेधारकाला तो भारतातून परत निघून जातेवेळी दिली जावी. मात्र, ते खाते सहा महिन्यांपेक्षा जास्त नसलेल्या काळासाठी ठेवले गेले असावे आणि त्या खात्यात त्यावरील व्याज सोडून कोणताही स्थानिक निधी जमा केला गेला नसावा.

प्रश्न 6 :- एसएनआरआर खाते म्हणजे काय ? ते एनआरओ खात्यापेक्षा कसे वेगळे आहे?

उत्तर :- भारतामध्ये व्यापारी हितसंबंध असलेली, भारताबाहेर निवासी असलेली कोणतीही व्यक्ती, ह्या अधिनियमाच्या तरतुदी व त्याखाली केलेले नियम व विनियम ह्यांच्यानुसार असलेले रुपयांमधील प्रामाणिक व्यवहार करण्यासाठी एक विशेष/खास अनिवासी रुपये खाते (एसएनआरआर खाते) प्राधिकृत डीलरकडे उघडू शकते.

एसएनआरआर खाते व एनआरओ खाते ह्यामधील फरक पुढीलप्रमाणे आहेत :-

लक्षण एसएनआरआर खाते एनआरओ खाते
कोण उघडू शकते? भारताबाहेर निवासी असलेली व रुपयांमधील प्रामाणिक व्यवहार करण्यासाठी भारतामध्ये व्यवहार/व्यवसाय करण्यास इच्छुक असलेली कोणतीही व्यक्ती.

पाकिस्तानी व बांगलादेशीय व्यक्तींना, तसेच पाकिस्तान व बांगलादेशात इनकॉर्पोरेट झालेल्या संस्थांना, एसएनआरआर खाती उघडण्यास रिझर्व बँकेची पूर्व मंजुरी घेणे आवश्यक आहे.
रुपयांमधील खरे/प्रामाणिक व्यवहार करण्यासाठी भारताबाहेर निवासी असलेली कोणतीही व्यक्ती.

पाकिस्तानी राष्ट्रीयत्व/वंश असलेल्या व्यक्ती/संस्थांना आणि बांगलादेशीय मूळ असलेल्या संस्थांना, रिझर्व बँकेची पूर्व मंजुरी घेणे आवश्यक आहे.

तथापि, बांगलादेश/पाकिस्तान मधील अल्पसंख्याक जमातीमधील नागरिक, म्हणजे, हिंदु, शीख, बौध्द, जैन, पारशी व ख्रिश्चन - जे भारतामध्ये राहत आहेत व ज्यांना एलटीव्ही देण्यात आला आहे किंवा ज्यांचा एलटीव्हीसाठीचा अर्ज विचाराधीन आहे अशा व्यक्ती, वेळोवेळी सुधारित अधिसूचना क्र. फेमा 5(आर)/2016-आरबी दि. एप्रिल 1, 2016 मध्ये निर्देशित केलेल्या अटींवर एखाद्या एडी बँकेत एनआरओ खाते उघडू शकतात.
खात्याचा प्रकार बिन व्याजाचे खाते चालु, आवर्ती किंवा स्थिर ठेव.

व्याजदर - विनियमन विभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार.
परवानगी असलेले व्यवहार - खातेदाराने प्रायोजित केलेल्या व्यवसायानुसार विशिष्ट/आनुषंगिक डेबिट्स व क्रेडिट्स क्रेडिट्स.

अंतर्गत प्रेषणे, भारतामधील कायदेशीर येणी (ड्युज्), अन्य एनआरओ खात्यांमधून केलेली हस्तांतरणे व फेमा 1999 खालील नियम/विनियम/सूचनांनुसार मिळालेली कोणतीही रक्कम.

डेबिट्स :-

स्थानिक प्रदाने, अन्य एनआरओ खात्यांमध्ये केलेली हस्तांतरणे, विद्यमान उत्पन्नाचे प्रेषण, आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डांवरील आकारांचे समायोजन.
मुदत खातेदाराने केलेल्या व्यवसाय कंत्राटाच्या/कार्यकारी कालावधी एवढी आणि कोणत्याही परिस्थितीत, रिझर्व बँकेची मंजुरी सोडल्यास, सात वर्षांपेक्षा अधिक नसावी.

फेमा 5 (आर) च्या शेड्युल 4 च्या परिच्छेद 1 च्या पोट-परिच्छेद 1 ते 5 मध्ये निर्देशित केलेल्या हेतूंसाठी उघडलेल्या एसएनआरआर खात्यांना सात वर्षांचा निर्बंध लागु नाही.
मुदतीवर असे कोणतेही निर्बंध नाहीत.
प्रत्यावर्तता प्रत्यावर्तनक्षम फेमा 13 (आर) च्या तरतुदींनुसार प्रति वित्तीय वर्ष युएसडी 10 लक्षपर्यंतचे विद्यमान उत्पन्न व एनआरआय/पीआयओनी केलेली प्रेषणे सोडल्यास प्रत्यावर्तनक्षम नाही.

प्रश्न 7 :- भारतामधील विदेशी डिप्लोमॅटिक मिशन्स/अधिकारी व त्यांचे नातलग कोणत्या प्रकारच्या ठेवी ठेवू शकतात?

उत्तर :- पुढील खाती ठेवण्यास परवानगी आहे.

(अ) भारतामधील विदेशी डिप्लोमॅटिक मिशन्स व डिप्लोमॅटिक अधिकारी व त्यांच्या कुटुंबातील सभासद एखाद्या एडी बँकेत रुपये ठेव खाते उघडू शकतात.

(ब) कस्टम्स प्राधिकरणांनी, स्टोअरची बाँडमध्ये आयात करण्यासाठी विशेष सुविधा दिल्या आहेत अशा कंपन्या व संस्थांकडून बँडेड स्टॉक्स खरेदी करण्यास मदत करण्यासाठी, डिप्लोमॅटिक मिशन्स व डिप्लोमॅटिक अधिकारी विशेष रुपये खाती म्हणजे डिप्लोमॅटिक बाँड स्टोअर्स खाते काही अटींवर उघडू शकतात. ह्या खात्यामधील निधी रिझर्व बँकेच्या मंजुरीशिवायही भारताबाहेर प्रत्यावर्तित केला जाऊ शकतो.

(क) संबंधित विदेशी देशांचे राष्ट्रीयत्व असलेले व भारतामधील विदेशी वकिलातींचा अधिकृत पासपोर्ट धारक असलेले, डिप्लोमॅटिक मिशन्स, डिप्लोमॅटिक अधिकारी व डिप्लोमॅटिक नसलेले कर्मचारी, भारतामध्ये विदेशी मुद्रा खाते उघडू शकतात. असे खाते, चालु किंवा मुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवले जाऊ शकते आणि डिप्लोमॅटिक अधिकारी व डिप्लोमॅटिक नसलेल्या कर्मचा-यांच्या बाबतीत ते बचत खात्याच्या स्वरुपातही ठेवले जाऊ शकते. भारतामधील त्या डिप्लोमॅटिक मिशन्सच्या रुपये खात्यामधून आवक (इनवर्ड) प्रेषणे व हस्तांतरणे ह्या स्वरुपात (जी भारतामध्ये व्हिसा शुल्के म्हणून गोळा केली जातात) अशा खात्यांमध्ये क्रेडिट केले जाऊ शकते. अशा खात्यांमधील निधी रुपयांमध्ये रुपांतरित केला असल्यास त्याचे विदेशी मुद्रेत परत रुपांतरण केले जाऊ शकणार नाही. ह्या खात्यातील निधी रिझर्व बँकेच्या परवानगीशिवायही भारताबाहेर प्रत्यावर्तित केला जाऊ शकतो.

प्रश्न 8 :- नेपाळ व भूतानमधील रहिवासी व्यक्ती भारतात खाते ठेवू शकतात काय?

उत्तर :- नेपाळ व भूतानमधील रहिवासी व्यक्ती भारतामधील प्राधिकृत डीलरकडे खाते उघडू शकतात.

प्रश्न 9 :- एखादी बहुपक्षीय संस्था भारतामध्ये ठेवी ठेवू शकते काय?

उत्तर :- भारत जिचा सभासद देश आहे अशी कोणतीही बहुपक्षीय संस्था किंवा तिच्या भारतातील सहाय्यक/जोडलेल्या संस्था व अधिकारी, भारतामधील प्राधिकृत डीलरकडे ठेवी खाते उघडू शकतात.

प्रश्न 10 :- कंपनीज अधिनियम 2013 च्या कलम 160 च्या अनुसार/अन्वये, एखादी भारतीय कंपनी अनिवासी व्यक्ती/संस्थांकडून ठेवी स्वीकारु शकते काय?

उत्तर :- होय. असा ठेवींचा स्वीकार आवश्यक असल्यास परतावा हे व्यवहार चालु खाते व्यवहाराखाली येतात व ते फेमाच्या दृष्टिकोनातून कोणत्याही निर्बंधांशिवाय मुक्तपणे केले जाऊ शकतात.

प्रश्न 11 :- एखादा विदेशी पोर्टफोलियो निवेशक किंवा विदेशी व्हेंचर कॅपिटल निवेशक, भारतामध्ये विदेशी मुद्रा खाते उघडू शकतो काय?

उत्तर :- होय. एखादा विदेशी पोर्टफोलियो निवेशक किंवा विदेशी व्हेंचर कॅपिटल निवेशक, हे दोघेही, संबंधित सेबी विनियमांखाली, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) पंजीकृत झालेले असल्यास, विदेशी मुद्रा व्यवस्थापन (नॉन-डेट संलेख) नियम, 2019 अनुसार, गुंतवणुक करण्याच्या हेतूने, बिनव्याजाचे विदेशी मुद्रा खाते उघडू व चालवू शकतात.

प्रश्न 12 :- भारतामध्ये एस्क्रो खाते, कोण व कशासाठी उघडू शकते?

उत्तर :- वेळोवेळी सुधारित केलेले विदेशी मुद्रा व्यवस्थापन (नॉन डेट इंस्ट्रुमेंट) नियम, 2019 अनुसार, आणि वेळोवेळी सुधारित, विदेशी मुद्रा व्यवस्थापन (ठेव) विनियम, 2016 च्या शेड्युल 5 खाली विहित केलेल्या अटी व शर्तींवर, निवासी व अनिवासी प्राप्तकर्ते (अॅक्वायरर्स), भांडवली संलेखांची/परिवर्तनीय नोट्सची प्राप्ती/हस्तांतरण करण्यासाठी, भारतामधील (एस्क्रो एजंट म्हणून) एखाद्या एडी बँकेत आयएनआरमधील एस्क्रो खाते उघडू शकतात.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä