Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 30/10/2019
आरटीजीएस प्रणाली

(ऑक्टोबर 30, 2019 प्रमाणे अद्यावत)

(1) आरटीजीएस म्हणजे काय ?

आरटीजीएस ही अक्षरे रियल टाईम ऑफ सेटलमेंट ह्यासाठीची अद्याक्षरे असून, त्याचा अर्थ, जेथे सातत्याने व प्रत्यक्ष वेळी म्हणजे रियल टाईम धर्तीवर, वैय्यक्तिक रितीने, एकेक व्यवहार - व्यवहार धर्तीवर (नेटिंग नाही) केले जाते अशी प्रणाली, ‘रियल टाईम’ म्हणजे, सूचना मिळाल्याक्षणीच प्रक्रिया केली जाणे. ‘ग्रॉस सेटलमेंट’ म्हणजे, निधी हस्तांतरणाच्या सूचनांचे समायोजन वैयक्तिकरीत्या केले जाते.

(2) आरटीजीएस खालील प्रदाने अंतिम व रद्द न होण्याजोगी असतात काय ?

हे निधी समायोजन भारतीय रिझर्व बँकेच्या पुस्तकांमध्ये होत असल्याचे विचारात घेता, ही प्रदाने व रद्द न होण्याजोगी असतात.

(3) आरटीजीएसचा वापर करण्याचे लाभ कोणते ?

उत्तर :- निधी हस्तांतरणाच्या इतर रीतींपेक्षा अनेक लाभ आरटीजीएस देऊ करते.

  • निधी हस्तांतरण करण्यासाठी ही एक सुरक्षित व सुरक्षायुक्त प्रणाली आहे.

  • आरटीजीएसने करावयाचे व्यवहार/हस्तांतरणे ह्याच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.

  • शनिवार सह, बहुतेक बँका काम करत असलेल्या सर्व दिवशी ही प्रणाली उपलब्ध आहे.

  • लाभार्थीच्या खात्यात त्याचवेळी (रियल टाईम) निधी हस्तांतरण केले जाते.

  • प्रेषण करणाराने प्रत्यक्ष चेक किंवा डिमांड ड्राफ्ट देण्याची गरज नाही.

  • कागदी संलेख जमा करण्यासाठी लाभार्थीला बँक शाखेत जाण्याची गरज नाही.

  • प्रत्यक्ष संलेख हरविणे/चोरीस जाणे किंवा तो लबाडीने वटविला जाणे ह्याबाबत लाभार्थीला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही.

  • इंटरनेट बँकिंगची सुविधा बँकेने दिली असल्यास, प्रेषणकर्ता, त्याच्या/तिच्या घरातून/कामाच्या जागेतून प्रेषण करु शकतो.

  • आरबीआयने व्यवहारांसाठीच्या आकारांवर मर्यादा घातल्या आहेत.

  • ह्या व्यवहाराला कायद्याचे पाठबळ आहे.

(4) आरटीजीएसची प्रक्रिया नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्स्फर (एनईएफटी) प्रणालीच्या प्रक्रियेपेक्षा कशी वेगळी आहे ?

उत्तर :- एनईएफटी ही एक इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण प्रणाली असून त्यात एका विशिष्ट वेळेपर्यंत मिळालेल्या व्यवहारांवर बॅचेसने (गट) प्रक्रिया केली जाते. ह्याच्या उलट, आरटीजीएसमध्ये, आरटीजीएसच्या संपूर्ण व्यवसाय तासांमध्ये, एकेका व्यवहाराने, व्यवहारांवर सातत्याने प्रक्रिया केली जात असते.

(5) आरटीजीएस ही एक 24 x 7 चालणारी प्रणाली आहे की तिला काही वेळा लागु आहेत ?

उत्तर :- आरटीजीएस ही 24 x 7 चालणारी प्रणाली नाही. आरटीजीएसची सेवा खिडकी ही, आरबीआयमध्ये समायोजन होण्यासाठी, ग्राहकांच्या व्यवहारांसाठी एखाद्या कामकाजाच्या दिवशी बँकांमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असते. तथापि, बँका अनुसरत असलेल्या वेळा बँका-बँकानुसार वेगवेगळ्या असू शकतात.

(6) आरटीजीएस व्यवहारांसाठी किमान/कमाल रकमांची अट आहे काय ?

उत्तर :- आरटीजीएस प्रणाली ही मुख्यतः मोठ्या रकमांच्या व्यवहारांसाठी आहे. आरटीजीएसमधून पाठविण्याची किमान रक्कम रु.2,00,000/- असून त्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.

(7) आरटीजीएस व्यवहारांसाठीचे प्रक्रिया आकार/सेवा आकारांचे काय ?

उत्तर :- जुलै 1, 2019 पासून आरबीआयने, आरटीजीएस व्यवहारांसाठीचे प्रक्रिया आकार काढून टाकले आहेत. हा लाभ बँका त्यांच्या ग्राहकांनाही देऊ शकतात.

बँकांकडून आकारण्यात येणा-या आरटीजीएस सेवा आकारांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी आकारांचा एक स्थूल साचा खालीलप्रमाणे अनिवार्य करण्यात आला आहे.

(अ) आवक व्यवहार - निःशुल्क. कोणताही आकार नाही.

(ब) जावक व्यवहार :- रु.2,00,000/- ते रु.5,00,000/-, रु.24.50 पेक्षा अधिक नाही (करा-व्यतिरिक्त)

रु.5,00,000/- पेक्षा अधिक - रु.49.50/- पेक्षा अधिक नाही (करा-व्यतिरिक्त)

बँका ह्यापेक्षा कमी दर आकारु शकतात. परंतु आरबीआयने विहित केलेल्या दरांपेक्षा जास्त नाही.

(8) बँकेने प्रेषण करण्यासाठी, प्रेषण करणा-या ग्राहकाने बँकेला द्यावयाची अत्यावश्यक माहिती कोणती ?

उत्तर :- आरटीजीएसने प्रेषण करण्यासाठी, प्रेषण करणा-या ग्राहकाने बँकेला पुढील माहिती दिली पाहिजे :-

(1) प्रेषण करण्याची रक्कम
(2) डेबिट करावयाचा खाते क्रमांक
(3) लाभार्थी बँक व शाखेचे नाव
(4) स्वीकारर्कत्या बँकेचा आयएफएसी क्रमांक
(5) लाभार्थी ग्राहकाचे नाव
(6) लाभार्थी ग्राहकाचा खाते क्रमांक
(7) प्रेषकाने स्वीकारर्कत्याबाबत द्यायची माहिती असल्यास

(9) स्वीकारर्कत्या बँकेचा आयएफएससी क्रमांक कसा समजेल ?

उत्तर :- प्रेषणकर्ता (ग्राहक) त्याच्या/तिच्या बँक शाखेमधून आयएफएससी नंबर मिळवू शकतो. पर्यायाने, तो क्रमांक, लाभार्थीच्या चेकवर दिलेला असतो. हा संकेत क्रमांक/बँक शाखांबाबतची माहिती, लाभार्थी प्रेषणर्कत्या ग्राहकाला कळवू शकतो. आयएफएससीची यादी आरबीआयच्या वेबसाईटवर http://rbidocs.rbi.org.in/rdocs/RTGS/DOCs/RTGEB0815.xlsx ह्या लिंकवरही उपलब्ध आहे.

(10) भारतामधील सर्व बँक शाखा आरटीजीएस सेवा देतात काय ? लाभार्थीची बँक शाखा आरटीजीएस मार्फत प्रेषण स्वीकारु शकते की नाही हे प्रेषक ग्राहकाला कसे कळेल ?

उत्तर :- आरटीजीएसमार्फत निधी हस्तांतरण होण्यासाठी, प्रेषक बँक शाखा व स्वीकारकर्ती बँक शाखा ह्या दोन्हीही आरटीजीएसक्षम असणे आवश्यक आहे. सध्या 1,40,000 पेक्षा अधिक बँक शाखा आरटीजीएस क्षमता असलेल्या असून त्यांची यादी आरबीआयच्या वेबसाईटवर http://rbidocs.rbi.org.in/rdocs/RTGS/DOCs/RTGEB0815.xlsx ह्या लिंक वर उपलब्ध आहे.

(11) आरटीजीएस व्यवहार सुरु करतेवेळी कोणती काळजी घ्यावी ?

उत्तर :- आरटीजीएसचा वापर करुन निधीचे हस्तांतरण करताना पुढील गोष्टींची खात्री करुन घेतली जावी :-

  • सुरुवात करणारी व डेस्टिनेशन (अंतिम/लाभार्थी) बँक शाखा ह्या आरटीजीएस नेटवर्कचा एक भाग आहेत.

  • लाभार्थीचे नाव, खाते क्रमांक, व खात्याचा प्रकार, लाभार्थी बँक शाखेचे नाव व आयएफएसी ह्यासारख्या लाभार्थीबाबतचा तपशील प्रेषणर्कत्याकडे उपलब्ध असावा.

  • लाभार्थीचा खाते क्रमांक देतेवेळी अत्यंत काळजी घेतली जावी कारण, आरटीजीएस व्यवहार प्रक्रियांदरम्यान केवळ आरटीजीएस प्रेषण सूचना/संदेशामध्ये दिलेल्याच खाते क्रमांकाच्या आधारावरच ग्राहकाच्या खात्यावर क्रेडिट दिले जाईल.

(12) आरटीजीएसमध्ये केवळ खाते क्रमांकाच्या आधारावरच लाभार्थीला क्रेडिट का दिले जाते ?

उत्तर :- आरटीजीएसमधील व्यवहार हे प्रत्यक्ष म्हणजे रियल टाईममध्ये होत असल्याने, लाभार्थीच्या खात्यात क्रेडिट करण्यापूर्वी, नाव व खाते क्रमांक जुळविणे शक्य होत नाही. भारतीय संदर्भात नावांचे स्पेलिंग निरनिराळ्या प्रकारे केले जात असल्याने ते लाभार्थी बँकेत असलेल्या स्पेलिंगशी कदाचित जुळु शकणार नाही. त्यामुळे लाभार्थीच्या केवळ खाते क्रमांकावर आधारित क्रेडिट देण्याची प्रक्रिया ठेवण्यात आली आहे.

(13) आरटीजीएस मार्फत एका खात्यातून दुस-या खात्यात निधी हस्तांतरणासाठी किती वेळ लागतो ?

उत्तर :- सर्वसामान्य परिस्थिती, प्रेषणर्कत्या बँकेने निधी हस्तांतरण केल्याक्षणीच रियल टाईममध्ये, लाभार्थी शाखांना निधी मिळणे अपेक्षित आहे. निधी हस्तांतरणाचा संदेश मिळाल्याच्या 30 मिनिटांच्या आत, लाभार्थी बँकेने लाभार्थीच्या खात्यात क्रेडिट करणे आवश्यक आहे.

(14) प्रेषणकर्ता ग्राहक भविष्यातील एखाद्या तारखेसाठी एखादा व्यवहार सुरु करु शकतो काय ?

उत्तर :- आरटीजीएस प्रणाली तीन दिवस पर्यंतच्या अग्रिम/भविष्यातील आरटीजीएसच्या कामकाजाच्या दिवसांवरील समायोजनासाठी, प्रेषणर्कत्या बँकेकडून भविष्यातील मूल्य दिनांकित व्यवहार स्वीकारते. असे व्यवहार रांगेत ठेवले जातील व ते व्यवहाराच्या मूल्य दिनांकांच्या धर्तीवर समायोजित केले जातील.

(15) दुस-याच एखाद्या खात्यामधून पैसे काढण्यासाठी (स्वीकारण्यासाठी) एखादा व्यवहार सुरु करता येतो काय ?

उत्तर :- नाही. आरटीजीएस ही एक क्रेडिट पुश प्रणाली आहे. म्हणजे, केवळ आदाता/प्रेषणकर्ता/पाठविणाराकडून, लाभार्थीला निधीचे प्रदान/हस्तांतरण/प्रेषण करण्यासाठीच व्यवहार सुरु केले जाऊ शकतात.

(16) एखाद्या आरटीजीएस व्यवहाराचा मागोवा घेता येतो काय ? लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा झाल्याबाबतची पावती प्रेषणर्कत्या ग्राहकाला मिळते काय ?

उत्तर :- व्यवहाराचा मागोवा घेण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध नसली तरीही, आरबीआयने आरटीजीएस व्यवहारामध्ये सकारात्मक दुजो-याचे एक लक्षण टाकले आहे. ह्याखाली, प्रेषणर्कत्या बँकेला आरबीआयकडून एक संदेश येईल की, (लाभार्थी बँकेच्या मार्फत) लाभार्थी बँकेत/ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. ह्यावर आधारित प्रेषणर्कत्या बँकेने, प्रेषणर्कत्या ग्राहकाला कळवावे की, प्राप्तर्कत्या बँकेच्या लाभार्थी खात्यात पैसे जमा झाले आहेत.

(17) लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा न झाल्यास ते पैसे प्रेषक ग्राहकाला परत मिळतील काय ? ह्यासाठी काही कालावधी विहित केला आहे काय ?

उत्तर :- होय. कोणत्याही कारणाने लाभार्थीच्या खात्यात निधी क्रेडिट करणे शक्य न झाल्यास आरटीजीएसचा सभासद असलेली बँकेला मिळालेला निधी, पेमेंट इंटरफेस (पीआय) वर प्रदान मिळाल्याच्या एक तासाच्या आत किंवा आरटीजीएस व्यवहाराचा दिवस समाप्त होण्यापूर्वी (जे आधी असेल ते), सुरुवात करणा-या बँकेला परत केला जाईल. प्रेषणर्कत्या बँकेला पैसे परत मिळाल्यावर, ग्राहकाच्या खात्यातील मूळ डेबिट एंट्री रिव्हर्स (उलट) केली जावी.

(18) प्रदान परत करण्यात विलंब झाल्यास त्यासाठी भरपाई मिळण्यास ग्राहक पात्र असतो काय ?

अयशस्वी झालेले प्रदान परत करण्यात विलंब झाल्यास, सुरुवात करणारा ग्राहक विद्यमान रेपो रेट अधिक 2% दराने भरपाई मिळविण्यास पात्र आहे.

(19) लाभार्थीच्या खात्यात क्रेडिट न झाल्यास किंवा विलंब झाल्यास ग्राहकाने कोणाशी संपर्क साधावा ?

उत्तर :- लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा न होणे/विलंब होणे ह्याबाबतच्या प्रश्नासाठी ग्राहक त्याच्या/तिच्या बँक/शाखेशी संपर्क साधू शकतो. तो प्रश्न समाधानकारक रितीने सोडविला न गेल्यास, त्याबाबतचा तपशील व युटीआर क्रमांक देऊन, ई-मेलने किंवा पोस्टाने पुढील पत्त्यावर पाठवून तक्रार दाखल केली जावी.

मुख्य महाव्यवस्थापक,
ग्राहक शिक्षण व संरक्षण विभाग
1ला मजला, अमर बिल्डिंग, फोर्ट
भारतीय रिझर्व्ह बँक
एसबीएस रोड, फोर्ट
मुंबई, 400 001

(20) युटीआर क्रमांक म्हणजे काय ?

उत्तर :- युनिक ट्रँझॅक्शन रेफरन्स (युटीआर) क्रमांक हा, आरटीजीएस प्रणालीमधील एखादा व्यवहार एकमेवतेने ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा 22 अक्षरी संकेत आहे.

हे एफएक्यु, भारतीय रिझर्व्ह बँकेने माहिती व सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी दिले आहेत. ह्यांच्या आधारावर केलेल्या कृती आणि/किंवा निर्णय ह्यासाठी रिझर्व्ह बँक जबाबदार असणार नाही. स्पष्टीकरणे किंवा अर्थ ह्यासाठी, रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी दिलेल्या संबंधित परिपत्रकांचे व अधिसूचनांचे मार्गदर्शन घेण्याची विनंती करण्यात येत आहे.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä