Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 23/10/2019
मनी चेंजिंग कार्यकृती

(ऑक्टोबर 23, 2019 नुसार अद्यावत केल्याप्रमाणे)

(1) विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 (‘फेमा’) खालील प्राधिकृत व्यक्ती कोणत्या ? फेमा 1999 च्या कलम 10(1) खाली प्राधिकृतता/परवाना दिला गेलेले निरनिराळे वर्ग कोणते ?
(2) प्राधिकृत मनी चेंजरना व्यवसाय करु देण्यामागील उद्दिष्ट कोणते ?
(3) मनी चेंजिग व्यवसाय करण्यासाठी परवाना असणे अपरिहार्य आहे काय ?
(4) एफएफएमसी परवान्यासाठी कोण अर्ज करु शकतो ?
(5) एफएफएमसी परवान्यासाठीचा अर्ज कुठे सादर करता येतो ?
(6) निव्वळ निज निधीचे गणन कसे करावे ?
(7) एनओएफ सातत्याने ठेवावा लागतो काय ?
(8) नव्यानेच परवाना मिळालेल्या एफएफएमसीने तिच्या कार्यकृती सुरु करण्याचा कालावधी कोणता ?
(9) परवान्याच्या नूतनीकरणासाठीचा अर्ज कधी केला जावा ?
(10) रिझर्व्ह बँकेकडून कोणत्या परिस्थितीत एफएफएमसी परवाना रद्द करु शकते ?
(11) भारतामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या प्रती चेंजिंग सुविधा काय/कोणत्या आहेत ?
(12) निर्बंधित मनी चेंजिंग कार्यकृती करण्यासाठी, एडी वर्ग 1 बँका एडी वर्ग 2 आणि एफएफएमसींकडून फ्रँचायजीस नेमण्यामधील उद्दिष्ट कोणते ?
(13) फ्रँचायजी कराराची प्रमुख लक्षणे कोणती ?
(14) एडी वर्ग 1 बँक/एडी वर्ग 2 बँक आणि एफएफएमसी कडून फ्रँचायजींची नेमणुक करण्यासाठीचे अर्ज भारतीय रिझर्व बँकेकडे सादर करण्याची कार्यरीत कोणती ?
(15) फ्रँचायजींची नेमणुक करण्यापूर्वीच्या ड्यु डिलिजन्स करतेवेळी, एडी वर्ग-1 बँका/एडी वर्ग-2 बँका/एफएफएमसींनी कोणकोणत्या तपासण्या केल्या असल्याची खात्री करुन घ्यावी ?
(16) केंद्रांची निवड करण्यासाठी कोणते निकष आहेत ?
(17) फ्रँचायजींना प्रशिक्षण देण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे कोणती ?
(18) फ्रँचायजींच्या बाबतीत अहवाल पाठविणे, ऑडिट व तपासणी करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे कोणती ?
(19) फ्रँचायजीने केवायसी/एएमएल/सीएफटीबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे काय ?
(20) एडी वर्ग-2, फोरेक्स प्रिपेड कार्डे देऊ शकतात काय ?
(21) भारतामधील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील ड्युटी फ्री शॉप्समध्ये फोरेक्स प्रिपेड कार्डे वापरता येऊ शकतात काय ?
(22) पापुआ न्यु गिनी कागदी बँक नोटांची स्थिती काय आहे ?
(23) केनियामधील जुन्या पिढीतील ‘1000 शिलिंग्ज (केएसएच)’ बँक नोटांची काय स्थिती आहे ?

उपयोजकांना ह्या विषयावर असणारे सर्वसामान्य प्रश्न, ह्या एफएक्युमध्ये सहज समजणा-या भाषेत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एफएफएमसींचे प्राधिकृतीकरण व कार्य करण्याच्या रीती, अबँकीय एडी वर्ग 2, आणि प्राधिकृत व्यक्तींच्या फँचायजीज्, तसेच त्यांचे ग्राहक/घटक ह्यांचेबरोबर विदेशी मुद्रेत व्यवहार करण्याच्या कार्यकृती, ह्यासह पैसे बदलून देण्याच्या कार्यकृतींच्या संबंधाने असलेले निर्देश हे वेळोवेळी अद्यावत केलेल्या पैसे बदलून देण्याच्या कार्यकृतींवरील महानिर्देशामध्ये देण्यात आले आहे.

(1) विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 (‘फेमा’) खालील प्राधिकृत व्यक्ती कोणत्या ? फेमा 1999 च्या कलम 10(1) खाली प्राधिकृतता/परवाना दिला गेलेले निरनिराळे वर्ग कोणते ?

विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 च्या कलम 10(1) खाली, रिझर्व्ह बँक सध्या पुढील संस्थांना प्राधिकृतता देते.

 • वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार, परवानगीप्राप्त असलेले चालू व भांडवली व्यवहार करण्यासाठी निवडक बँकांना (प्राधिकृत डीलर्स वर्ग-1 म्हणून)

 • विहित केलेले, ट्रेडिंगशी संबंधित नसलेले चालु खात्यांचे व्यवहार, संपूर्णपणे (फुल फ्लेज्ड) मनी चेंजर्सना परवानगी दिलेल्या सर्व कार्यकृती व रिझर्व्ह बँकेने ठरविल्यानुसार इतर कोणतीही कार्यकृती करण्यासाठी - निवडक संस्था (प्राधिकृत डीलर्स वर्ग-2 म्हणून)

 • निवडक वित्तीय व अन्य संस्था (प्राधिकृत डीलर्स वर्ग-3 म्हणून) ह्यांना त्यांचे व्यवसाय/कार्यकृतींसाठीचे नैमितिक विशिष्ट विदेशी मुद्रा व्यवहार करण्यासाठी

 • निवडक पंजीकृत कंपन्यांना, फुल फ्लेज्ड मनी चेंजर्स (एफएफएमसी) म्हणून, विहित केलेल्या हेतूंसाठी - उदा. विदेशात खाजगी व व्यवसायानिमित्त प्रवास - विदेशी मुद्रा खरेदी करण्यासाठी व विदेशी मुद्रा विकण्यासाठी.

(2) प्राधिकृत मनी चेंजरना व्यवसाय करु देण्यामागील उद्दिष्ट कोणते?

स्पर्धात्मक कार्यकृतींद्वारे सक्षम अशी ग्राहक सेवा दिली जात आहे ह्याची खात्री करुन घेत असतानाच, निवासी व्यक्ती व पर्यटकांना अधिक प्रमाणावर विदेशी मुद्रा विनियमाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे.

(3) मनी चेंजिग व्यवसाय करण्यासाठी परवाना असणे अपरिहार्य आहे काय ?

होय. विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 च्या कलम 10 खाली रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेल्या संस्थांकडूनच मनी चेंजिंग व्यवसाय केला जाऊ शकतो. रिझर्व्ह बँकेने दिलेला वैध परवाना मिळाला असल्याशिवाय कोणतीही व्यक्ती मनी चेंजिंगचा व्यवसाय करु शकत नाही. वैध परवान्याशिवाय मनी चेंजिंगचा व्यवसाय करणा-या व्यक्तीवर वरील अधिनियमाखाली दंड लावला जाऊ शकतो.

(4) एफएफएमसी परवान्यासाठी कोण अर्ज करु शकतो ?

अर्जदार ही, कंपनीज अधिनियम 1956/कंपनीज अधिनियम 2013/कंपन्यांचे पंजीकरण (सिक्कीम) अधिनियम 1961 खाली पंजीकृत संस्था असावी आणि एकल शाखा एफएफएमसी परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी तिचा किमान नक्त निज निधी (एनओएफ) आयएनआर 25 लक्ष व बहुविध - शाखा एफएफएमसी परवान्यासाठी तो आयएनआर 50 लक्ष असावा.

(5) एफएफएमसी परवान्यासाठीचा अर्ज कुठे सादर करता येतो ?

विहित केलेल्या नमुन्यातील अर्ज (फेमा 1999 खाली रिपोर्ट करणे वरील एफईडी महानिर्देश क्र.18/2015-16 च्या विभाग-1 : जोडपत्र 1 मध्ये दिल्यानुसार) आवश्यक त्या कागदपत्रांसह, अर्जदाराची कंपनी ज्याच्या अधिकारक्षेत्रात येते त्या, रिझर्व्ह बँकेच्या विदेशी मुद्रा विभागाच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाकडे सादर केला जावा.

(6) निव्वळ निज निधीचे गणन कसे करावे ?

बँका सोडून इतर अर्जदारांच्या बाबतीत, निव्वळ निज निधी(एनोएफ) पुढील रितीने काढला जावा.

 • निज निधी : (भरणा केलेले इक्विटी भांडवल अ मुक्त राखीव निधी अ नफा-तोटा खात्यामधील जमा शिल्लक) वजा (तोट्याची संचयित शिल्लक, डिफर्ड महसुली खर्च व इतर अमूर्त अॅसेट्स).

 • निव्वळ निज निधी : निज निधी वजा, तिच्या सहाय्यक कंपन्यांच्या व त्याच गटातील कंपन्यांच्या व (इतर) सर्व अबँकीय वित्तीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणुक, तसेच डिबेंचर्स, बाँड्स, थकित कर्जे व दिलेल्या अग्रिम राशी व सहाय्यक कंपन्या व त्याच गटातील कंपन्यांमध्ये ठेवलेल्या (निजनिधीच्या 10% पेक्षा अतिरिक्त) ठेवी ह्यांचे पुस्तकी मूल्य.

(7) एनओएफ सातत्याने ठेवावा लागतो काय ?

एएमसींनी किमान निजनिधी / एनओएफ सातत्याने ठेवणे अपेक्षित आहे.

(8) नव्यानेच परवाना मिळालेल्या एफएफएमसीने तिच्या कार्यकृती सुरु करण्याचा कालावधी कोणता ?

नव्याने परवाना मिळालेल्या एफएफएमसीने तिला परवाना दिल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत कार्यकृती सुरु कराव्यात. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी, दुकाने व आस्थापना अधिनियमाखालील पंजीकरणाची एक प्रत किंवा भाडे पावती, लीज कराराची प्रत असा कागदोपत्री पुरावा रिझर्व्ह बँकेला सादर केला जावा.

(9) परवान्याच्या नूतनीकरणासाठीचा अर्ज कधी केला जावा ?

एखादी एफएफएमसी/अबँकीय एडी वर्ग-2 ने, परवान्याच्या नूतनीकरणासाठीचा अर्ज, त्या परवान्याची मुदत/वैधता संपण्याच्या दोन महिने आधी किंवा रिझर्व्ह बँकेने विहित केलेल्या कालावधीनुसार करावा. वरीलप्रमाणे परवान्याच्या नूतनीकरणाचा अर्ज सादर करण्यात आला आहे तेथे, तो परवाना नूतनीकृत केला गेल्याच्या तारखेपर्यंत किंवा अर्ज फेटाळला जाण्याच्या तारखेपर्यंतच तो परवाना जारी असेल. परवाना समाप्त झाल्यावर एफएफएमसी/अबँकीय एडी वर्ग-2 कडून त्याच्या नूतनीकरणासाठीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

(10) रिझर्व्ह बँकेकडून कोणत्या परिस्थितीत एफएफएमसी परवाना रद्द करु शकते ?

फेमा 1999 च्या कलम 10(1) खाली दिलेली प्राधिकृतता, रिझर्व्ह बँकेचे पुढील बाबतीत समाधान झाले असल्यास, तिच्याकडून कोणत्याही वेळी रद्द केली/मागे घेतली जाऊ शकते.

(अ) जनतेच्या हिताच्या दृष्टीने तसे करणे आवश्यक असल्यास किंवा

(ब) प्राधिकृत व्यक्तीने, ती प्राधिकृतता दिली जाण्याबाबतच्या अटीचे पालन केलेले नसल्यास किंवा हा अधिनियम किंव त्याखालील कोणताही नियम, विनियम, अधिसूचना, निर्देश किंवा आदेश ह्यांचे उल्लंघन केले असल्यास

कोणत्याही वैधानिक किंवा विनियामक तरतुदीचा भंग/उल्लंघन केले गेल्यास; प्राधिकृत व्यक्ती कोणत्याही कार्यालयाची प्राधिकृतता रद्द करण्याचा हक्क रिझर्व्ह बँकेने राखून ठेवला आहे. रिझर्व्ह बँक, कोणत्याही वेळी, प्राधिकृतीकरण/परवाना ह्याबाबतच्या कोणत्याही विद्यमान अटी बदलू किंवा रद्द करु शकते किंवा नव्या अटी जारी करु शकते.

(11) भारतामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या प्रती चेंजिंग सुविधा काय/कोणत्या आहेत ?

सध्या तरी, विदेशी मुद्रेमधील चलनी नोटा, नाणी किंवा ट्रॅवलर्स चेक्स भारतीय चलनात (आणि ह्या उलटही) बदलून/रुपांतरण करुन देणे, एडी वर्ग-1 बँका, एडी वर्ग-2 बँका आणि संपूर्णतया मनी चेंजर्स (एफएफएमसी) मार्फत करणे शक्य आहे. ह्याशिवाय, विदेशी मुद्रा विकत घेण्यासाठी, एडी वर्ग-1 बँका, एडी वर्ग-2 आणि एफएफएमसी, फ्रँचायजी (ह्यांना एजंट असेही समजले जाते) नेमू शकतात.

(12) निर्बंधित मनी चेंजिंग कार्यकृती करण्यासाठी, एडी वर्ग 1 बँका एडी वर्ग 2 आणि एफएफएमसींकडून फ्रँचायजीस नेमण्यामधील उद्दिष्ट कोणते ?

ह्या योजनेचा उद्देश म्हणजे, देशामधील मनी चेंजिंग सुविधांच्या नेटवर्कचा विस्तार करुन, अनिवासी भारतीयांसह (एनआरआय) प्रवासी व पर्यटकांसाठी सुलभतेने विदेशी मुद्रा रुपांतरण करुन देणे. अशा फ्रँचायजी व्यवस्थेमुळे, सर्व पर्यटक केंद्रांमध्ये व मोठ्या शहरांमध्ये विस्तारित कालावधीत, तसेच सुट्टीच्या दिवशीही अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यास, एडी वर्ग-1 बँका, वर्ग-2 एडी व एफएफएमसींना सहाय्यच होईल.

(13) फ्रँचायजी कराराची प्रमुख लक्षणे कोणती ?

ह्या योजनेखाली, एडी वर्ग-1 बँका, वर्ग-2 एडी व एफएफएमसी ह्यांना, मनी चेंजिंगचा निर्बंधित व्यवसाय करण्यासाठी, (म्हणजे, विदेशी मुद्रेतील नोटा, नाणी किंवा प्रवासी चेक्स चे रुपयांमध्ये रुपांतरण) त्यांच्या मता/निवडीनुसार फ्रँचायजी करार करण्यासाठी, रिझर्व बँक परवानगी देते.

व्यवसाय करण्याची जागा व रु.10 लाखांचा किमान निजनिधी असलेली कोणतीही संस्था फ्रँचायजी असू शकते. असे फ्रँचायजी केवळ निर्बंधित मनी चेंजिंग व्यवसाय करु शकतात.

फ्रँचायजर्स म्हणून काम करणा-या एडी वर्ग-1 बँका, वर्ग-2 एडी, व एफएफएमसी ह्यांना, फ्रँचायजीबरोबरच्या उभयपक्षी सहमतीने, कराराची मुदत, दलाली किंवा शुल्क ठरविण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. फ्रँचायजीबरोबर केलेल्या करारात पुढील अटी समाविष्ट असाव्यात.

(अ) फ्रँचायजींनी, त्यांच्या कार्यालयात, त्यांच्या फ्रँचायजसची नावे, विनिमय दर आणि केवळ विदेशी मुद्रा खरेदी करण्यासच ते प्राधिकृत असल्याचे ठळकपणे प्रदर्शित करावे. विदेशी मुद्रेचे रुपयांमध्ये रुपांतरण करण्यासाठीचा विनिमय-दर, एडी वर्ग-1 बँका/वर्ग-2 एडी/एफएफएमसी ह्यांच्याकडून त्यांच्या शाखांमध्ये आकारण्यात येणा-या दैनिक दराएवढा किंवा त्याच्या जवळपास असावा.

(ब) फ्रँचायजीने खरेदी केलेली विदेशी मुद्रा, ती विकत घेतल्याच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत केवळ त्याच्या फ्रँचायजरकडे देण्यात यावी.

(क) फ्रँचायजीने व्यवहारांचे व्यवस्थित रेकॉर्ड ठेवावे.

(ड) वर्षातून किमान एकदा, फँचायझरने त्याच्या फ्रँचायजीची ऑनसाईट तपासणी करावी.

(14) एडी वर्ग 1 बँक/एडी वर्ग 2 बँक आणि एफएफएमसी कडून फ्रँचायजींची नेमणुक करण्यासाठीचे अर्ज भारतीय रिझर्व बँकेकडे सादर करण्याची कार्यरीत कोणती ?

ह्या योजनेखाली फ्रँचायजीची नेमणुक करण्यासाठी, एडी वर्ग-1 बँक/वर्ग-2 एडी/एफएफएमसी ह्यांनी, फॉर्म आरएमसी-एफ (भाग 1 जोडपत्र 2 – एफईडी महानिर्देश क्र 18/2015-16 मधील अहवाल फेमा 1999 नुसार), भारतीय रिझर्व बँकेच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाकडे अर्ज करावा. ह्या अर्जासोबत एक घोषणापत्र देण्यात यावे की, फ्रँचायजींची निवड करतेवेळी, योग्य ते परिश्रम घेण्यात आले असून, अशा संस्थांनी, फ्रँचायजी-कराराच्या सर्व तरतुदींचे आणि मनी चेंजिंगबाबत रिझर्व बँकेच्या विनियमांचे अनुपालन करण्याचे वचन दिले आहे. पहिल्या फ्रँचायजी करारासाठी रिझर्व बँक मंजुरी देईल. त्यानंतर, केलेल्या व नव्या फ्रँचायजी करारांसाठी, ते करार फॉर्म आरएमसी-एफ मध्ये पोस्ट-फॅक्टो धर्तीवर आणि वर निर्देशित केलेल्या घोषणापत्रासह रिझर्व बँकेला कळविले जावेत.

(15) फ्रँचायजींची नेमणुक करण्यापूर्वीच्या ड्यु डिलिजन्स करतेवेळी, एडी वर्ग-1 बँका/एडी वर्ग-2 बँका/एफएफएमसींनी कोणकोणत्या तपासण्या केल्या असल्याची खात्री करुन घ्यावी ?

फ्रँचायजींबाबतच्या माहितीसाठी परिश्रम करताना, एडी वर्ग-1 बँका/वर्ग-2 एडी/एफएफएमसी ह्यांनी पुढील किमान तपासण्या कराव्यात.

 • त्या फ्रँचायजीच्या विद्यमान व्यावसायिक कार्यकृती व त्याची त्या क्षेत्रातील स्थिती/स्थान.

 • त्या फ्रँचायजीचा किमान निव्वळ निजनिधी.

 • त्या फ्रँचायजीच्या नावे असलेला गुमास्ता कायदा प्रमाणपत्र/लागु असलेले अन्य म्युनिसिपल प्रमाणपत्र.

 • त्या फ्रँचायजीच्या कामाच्या ठिकाणाची (जेथे निर्बंधित मनी चेंजिंग कार्यकृती केल्या जाणार आहेत) प्रत्यक्ष पडताळणी.

 • स्थानिक पोलिस प्राधिकरणाचे त्या फ्रँचायजीच्या वर्तणुकीचे प्रमाणपत्र (सुसंस्थापित झालेल्या संस्थांबाबत, वर्तणुक प्रमाणापत्रा ऐवजी, मेमोरँडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशनची आणि इनकॉर्पोरेशन प्रमाणपत्राची प्रत).

  टीप :- स्थानिक पोलिस प्राधिकरणाकडून फ्रँचायजीसाठीचे वर्तणुक प्रमाणपत्र घेणे हे फ्रँचायजीसाठी ऐच्छिक आहे. तथापि, कोणत्याही कायदा अंमलबजावणी खात्याने दाखल केलेली/सुरु असलेली/प्रलंबित असलेली प्रकरणे ज्यांच्या विरुध्द आहेत अशा व्यक्तींची/संस्थांची फ्रँचायजी म्हणून नेमणुक करणे टाळण्यासाठी, फ्रँचायजर्सनी योग्य ती काळजी घ्यावी.

 • कोणत्याही कायदा अंमलबजावणी खात्याने त्या फ्रँचायजीविरुध्द किंवा त्याच्या संचालका/भागीदाराविरुध्द सुरु केलेली/प्रलंबित असलेली प्रकरणे आणि भूतकाळातील फौजदारी प्रकरणे (असल्यास) ह्याबाबतचे घोषणापत्र.

 • फ्रँचायजी व त्याच्या संचालकांचे/भागीदारांचे पॅन कार्ड

 • फ्रँचायजीच्या संचालकांची/भागीदारांची आणि मुख्य व्यक्तीची छायाचित्रे.

वरील तपासण्या नियमितपणे, वर्षातून किमान एकदा केल्या जाव्यात. फ्रँचायजीच्या कामाच्या जागी दिलेल्या भेटीं व्यतिरिक्त, एडी वर्ग-1 बँका/वर्ग-2 एडी/एफएफएमसी ह्यांनी, फ्रँचायजीकडून त्या ठिकाणाला पुष्टि देणारा कागदोपत्री पुरावाही मिळवावा. फ्रँचायजीने योग्य तो निव्वळ निजनिधी ठेवला (सातत्याने रु.10 लाख) असल्याबाबत, एडी वर्ग-1 बँका/वर्ग-2 एडी/एफएफएमसींनी चार्टर्ड अकाऊंटंटचे प्रमाणपत्रही मिळवावे.

(16) केंद्रांची निवड करण्यासाठी कोणते निकष आहेत ?

एडी वर्ग-1 बँका/वर्ग-2 एडी/एफएफएमसी ह्यांनी, त्यांच्या संबंधित नियंत्रक शाखांपासून 100 कि.मी. च्या आत असलेले फ्रँचायजी नेमावेत.

तथापि, फ्रँचायजी म्हणून नेमण्यात आलेल्या, मान्यताप्राप्त हॉटेल ग्रुप्स/चेनसाठी, वरील अंतराबाबत सूट देण्यात आली आहे - मात्र, अशा हॉटेल ग्रुप्स/चेनचे मुख्य कार्यालय, एडी वर्ग-1 बँका/वर्ग-2 एडी/एफएफएमसीच्या (फ्रँचायझर) संबंधित नियंत्रक शाखांपासून 100 कि.मी. च्या आत असावे.

ह्याशिवाय, डोंगराळ क्षेत्रे म्हणून घोषित केलेल्या (संबंधित राज्य सरकारे/केंद्र सरकार शासित प्रदेश ह्यांनी व्याख्या केल्यानुसार) आणि ईशान्ये कडील राज्यांबाबत, वरील बाब (1) मधील अंतराची अट लागु नाही.

(17) फ्रँचायजींना प्रशिक्षण देण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे कोणती ?

कार्यकृती व रेकॉर्ड ठेवणे ह्याबाबत फ्रँचायजर्सनी त्यांच्या फ्रँचायजींना प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे.

(18) फ्रँचायजींच्या बाबतीत अहवाल पाठविणे, ऑडिट व तपासणी करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे कोणती ?

फ्रँचायजर्स म्हणजे एडी वर्ग-1 बँका/वर्ग-2 एडी/एफएफएमसी ह्यांचेकडून अपेक्षित आहे की, त्यांनी त्यांच्या फ्रँचायजींनी केलेल्या व्यवहारांची माहिती नियमितपणे (किमान महिन्यातून एकदा) त्या फ्रँचायजर्सना कळविली जाईल ह्याची खात्री करुन घेण्यात यावी. एडी वर्ग-1 बँका/वर्ग-2 एडी/एफएफएमसींकडून, किमान सहा महिन्यातून एकदा, फ्रँचायजींच्या जागेचे नियमित व स्पॉट ऑडिट केले जावे. असे ऑडिट करण्यासाठी खास नेमलेली टीम त्या फ्रँचायजीच्या अनुपालनाचा स्तर मोजण्यासाठी वापरण्यात यावी. फ्रँचायजींच्या पुस्तकांची वार्षिक तपासणी करण्यासाठीची यंत्रणाही ठेवली जावी. अशा तपासण्या करण्याचा उद्देश म्हणजे, फ्रँचायजीज् कडून केला जाणारा मनी चेंजिंगचा व्यवसाय, रिझर्व बँकेच्या प्रचलित मार्गदर्शक तत्वांना धरुन होत आहे, व फ्रँचायजींकडून आवश्यक ती रेकॉर्ड्स ठेवली जात आहे ह्याची खात्री करुन घेणे.

(19) फ्रँचायजीने केवायसी/एएमएल/सीएफटीबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे काय ?

एडी वर्ग-1/वर्ग 2-एडी/एफएफएमसींना लागु असलेल्या केवायसी/एएमएल/सीएफटी मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करणे फ्रँचायजींसाठी आवश्यक आहे.

टीप : अंमलबजावणी संचालनालय (डीओई)/रेव्हेन्यु इंटलिजन्स संचालनालय (डीआरआय)/केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)/पोलिस ह्यांचेकडे केस प्रलंबित आहे. अशा कोणत्याही एफएफएमसी/अबँकीय एडी वर्ग-2 ह्यांना, फ्रँचायजी नेमण्यासाठी परवाना दिला जाणार नाही. एखाद्या एफएफएमसी/वर्ग-2 अबँकीय संस्था ह्यांना फ्रँचायजी नेमण्याची एकदाच मंजुरी दिली गेली आहे व मंजुरी दिल्याच्या तारखेनंतर, कोणतीही डीओई/डीआरआय/सीबीआय/पोलिस केस दाखल केली गेली असल्यास, त्यांनी आणखी फ्रँचायजी नेमू नयेत आणि ती बाब ताबडतोब रिझर्व बँकेच्या नजरेस आणावी. एफएफएमसी/अबँकीय एडी वर्ग-2 ह्यांना फ्रँचायजी नेमण्यास परवानगी देण्याबाबत रिझर्व बँक निर्णय घेईल.

(20) एडी वर्ग-2, फोरेक्स प्रिपेड कार्डे देऊ शकतात काय ?

विदेशात खाजगी कामासाठी/व्यवसायासाठी प्रवास करणा-या निवासी व्यक्तींना एडी वर्ग-2 फोरेक्स प्रिपेड कार्डे देऊ शकतात - मात्र, त्यांनी केवायसी/एएमएल/सीएफटी आवश्यकता पूर्ण केल्या असल्या पाहिजेत. तथापि, फोरेक्स प्रिपेड कार्डांचे समायोजन, एडी वर्ग-1 बँकांमार्फतच केले जावे.

(21) भारतामधील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील ड्युटी फ्री शॉप्समध्ये फोरेक्स प्रिपेड कार्डे वापरता येऊ शकतात काय ?

होय, भारतामधील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील ड्युटी फ्री शॉप्समध्ये विदेशी मुद्रेमधील नोटा/प्रवासी चेक्स प्रमाणेच फोरेक्स प्रिपेड कार्डे वापरता येऊ शकतात

(22) पापुआ न्यु गिनी कागदी बँक नोटांची स्थिती काय आहे ?

बँक ऑफ पापुआ न्यु गिनी ह्यांनी त्यांची वेबसाईट www.bankpng.gov.pg वर दिलेल्या सार्वजनिक नोटिस (https://www.bankpng.gov.pg/wp-content/uploads/2014/08/Full-page_-potrait_Paper-Bank-Notes2.pdf) अनुसार, जून 30, 2012 रोजी, पापुआ न्यु गिनी कागदी बँक नोटा वैध चलन असणे समाप्त झाले असून, पापुआ न्यु गिनी मध्ये केवळ पॉलिमर बँक नोटाच वैध चलन आहेत. ह्याशिवाय, बँक ऑफ पापुआ न्यु गिनी ह्यांनी, पूर्वी कधीही न दिल्या गेलेल्या (आणि युरोप मधील एका रिसायक्लरला विकलेल्या) बँक नोटांच्या अनुक्रमांकांची पुढील रेंज शेअर केली आहे. आणि म्हणून त्या बँक नोटा पापुआ न्यु गिनी मध्ये वैध चलन नाहीत.

डिनॉमिनेशन प्रिफिक्स सिरियल क्रमांक
लहान मोठा
K2 ABJ - AJS 000001 003000
K10 AC - AY 030000 031000
NBP- NES 160000 173000
K20 BPNG 0000001 3000000
K50 HTT - HUU 080000 090000
K100 BPNG 0000001 6000000

(23) केनियामधील जुन्या पिढीतील ‘1000 शिलिंग्ज (केएसएच)’ बँक नोटांची काय स्थिती आहे ?

नवीन पिढीतील बँक नोटा दिल्या गेल्याने, सुरु केल्याने, केनियाने सांगितले/कळविले आहे की, सेंट्रल बँक ऑफ केनिया कडील (http://kenyalaw.org/kenya_gazette/gazette/volume/MTk2Mg--/Vol.CXXI-No.69) येथे उपलब्ध) गॅझेट नोटिस क्र. 4849 दि. मे 31, 2019 अन्वये आणि (https://www.centralbank.go.ke/uploads/press_releases/696932423_Press%20Release%20-%20New%20Generation%20Banknotes.pdf) उपलब्ध असलेल्या वृत्तपत्र निवेदन दि. जून 6, 2019 अन्वये, 1000 शिलिंग्ज (केएसएच) मूल्याच्या सर्व चलनी नोटा, ऑक्टोबर 1, 2019 पासून वैध चलन असणार नाहीत व बदलून दिल्या जाणार नाहीत.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä