Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 04/02/2019
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना

(फेब्रुवारी 4, 2019 पर्यंत अद्यावत)

(1) सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (एसजीबी) म्हणजे काय ? तिचे प्रचालक कोण आहे ?

एसजीबी हे सरकारी प्रतिभूती असून त्याचे मूल्य ग्राम-सोन्यामध्ये असते. प्रत्यक्ष सोने ठेवण्यासाठीचा तो एक पर्याय आहे. निवेशनांना इश्युची किंमत रोख स्वरुपात द्यावी लागते आणि बाँड्स परिपक्व झाल्यावर त्यांचे विमोचनही रोखीनेच दिले जाते. हे रोखे भारत सरकारच्या वतीने रिझर्व बँकेकडून दिले जातात.

(2) प्रत्यक्ष सोने घेण्या ऐवजी मी एसजीबी का विकत घ्यावेत ? त्याचे फायदे कोणते ?

निवेशक प्रदान करत असलेल्या सोन्याचे आकारमान संचयित असते. आपण, विमोचन/मुदतपूर्व विमोचन करतेवेळी त्याला त्या सोन्याची, बाजारात प्रचलित असलेली किंमत/मूल्य मिळते. प्रत्यक्ष स्वरुपात सोने ठेवण्याऐवजी एसजीबी अधिक चांगला पर्याय उपलब्ध करुन देतात. सोने साठवून ठेवण्यामधील जोखमी व खर्च त्यामुळे होत नाही. परिपक्वतेच्या वेळी आणि नियतकालिकतेने व्याज देण्याचे वेळी असलेल्या भावाची हमी निवेशकांना दिली जाते. अलंकारांच्या स्वरुपात असलेल्या सोन्याच्या बाबतीत, घडणावळ व शुध्दता ह्या सारख्या प्रश्नांपासून एसजीबी मुक्त आहेत. हे रोखे आरबीआयच्या पुस्तकात किंवा डिमॅट स्वरुपात धारण करता येतात व त्यामुळे स्क्रिप हरविण्यासारखे धोके संभवत नाहीत.

(3) एसजीबीमध्ये गुंतवणुक करण्यात काही धोके आहेत काय ?

बाजारभाव खाली पडल्यास भांडवली तोटा होण्याचा धोका असू शकतो. तथापि, निवेशकाने प्रदान केलेल्या सोन्याच्या युनिट्सच्या संदर्भात निवेशकाचा तोटा होत नाही.

(4) एसजीबीमध्ये गुंतवणुक करण्यास कोण पात्र आहेत ?

विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 खाली व्याख्या केली असलेल्यानुसार भारतात निवासी असलेल्या व्यक्ती, एसजीबीमध्ये गुंतवणुक करण्यास पात्र आहेत. अशा पात्र असलेल्या व्यक्तींमध्ये, व्यक्ती, एचयुएफ, ट्रस्ट, विश्वविद्यालये, धर्मादाय संस्था इत्यादि समाविष्ट आहेत. निवासी दर्जामध्ये, निवासी पासून ते अनिवासी व्यक्ती असा बदल झालेले व्यक्तिगत गुंतवणुकदार, लवकर विमोचन करे पर्यंत/परिपक्वतेपर्यंत एसजीबी धारण करणे सुरु ठेवू शकतात.

(5) संयुक्त-धारण करण्यास परवानगी आहे काय ?

होय. संयुक्त-धारण करण्यास परवानगी आहे.

(6) एखादी अल्पवयीन व्यक्ती एसजीबीमध्ये गुंतवणुक करु शकते काय ?

होय. त्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने, त्याच्या/तिच्या पालकाने अर्ज करावयाचा असतो.

(7) निवेशकांना अर्जाचा फॉर्म कुठे मिळू शकेल ?

अर्जाचा फॉर्म एसजीबी देणा-या बँका/एसएचसीआयएलची कार्यालये/नेमलेली पोस्ट ऑफिसे/एजटंस ह्यांचेकडून मिळेल. त्याचप्रमाणे तो, आरबीआयच्या वेबसाईटवरुनही डाऊनलोड करता येऊ शकतो. बँका ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही देऊ शकतात.

(8) तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) साठीचे निकष कोणते ?

प्रत्येक अर्जासोबत, आय कर विभागाने गुंतवणुकदारांना दिलेला ‘पॅन क्रमांक’ दिला जाणे आवश्यक आहे.

(9) सार्वभौम सुवर्ण रोख्यांसाठीच्या वर्गणीसाठी एखादा गुंतवणुकदार एकापेक्षा अधिक गुंतवणुकदार आयडी धारण करु शकतो काय ?

नाही. एखादा गुंतवणुकदार, विहित केलेल्या कोणत्याही एका ओळख कागदपत्रांशी जोडलेला एकमेव गुंतवणुकदार आयडी ठेवू शकतो. हा एकमेव गुंतवणुकदार आयडी, ह्या योजनेतील नंतरच्या सर्व गुंतवणुकींमध्ये वापरावयाचा आहे. डिमटेरियालाइ्जड स्वरुपात सिक्युरिटीज धारण करण्यास, अर्जाच्या फॉर्म मध्ये पॅन देणे अनिवार्य आहे.

(10) गुंतवणुकीसाठी कमाल व किमान मर्यादा कोणती ?

हे बाँड्स एक ग्राम सोने व त्याच्या पटीतील मूल्यात दिले जातात. व्यक्तींसाठी किमान गुंतवणुक मर्यादा एक ग्राम व वर्गणीसाठीची कमाल मर्यादा 4 किलो, हिंदु अविभाज्य कुटुंबासाठी (एचयुएफ) 4 किलो आणि प्रति वित्तीय वर्ष (एप्रिल - मार्च) सरकारने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या ट्रस्ट व त्यासारख्या संस्थांसाठी 20 किलो असेल. संयुक्त धारणाबाबत, ही मर्यादा प्रथम धारकाला लागु आहे. वार्षिक मर्यादेमध्ये, सरकारने सुरुवातीच्या देण्यामधील निरनिराळ्या सोडतीखाली वर्गणी दिलेले बाँड्स व सेकंडरी मार्केटमधून खरेदी केलेले बाँड्स समाविष्ट असतील. गुंतवणुकीवरील मर्यादेत, बँका व इतर वित्तीय संस्थांकडून तारण म्हणून असलेले धारण समाविष्ट असणार नाही.

(11) माझ्या कुटुंबातील प्रत्येक सभासद स्वत: च्या नावाने प्रत्येकी 4 किलो विकत घेऊ शकतो काय ?

होय. प्रश्न 4 मधील पात्रता निकष पूर्ण केलेले असल्यास कुटुंबातील प्रत्येक सभासद, त्याच्या/तिच्या स्वतःच्या नावाने हे रोखे विकत घेऊ शकतो.

(12) मी दरवर्षी 4 किलो / 20 किलो किंमतीचे एसजीबी विकत घेऊ शकतो काय ?

होय. कोणतीही व्यक्ती दरसाल 4 किलो / 20 किलो किंमतीचे सुवर्ण रोखे विकत घेऊ शकते कारण ही मर्यादा आर्थिक वर्षाच्या (एप्रिल-मार्च) धर्तीवर ठरविण्यात आली आहे.

(13) संयुक्त धारणाच्या बाबतीतही 4 किलोची कमाल मर्यादा लागु आहे काय ?

त्या विशिष्ट अर्जासाठी, संयुक्त धारणाबाबत ही कमाल मर्यादा प्रथम अर्जदाराला लागु असेल.

(14) ह्यासाठीचा व्याज दर काय आहे आणि व्याज कसे दिले जाईल ?

सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या रकमेवर, ह्या रोख्यांवर 2.50 टक्के (स्थिर दर) दरसाल व्याज दिले जाते. हे व्याज सहामाही धर्तीवर निवेशकाच्या बँक खात्यात जमा केले जाईल आणि शेवटचे व्याज प्रदान, मुद्दलासह, परिपक्व झाल्यावर दिले जाईल.

(15) एसजीबी विकणा-या प्राधिकृत एजन्सी कोणत्या ?

हे बाँड्स, राष्ट्रीयीकृत बँका, अधिसूचित खाजगी बँका, अधिसूचित विदेशी बँका ह्यांची कार्यालये किंवा शाखा, नेमस्त पोस्ट ऑफिसे, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसएचसीआयएल) व प्राधिकृत स्टॉक एक्सचेंजेस कडून थेट किंवा त्यांच्या एजंटांकडून विकले जातात.

(16) मी अर्ज केल्यास मला वाटप केले जाण्याची खात्री/ग्वाही आहे काय ?

ग्राहकाने पात्रतेचे निकष पूर्ण केले असल्यास, त्याने ओळख-पुराव्याचे वैध कागदपत्र सादर केले असल्यास आणि अर्जाची शुल्क रक्कम वेळेवर भरली असल्यास त्याला/तिला रोख्याचे वाटप केले जाईल.

(17) ग्राहकांना धारण प्रमाणपत्र केव्हा दिले जाईल ?

एसजीबी दिल्याच्या तारखेसच ग्राहकांना धारण प्रमाणपत्र दिले जाईल. हे धारणपत्र, रोखे देणा-या बँका/एसएचसीआयएल कार्यालये/पोस्ट ऑफिसे/ स्टॉक एक्सचेंजेस /एजंट्स ह्यांच्याकडून गोळा केले जावे, किंवा अर्जामध्ये ई-मेल पत्ता दिला असल्यास, आरबीआयकडून ई-मेलवर थेट मिळविता येऊ शकते.

(18) मी ऑनलाईन अर्ज करु शकतो काय ?

होय. सूचीबध्द वाणिज्य बँकांच्या वेबसाईट मार्फत ग्राहक ऑनलाईन अर्ज करु शकतो. ऑनलाईन अर्ज करणारांसाठीची सुवर्ण रोख्यांची इश्यु किंमत, नाममात्र मूल्यापेक्षा प्रति ग्राम रु.50 ने कमी असेल आणि त्या अर्जाविरुध्दचे प्रदान डिजिटल रितीने केले जाते.

(19) बाँड्स कोणत्या किंमतीने विकले जातात ?

ह्या सुवर्ण रोख्यांची नाममात्र किंमत, भारतीय रुपयांमध्ये, वर्गणीच्या कालावधीच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 कामकाजाच्यां दिवसांसाठी, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन लिमिटेड ह्यांनी प्रसिध्द केलेल्या 999 शुध्दतेच्य सोन्याच्या बंद किंमतीच्या साध्या सरासरी किंमतीच्या आधारावर ठरविलेली असेल.

(20) सोन्याचा लागु असलेला दर आरबीआय दररोज प्रसिध्द करील काय ?

संबंधित फेरीसाठीचा सोन्याचा भाव/दर, ते इश्यु उघडण्या/सुरु होण्याच्या दोन दिवस आधी आरबीआयच्या वेबसाईटवर दर्शविला जाईल.

(21) विमोचन केल्यानंतर मला काय मिळेल ?

परिपक्वता झाल्यावर त्या सुवर्ण रोख्यांचे भारतीय रुपयांमध्ये विमोचन केले जाईल आणि विमोचनाचे मूल्य हे, पुनर् प्रदान केल्याच्या तारखेपासून मागील 3 कामकाजांच्या दिवसांच्या, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन लिमिटेड ह्यांनी प्रसिध्द केलेल्या 999 शुध्दतेच्या सोन्याच्या बंद किंमतीच्या साध्या सरासरी किंमतीवर आधारित असेल.

(22) विमोचनाची रक्कम मला कशी मिळेल ?

रोख विकत घेतेवेळी, ग्राहकाने दिलेल्या बँक खात्यात व्याज व विमोचनाची रक्कम जमा केली जाईल.

(23) विमोचन करण्यासाठीच्या कार्यरीती कोणत्या ?

  • रोख परिपक्व होत असल्याबाबत, तो परिपक्व होण्याच्या एक महिना आधी निवेशकाला कळविले जाईल.

  • परिपक्वतेच्या तारखेस, रेकॉर्डमधील तपशीलानुसार, परिपक्वतेची रक्कम निवेशकाच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

  • तपशीलामध्ये काही बदल असल्यास (जसे खाते क्रमांक, ई-मेल आयडी) निवेशकाने त्याच्या बँकेला/एसएचसीआयएल/पीओला त्याबाबत ताबडतोब कळविणे आवश्यक आहे.

(24) ह्या रोख्याचे रोखीकरण मी कोणत्याही वेळी करु शकतो काय ? मुदतपूर्व विमोचन करण्यास परवानगी आहे काय ?

ह्या रोख्याची मुदत 8 वर्षे असली तरीही, कुपन पेमेंट तारखांवरील रोख दिल्याच्या तारखेपासून पाचव्या वर्षानंतर ह्या रोख्याचे मुदतपूर्व रोखीकरण/विमोचन करण्यास परवानगी आहे. डिमॅट स्वरुपात रोखा ठेवला असल्यास त्याचे एक्सचेंजवर ट्रेडिंगही करता येईल. तसेच तो पात्र असलेल्या अन्य निवेशकालाही हस्तांतरित करता येईल.

(25) मला माझ्या ह्या गुंतवणुकीतून बाहेर पडावयाचे असल्यास मी काय करावे ?

मुदतपूर्व विमोचनाच्या बाबतीत, निवेशकांनी कुपन रिपेमेंट डेटच्या तीस दिवस आधी, संबंधित बँक/एसएचसीआयएल कार्यालय/पोस्ट ऑफिस/एजंटकडे जावे. मुदतपूर्व विमोचन करण्यासाठीची विनंती, तो निवेशक, कुपन पेमेंट तारखेच्या किमान एक दिवस आधी संबंधित बँक/पोस्ट ऑफिसात आल्यास मान्य केली जाईल. विमोचनाचे उत्पन्न, बाँडसाठी अर्ज करताना ग्राहकाने दिलेल्या त्याच्या खात्यात जमा केले जाईल.

(26) एखादा नातेवाईक किंवा मित्र ह्यांना, एखाद्या प्रसंगी, मी हा रोखा देणगी म्हणून देऊ शकतो काय ?

नातेवाईकाला/मित्राला/(प्रश्न क्र.4 मध्ये दिल्यानुसार) पात्रतेचे निकष पूर्ण करणा-या कोणत्याही व्यक्तीला, हे रोखे देणगी म्हणून देता येऊ शकतात/हस्तांतरित केले जाऊ शकतात. ह्या रोख्यांचे हस्तांतरण, सरकारी प्रतिभूती अधिनियम, 2006 व सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या तरतुदींनुसार, ते परिपक्व होण्यापूर्वी, हे रोखे देणा-या एजंटांकडे उपलब्ध असलेला हस्तांतरण संलेख सादर करुन करता येते.

(27) ह्या प्रतिभूती, मी कर्जासाठीचे तारण म्हणून वापरु शकतो काय ?

होय. ह्या प्रतिभूती, बँका, वित्तीय संस्था आणि अबँकीय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) ह्यांच्याकडून कर्ज घेण्यासाठी तारण म्हणून वापरण्यास पात्र आहेत. ह्याबाबतचे कर्ज-मूल्य गुणोत्तर, आरबीआयने वेळोवेळी विहित केलेल्या सामान्य सुवर्ण-कर्जाला लागु असल्याप्रमाणेच असेल. एसजीबींविरुध्द कर्ज देणे हे संबंधित बँक/वित्तीय एजन्सीच्या निर्णयावर अवलंबून असेल व कर्ज मिळवण्याचा हक्कच असल्याचे समजले जाणार नाही.

(28) (1) व्याज व (2) भांडवली लाभांवरील करांबाबत काय ?

आय कर अधिनियम, 1961 (1961 चा 43) च्या तरतुदीनुसार ह्या रोख्यांवरील व्याज कर पात्र असेल. एखाद्या व्यक्तीने केलेल्या एसजीबीच्या विमोचनामुळे निर्माण झालेल्या भांडवली-लाभ कराला सूट देण्यात आली आहे. रोख्याचे हस्तांतरण केल्यामुळे एखाद्या व्यक्ती झालेल्या दीर्घकालीन भांडवली लाभाबाबत इंडेक्सेशन लाभ दिले जातील.

(29) स्त्रोतामधूच कर वजावट (टीडीएस) करणे ह्या रोख्यांना लागु आहे काय ?

ह्या रोख्यांसाठी टीडीएस लागु नाही. तथापि, करविषयक कायद्यांचे अनुपालन करण्याची जबाबदारी रोखे-धारकाचीच आहे.

(30) हे रोखे दिल्यानंतर त्यानंतरच्या इतर ग्राहक सेवा कोण देईल ?

ह्या प्रतिभूती जेथून खरेदी केल्या गेल्या त्या बँका/एसएचसीआयएल कार्यालये/पोस्ट ऑफिसे/ नेमलेले स्टॉक एक्सचेंजेस / एजंट्स हेच, पत्त्यामधील बदल, मुदतपूर्व विमोचन, नामनिर्देशन, तक्रार निवारण, हस्तांतरणासाठीचे अर्ज इत्यादि सारख्या इतर ग्राहक सेवा पुरवतील.

(31) सार्वभौम सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणुक करण्यासाठी प्रदान करण्याचे पर्याय कोणते ?

रोख रक्कम (रु.20,000/- पर्यंत)/चेक/डिमांड ड्राफ्ट/इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण ह्यांच्या मार्फत प्रदान करता येऊ शकते.

(32) ह्या गुंतवणुकींसाठी नामनिर्देशन सुविधा उपलब्ध आहे काय ?

होय. सरकारी सिक्युरिटीज अधिनियम, 2006 व सरकारी सिक्युरिटीज विनियम 2007 च्या तरतुदीनुसार नामनिर्देशन उपलब्ध आहे. अर्जाच्या फॉर्म बरोबर नामनिर्देशनाच्या फॉर्मही उपलब्ध असतो. एखाद्या मृत गुंतवणुकदाराचा नामनिर्देशित असल्यामुळे/असल्यास, एखादी अनिवासी व्यक्ती, ती सिक्युरिटी त्याच्या नावावर हस्तांतरित करुन घेऊ शकते. मात्र त्यासाठी पुढील अटी आहेत.

(1) अनिवासी गुंतवणुकदाराने ती सिक्युरिटी पूर्व विमोचन किंवा परिपक्वतेपर्यंत धारण करणे आवश्यक असेल आणि

(2) त्या गुंतवणुकीचे व्याज व उत्पन्न प्रत्यावर्तनीय नसेल.

(33) हे रोखे मला डिमॅट स्वरुपात मिळू शकतात काय ?

होय. हे रोखे डि-मॅट खात्यात ठेवता येऊ शकतात. त्यासाठी, अर्जाच्या फॉर्ममध्येच तशी विनंती करण्यात यावी.

डिमटेरियलायझेशनची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे रोखे आरबीआयच्या पुस्तकात ठेवले जातील. ह्या रोख्यांचे वाटप झाल्यानंतर, त्यांचे डि-मॅट स्वरुपात रुपांतरण करण्याची सुविधाही उपलब्ध असेल.

(34) मी ह्या रोख्यांचे ट्रेडिंग करु शकतो काय ?

आरबीआयने अधिसूचित केलेल्या तारखेपासून हे रोखे ट्रेडेबल असतील (येथे नोंद घेण्यात यावी की, केवळ डिपॉझिटरीजमध्ये, डिमॅट स्वरुपात ठेवलेल्या रोख्यांचे स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेडिंग केले जाऊ शकते). सरकारी प्रतिभूती अधिनियम, 2006 च्या तरतुदींनुसार ह्या रोख्यांची विक्री व हस्तांतरणही केले जाऊ शकते.

(35) एखादा निवेशक मृत झाल्यास अनुसरण्याची रीत कोणती ?

त्या बाँडच्या नामनिर्देशितांनी आपल्या दाव्या/हक्कासह संबंधित रिसीव्हिंग ऑफिसमध्ये जावे. सरकारी सिक्युरिटीज विनियम 2007 च्या प्रकरण 3 सह वाचित, सरकारी सिक्युरिटीज अधिनियम 2006 तरतुदीनुसार, नामनिर्देशितांचा हक्क/दावा ओळखला जाईल. नामनिर्देशन केले नसल्यास, मृत धारकाच्या एक्झिब्युटर्सचा किंवा प्रशासकाचा दावा किंवा वारसा प्रमाणपत्र (भारतीय वारसा अधिनियमाच्या विभाग 10 खाली दिलेले) धारकाचा दावा, रिसीव्हिंग ऑफिसे/डिपॉझिटरींमध्ये सादर केला जावा. येथे नोंद घेण्यात यावी की, वरील तरतुदी अल्पवयीन निवेशकाच्या मृत्युबाबतही लागु आहे. अशा बाबतीत त्या बाँडचे शीर्षक (टायटल) हे नैसर्गिक पालकाला नव्हे तर, सरकारी सिक्युरिटीज अधिनियम, 2006 मध्ये दिलेले निकष पूर्ण करणा-या व्यक्तीकडे जाईल.

(36) पुट ऑप्शनची अंमलबजावणी करताना ह्या रोख्यांचे अंशतः प्रदान मला मिळू शकेल काय ?

होय. एक ग्रामच्या पटीमध्ये धारणाच्या काही भागाचे विमोचन करता येते.

(37) सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या बाबतीत, माझे प्रश्न/चौकशी ह्यासाठी मी आरबीआयशी कसा संपर्क करु शकेन ?

सार्वभौम सुवर्ण रोख्यांवरील जनतेचे प्रश्न स्वीकारण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने एक खास ई-मेल निर्माण केला आहे. निवेशक, ह्या ई-मेल आयडीवर त्यांचे प्रश्न ई-मेलने पाठवू शकतात.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä