Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
 ¤ÉÄEò´ªÉ´É½þÉ®ú
 SɱÉxÉ
 ‡´Énäù„ÉÒ SɱÉxÉ
 ºÉ®úEòÉ®úÒ ®úÉäJÉä ¤ÉÉVÉÉ®ú{Éä`ö
 BxÉ ¤ÉÒ B¡ò ºÉÒVÉ
 |ÉnùÉxÉ |ÉhÉɱÉÒ
½þÉä¨É >> B¡ò B CªÉÚVÉ - Display
Date: 14/10/2016
अबँकीय वित्तीय कंपन्या - सूक्ष्म वित्त संस्था (एनबीएफसी-एमएफआय)

(ऑक्टोबर 14, 2016 पर्यंत अद्यावत)

प्रश्न 1 : एनबीएफसी-एमएफआय म्हणून पंजीकरण करण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत ?

उत्तर : रिझर्व बँकेकडून पंजीकरण प्रमाणपत्र मिळविण्यासाठीची यादी, आरबीआयच्या वेबसाईटवर www.rbi.org.in उपलब्ध आहे. --- रेग्युलेशन --- नॉन बँकिंग --- फॉर्म्स -- एनबीएफसी - एमएफआयच्या पंजीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे नवीन कंपन्या आणि एनबीएफसी-एमएफआय च्या पंजीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे (विद्यमान एनबीएफसी) ही दिलेली यादी केवळ निर्देशक असून सर्वसमावेशक नाही. बँकेला तसे आवश्यक वाटल्यास, एनबीएफसी-एमएफआय म्हणून पंजीकरण मिळविण्यासाठी असलेल्या पात्रतेबाबत तिचे समाधान होण्यासाठी ही बँक आणखीही कागदपत्रे मागवू शकते.

प्रश्न 2 : एक एनबीएफसी-एमएफआय म्हणून अर्हता नसलेल्या एखाद्या एनबीएफसीवर कोणत्या मर्यादा घालण्यात आल्या आहेत ?

उत्तर : अशा एनबीएफसींकडे, ह्या निदेशांमध्ये व्याख्या केल्यानुसार, ‘क्वालिफायिंग अॅसेट्स’ चा निकष पूर्ण करण्याबाबत, तिच्या एकूण अॅसेट्सच्या 10% पेक्षा अधिक कर्जे म्हणून असू नयेत.

प्रश्न 3 : एखादी एनबीएफसी-एमएफआय धारण करत असलेल्या अॅसेट्सच्या उरलेल्या 15% वर काही निर्बंध आहेत काय ?

उत्तर : नाही. कोणतेही विशिष्ट निर्बंध नाहीत. तथापि, ह्या कर्जाच्या बाबतीत, एनबीएफसींना अटी व शर्तींबाबत दिलेल्या सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वांचे पालन, एनबीएफसी-एमएफआय ह्यांनी करणे आवश्यक आहे.

प्रश्न 4 : व्हॅरिअन्स नॉर्म्ससह, किंमती बाबतचे विनियम, अर्हताप्राप्त नसलेल्या अॅसेट्सना लागु नाहीत.

उत्तर : व्हॅरिअंस नॉर्म्स सह किंमत ठरविण्याचे विनियम, अर्हता नसलेल्या ऍसेटसना लागु नाहीत.

प्रश्न 5 : अर्हताप्राप्त अॅसेट्सखाली, छोट्या रकमेची (सुमारे रु.50,000) नूतनीकरण/सुधारणा कर्जे समाविष्ट केली जाऊ शकतात काय ?

उत्तर : गृह कर्जांच्या बाबतीत, साधारणतः निवासी एकक, तारण/गहाण ठेवले जाते. तथापि, तारणमुक्त कर्जांसह, अर्हताप्राप्त अॅसेट्सना लागु असलेल्या सर्व अटी पूर्ण झाल्या असल्यास, आणि उत्पन्न-निर्माणासाठीच्या कर्जाच्या 50% पेक्षा कमी नसलेली रक्कमेची अट पूर्ण केली असल्यास, त्या अॅसेट्सना अर्हताप्राप्त अॅसेट्स समजता येईल.

प्रश्न 6 : वैय्यक्तिक उपयोग/आणीबाणीचे प्रसंग ह्यासाठी एनबीएफसी-एमएफआय कर्ज देऊ शकतात काय ?

उत्तर : कर्जांच्या एकूण रकमेचा काही भाग (कमाल 50%), घराची दुरुस्ती, शिक्षण, वैद्यकीय व इतर आणीबाणीचे प्रसंग ह्या सारख्या इतर हेतूंसाठी दिला जाऊ शकतो. तथापि, एनबीएफसी-एमएफआयनी कर्जदाराला दिलेल्या एकूण कर्जांचा किमान 50% भाग, उत्पन्न निर्माणासाठी दिलेला असावा.

प्रश्न 7 : ‘कर्जाची किंमत’ खाली दिल्यानुसार, निधीचा खर्च काढण्यासाठी कोणकोणते घटक विचारात घेतले जावेत ?

उत्तर : निधीचा खर्चामध्ये पुढील घटक समाविष्ट असतील.

(1) व्याज प्रदानाबाबत झालेला खर्च
(2) सेवा करासह (मासिक अॅमोर्टायझेशन केलेला) प्रक्रिया शुल्क.
(3) मुद्रांक शुल्क आकार (मासिक अॅमोर्टायझेशन केलेला)
(4) डीडी आकार (मासिक अॅमोर्टायझेशन केलेला)
(5) वजा सुरक्षा ठेवीवर जमा झालेले व्याज.

प्रश्न 8 : निधीचा खर्च काढण्यासाठी, कर्जदात्या बँकेकडून मिळालेली नक्त कर्ज रक्कम (म्हणजे, कर्जाची रक्कम, वजा ठेव म्हणून ठेवलेली, कर्ज रकमेचा विशिष्ट भाग असलेली रोख तारण रक्कम) छेदामध्ये (डिनॉमिनेटर) वापरता येईल काय ?

उत्तर : निधीचा खर्च काढण्यासाठी, डिनॉमिनेटर काढण्यासाठी, एकूण कर्जामधून रोख तारण्याची रक्कम वगळण्यासाठी एनबीएफसी-एमएफआयना परवानगी नाही.

प्रश्न 9 : आवक (म्हणजे एमएफआय कर्जदारांकडून मिळालेली) व जावक (धनकोंना दिलेली) अशी दोन्हीही प्रक्रिया शुल्के, एनबीएफसी-एमएफआय कडून अॅमोरटाईझ केली जाऊ शकतात काय ?

उत्तर : प्रक्रिया शुल्के, ही ज्या काळात प्रदान केली/स्वीकारली जातात त्याच लेखा काळात पुस्तकामध्ये नोंदली जावीत आणि त्याचे अॅमोरटायझेशन करण्यास परवानगी नाही.

प्रश्न 10 : एखादी एनबीएफसी-एमएफआय तिच्या ग्राहकांना आकारु शकते असे प्रक्रिया-आकार कोणते ?

उत्तर : एनबीएफसी-एमएफआयने लावलेले प्रक्रिया आकार, सकल (ग्रॉस) कर्ज रकमेच्या 1% पेक्षा अधिक असू नयेत. हे प्रक्रिया आकार, मार्जिन कॅपमध्ये समाविष्ट करण्याची गरज नाही. ह्याशिवाय, एनबीएफसी, गट किंवा जनावरे, जीवन, स्वास्थ्य ह्यासाठीच्या विम्याचा केवळ प्रत्यक्ष खर्चच वसुल करेल.

प्रश्न 11 : एखादी एनबीएफसी-एमएफआय, तिच्या ग्राहकांना व्याजाचा विभेदक दर आकारु शकते काय ? होय असल्यास, आरबीआयने त्यावर काही मर्यादा घातली आहे काय ?

उत्तर : होय. एखादी एनबीएफसी-एमएफआय तिच्या ग्राहकांना व्याजाचा विभेदक दर आकारु शकते, परंतु, वैय्यक्तिक कर्जांसाठीच्या कमाल व किमान व्याजदरामधील फरक 4 टक्क्यांपेक्षा अधिक नसावा.

प्रश्न 12 : एखाद्या एनबीएफसी-एमएफआयकडून घेतलेल्या कर्जावर, ग्राहकाने द्यावयाचे आकार कोणते ?

उत्तर : एखाद्या कर्जाच्या खर्चात/किंमतीत फक्त तीन घटक असतात हे ग्राहकाने जाणणे आवश्यक आहे, म्हणजे, व्याज-आकार, प्रक्रिया आकार व विम्याचा हप्ता (ह्यात त्याबाबतचा प्रशासकीय खर्चही समाविष्ट आहे) वरील तीन घटनांव्यतिरिक्त, एखादी एनबीएफसी-एमएफआय अन्य कोणतेही आकार लावू शकत नाही.

प्रश्न 13 : एनबीएफसीने देऊ केलेल्या कर्जाबाबत ग्राहकाने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ?

उत्तर : ग्राहकाने पुढील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

(अ) उचित आचार संहितेखाली दिलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिल्यानुसार, एनबीएफसी-एमएफआयने, तिच्या कर्जदाराबरोबर करावयाच्या व्यवहारात औचित्य व पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे.

(ब) ‘अर्हताप्राप्त अॅसेट्स’ खाली समाविष्ट असलेल्या कर्जांच्या बाबतीत, कर्जदाराने, एनबीएफसी-एमएफआयकडे कोणतीही सुरक्षा ठेव/मार्जिन/तारण ठेवणे आवश्यक नाही.

(क) पुढील बाबी दर्शविणारे लोन कार्ड त्या एनबीएफसी-एमएफआय कडून मिळत असल्याची खात्री कर्जदाराने करुन घ्यावी.

(1) आकारण्यात आलेल्या व्याजाचा परिणामकारक दर
(2) त्या कर्जाशी जोडलेल्या इतर सर्व अटी व शर्ती
(3) ग्राहकाची योग्य ओळख पटविणारी माहिती
(4) मिळालेले हप्ते व अंतिम डिसचार्ज ह्यासह केलेल्या सर्व पुनर् प्रदानांबाबत एनबीएफसी-एमएफआयने दिलेली पावती
(5) ते कर्ज ‘अर्हताप्राप्त कर्ज’ म्हणून वर्गीकृत केले आहे काय ?

(ड) ह्या लोन कार्डांमधील सर्व नोंदी तेथील भारतीय भाषेमध्ये असाव्यात.

(ई) ग्राहकाला आकारण्यात येणारे व्याज, घटत्या शिल्लकेवर काढण्यात यावे.

(फ) विलंबाने केलेल्या प्रदानासाठी एनबीएफसी-एमएफआयकडून दंड लावण्यात येणार नाही.

प्रश्न 14 : एनबीएफची-एमएफआयकडून आकारला जाणारा विद्यमान/चालु व्याजदर ग्राहकाला कसा कळेल ?

उत्तर : एखाद्या एनबीएफसी-एमएफआयच्या सर्व कार्यालयांमध्ये, तिने दिलेल्या पत्रके/पुस्तिका साहित्यामध्ये आणि तिच्या वेबसाईटवरही, तिच्याकडून आकारण्यात येणारा परिणामकारक व्याजदर ठळकपणे प्रदर्शित करणे, आरबीआयने, एनबीएफसी-एमएफआयलाही अपरिहार्य केले आहे.

प्रश्न 15 : मुदतपूर्व प्रदान केल्यास एनबीएफसी-एमएफआय दंड लावू शकते काय ?

उत्तर : एनबीएफसी-एमएफआय, मुदतपूर्व प्रदानाबाबत कोणताही दंड लावू शकत नाही.

प्रश्न 16 : एसएचजी/जेएलजी चे वैय्यक्तिक सभासद, आणि/किंवा एखादी एसएचजी/जेएलजी/व्यक्ती कर्ज घेऊ शकते अशा एनबीएफसी-एमएफआयच्या संख्येवर मर्यादा आहे काय ?

उत्तर : एखादा कर्जदार केवळ एकाच एसएचजी/जेएलजीचा सभासद होऊ शकतो. एखाद्या एसएचजीचा सभासद म्हणून किंवा एखाद्या जेएलजीचा सभासद म्हणून किंवा त्याच्या वैय्यक्तिक क्षमतेत, एनबीएफसी-एमएफआयकडून कर्ज घेऊ शकतो. ह्याशिवाय, एखादा एसएचजी किंवा जेएलजी किंवा एखादी व्यक्ती, दोन पेक्षा अधिक एनबीएफसी-एमएफआयकडून कर्ज घेऊ शकत नाही.

प्रश्न 17 : एखाद्या क्रेडिट इन्फर्मेशन कंपनीचा सभासद असणे एनबीएफसी-एमएफआयसाठी अत्यावश्यक आहे काय ?

उत्तर : प्रत्येक एनबीएफसी-एमएफआयसाठी, सीआयसी विनियामक अधिनियम 2005 खाली स्थापन झालेल्या सर्व क्रेडिट इन्फर्मेशन कंपन्यांचा (सीआयसी) सभासद होणे, आणि एसएचजी/जेएलजी ह्यांच्या सभासदत्वां बाबतच्या अटींचे अनुपालन, कर्ज बाजारीपणाचा स्तर आणि कर्ज घेण्याबाबतचे स्त्रोत, ह्याबाबत त्यांच्याकडे असलेल्या माहितीचा केलेला उपयोग, ह्याबाबतची माहिती त्या सीआयसींना वेळेवारी व बिनचुकपणे पुरविणे आवश्यक आहे. सीआयसींकडे असलेली माहिती व व्याप्ती सशक्त/सबळ होण्यास त्या सीआयसींना थोडा वेळ लागू शकतो. अशा परिस्थितीत एनबीएफसी-एमएफआय ह्यांनी कर्जदारांनी दिलेली स्वयं-प्रमाणपत्रे, वरील दृष्टिकोनातून त्यांनी केलेल्या चौकशा तसेच वार्षिक उत्पन्न ह्यावर विसंबून राहावे.

प्रश्न 18 : एनबीएफसी-एमएफआयच्या बाबतीत लागु असलेला किमान मोरेटोरियमचा कालावधी काय ?

उत्तर : कर्ज दिले जाणे व त्याचा पहिला हप्ता भरण्याची ठरविलेली तारीख ह्यांच्या दरम्यान किमान मोरेटोरियम कालावधी ठेवला जाणे आवश्यक आहे. हा मोरेटोरियमचा कालावधी पुनर् प्रदानाच्या वारंवारतेपेक्षा कमी नसावा. उदा. साप्ताहिक परतेफेडीच्या बाबतीत, मोरेटोरियम एक आठवड्यापेक्षा कमी असणार नाही.

प्रश्न 19 : एनबीएफसी-एमएफआय कडून वसुली साठी वापरण्यात येणा-या रीतींबाबत अनेक प्रश्न आहेत. आरबीआयने हा प्रश्न कसा सोडविला आहे ?

उत्तर : काही एनबीएफसी-एमएफआयकडून वसुली करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सुधारित रीतींची दाद घेऊन, आरबीआयने अपरिहार्य केले आहे की, आरबीआयने एनबीएफसींना वेळोवेळी दिलेल्या उचित आचार संहितेवरील मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन, एनबीएफसी-एमएफआयने, त्यांच्या फील्ड स्टाफची नेमणुक, प्रशिक्षण व पर्यवेक्षण ह्यासाठी एक आचार संहिता व प्रणाली ठेवली असल्याची खात्री करुन घ्यावी. त्याचप्रमाणे ठरविलेल्या केवळ एकाच केंद्रीय ठिकाणामधून वसुली केली जावी. लागोपाठ दोन किंवा अधिक प्रसंगी, कर्जदार अशा केंद्रीय वसुली कार्यालयात गैरहजर राहिला असल्यासच, कर्जदाराच्या घरी किंवा कामाच्या जागी जाऊन वसुली करण्याची परवानगी फील्ड स्टाफला देण्यात यावी.

प्रश्न 20 : एखादी एनबीएफसी-एमएफआय व अन्य एनबीएफसी ह्यांना लागु असणा-या अॅसेट-वर्गीकरण व तरतुदीकरण निकष ह्यात काही फरक आहे काय ?

उत्तर : होय. ‘अर्हताप्राप्त अॅसेट्स’ च्या व्याख्येखाली असलेल्या अॅसेट्सच्या बाबतीत, एनबीएफसी-एमएफआयना लागु असलेल्या नॉर्म्समध्ये फरक आहे. एनबीएफसी-एमएफआयच्या अशा ‘अर्हताप्राप्त अॅसेट्स’ साठी, प्रमाणभूत नसलेला अॅसेट म्हणजे, 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी, ज्याबाबतचे व्याज/मुद्दल प्रदान थकित (ओव्हर ड्यु) झाले आहे असा अॅसेट तरतुदीकरणाचे नॉर्म्स पुढीलप्रमाणे आहेत.

  • 90 दिवसांपेक्षा अधिक व 180 दिवसांपेक्षा कमी असलेल्या काळासाठी थकित झालेल्या एकूण कर्ज हप्त्यांच्या 50 टक्के.

  • 180 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी थकित झालेल्या एकूण कर्ज-हप्त्यांच्या 100 टक्के.

‘अर्हताप्राप्त अॅसेट्स’ चे निकष पूर्ण न करणा-या अॅसेट्ससाठी, इतर एनबीएफसींना लागु असलेले तरतुदीकरण निकष लागु होतील.

प्रश्न 21 : एनबीएफसी-एमएफआयसाठीच्या कॅपिटल अॅडेक्वसी आवश्यकता कोणत्या ?

उत्तर : सर्व एनबीएफसी-एमएफआय, त्यांच्या एकूण जोखीम भारित अॅसेट्सच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेले, टायर 1 व टायर 2 भांडवल समाविष्ट असलेले कॅपिटल अॅडेक्वसी गुणोत्तर ठेवतील. कोणत्याही वेळी एकूण टायर भांडवल हे, टायर 1 भांडवलाच्या 100 टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.

प्रश्न 22 : एनबीएफसी-एमएफआयसाठी क्रेडिट कॉनसेंट्रेशन नॉर्म्स लागु आहेत काय ?

उत्तर : नाही. एनबीएफसी-एमएफआयना क्रेडिट कॉनसेंट्रेशन नॉर्म्स लागु नाहीत.

प्रश्न 23 : एबी आधारित पोर्टफोलिओजना आधी देण्यात आलेल्या वाटपांव्यतिरिक्त, एनबीएफसी-एमएफआयसाठी द्यावयाच्या, तरतुदीकरण व जोखीम भार ह्यावर काही अतिरिक्त वाटप/वितरण आहे काय ?

उत्तर : होय. सूक्ष्म व लघु उद्योगांसाठीच्या क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टने हमी दिलेल्या कर्ज सुविधांच्या धर्तीवर देण्यात आलेल्या कर्जांना शून्य जोखीम भार दिला जाईल आणि हमी देण्यात आलेल्या भागासाठी कोणतेही तरतुदीकरण करण्यात येणार नाही.

प्रश्न 24 : एनबीएफसी-एमएफआयच्या कार्यकृतींच्या देखरेखीमध्ये, स्वयं-विनियामक संस्थेची (एसआरओ) भूमिका कोणती ?

उत्तर : एनबीएफसी-एमएफआयच्या ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने, सूक्ष्म वित्त देणा-या अबँकीय वित्तीय कंपन्यांकडून (म्हणजेच एनबीएफसी-एमएफआय), विनियम, आचार संहिता व कार्य ह्यांचे पालन करण्यास औधोगिक संघांनी (येथे एसआरओ) मदत करणे अपेक्षित आहे. औद्योगिक संघ/एसआरओ मध्ये, एनबीएफसी-एमएफआयचे सभासदत्व असणे, ह्याकडे, व्यापार, कर्जदार व धनको, एक विश्वासाचे प्रतिक/चिन्ह म्हणून पाहतील, आणि सभासदत्व काढून घेतले गेल्यास अशा काढून टाकलेल्या एनबीएफसी-एमएफआयच्या प्रतिष्ठेवर तो एक आघात समजला जाईल.

प्रश्न 25 : सूक्ष्मवित्त क्षेत्राच्या संबंधात एखाद्या एसआरओची जबाबदारी कोणती ?

उत्तर : रिझर्व बँकेकडून मान्यता मिळालेल्या एसआरओला, काही कार्ये व जबाबदा-या घ्याव्या लागतील. जसे - आचार संहिता तयार करणे व वितरित करणे, एनबीएफसी-एमएफआयच्या ग्राहकांसाठी तक्रार/वाद निवारण यंत्रणा ठेवणे, ग्राहक शिक्षण व संरक्षण खात्रीपूर्वक होत असल्याची जबाबदारी घेणे, रिझर्व बँकेने तयार केलेल्या विनियामक साचाच्या, एनबीएफसी-एमएफआयने केलेल्या अनुपालनावर देखरेख ठेवणे, सूक्ष्मवित्त क्षेत्रावर नजर ठेवणे, सभासद, स्वयंसेवा गट इत्यादींसाठीचे प्रशिक्षण व जाणीव कार्यक्रम, भावी वार्षिक अहवालासह तिची वित्तीय स्थिती रिझर्व बँकेला कळविणे.

प्रश्न 26 : स्वयं-विनियामक संस्थेचा (एसआरओ) सभासद होणे एनबीएफसी-एमएफआयसाठी आवश्यक आहे काय ?

उत्तर : एसआरओचे सभासदत्व असणे अपरिहार्य नाही. तथापि, किमान एका तरी एसआरओचे स्वेच्छेने सभासद होण्यासाठी एनबीएफसी-एमएफआयना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä