Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
����� >> +?vɺ��S�x�� - Display
Note : To obtain an aligned printout please download the (145.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 26/06/2019
नाण्यांचा स्वीकार करणे

आरबीआय/2018-19/223
डीसीएम (एनई) क्र.3057/08.07.18/2018-19

जून 26, 2019

व्यवस्थापकीय संचालक
मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व बँका

महोदय/महोदया,

नाण्यांचा स्वीकार करणे

वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीसीएम (आरएमएमटी) क्र. 2945/11.37.01/2017-18 दि. फेब्रुवारी 15, 2018 आणि नोटा व नाणी बदलून देण्याचा सुविधेवरील आमचे महापरिपत्रक डीसीएम (एनई) क्र.जी-2/08.07.18/2018-19 दि. जुलै 2, 2018 च्या (जानेवारी 14, 2019 रोजी अद्यावत केलेले) परिच्छेद 1(ड) कडे आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो. त्यात सांगण्यात आले होते की, कोणत्याही बँक शाखेने त्यांच्या काऊंटर्सवर सादर केलेल्या छोट्या मूल्याच्या नोटा आणि/किंवा नाणी स्वीकारण्यास नकार देऊ नये.

(2) तथापि, शाखांकडून नाणी स्वीकार करण्यास नकार दिल्या गेल्याच्या व त्यामुळे जनतेला मोठा त्रास होत असल्याच्या तक्रारी रिझर्व बँकेकडे अजूनही येतच आहेत.

(3) ह्यासाठी आपणास पुनश्च सांगण्यात येते की, आपण आपल्या सर्व शाखांना ताबडतोब कळवावे की त्यांनी त्यांच्या काऊंटर्सवर, व्यवहारांसाठी किंवा बदलण्यासाठी सादर केलेल्या सर्व मूल्याच्या नाण्यांचा स्वीकार करुन ह्याची कडक अंमलबजावणी होत असल्याची खात्री करुन घ्यावी.

आपला,

(अजय मिचयारी)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक

 
  © ��ɮ�i�Ҫ� ���Zɴ�� ���E�, �ɴ�� ��CE� ����v��x�

S���Mɱ��� o����ɺ��`�� +ɪ� <� 5 �� i��ɴɮ�ұ� 1024 X 768 ���Z��䱪�ք�x� +��ɴ��